आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह काढताना दुसरा सांगाडाही सापडला ! रावेर (प्रतिनिधी) – निंभोरा येथील वाघोदा रोडलगत उज्वल नरेंद्र पाटील यांच्या विहिरीत उडी घेऊन१४ एप्रिलरोजी गावातील देवेंद्र भागवत सोनवणे (वय २७ रा. निंभोरा) या युवकाने आत्महत्या केली. त्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढत असताना तेथे दुसरा कमरेपासून खालचा पुरुष जातीचा सांगाडा आढळून आला आहे. निंभोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खबर निंभोरा पोलीस ठाण्यात मयताचे चुलत भाऊ श्रीराम सोनवणे यांनी दिल्याने घटनास्थळी फैजपूर पोलीस उपविभागीय प्रभारी अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि हरिदास बोचरे व फौजदार अभय ढाकणे, पो.हे का. अविनाश पाटील व किरण जाधव यांनी जाऊन विहिरीतील आत्महत्या…
Author: Vikas Patil
चोरांच्या टोळीत पोलिस उपनिरीक्षकाचाही सहभाग ! चोपडा ( प्रतिनिधी ) – चक्क चोरी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकच चोरट्यांच्या टोळीसोबत आल्याचे दिसून आले आहे. चोपडा शहरातील बसस्थानक परिसरात चोरी करण्यासाठी टोळीसोबत आलेल्या जालन्याच्या पीएसआयचा स्थानिक गुन्हे शाखेसह चोपडा पोलिसांनी पर्दाफाश केला. पळून जात असतांना या पथकाने प्रल्हाद मालटे (वय ५८, रा. सदर बाजार, जालना) या पीएसआयसह चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. या गुन्ह्यात सहभागी असलेला पीएसआय तीन महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होते, मात्र त्यापुर्वीच त्यांच्या कारनाम्यांचा भांडाफोड झाला आहे. चोपडा शहरातील बस स्थानक परिसरात बाहेर जिल्ह्यातील टोळीकडून गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे दागिने आणि पैसे लांबविल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह एलसीबीचे पथक संशयितांच्या मागावर…
शेतीच्या वादातून चाकूने वार : तरुणाचा मृत्यू जळगाव (प्रतिनिधी)- येथील सदाशिवनगरात शेतीला वारस लावण्यावरून वाद होऊन शालकांनी मेहुण्यावर शुक्रवारी चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते. त्यात या तरुणाचा सोमवारी पहाटे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दोन्ही शालकांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तौफिक कय्यूम पिंजारी (वय-३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. सदाशिवनगरात मालवाहू रिक्षाचालक असलेले तौफीक पिंजारी कुटुंबासह वास्तव्याला होते. तौफीक पिंजारी व त्यांचे मेहुणे अस्लम समशोद्दीन पिंजारी व शफिक गफूर पिंजारी यांच्यामध्ये शेतीला वारस लावण्यावरून वाद झाले होते. शुक्रवारी तौफीक यांच्या सदाशिवनगरातील घरी जाऊन त्यांना दोघांनी शिवीगाळ व मारहाण केली होती. अस्लमने तौफीकच्या पोटाच्या…
रोहित पवार इंग्लिश मीडियममध्ये शिकलेलं पोट्टं, त्याला जिल्हा परिषद शाळा काय कळते – पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव (प्रतिनिधी)- आम्ही राजकीय पक्ष फोडतो तसे तुम्ही शाळा चालविण्यासाठी विद्यार्थी फोडा, असा अजब सल्ला मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षकांना दिल्यानंतर राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकार आता विद्यार्थ्यांना फोडण्यासाठी त्यांच्यामागे देखील ईडी, सीबीआय आणि आयटीच्या चौकशीचा ससेमिरा लावणार का, असा प्रश्न केला होता. मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यावर रोहित पवार हे इंग्लिश मीडियममध्ये शिकलेलं पोट्टं आहे. त्याला जिल्हा परिषद शाळा काय कळते, असा प्रश्न केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जळगाव येथे सोमवारी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.…
4 अल्पवयीन मुलींसह २ मुलांना रावेर पोलीसांनी शोधून आणले रावेर (प्रतिनिधी)- रावेर पोलीसांच्या अथक प्रयत्नांनी फुस लाऊन पळवून नेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा मध्यप्रदेशातून तर दोन मुले व दोन मुलींना ओडीसा राज्यातून असे सहा अल्पवयीन मुलांचा शोध लागला आहे. या अल्पवयीन मुले, मुलींना अज्ञात इसमाने फुस लावुन पळवून नेले होते. रावेर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल करण्यात आले होते. तपासात गुप्त बातमीदार, नातेवाईकांची चौकशी करुन, सिसीटिव्ही फुटेज व तांत्रिक विष्लेशन करुन अपह्रत मुले व मुलींची माहिती काढुन त्यांना टिकिरी, ओडीसा मकपदारा जंगलामधून शोध घेतला. त्यानंतर एका मुलीस इंदौर येथुन शोध घेऊन आणले एक मुलगी नायर ता. खकनार जि. बुऱ्हाणपुर येथुन ताब्यात…
जिल्ह्यातील ६ तालुक्यांत भूजल पातळी खालावली जळगाव (प्रतिनिधी)- जळगावसह राज्यात काही ठिकाणी पाणी टंचाईची भीषणता जाणविण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये भूजल पाणी पातळीत घट झालीय. पाऊण ते सव्वा मीटरपर्यंत घट झाली असून या सहा तालुक्यांमध्ये पाण्याची समस्या निर्माण होण्याची भीती आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पाणीपातळी वाढली होती. गेल्या वर्षापेक्षा यंदा भूजल पाणी पातळीतील घट कमी असल्याचे तज्ञांकडून सांगितले जात आहे. तरीदेखील जिल्ह्यातील तापमान ४२ अंशाच्यावर गेल्याने प्रचंड उष्णता जाणवत आहे. याचा परिणाम म्हणून पाणी पातळी घटत आहे. वरीष्ठ भूवैज्ञानिक विभागातर्फे पाच वर्षाची पाणी पातळीची सरासरी लक्षात घेऊन १५ तालुक्याची पाणी पातळी मोजली जाते. विहीरींचेही निरीक्षण केले…
नागपूरमध्ये १० व्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन नागपूर (प्रतिनिधी)- शहरात २६ व २७ एप्रिलरोजी मातोश्री विमलताई देशमुख सभागृह, धनवटे नॅशनल कॉलेज येथे १० वे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन वैचारिक वातावरणात रंगणार आहे. “शाश्वत मूल्यांच्या संवर्धनार्थ” या उद्घोषणेसह होणाऱ्या या संमेलनात देशभरातील साहित्यिक, विचारवंत, अभ्यासक, पत्रकार आणि कवी सहभागी होणार आहेत. संमेलनाचे अध्यक्षपद माजी कुलगुरू आणि एमआयटी पुणेचे सल्लागार डॉ. एस. एन. पठाण भूषवणार आहेत. उद्घाटन सत्रात प्रा. डॉ. अनुपमा उजगरे (मुंबई) यांचे विशेष भाषण होणार असून त्या मराठीतील मुस्लीम साहित्यप्रवाहाबद्दल विचार मांडतील. स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. शरयू तायवाडे, मुख्य आमंत्रक प्रा. जावेद पाशा कुरेशी, सचिव अय्युब…
मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई, मावशीचाही बुडून मृत्यू यावल (प्रतिनिधी)- तालुक्यातील अंजाळे येथे तापी नदीपात्रात बुडणाऱ्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची आई व मावशी यांच्यासह तीन जण बुडून मरण पावल्याची हृदयद्रावक घटना घडल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. अंजाळे येथील घाणेकरनगरात बादल भील हा तेवीस वर्षाचा युवक वास्तव्याला असून तो जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करतो. काल खंडोबाचा जागरण गोंधळ असल्याने त्यांच्या बहिणींसह आप्त आलेले होते. त्यांची मावस बहिण वैशाली भील ( रा. अंतुर्ली, ता. अमळनेर ) आणि मामेबहिण सपना सोनवणे (रा. पळाशी, ता. सोयगाव ) यांचा समावेश होता. काल जागरण गोंधळ झाल्यानंतर दुपारी ते तापी नदीवर आंघोळीसह कपडे धुण्यासाठी गेले. वैशाली भील यांचा…
नमो शेतकरी योजनेतील लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रूपये ! मुंबई (प्रतिनिधी)- राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेतील आठ लाख लाभार्थी महिलांना यापुढे दरमहा फक्त ५०० रुपयेच मिळणार आहेत. राज्य शासनाने नमो शेतकरी योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी केली आठ लाख महिला लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याचे उघड झाले. एकाच लाभार्थ्याला दोन सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही, या अटीमुळे आता त्या महिलांना लाडकी बहीण योजनेत केवळ ५०० रुपयेच मिळणार आहेत. नमो शेतकरी योजनेत महिलांना दरवर्षी ६,००० रुपये मिळतात. केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधीमधूनही त्यांना ६,००० रुपये मिळतात. एकूण मिळकत १२,००० रुपये झाल्यामुळे त्यांना आता लाडकी बहीण योजनेतून फक्त ५०० रुपये प्रति…
जिल्हा रुग्णालयात दोन गटांकडून पुन्हा तोडफोड जळगाव (प्रतिनिधी)- भांडण झाल्यानंतर दोन्ही गटातील जखमी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. याठिकाणी ते पुन्हा समोरासमोर आल्याने पुन्हा वाद होवून हाणामारी झाली. त्यांनी जिल्हा रुग्णालयातील साहित्याची तोडफोड केली. दरम्यान, त्यांना पोलिसांनी आवरले, मात्र त्यांनी पोलिसांनी देखील शिवीगाळ केली. ही घटना १४ एप्रिलरोजी मध्यरात्री जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. याठिकाणी नियुक्त डॉक्टरांकडून या घटनेचा व्हिडीओ काढला जात होता, मात्र हल्लेखोरांनी त्यांचा मोबाईल हिसकावून आमचा व्हिडीओ काढता असे म्हणत त्यांना देखील शिवीगाळ केल्याचे व्हीडीओमध्ये कैद झाले आहे. दोन्ही गटातील वाद वाढतच असल्यामुळे ड्युटीवर असलेले जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यांनी देखील भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडूनच…