Author: Vikas Patil

ट्रकने कट मारल्याने बस खड्ड्यात जळगाव (प्रतिनिधी)- भरधाव ट्रकने कट मारल्याने प्रवाशांनी भरलेली एसटी बस खड्ड्यात गेली. सुदैवाने ही बस झुडपांमध्ये अडकली आणि अनर्थ टळला. हा अपघात जळगावमधील आहुजानगर ते द्वारकानगर थांब्यादरम्यान घडला. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला पोलिसांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली असून शोध घेतला जातोय. निंभोरेहून जळगावला येणारी एसटी बस आहुजानगर स्टॉपजवळ होती. दरम्यान भरधाव ट्रकने कट मारल्यामुळे एसटी चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस समांतर रस्त्याच्या खड्ड्यात उतरली. सुदैवाने बस झुडपांमध्ये अडकली आणि अनर्थ टळला. बस ज्या खड्यावर अडकली तो खड्डा मोठा होता. प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून दुर्घटना टळली. बसमध्ये जवळपास ५० प्रवासी होते, मात्र कुणालाही दुखापत…

Read More

अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू जळगाव (प्रतिनिधी)- रावेर तालुक्यातील बोर घाटात थार जीप आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. पिंटू बोडोले (वय ३०) असं मयत पित्याचे व रितीक बोडोले (वय ३) असं मुलाचे नाव आहे. पोलिसांनी थार गाडीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पिंटू बोडोले हे कुटुंबासह भुसावळ येथे मजुरी करून उदरनिर्वाह चालवत होते. रविवारी ते पत्नी मालुबाई (वय २८) आणि दोन मुले यांच्यासह दुचाकीने भुसावळहून पाल येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. दरम्यान, रात्री रावेर तालुक्यातील बोर घाटात खेरगावकडून भुसावळच्या दिशेने येणाऱ्या थार गाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, पिंटू आणि त्यांचा लहान…

Read More

बोरिसच्या कबड्डी खेळाडूचा रेल्वेतून पडून मृत्यू जळगाव (प्रतिनिधी) धावत्या रेल्वेतून पडून धुळे जिल्ह्यातील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना २६ एप्रिलरोजी सकाळी पाचोरा तालुक्यातील तारखेडा गावाजवळ घडली पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशाल किरण बोरसे (वय २५, रा.बोरिस ता.जि. धुळे) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, भाऊ यांच्यासह राहत होता. पाचोरा ते गाळण रेल्वे स्टेशनदरम्यान तारखेडानजीक ऑफलाइनवरील खंबा किलोमीटर क्रमांक ३६५/२०१८ दरम्यान अज्ञात तरूणाचा मृतदेह असल्याची माहिती पाचोरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेतली. पंचनामा करत मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आला पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मृतदेहाची ओळख पटवण्याचे…

Read More

दंतशस्त्रक्रीयेसाठी रोबोटिक तंत्रज्ञानाची भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयात चाचणी यशस्वी पुणे (न्युज नेटवर्क)- दंतशस्त्रक्रियेसाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर आता पुण्यात सुरू होणार आहे. भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयाने फ्रान्समधील लुपिन डेंटलच्या सहकार्याने ही वैद्यकीय चाचणी यशस्वी केली आहे. रुग्णांची काळजी आणि उपचारांचे परिणाम यात रोबोटिक तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदल होणार आहेत. दंतचिकित्सा क्षेत्रातील हा महत्त्वाचा टप्पा असल्याची माहिती भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांनी दिली. लेसरपासून मायक्रोस्कोप, कॅड कॅम, स्कॅनर अशी अत्याधुनिक साधने, उपचार उपलब्ध आहेत. दात काढणे, बसवणे, वेडेवाकडे दात सरळ करणे, हिरड्यांचे आजार बरे करणे, जीभ, पडजीभ, ओठ, गाल यांच्या उपचारांत आता रोबोटिक तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. ‘फ्रान्समधील…

Read More

अल्पवयीन मुलीवर ११ दिवस अत्याचार चाळीसगाव (प्रतिनिधी )- चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तोड दाबून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेहुणबारे पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबासह वास्तव्याला आहे. २६ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरच्या कालावधीमध्ये संशयित आरोपी दत्तू दिलीप मोरे (रा. मेहुणबारे ता.चाळीसगाव ) यांने पीडित मुलगी एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्या राहत्या घरात तिच्यावर अत्याचार केला आहे. इतर दिवशीदेखील शेतात आणि इतर भागात देखील धमकी देऊन अत्याचार केला . पीडित अल्पवयीन मुलीने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. त्यानुसार शनिवारी मेहुणबारे पोलीस…

Read More

एकनाथ शिंदेंच्या दप्तरी बेपत्ता नोंद झालेले पाकिस्तानी नागरिक फडणवीसांना सापडले! मुबई (प्रतिनिधी )- पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीच्या सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. महाराष्ट्रातील १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तर, राज्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी एकही जण बेपत्ता नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सर्व पाकिस्तानी उद्या सकाळपर्यंत राज्य सोडून निघन जातील, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की पाकिस्तानी नागरिकांनी हा देश सोडून निघून जावं. हे प्रत्येक भारतीयांच्या मनातलं फर्मान आहे. महाराष्ट्रातही काही पाकिस्तानी नागरिक होते. त्यापैकी १०७ पाकिस्तानी…

Read More

भारताने पाकचं पाणी बंद केलेलं नाही, सरकार खोटं बोलतंय- प्रकाश आंबेडकर शिर्डी (न्यूज नेटवर्क )- पाकिस्तानची पाणी कोंडी करत सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, 24 एप्रिलरोजी केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताने पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं नाही, सरकार खोटं बोलतंय, दिशाभूल करतय, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. हा करार रद्द केल्याचं खोटं सांगितलं जातय, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. पाकिस्तानला पाणी बंद केल्यासंदर्भाने दिलेलं पत्रच त्यांनी दाखवलं. या पत्रामध्ये कुठेही पाणी बंद केल्याचा उल्लेख नाही. धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही,…

Read More

काश्मीरमधील शिबिरात नाशिकच्या डॉक्टरांकडून सेवा   दहशतवादी हल्ला सुरु असतानाच ऑपरेशनची मोहीम   नाशिक (प्रतिनिधी) – जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडत असतानाच महाराष्ट्रातील १८ डॉक्टर जम्मू-काश्मीरमधील नागरिक, महिला, मुलांवरील विविध शस्त्रक्रियेसाठी धडपडत होते. या डॉक्टरांच्या माध्यमातून तेथील ७०० रूग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे काम करण्यात आले. नाशिक येथील रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३० मधील स्त्रीरोगतज्ञ रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनच्या रोटरीयन आणि नाशिक आयएमएच्या सचिव डॉ. मनिषा जगताप या शिबिरात स्त्रियांच्या ऑपरेशनच्या सेवेसाठी सहभागी झाल्या होत्या. या ठिकाणी गुंतागुंतीच्या अनेक शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या. यावेळी नांदेड येथील स्त्रीरोगतज्ञ डॉ. अनिल साखरे आणि मुंबई येथील डॉ. शिवानी अग्रवालही उपस्थित…

Read More

तुळजाभवानीच्या तिजोरीत ८० कोटींचे दान, यंदाचे व्याज २३ कोटी छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी )- तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात मागील वर्षभरात ८० कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. देशभरातील भाविकांनी अर्पण केलेले दागिने आणि मौल्यवान धातूंची संख्याही लक्षवेधी आहे. तुळजाभवानी देवीच्या चरणी १७ किलो सोने आणि २५६ किलो चांदी अर्पण करण्यात आली. तुळजाभवानी मंदीर समितीच्या पाच बँकांमध्ये २७४ कोटी रुपयांच्या ठेवी असून, त्यावर यंदा २३ कोटी ८१ लाख रुपये व्याजही मिळाले. दोन दशकांपासून तुळजाभवानी मंदिर संपत्तीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वीस वर्षांत तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढत आहे. दळणवळणाच्या सुविधा आणि मंदिर परिसरात उपलब्ध सोयींमुळेही देशभरातील भाविकांची संख्या संपूर्ण वर्षभर वाढत…

Read More

जळगाव जिल्ह्यात तीन वर्षात ऑनर किलिंगच्या तीन घटना जळगाव (प्रतिनिधी)– जिल्ह्यातील चोपडा शहरात केंद्रीय राखीव पोलीस दलातील निवृत्त जवानाने आपल्या इच्छेविरूद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीची गोळी घालून हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडल्यानंतर खळबळ उडाली. जिल्ह्यात तीन वर्षात ऑनर किलिंगची ही तिसरी घटना उघडकीस आली असून, त्याबद्दल सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांसमोर देखील अशा घटना रोखण्याचे आव्हान आहे. जिल्ह्यातील चोपडा शहर पोलीस ठाणे अंतर्गत वर्षा कोळी आणि राकेश राजपूत यांची १२ ऑगस्ट २०२२ रोजी प्रेम असल्याच्या रागातून नातेवाईकांकडून हत्या करण्यात आली होती. दोघांच्या प्रेमाची माहिती समजल्यावर मुलगा दुसऱ्या समाजाचा असल्याने, त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाकण्याविषयी वर्षाच्या मागे तिच्या भावासह…

Read More