Author: Vikas Patil

छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते-संभाजी भिडे मुंबई (प्रतिनिधी)- शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला. आपल्याकडील प्राध्यापक, शिक्षक मात्र चुकीचा इतिहास मांडत आहेत, असे मत व्यक्त केले आहे . काहीजण आपल्या सोयीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भिडे म्हणाले की,”छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मीय नव्हते. काही लोकांनी हे चिकटवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हिंदु धर्माच्या रक्षणासाठीच होते. इतिहासाचा अभ्यास असलेले आणि छत्रपती शिवाजी महाराज…

Read More

इलेक्ट्रिक वाहने आता करमुक्त मुंबई ( प्रतिनिधी )- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत राज्यात इलेक्ट्रिक वाहनांवरील कर पूर्ण रद्द करण्याची घोषणा केली. सध्या 30 लाखांपर्यंतच्या ईव्ही वाहनांवर कोणताही कर लावला जात नाही, 30 लाखांवरील लक्झरी सेगमेंटसाठी 6 टक्के कर आकारला जात होता. मात्र, आता हा कर पूर्ण रद्द करण्यात आला आहे. अधिकृत घोषणा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत करतील, असेही फडणवीस यांनी सांगितले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करत, “पूर्वी मुख्यमंत्री स्वतः रस्ते धुवायला जायचे, आत्ताचे मुख्यमंत्री जाणार का?” असा खोचक सवाल केला. यावर फडणवीस हसत म्हणाले, “परब यांनी मला रस्त्यावर…

Read More

भाजपकडून मुस्लिमांना ‘सौगात-ए-मोदी’ मुंबई ( प्रतिनिधी )- रमजान ईदसाठी भाजपने मुस्लिम बांधवांना भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप अल्पसंख्याक मोर्चाने देशातील 32 लाख गरीब मुस्लिमांना ‘सौगात-ए-मोदी’ किट देण्याची घोषणा केली आहे. ईद साजरी करताना अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. रमजानच्या पवित्र महिन्यात गरजू शेजाऱ्यांना मदत करण्याचा परंपरेला चालना देत भाजपने मुस्लिम समाजासाठी हे पाऊल उचलले आहे. पश्चिम बंगाल आणि बिहार निवडणुकीपूर्वी मुस्लिम समाजात आपली स्वीकारार्हता वाढवण्यासाठी भाजपकडून अभियान राबवले जात आहे. अल्पसंख्याक मोर्चाचे 32 हजार पदाधिकारी देशभरातील 3 हजार मशिदींमध्ये भेट देऊन 32 लाख गरजू मुस्लिमांना मदत करतील. दिल्लीतील निजामुद्दीन येथून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष…

Read More

युक्रेनमध्ये ‘एमबीबीएस’ प्रवेशाच्या आमिषाने डॉक्टरांना ७ लाख ३० हजारांत गंडवले जामनेर (प्रतिनिधी) – युक्रेनमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका डॉक्टरांची ३ भामट्यांनी ७ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. फत्तेपूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. सुनील चव्हाण (वय ५२, रा. कापूसवाडी, ता. जामनेर) हे वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांच्या मुलाला युक्रेनमधील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन महेश वाघमारे (रा. मुंबई), राहुल शर्मा आणि प्रेरणा कौशिक (रा. दिल्ली) या तिघांनी दिले होते. या तिघांनी संगनमत करून सुनील चव्हाण यांच्याकडून ७ लाख ३० हजार रुपये घेतले आणि…

Read More

“आडवे आले तर कायमचा धडा शिकवा”; आरोपी पंटरांना वाल्मिक कराडचा निरोप बीड ( प्रतिनिधी )- संतोष देशमुख हत्याकांडात ७ डिसेंबर, २०२४ रोजी रात्री आठ वाजता वाल्मीक कराडला सुदर्शन घुलेने फोन केला. फोनवर घडलेली हकीकत सांगितली. यावेळी कराड यांनी अडथळा आणतील त्यांना संपवा असा निरोप वाल्मिक कराडने दिल्याची कबुली घुलेने दिली आहे. (त्याचे पुरावे सादर केले आहेत); हा महत्वाचा मुद्दा आज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या खटल्याच्या पहिल्याच सुनावणीत न्यायालयात मांडला. संतोष देशमुख हत्याकांडाची आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासारखा हायप्रोफाईल वकील हा खटला लढवत असल्याने सुनावणीला महत्त्व प्राप्त झाले होते. ते…

Read More

जिल्हा बँकेकडून 31 मार्चपूर्वी कर्जफेडीवर शून्य व्याज जळगाव ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातील सर्व विकास कार्यकारी सोसायटी व जिमस बँकेच्या वैयक्तिक कर्जदार शेतकरी सभासदांनी 2024-25 या चालू आर्थिक वर्षात घेतलेल्या पीक कर्जाच्या फक्त मुद्दल रकमेचा भरणा 31 मार्चपूर्वी केल्यास शून्य व्याजाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जफेड करून फायदा करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी केले आहे. शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम मुदतीत भरता यावी म्हणून बँकेने 30 आणि 31 मार्च या सुटीच्या दिवशी सर्व शाखा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जदार सभासदांनी या सोयीचा लाभ घ्यावा आणि कर्ज वेळेत परतफेड करून पुढील पत वाढल्याच्या आधारावर नवीन पीककर्ज…

Read More

दोन लाखांच्या चोरीचा महिलांवर संशय धरणगाव (प्रतिनिधी)- धरणगाव शहरातील एका कॉम्प्युटर सेंटरमध्ये पिशवीत ठेवलेल्या पाच लाख रुपयांच्या रोकडमधून दोन लाखाची रोकड सफाईने काढुन संशयितांनी पोबारा केला. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन संशयित महिला कैद झाल्या आहेत. धरणगाव येथील बालाजी कॉम्प्युटर सेंटरमध्ये २० मार्च रोजी सकाळी ही चोरी झाली. सुविधा केंद्राच्या टेबलाजवळ पिशवीत पाच लाखाची रोकड होती. केंद्रात दोन महिला आल्या. कामाबाबत त्यांनी विचारपूस करत पिशवीतून दोन लाखाची रोकड नेली. भुषण पाटील (वय ३५, रा. धरणगाव) यांच्या तक्रारीनुसार धरणगाव पोलीस ठाण्यात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करत तपासाला गती दिली आहे. हवालदार चंदुलाल सोनवणे तपास करीत…

Read More

ग्रामसेवकांसारखेच ग्रा.प. सदस्यही अडचणीत येण्याची शक्यता जळगाव ( प्रतिनिधी)- २५० पैकी १५० ग्रामपंचातींनी १५ व्या वित्त आयोगातून ६० ते ६५ टक्क्यांपेक्षा अधिकचा निधी खर्च केलेला नाही. अशा ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना ग्रामपंचायतींचे दप्तर घेऊन, जिल्हा परिषदेत तपासणीसाठी बोलाविण्यात आले आहे. २०० कोटीं अद्यापही अखर्चित असल्याने आणि दप्तर तपासणी दरम्यान काही तफावत आढळल्यास ग्रामसेवक व ग्रामपंचायतीचे सदस्यही अडचणीत येऊ शकतात. १५ वा वित्त आयोग निधी वेळेत खर्च करण्याचे आदेश देऊनही विलंब केल्याने जिल्ह्यातील २५० ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेकडून नोटिसा बजावून खुलासा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून होणाऱ्या कामांचे नियोजन न केल्यास या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. प्रशासनाकडून…

Read More

आ. खडसेंकडून मंत्री देसाईंचे संतापात अभिनंदन! जळगाव (प्रतिनिधी)- विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषदेत एकनाथ खडसे चांगलेच संतापलेले दिसले. राज्यात इतर महत्त्वाचे प्रश्न असताना औरंगजेब आणि कामराची चर्चा झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यात ४२ मंत्री असतानाही सभागृहात केवळ एकच मंत्री सहभागी असल्यानेही संताप व्यक्त करत उपस्थित एकटेच मंत्री शंभुराज देसाई यांचे खडसेंनी अभिनंदन केले !. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेसाठी सभागृहात जास्तीत जास्त मंत्र्यांनी उपस्थित राहावे, ही अपेक्षा असते, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. मला माहिती आहे, तुम्हाला खूप काम असते. रात्री जागरणं होतात. त्यामुळे सकाळी उठायला वेळ होतो, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले. त्यावर शंभुराज देसाई यांनी मी…

Read More

राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे विधानसभा उपाध्यक्षपदी मुंबई ( प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या पदासाठी केवळ महायुतीच्यावतीने बनसोडे यांचा अर्ज आला होता. आज दुपारी त्यांच्या निवडीचा प्रस्ताव आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. विधानसभा उपाध्यक्षपदासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचे नाव चर्चेत होतेच मात्र त्यांशिवाय लातूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोडे, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले या तिघांची नावे चर्चेत होती. अण्णा बनसोडे उपमुख्यमंत्री अजित…

Read More