जामनेरात बुध्दीजीवी प्रेरणा संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन साईमत/जामनेर/प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी प्रजाजनांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. त्याची आपल्या राजवटीत काटेकोरपणे अंमलबजावणी केली.शिवाय धार्मिकतेला जपुन बारा ज्योतीर्लिगांसह अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार स्वखर्चाने केला. त्यांनी सर्व समाजासाठी अनेक कार्य केल्याचे प्रतिपादन जळगाव येथील माजी नगरसेविका ॲड.शुचिता हाडा यांनी केले. शहरातील एकलव्य माध्यमिक शाळा येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अहिल्याबाई होळकरांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त प्रेरणावंत बुद्धिजीवी प्रेरणा संवाद कार्यक्रमात भाजपाचे जळगाव (पूर्व) जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर, ॲड.शिवाजी सोनार, संजय गरुड, गोविंद अग्रवाल, अजय भोळे, नवलसिंग पाटील, आतिश झाल्टे, अनंत कुलकर्णी, हरलाल कोळी, प्रदीप लोढा, रवींद्र झाल्टे, मयूर पाटील, कमलाकर पाटील, प्रा शरद पाटील, डॉ.प्रशांत…
Author: Sharad Bhalerao
पंचाळाला कवी महेंद्र ताजणे मान्यवरांकडून पुरस्काराने सन्मानित साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील स्मृतीशेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठानच्यावतीने स्मृतीशेष चमेली भाऊराव काव्य आणि कादंबरी राज्य पुरस्काराचे यंदा दुसरे वर्ष होते. यंदाचा काव्य पुरस्कार पंचाळा, वाशिम येथील कवी महेंद्र ताजणे यांच्या काॅपर काॅईन, नवी दिल्ली प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या “खूप काही आणखी” ह्या काव्यसंग्रहास तर गुहाघर, रत्नागिरी येथील प्रा.बाळासाहेब लबडे यांच्या जळगाव येथील अथर्व पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या “चिंबोरे युद्ध” कादंबरीस जाहीर केला होता. प्रतिष्ठानतर्फे ‘पुरस्कार आपले दारी’ अशा अभिनव उपक्रमाने पुरस्काराचे वितरण कवी, कादंबरीकार यांच्या घरी जाऊन करण्यात आले. त्यात यंदाचा कवितेचा पुरस्कार कवी महेंद्र ताजणे यांच्या पंचाळा गावातील घरासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज…
बाजाराच्या दिवशी होतेय गर्दी ; वाहतुकीची कोंडी, संबंधितांचे दुर्लक्ष साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा परिसरातील पांडुरंग साई नगरात सिमेंट काँक्रीटचे नव्याने रस्ते तयार केले आहेत. मात्र, हल्ली हे रस्ते वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठी राहिलेच नाहीत. पांडुरंग साईनगर येथे हुडकोकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावरच मच्छीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांनीच ताबा मिळविला असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. रोज दुपारी ४ ते रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू असतात. पिंप्राळ्याचा बुधवारी बाजार असतो. त्यादिवशी तर मासे विक्रेत्यांच्या दुकानात प्रचंड गर्दी दिसून येते. त्यामुळे ग्राहक रस्त्यावरच कशी पण वाहन लावून वाहतुकीची कोंडी निर्माण करतात. अशा गंभीर समस्याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे. शहरातील…
लेखी तक्रारींकडे संबंधितांचे दुर्लक्ष, पोल बसविण्याची मागणी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील पिंप्राळा भागातील जिल्हा परिषद कॉलनी आणि सहयोग कॉलनीतील वॉर्ड क्रमांक १० मध्ये इलेक्ट्रीक पोल (विजेचे खांब) नसल्याने अंधार पसरतो. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. तसेच टारगट मुले-मुली अंधाऱ्याचा फायदा घेऊन कट्ट्यावर गोंधळ घालतात. दुसरीकडे परिसरात पसरलेल्या अंधाऱ्याच्या भीतीमुळे घरगुती महिला रात्री फिरण्यासाठी बाहेर निघत नाही. अशा गंभीर समस्येकडे वार्डाच्या नगरसेवकांचे दुर्लक्ष झाल्याची ओरड परिसरातील नागरिकांसह महिलांनी केली आहे. यापूर्वी यासंदर्भात वेळोवेळी संबंधितांना लेखी अर्ज देऊनही समस्या अद्यापही सुटलेली नाही. त्यामुळे परिसरात त्वरित विजेचे खांब बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील पिंप्राळा भागातील जिल्हा परिषद कॉलनी आणि सहयोग कॉलनीतील वॉर्ड…
रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील एका ४५ वर्षीय प्रौढाने जवळील जंगलात विषारी औषध सेवन केल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारावेळी त्याचा रुग्णालयात मंगळवारी, २७ मे रोजी रात्री १० वाजता मृत्यू झाला. मात्र, त्याने विषारी औषध घेण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. जितू सोमा अहिरे (वय ४५, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) असे मयताचे नाव आहे. पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी जितू अहिरे यांनी २० मे रोजी पिंप्राळा हुडको परिसरातील जंगलात जाऊन विषारी औषध प्राशन केले होते. त्यांची प्रकृती खालावल्याचे लक्षात…
एकाला अटक, दुसरा फरार, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मेहरूण परिसरातील भिलाटी भागात गावठी पिस्तूल घेवून दहशत माजविणाऱ्या दोन जणांवर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी, २७ मे रोजी दुपारी २ वाजता कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक तर दुसरा फरार झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. सविस्तर असे की, जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील भिलाटी भागात हातात गावठी पिस्तूल घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने २७ मे रोजी त्यांच्यावर कारवाई केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत विशाल संजय पवार (वय २३, रा. भिलाटी, मेहरूण) याला ताब्यात…
एमआयडीसी पोलिसात तरुणाविरुध्द गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील एका हॉटेलमध्ये एरंडोल येथील तरूणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार २६ मे रोजी घडला आहे. तसेच तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची तिला धमकी दिली. अखेर याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. जामनेर तालुक्यातील रहिवासी असलेली २३ वर्षीय तरूणी ही सध्या एरंडोल शहरात वास्तव्याला आहे. पीडित तरूणीची ओळख विश्वजीत विठ्ठलसिंग सिसोदे (वय २७, रा. बरेजवळा, ता. खामगाव, जि.बुलढाणा) याच्याशी ऑगस्ट २०२४ मध्ये झाली. विश्वजीत सिसोदे याने पीडित तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत जळगाव एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये नेवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिच्या सोबत काढलेले व्हिडीओ आणि चॅटींग पीडित तरूणीच्या आई-वडिलांना दाखविण्याची…
बोदवड पोलिसांकडून जळगावला गुन्हा वर्ग साईमत/बोदवड/प्रतिनिधी : शहरातील एका २२ वर्षीय युवतीला गौरव मुकुंदा साठे (वय २३, रा. बोदवड) याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण केली. त्यानंतर तिला जळगाव येथील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तिच्यावरील अत्याचार करत असतानाचे फोटो काढले. तसेच व्हिडीओही केला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. धमकी दिल्यानंतर वेळोवेळी ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून युवतीकडून रक्कमही उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, बोदवड शहरातील ही युवती बाहेरगावी शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली आहे. वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीला त्रासून अखेर युवतीने याबाबत तिच्या आईकडे कैफियत मांडली. त्यानंतर…
जिल्हा पोलीस अधीक्षकांना भाजपने दिले मागण्यांचे निवेदन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : अमळनेर येथील ‘रऊफ बँड’चे संचालक अस्लम अली सय्यद याच्याविरुद्ध तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन जळगाव जिल्हा भाजपा महानगरच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना नुकतेच देण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रदेश युवा उपाध्यक्ष भैरवी वाघ-पलांडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा भारती सोनवणे, प्रदेश चिटणीस तथा माजी नगरसेविका सुरेखा तायडे, भाग्यश्री चौधरी, सरोज पाठक, मनोज भांडारकर, गजानन धीरज वर्मा यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. अमळनेर तालुक्यातील धानोरी येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला ‘रऊफ बँड’चे संचालक अस्लम अली सय्यद याने फसवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा…
वादळी वारे, विजांचा कडकडाट अन् पावसाचा इशारा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : मुंबईतील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. बुधवारी, २८ मे रोजी दुपारी पावणे पाच वाजता झालेल्या प्राप्त इशाऱ्यानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी ताशी ५० ते ६० कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सर्व यंत्रणांना तयारीत राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी : विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यास शक्यतो घरातच रहावे. सुरक्षित निवारा नसल्यास सखल जागा निवडून गुडघ्यात डोके घालून बसावे. विजा चमकत असताना…