Electricity bills इंधन समायोजन शुल्काच्या बोजाने वीज बिल वाढणार जळगाव (प्रतिनिधी)- राज्यात १ एप्रिलपासून वीज स्वस्त होणार होती. मात्र, महावितरणने आक्षेप घेतल्याने राज्य नियामक आयोगाने निर्णय स्थगित ठेवला. या स्थगितीमुळे ग्राहकांना पुढील आदेशापर्यंत सध्या सुरू असलेल्या दरानेच वीज बिल येणार आहे. महावितरणने घरगुती ग्राहकांवर आता इंधन समायोजन शुल्क लावल्याने विजेचे बिल वाढून येणार आहेत वर्गवारीनुसार, व्यावसायिक ग्राहकांना ४० ते ६० पैसे, कृषी १५ ते ३० पैसे, पथदिवे ३० ते ३५ पैसे, पाणीपुरवठा योजना ३० ते ३५ पैसे, ईव्ही चार्जिंग स्टेशनला ४० पैसे आणि उद्योगांना ३५ ते ४० पैसे अधिक इंधन शुल्क म्हणून द्यावे लागतील.
Author: Vikas Patil
मालकाचा विश्वासघात; कंपनीतून ३ लाखांचा कच्चा माल लंपास जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद येथील सुबोनिया केमिकल्स कंपनीत मालकाचा विश्वासघात करून कर्मचाऱ्यांनी ३ लाख रुपयांचा ऑरगॅनिक कच्चा माल चोरून नेला म्हणून नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सुयोग सुधाकर चौधरी (वय ४८, रा. एमआयडीसी, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची नशिराबाद शिवारामध्ये सुबोनिया केमिकल्स कंपनी आहे. या कंपनीमध्ये अमित कमलाकर बेंडाळे (रा. सांगवी ता. यावल) आणि विरेंद्र खुबलाल विश्वकर्मा (रा. खडका ता. भुसावळ) काम करीत होते. त्यांनी १ ऑगस्ट २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यान कंपनीत काम करताना कच्चामाल चोरून नेला. सुयोग चौधरी…
रावेर तालुक्यात गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल रावेर (प्रतिनिधी)- आज तालुक्यातील काही भागात वाऱ्यासह गारा पडून पावसाने हजेरी लावल्याने केळी बागांच मोठं नुकसान झालंय. उटखेडा, भाटखेडा तसेच मधल्या टप्प्यात गारांचा वर्षाव होऊन पाऊस झाला. शेतकरी हवालदिल झाले आहेत. तापी नदीच्या किनारी भागांत वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने गारांमुळे केळी बागांचे नुकसान झाले आहे. आदिवासी भागांतही पावसाने हजेरी दिली आहे. पारशा नालालगत रोडवर झाड कोसळल्याने दोन्ही बाजुंची वाहातुक ठप्प झाली होती. काही गावांना विजपुरवठा खंडीत झाला होता. उन्हाच्या तडाख्यानंतर पाऊस आल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. बेमोसमी वादळी पावसामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. तहसिलदार बंडु कापसे यांनी…
मंडपाची आग विझविताना शॉक लागल्याने एरंडोल शहरात तरुणाचा मृत्यू एरंडोल (प्रतिनिधी)- महात्मा फुले जयंतीनिमित्त लावलेल्या मंडपास लागलेली आग विझवताना ३२ वर्षीय युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळ घडली. एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पंकज गोरख महाजन (वय-३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याचे पश्चात आई,वडील,पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. शुक्रवारी शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळ महात्मा फुले युवा क्रांती मंचच्या पदाधिका-यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी व आयोजन समितीचे सदस्य कार्यक्रमाची पूर्वतयारी करीत होते. परिसरात मंडप उभारण्यात आला होता.शुक्रवारी मध्यरात्री मंडपास अचानक आग लागली. मंडपाला लागलेली आग विझवत असतांना पंकज महाजन…
जि. प.तील आरोग्य खात्याचा अधिकारी १५ हजारांची लाच घेताना अडकला जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात ४ एप्रिलरोजी दुपारी जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक प्रतिबंधक विभागाने तक्रारीवरून सापळा लावला. एका आरोग्य अधिकाऱ्याला १५ हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले व इतरांची चौकशी सुरु आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेतक्रारदाराने लाच मागितल्याबाबत तक्रार दिली होती. आरोग्य अधिकाऱ्याने त्याचे शासकीय काम करून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. एसीबीने लाच मागणीच्या सत्यतेची पडताळणी केली. त्यानंतर ४ एप्रिलरोजी दुपारी आरोग्य विभागात सापळा लावला. एका अतिरिक्त आरोग्य अधिकारी पदावरच्याच्या व्यक्तीला तडजोडीअंती १५ हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडल्याची माहिती मिळाली आहे. आरोग्य विभागातील इतर…
जुनी पेन्शनसाठी शिक्षकांची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने जळगाव (प्रतिनिधी )- जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित पदांवर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू असल्याचा आदेश देण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित पदांवर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अद्याप त्याबाबत प्रशासनाने अधिकृत आदेश काढलेला नाही. यामुळे संतप्त शिक्षकांनी आज जिल्हा परिषदेवर धडक देत आक्रमक घोषणांनी परिसर दणाणून टाकला. शिक्षक…
ट्रॅक्टर विहिरीत कोसळले ; ८ मजूर महिला दगावल्या नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरानजीक आलेगाव शिवारात शेजमजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने ८ मजूर महिला दगावल्याचे सांगितले जात आहे. हिंगोली -नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव शिवारात हा अपघात झाला. अपघातानंतर ३ महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. ८ जणींचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या गुंज गावातील महिला मजूर आलेगाव शिवारात हळद काढायला आल्या होत्या. ट्रॅक्टरमध्ये बसून हळद काढण्यासाठी जात असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सकाळी ७ वाजेदरम्यान ही घटना घडली. सध्या बचावकार्य सुरु आहे. ३ महिलांसह एका पुरुषाचे प्राण वाचवण्यात…
अभिनेते, निर्माते मनोजकुमार यांचे निधन मुंबई (प्रतिनिधी)- ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते मनोजकुमार यांचे शुक्रवारी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. मनोज कुमार प्रदीर्घ काळ आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले. मनोज कुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीत ‘भरत कुमार’ म्हणून ओळखले जाते. अभिनेते मनोज कुमार यांचा जन्म ब्रिटिश भारताच्या वायव्य प्रांतातील (सध्या खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान) अबोटाबादमधील पंजाबी हिंदू ब्राम्हण कुटुंबात झाला. मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी होते. फाळणीनंतर मनोजकुमार १० वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब दिल्लीला स्थलांतरीत झाले. मनोजकुमार त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी विशेष ओळखले जात. त्यामुळे त्यांना ‘भारतकुमार’ हे टोपणनाव मिळाले. त्यांनी…
घाटाच्या कठड्याला पिकअप धडकली; ३ ठार, ५ जण जखमी चाळीसगाव (प्रतिनिधी) श्रीरामपूरहून नवस फेडून छत्रपती संभाजीनगरमार्गे चाळीसगावकडे परत येताना २० प्रवाशांनी भरलेली पिकअप गाडी कन्नड घाटाच्या पायथ्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने संरक्षण कठड्याला धडकली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले ५ जण गंभीर जखमी झाले हा अपघात बुधवारी रात्री घडला. चाळीसगाव ग्रामीणचे पो नि राहुल पवार यांनी अन्य कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पातोंडा येथील अतुल माळी यांच्या मुलीचा नवस फेडण्यासाठी बुधवारी एमएच१९/बीएम ३९४७ या वाहनाने माळी कुटूंबातील २० जण श्रीरामपूर येथे गेले होते. नवस फेडल्यानंतर सर्वजण पुन्हा याच वाहनातून छत्रपती संभाजीनगरमार्गे चाळीसगावकडे येत होते. या…
रेल्वे मालगाडीच्या डब्याचे सील तोडून खताच्या १२७ गोण्या चोरल्या जळगाव (प्रतिनिधी)- जळगाव-सुरत रेल्वे लाइनवर उभ्या मालगाडीच्या दरवाजाचे सील तोडून ७८ हजार रुपये किमतीच्या १२७ खतांच्या गोण्या तीन चोरट्यांनी लांबवल्या. रेल्वेच्या आरपीएफ कार्यालयात गुन्ह्याची नोंद झाली आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी मुख्य चोरट्यासह ज्या दोन जणांना खताची विक्री केली, त्यांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून खताच्या ७५ गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत. पिंपळकोठा येथील योगेश बडगुजर याने त्याच्या अन्य दोन साथीदारांच्या मदतीने २६ मार्चरोजी रात्री जळगाव-सुरत लाइनवरील मालगाडीच्या डब्याच्या दरवाजाचे सील तोडून खताच्या १२७ गोण्या चोरल्या. बडगुजर याने त्याच्या पिकअप गाडीतून ७५ गोण्या पिंपळकोठा येथे नेल्या. १० गोण्या शेतातील झोपडीत ठेवल्या ३०…