Author: Vikas Patil

जिल्ह्यात १३ हजार बचत गटांना ३४० कोटी कर्जाचे वाटप जळगाव (प्रतिनिधी)- उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवनन्नोती अभियानांतर्गत जिल्ह्यात आयोजित तीन दिवसीय विशेष कॅम्पअंतर्गत पहिल्यादिवशी २० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ३० हजार स्वयंसहाय्यता समूहांमध्ये ३ लक्ष महिला आहेत. जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत जिल्ह्यासाठी असलेल्या उद्दिष्टापैकी यावर्षी ३४० कोटी रुपये १३ हजार स्वयंसाहायता समूहांना कर्ज स्वरूपात दिलेले आहे. २६ व २७ मार्चरोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महिला बचत गटांसाठी विशेष कॅम कर्जवाटप पीएमईजीपी योजना तथा पीएमएफएमई योजना संदर्भात बँक स्तरावर आयोजित करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास २२० शाखांमध्ये कर्ज वाटप कॅम्प सुरू करण्यात आले…

Read More

दुचाकी चोराला अटक, ४ वाहने जप्त जळगाव (प्रतिनिधी)- एलसीबीच्या पथकाने गोलाणी मार्केटमधील दुचाकी चोरीचा छडा लावताना ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. संशयित विक्रम चव्हाणला अटक केली त्याच्याकडून ४ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. जळगांव शहर पो.स्टे.ला मोटारसायकल चोरीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा पथकास गोपनीय बातमीदारामार्फत विक्रम चव्हाण (रा.वसंतवाडी) चोरीच्या मोटारसायकल वापरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. पथकाने विक्रम चव्हाण त्याचे घरी असल्याची बातमी मिळाल्यावरून त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडून चौकशीत जळगांव शहर पो.स्टे.ला दाखल गुन्ह्यातील मो.सा.(क्र.एमएच १९ डीयू ८२३५) हिरो होंडा स्प्लेंडर, (एमएच १९ इसी ३९६८) होंडा शाईन, (एमएच १९बीबी ६००५) हिरो होंडा स्प्लेंडर प्रो आणि…

Read More

रेल्वे आरक्षण ई-तिकिटांचा काळाबाजार ; तरुणाला अटक जळगाव (प्रतिनिधी)- पुणे सायबर सेलने रेल्वे आरक्षण ई-तिकिटांच्या अवैध व्यवहाराचा पर्दाफाश केला आहे. संशयास्पद युजर आयडीच्या मदतीने तिकिटे बनविणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. भुसावळचे वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त, यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. संशयित आरोपीचे नाव ज्ञानेश्वर गुलाब पाटील (वय ३८,वर्षे, रा. मुकटी, ता. धुळे) आहे. २६ रोजी पुणे सायबर सेलकडून रेल्वे आरक्षण ई-तिकिटांच्या काळाबाजारामध्ये संलग्न संशयिताबाबत माहिती मिळाली. त्यानुसार रेल्वे संरक्षण दल चौकी चाळीसगाव येथे गुन्हा नोंदवण्यात आला. पथकाने आरोपीकडून २४३ ई-तिकिटे जप्त केली आहेत. या तिकीटांची किंमत ४ लाख २० हजार ९६२ रुपये आहे. यात ८८ आगाऊ प्रवासाची तिकिटे,…

Read More

६ दरोडेखोरांची टोळी फरार : एकाला अटक मुक्ताईनगर (प्रतिनिधी)- येथील लालगोटा-धुळे रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या ७ जणांच्या टोळीतील एकाला पकडण्यात यंत्रणेला यश आले अन्य सहा संशयित पसार झाले आहेत. मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परराज्यातील लोकांना पिवळ्या रंगाचा धातू देण्याच्या बहाण्याने बोलावून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने धुळे लालगोटा शेताकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर पुलाजवळ तयारीत असलेल्या आरोपींबाबत माहिती मिळताच पथकाने २७ रोजी धाव घेतली. मात्र ६ संशयित पसार होण्यात यशस्वी झाले एकास पकडण्यात यश आले. राहुल हरी राठोड (वय ३०, रा.जोंधनखेडा) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. कॉ सागर सावे यांच्या फिर्यादीवरून राहुल राठोड, गोपी राठोड, दिनेश राठोड, गजानन राठोड,…

Read More

रामानंदनगरात तरूणाची गळफासाने आत्महत्या जळगाव (प्रतिनिधी) – रामानंदनगर परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कुणाल अनिल महाजन (वय २३) असे मयत तरुणाचे नाव आहे. कुणाल महाजन रामानंदनगरात आई, वडील व मोठ्या भावासह वास्तव्यास होता. रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून तो कामाला होता.बुधवारी रात्री कुणाल घराच्या मागच्या खोलीत गेला. तेथे गळफास घेवून त्याने जीवनयात्रा संपविली. त्याच्या आईने दरवाजा तीन वेळेस ठोठावला पण, कुलर सुरू असल्यामुळे मुलगा गाढ झोपेत असेल म्हणून आईनेही पुन्हा दरवाजा ठोठावला नाही. अखेर रात्री १०.३० वाजता वडिल व मोठ्या भावाने…

Read More

११ लाखांच्या गांजासह दोन आरोपी पकडले अमळनेर ( प्रतिनिधी)- अमळनेर पोलिसांनी जळोद रस्त्यावर छापा टाकून ५६ किलो ९७० ग्रॅम वजनाचा गांजा पकडला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली वाहनासह १९ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पांढऱ्या बोलेरो पिकअप (एमएच १८ एजे ०२२३) मधून गांजा विक्रीसाठी येणार असल्याचे समजले. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखालीआणि तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला. २८ मार्चरोजी रात्री पोलिसांनी जळोद रस्त्यावर उड्डाणपुलाजवळ गाडी अडवली. गाडीच्या झडतीत १८ पॅकेटमध्ये भरलेला ओलसर गांजा सापडला. ५६ किलो ९७० ग्रॅम…

Read More

लग्नाच्या आमिषाने अत्याचार; नंतर लग्नास टाळाटाळ अमळनेर ( प्रतिनिधी)- अमळनेर शहरात राहणारी महिला आठ वर्षांपुर्वी अल्पवयीन असतांना तिला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केला. या अत्याचारातून तिने मुलाला जन्म दिला. नंतर आरोपीने लग्नास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. २७ मार्चरोजी दुपारी अमळनेर पोलीस ठाण्यात नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर शहरात पिडीत महिला आपल्या मुलासोबत वास्तव्याला आहे. २०१७ मध्ये पिडीत महिला अल्पवयीन असतांना आरोपी गौरव विजय पाटीलने लग्नाचे आमिष दाखवत पिडीतेला औरंगाबाद जिल्ह्यात नेले. तिकडे तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आला. या अत्याचारातून पिडीा गर्भवती झाली. त्यामुळे पिडीतेने गौरवला लग्न करण्याचा आग्रह धरला. पण गौरवने लग्न करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर पिडीतेने…

Read More

अज्ञात ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले जळगाव ( प्रतिनिधी ) खेडी फाट्याजवळ भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या दुचाकीस्वराला अज्ञात ट्रकने चिरडल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला महेंद्र एकनाथ बोंडे (वय ३८, रा. गणेश कॉलनी, भुसावळ) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. महेंद्र बोंडे आई-वडीलांच्यासह भुसावळ शहरातील गणेश कॉलनीत वास्तव्याला होता. तो जळगाव येथील एमआयडीसीतील गणेश अल्युमिनियम कंपनीमध्ये कामाला होता. दररोज भुसावळ ते जळगाव दुचाकीने जाणेयेणे करत होता. नेहमीप्रमाणे २९ मार्चरोजी सकाळी महेंद्र दुचाकीने भुसावळकडून जळगावला येण्यासाठी निघाला. खेडीफाट्याजवळ अज्ञात ट्रकने त्याला धडक दिली. त्यामुळे तो रोडवर पडला आणि त्याला ट्रकने चिरडले. त्यात महेंद्र बोंडे हे जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक…

Read More

नियोजन विभागाचा अजब कारभार; १२ कोटींच्या कामांचेही तुकडे विधानसभा निवडणुकीच्या घाईगर्दीत ‘डिपीओ’ने साधली अर्थपूर्ण संधी जळगाव । छगनसिंग पाटील जिल्हा नियोजन कार्यालयातर्फे वाटप केली जाणारी विकासाची कामे आणि पध्दतीचे एकामागून एक किस्से समोर येत आहेत. ४ कोटींच्या कामांचे ४० तुकडे केल्यानंतर आता १२ कोटींच्या कामांचा विषय चर्चेत आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासाठी १२ कोटींच्या विकास कामांचेही तुकडे करून टेंडर देण्यात आले. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागातील एका वजनदार अधिकाऱ्याच्या हस्तकामार्फत १२ कोटींची कामे उरकण्यात आली. विधानसभा निवडणुकीची धामधूम आणि घाईगर्दीची संधी साधत जिल्हा नियोजन अधिकाऱ्याने ‘टक्केवारी’च्या लाभासाठी मनमानी पध्दतीने वर्क ऑर्डर दिल्याचे सांगितले जात आहे. नियोजन विभाग सार्वजनिक विकासापेक्षा आत्म…

Read More

सा. बां. अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदलीला स्थगिती जळगांव (प्रतिनिधी)- सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या बदली आदेशाला प्रशासकीय कारणास्तव स्थगिती देण्यात आली आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या नव्या शासन आदेशानुसार हा स्थगितीचा निर्णय १५ एप्रिलपर्यंत लागू राहील. प्रशांत सोनवणे यांची जळगांव येथील सार्वजनिक बांधकाम मंडळातून नगरपरिषद प्रशासन संचालनालय, विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आली होती. हा आदेश १८ मार्चरोजी जारी करण्यात आला होता. मात्र, नव्या शासन आदेशान्वये (क्र. बदली-१२२४/प्र.क्र.९१/सेवा-१, दि. १८.०३.२०२५) ही बदली तात्पुरती स्थगित करण्यात आली आली आहे. शासनाने स्पष्ट केले की, हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध असून त्याचा…

Read More