जळगाव सायबर पोलिसांची कारवाई, फसवणुकीची रक्कम रोखली साईमत/जळगाव/प्रतिनिधी तुमचे बँक खाते मनी लाँड्रिंगसाठी वापरले जात असल्याची भीती दाखवून एका सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची ऑनलाईन माध्यमातून तब्बल ३१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, त्यातील १० लाख रुपये पोलिसांनी रोखले आहे. न्यायालयाच्या आदेशाने ती रक्कम संबंधित व्यक्तीला परत केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवारी, ४ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. चाळीसगाव येथील फुले कॉलनीतील रहिवासी प्रकाश बाबुलाल शिंपी (वय ७३) हे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी फसवणुकीचे बळी ठरले आहेत. एका अज्ञात व्यक्तीने स्वतःला दिल्ली पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे…
Author: Sharad Bhalerao
सायबर पोलिसात ४ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ‘ट्रेण्ड नाऊ’ नावाच्या ॲप्लिकेशनद्वारे जळगावातील एका तरुणाची तब्बल १६ लाख ९८ हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही फसवणूक १२ नोव्हेंबर २०२४ ते ३ जुलै २०२५ या कालावधीत घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी ३ जुलै रोजी सायबर पोलीस ठाण्यात चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, राजमालती नगर येथील निखील कैलास गौड (वय २९) यांना नोव्हेंबर २०२४ मध्ये काही अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला. त्यांनी निखीलला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांनी निखीलला ‘ट्रेण्ड नाऊ’ नावाचे एक…
एलसीबीची कारवाई, पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषदेत माहिती साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ उभ्या असलेल्या एका महेंद्र पिकअप वाहनातून ४ लाख २ हजार रुपये किमतीच्या सिगारेटची चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा जळगाव शहर पोलिसांनी यशस्वी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पुणे येथून एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्या कबुलीवरून आणखी दोन साथीदारांनाही ताब्यात घेतले आहे. चोरट्यांनी चोरलेल्या सिगारेट विकून मिळालेले ३ लाख रुपये पोलिसांनी जप्त केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवारी, ४ जुलै रोजी पत्रकार परिषदेत दिली. जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप येथे चंद्रशेखर जवरीलाल राका (वय ५०, रा. नवीपेठ जळगाव) यांच्या मालकीचे उभ्या असलेल्या पिकअप वाहनाचे कुलूप तोडून…
जामनेरला ‘डॉक्टर्स डे’ निमित्त आयोजित डॉक्टरांच्या सत्काराप्रसंगी प्रतिपादन साईमत/जामनेर/प्रतिनिधी : कोरोनासारख्या महामारीत डॉक्टरांमुळेच आपण सुरक्षित राहिलो. डॉक्टर हे खरोखरच आपल्या कुटुंबापेक्षा रुग्णाच्या हितासाठीच रुग्णाला अधिक वेळ देतात. त्यामुळे वैद्यकीय सेवा देणारे ‘डॉक्टर्स’ हे ईश्वराचे रूप आहे, असे प्रतिपादन प.पू. श्याम चैतन्य महाराज यांनी केले. येथील उपजिल्हा रुग्णालयात ‘डॉक्टर्स डे’ निमित्त गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टच्यावतीने आपल्या कुटुंबाची काळजी न करता अहोरात्र काम करणाऱ्या जामनेर शहरातील डॉक्टरांचा नुकताच सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जामनेर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षल चांदा होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जामनेरचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, आयएमएचे अध्यक्ष डॉ.संदीप पाटील उपस्थित होते. याप्रसंगी जामनेर…
नातेवाईकांनी केला खूनाचा आरोप, रुग्णालयात केला आक्रोश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील असोदा येथील रहिवासी असलेले दोन तरुण गुरुवारी, ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता दुचाकीने जळगाव शहराकडे येत असताना एका चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालक तरुणाचा उपचारावेळी मृत्यू झाला. तसेच दुचाकीस्वार दुसरा तरुण जखमी झाला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हा अपघात नसून नियोजित कट आहे. अपघाताचा बनाव करत खून केल्याचा धक्कादायक आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केल्याचे पहायला मिळाले. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, असोदा येथील रहिवासी मोहम्मद इब्राहिम खाटीक (वय ३८) या तरुणाचे जळगाव शहरात कपड्याचे दुकान आहे.…
१ हजार रुपयाच्या बक्षीसासह दिली पुस्तके भेट साईमत/जामनेर/प्रतिनिधी : येथील वाकी रस्त्यालगतच्या सम्राट अशोक नगरातील रहिवासी तसेच जळगावातील भगीरथ न्यू इंग्शिल स्कूल शाळेचा विद्यार्थी हिमांशु शरद भालेराव (सोनार) याने नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे. त्याने हलाखीच्या आणि प्रतिकुल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या बळावर यश मिळविल्याबद्दल जामनेर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक, कवी तथा साहित्य सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष, अमृतयात्री डी.डी.पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत १ हजार रुपयाचे रोख बक्षीस, अमृतयात्री पुस्तक आणि शालेय पुस्तके भेट देऊन त्याचा गौरव केला. तसेच त्याचे कौतुक करुन त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत पुढील शिक्षणासाठी लागणाऱ्या…
जिल्हाधिकाऱ्यांसह जि.प.च्या सीईओंना तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अर्हतेची माहिती आता राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये तपासली जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘एस टू इन्फोटेक’ संस्थेमार्फत विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. त्यामध्ये जिल्हा एमआयएस समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहायक, संगणक चालक, लिपिक, वाहन चालक आणि शिपाई अशा विविध पदांचा समावेश आहे. शासनाने या पदांसाठी वेळोवेळी शैक्षणिक अर्हतेबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. सध्या, बाह्य संस्थेद्वारे कर्मचाऱ्यांच्या…
काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अधिकृत नियुक्तीपत्र प्राप्त साईमत/जामनेर/प्रतिनिधी : येथील काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी गणेश राजाराम झाल्टे (माळी) यांची नुकतीच अधिकृत नियुक्ती जाहीर केली आहे. त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र गेल्या २८ जून रोजी प्राप्त झाले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी बोदवडचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर नेरकर, ॲड.राजीव चोपडे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून जामनेर शहर काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा रंगली होती. अखेर काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून झालेल्या बैठकीनंतर ही नियुक्ती निश्चित केली आहे. काँग्रेसच्या निष्ठावान आणि संघर्षशील कार्यकर्त्यांमध्ये गणेश झाल्टे यांची ओळख आहे.…
परिसरात होतोय दुषित पाणीपुरवठा ; नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील पिंप्राळा हुडकोत परिसरात अस्वच्छता पसरली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून दुषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. हुडकोत जागोजागी कचऱ्याचे मोठ-मोठे ढीग साचले आहे. याकडे मनपा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कचरा उचलावा, नियमित साफसफाईची व्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. शहरातील पिंप्राळा हुडको भागात कचरा उचलला गेला नसल्याने जागोजागी ढीगचे ढीग साचले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मोकाट जनावरे कचरा खाऊ लागले आहेत. कचऱ्यातील प्लास्टिकमुळे जनावरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याकडे मनपाने लक्ष देऊन कचरा उचलावा, अशी मागणी होत आहे. परिसरात उघड्यावर…
न.पा.समोरील जिजामाता चौकात कार्यकर्त्यांनी फोडले फटाके साईमत/जामनेर/प्रतिनिधी : येथील नगरपालिकेसमोरील जिजामाता चौकात शासनाने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यामुळे सोमवारी, ३० जून रोजी दुपारी जामनेर तालुका महाविकास आघाडी तसेच मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप खोडपे, डी.के.पाटील, किशोर पाटील, सचिन बोरसे, विश्वजीत पाटील, प्रल्हाद बोरसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाधिकारी डॉ.विजयानंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष अशोक पाटील, शिवसेना उबाठाचे सुकलाल बारी, ॲड.प्रकाश पाटील, माजी शहरप्रमुख सुधाकर सराफ, शहर संघटक उस्मान शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, संदीप मराठे, सागर जोशी, राहुल शिंदे, कुलवंत शिंदे, नंदू इंगळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश झाल्टे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.