शेतीच्या वादात भावानेच भावाला संपवले मुक्ताईनगर (प्रतिनिधी )- तालुक्यातील टाकळी शिवारात शेतीच्या जुन्या वादातून चुलतभावाने एकाच्या मदतीने तरुणाचा खून केला आहे. शनिवारी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सुनील रामसिंग चव्हाण (वय-३२, रा.टाकळी) असे मयत तरुणाचे नाव आहे. सुनील चव्हाण परिवारासह टाकळी गावात वास्तव्याला होता. शेती आणि मजुरी करून तो उदरनिर्वाह करत होता. त्याचे चुलतभाऊ प्रवीण चव्हाणसोबत शेतीचा वाद होता. २५ मार्चरोजी सायंकाळी प्रवीण मित्रांसोबत जेवणासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९ एसी ४४७३) ने गेला होता. नंतर तो घरी परतला नाही. दुसऱ्या दिवशी २६ मार्चरोजी सकाळी सुनील चव्हाण याचे नातेवाईक रस्त्यावरून येत असताना टाकळी शिवारातील सुरेश चव्हाण यांच्या…
Author: Vikas Patil
अहिराणी साहित्य संमेलनालात देणगीसाठी क्यूआर कोड अमळनेर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह परिसरात अहिराणी सेवक साथी गुलाबराव पाटील साहित्यनगरी पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनासाठी सज्ज आहे. ३० व ३१ मार्च रोजी होणाऱ्या या संमेलनात अहिराणी भाषेच्या संवर्धनासाठी मागण्यांचे ठराव मांडले जाणार आहेत. संमेलनात अहिराणी भाषा मराठी अभ्यासक्रमात समाविष्ट करा, अहिराणी साहित्य प्रकाशित करण्यासाठी विशेष अनुदान जाहीर करा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अहिराणी अभ्यास केंद्र स्थापन करा या मागण्यांचा समावेश आहे. संमेलनाचे उद्घाटन मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर महाले यांच्या हस्ते होणार असून, संयोजन समितीने महाराष्ट्रभर प्रचार करून साहित्यप्रेमी, लेखक, कवी व विचारवंतांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.…
खेडी शिवारात ४८ हेक्टर्समध्ये रस्ते व गटारीसाठी निधी मिळणार जळगावः ( प्रतिनिधी )- राज्य शासनाने महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये प्रारुप विकास योजना मंजूर केल्या. त्यात जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील खेडी शिवारात ४८ हेक्टर्समध्ये टी. पी. स्किम ४ व ५ ला मंजुरी मिळाली आहे. यामुळे स्वामीनारायण मंदिर परिसराचा विकास होणार आहे. खेडी भागात शेती भूसंपादनाची गरज राहणार नाही. जागा मालकांना त्या ठिकाणी लेआउट टाकता येणार आहेत. ६५ टक्के जमीन शेतकऱ्यांची तर ३५ टक्के जमीन महापालिकेच्या मालकीची राहणार आहे. शाळा, क्रीडांगण, उद्यान, रस्ते, वीज, गटारी यासह विविध सुविधा टीपी स्कीम मध्ये आहेत. टीपी स्कीम मंजूर झाल्याने ४८ हेक्टर्सचा भाग ग्रीन झोनमधून येलो झोनमध्ये…
पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या १८१ बोगस मुस्लिम लाभार्थ्यांविरोधात गुन्हा नाशिक (प्रतिनिधी)- तालुक्यातील भादवण येथील पीएम किसान सन्मान योजनेच्या १८१ बोगस मुस्लिम लाभार्थ्यांविरोधात कळवण पोलीस ठाण्यात तालुका कृषी अधिकारी एम जी म्हस्के यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवणमधील भादवण गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना येथे पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे १८१ लाभार्थी लाभ घेत होते. ग्रांमस्थानी ही बाब कळवण तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार व सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निदर्शनात आणून दिली. मात्र, काहीही कारवाई होत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी मालेगाव येथील बोगस आधार कार्ड व रेशन कार्ड तयार करून बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी मुस्लिमांचा शोध लावणारे भाजपचे माजी खासदार किरीट…
वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याबद्दल इतिहासकारांची समिती नेमा – खासदार उदयनराजे भोसले मुंबई (प्रतिनिधी)- रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याबद्दल योग्य निर्णय घेण्यासाठी इतिहासकारांची समिती नेमण्याची मागणी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी, अशी मागणी करत राज्य सरकारला ३१ मेपर्यंत निर्णय घ्यावा, असा आग्रह धरला आहे. मात्र, त्यांच्या या मागणीला धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी विरोध दर्शवला. या वादानंतर इतिहासकारांनी आणि सामाजिक नेत्यांनी मतं मांडली आहेत. भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले की, वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी इतिहासकारांची समिती नेमली जावी. ही समिती चौकशी करून सत्यता तपासून निर्णय घेईल. इतिहासात…
शालिमार, गीतांजलीसह अनेक एक्स्प्रेस एप्रिलमध्ये काही दिवस रद्द जळगाव (प्रतिनिधी) – मुंबईसह पुण्याहून भुसावळमार्गे कोलकाताकडे धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या एप्रिलमध्ये काही दिवस रद्द होणार आहेत संत्रागाची येथे यार्ड विस्ताराचे काम आणि बिलासपूरजवळ चौथ्या मार्गाचे जोडणी काम सुरू झाल्यामुळे या रेल्वेगाड्या एप्रिल महिन्यात रद्द करण्यात येतील. बहुतांश गाड्या भुसावळ, जळगाव मार्गे धावणाऱ्या असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. रद्द झालेल्या गाड्यांमध्ये शालिमार, गीतांजलीसह अनेक गाड्यांचा समावेश आहे. कोणत्या तारखेला कोणती गाडी रद्द : गाडी क्र. २०८२२ – संत्रागाची-पुणे एक्सप्रेस – १४ एप्रिल आणि १९ एप्रिल रोजी रद्द. गाडी क्र.२०८२१ – पुणे -संत्रागाची एक्सप्रेस – १४ एप्रिल आणि २१ एप्रिल रोजी…
वीज दर १० टक्क्यांनी स्वस्त होणार जळगाव (प्रतिनिधी)- महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीसाठी पाठविलेल्या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले. वीज दर १० टक्क्यांनी स्वस्त होणार आहे. राज्यात पुढील ५ वर्षे वीज स्वस्त होणार आहे. राज्य वीज नियमक आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार २०२५-२६ या वर्षासाठी वीज दरामध्ये १० टक्के कपात होणार आहे. नवे वीजदर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याच्या घोषणा केल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या ५…
आधी खोट्या नावाने मुलीशी मैत्री, नंतर धमकावत संबंधांची मागणी जळगाव (प्रतिनिधी)- नाव बदलून मुलीशी मैत्री आणि तिचे अश्लील फोटो काढून संबंधांची मागणी करणाऱ्या आयान शे. नूर मोहम्मद (वय 19 वर्षे, रा.शिवाजीनगर रोड, गेंदालाल मिल) याच्याविरुद्ध पीडित मुलीने तक्रार केली. या आरोपीला अटक करण्यात आली न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी नूर मोहम्मद याने फिर्यादीच्या बालमनाचा फायदा घेत तिच्याशी गोड बोलून आधी विशाल शर्मा असे नाव सांगून फिर्यादीशी मैत्री केली. नंतर 22 डिसेंबर 2024 रोजी व 2025 मधील जानेवारीमध्ये शहरातील हनुमान मंदिराजवळ तिच्या मनाविरुध्द फोटो काढून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. नंतर 26 मार्चरोजी शहरातील बहीणाबाई गार्डनमध्ये…
तांदूळ विकणाऱ्या अंगणवाडीसेविकेसह मदतनिसावर गुन्हा जळगांव (प्रतिनिधी)- जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील ० ते ३ वर्षे वयोगटातील अंगणवाडीच्या बालकांना पुरवठा करण्यात येणाऱ्या तांदळाची परस्पर विक्री झाल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले होते. हा तांदुळ खरेदी करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून फत्तेपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी भारती भिसे यांनी अंगणवाडी पर्यवेक्षिका ज्योती कदम यांचेसह फत्तेपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.देऊळगावगुजरी येथील अंगणवाडी सेविका लता मोरे व मदतनिस ज्योती माळी यांनी संगनमत करून अंगणवाडी शालेय पोषण आहाराचा ११२ किलो तांदूळ किंमत फत्तेपूर येथील साहिल कुरेशी व जुबेर कुरेशी यांना विक्री केला. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी फत्तेपूर पोलीस स्टेशनला…
शेतमजूराची झाडाला गळफासाने आत्महत्या जळगाव (प्रतिनिधी) – नंदगाव येथील शेतमजुराने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २८ मार्चरोजी दुपारी उघडकीस आली तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रतीलाल अंकुश भिल (४३, मूळ रा. मोहाडी, ह. मु. नंदगाव ता. जळगाव) असे मयत शेतमजुराचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित व दोन अविवाहीत मुली आहेत. शेतमजुरी करून ते उदरनिर्वाह करीत होते.आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. काही दिवसांपासून ते कामानिमित्त नंदगाव येथे राहत होते. शुक्रवारी त्यांनी घराच्या बाजूला एका शेडजवळील झाडाला गळफास घेतला. हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर कुटुंबीय व पोलिसांना माहिती…