Author: Vikas Patil

कुंभमेळ्यात नाशिक, त्र्यंबकेश्वरचा प्रवास सुखद होणार महामार्ग विस्तारीकरण, रस्ता मजबुतीकरणासाठी २२७० कोटी नाशिक (प्रतिनिधी)– सिंहस्थ कुंभमेळ्यात कोणत्याही भागातून रस्ते मार्गाने नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणाऱ्या भाविकांना सुखद व जलद प्रवासासाठीची तयारी प्रशासनाने चालविली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाचे सहापदरीकरण, कॉक्रीटीकरण, नाशिक-दिंडोरी-वणी रस्त्यासह अन्य राज्य मार्गांचे मजबुतीकरण, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहराच्या सभोवताली वर्तुळाकार रस्त्याचे जाळे विणले जाणार आहे. या कामांसाठी २२७० कोटींची तजविज अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यातही भाविक उत्स्फुर्तपणे सहभागी होतील, हे गृहीत धरून नियोजनात व्यापक फेरबदल केले जात आहे. तयारीला कालावधी कमी असल्याने दीड ते दोन वर्ष लागणारी कामे तातडीने सुरू करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण…

Read More

महिलेसह प्रियकराची रेल्वेखाली आत्महत्या नांदगाव (प्रतिनिधी)- वारंवार मिळणाऱ्या धमक्यांना कंटाळून महिला आणि तिच्या प्रियकराने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथील शनिदेव मंदिराजवळ ही घटना घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याने १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येवला तालुक्यातील व्यक्तीने नांदगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, नांदगाव तालुक्यात राहणाऱ्या त्यांच्या बहिणीचे तिच्या गावातील एकाशी प्रेमसंबंध होते. मात्र, काही लोकांनी त्यांच्या नात्याला विरोध करत त्यांना वारंवार धमक्या दिल्याने मानसिक छळाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मंगळवारी रात्री महिलेने तिच्या भावाला व्हॉट्स ॲपवर संदेश पाठवला. त्यात तिने आत्महत्येस जबाबदार असलेल्या १६ जणांची नावे नमूद केली होती. महिलेचे नातेवाईक मनमाड पोलीस…

Read More

४४३५ सहायक प्राध्यापकांची लवकरच भरती मुंबई (प्रतिनिधी)- अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांची ४ हजार ४३५ रिक्त पदे भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. त्रुटींची पूर्तता करुन लवकरच भरतीला गती देण्यात येईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य जयंत आसगावकर यांनी प्राध्यापकांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी चर्चेला उत्तर देताना भरतीत पारदर्शकतेसाठी राज्यपालांनी स्थगिती देऊन बदल सूचवले होते. आता ही स्थगिती उठविल्यामुळे छाननी करून पारदर्शक भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे, असे पाटील यांनी सांगितले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सुधारित पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करताना वर्कलोडमध्ये बदल…

Read More

हतनूर धरणातून होतोय दररोज 25 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन जळगाव (प्रतिनिधी) – मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढताना दिसत आहे. तापमानाचा परिणाम धरणाच्या जलसाठ्यावर होऊ लागला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे हतनूर धरणातून दररोज 25 दलघमी बाष्पीभवन होत आहे. हतनूर धरणात गतवर्षीपेक्षा यंदा २.०३ टक्के साठा कमी आहे. गतवषर्षापेक्षा तो कमी असला तरी उन्हाळ्यात हतनूरवर अवलंबून असलेल्या गावांना टंचाई निर्माण होणार नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली. जळगाव जिल्ह्यातील वरणगाव तालुक्यातील हातनुर धरण हे भुसावळ शहरासह विभागातील ११० गावे, औद्योगिक प्रकल्प, नगरपालिका क्षेत्रांची तहान भागवते. या धरणाच्या पाण्यावर वीज निर्मिती अवलंबून आहे शेतीदेखील धरणावरच अवलंबून आहे. हतनूर धरणातून यंदा सिंचनासाठी चार,…

Read More

लाचखोर सहायक अभियंत्यास अटक चोपडा (प्रतिनिधी) – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव युनिटने सापळा कारवाईत सहायक अभियंता अमित सुलक्षणे (वय 35) याला लाच घेताना रंगेहात पकडले असल्याने खळबळ उडाली आहे. चोपडा शहरात आरोपी अमित सुलक्षणे महावितरण कंपनी चोपडा शहर कक्षा 2 मध्ये सहायक अभियंता आहे. त्याने 23 वर्षीय तक्रारदाराच्या घरात नवीन वीज मीटर बसवण्यासाठी 5,500 रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 4,500 रुपये ठरवण्यात आले. आज त्याला ही लाच स्वीकारताना पकडण्यात आले. काल तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, 12 मार्च रोजी सापळा रचून आरोपीला लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. या कारवाईनंतर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Read More

२९ गावांमध्ये अतिवृष्टीचे पंचनामेच नाहीत शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयावर धडकले अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पीक नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देणे आवश्यक आहे. मात्र, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे २९ गावांमध्ये पंचनामेच झाले नाहीत. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देत निषेध केला. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. सोयाबीन, कापूस, मका, ज्वारीसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र, काही गावांमध्ये ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी विभागाचे कर्मचारी यांनी पंचनामे केलेच नाहीत. यामुळे शेतकरी भरपाईपासून वंचित आहेत. शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.…

Read More

न्यूझीलंडकडून भारताला २५२ धावांचे लक्ष्य दुबई ( वृत्तसंस्था)- चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा डाव २५१ धावांवर आटोपला. त्यामुळे भारताला विजयासाठी २५२ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, पण भारतीय गोलंदाजांनी त्यांना नियमित अंतराने झटके दिले. ११ व्या षटकात कुलदीप यादवने रचिन रवींद्रला बाद करत पहिला धक्का दिला. रचिनने २९ चेंडूत ३७ धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडने २० व्या षटकात १०० धावांचा टप्पा पार केला. डॅरिल मिशेल आणि टॉम लॅथम यांनी संघाला सावरत १०० धावांपर्यंत पोहोचवले. मात्र, २४ व्या षटकात टॉम लॅथम (१४) रवींद्र…

Read More

घरी बसून गंगेचे पाणी अस्वच्छ म्हणणे चुकीचे – आमदार राम कदम मुंबई (प्रतिनिधी)- मी कुटुंबासोबत तीन वेळेस कुंभमेळ्यात पवित्र स्नान केलं आहे. अनेक नेते, अभिनेते, उद्योगपती, साधू-संत सगळेच लोक पवित्र स्नानासाठी गेले. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की, देशभरातील 57 कोटी लोक संगमावर आले. तिथले पाणी स्वच्छ होते. त्यामुळे जे गेलेच नसतील त्यांनी घरी बसून पाणी अस्वच्छ असे म्हणणे चुकीचे आहे. त्या 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात, असा पलटवार भाजप आमदार राम कदम यांनी राज ठाकरे यांच्यावर केलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 19 वा वर्धापन दिन सोहळा आज चिंचवडमधल्या रामकृष्ण मोरे सभागृहात सोहळा पार पडला. या सोहळ्यात…

Read More

जिल्हा रूग्णालयात रूग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांसह नर्सिंग स्टॉफला धक्काबुक्की जळगाव ( प्रतिनिधी) – हल्ल्यात जखमी तरुणावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची कॉलर पकडून त्याच्या नातेवाईक व इतरांनी धक्काबुक्की केली . हीघटना शुक्रवारी मध्यरात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडली. सात जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जुन्या भांडणातून ७ मार्च रोजी रात्री काट्याफाईल भागात राहुल शिंदेला मारहाण करून त्याच्यावर वार करण्यात आले होते. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे मध्यरात्री उपचार सुरू असताना जखमीसोबत आलेले नातेवाईक व मित्रांपैकी काही जण खासगी रुग्णालयात घेऊन जाण्याविषयी तर काही जण लवकर उपचार करा, असे म्हणत शिवीगाळ करू लागले. एक जण…

Read More

माजी नगरसेवकाची नऊ लाखांत फसवणूक जळगाव (प्रतिनिधी) – मुलाला रेल्वेत नोकरी लावून देतो असे आश्वासन देत जळगावचे माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांची नऊ लाख 18 हजार 500 रुपयांत ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. नवनाथ दारकुंडे (55, रा. शिवाजीनगर, जळगाव) यांना त्यांच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगून किरण सानप, संगीता सानप, समीक्षा सानप (तिघे रा. ठाणे), शैलेश शुक्ला (रा. मुंबई) आणि दिवाकर राय (रा. दिल्ली) या पाच जणांनी वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने 9 लाख 18 हजार 500 रुपये स्वीकारले. त्यांच्या मुलाला नोकरी लावून न देता त्यांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात…

Read More