राहत्या घरात गळफास घेऊन केली आत्महत्या साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील कुसुंबा येथील ३७ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना सोमवारी, ७ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. विशाल परशुराम पाटील असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात विशाल पाटील हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. ७ जुलै रोजी दुपारच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आले नाही. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याचे नातेवाईक राहुल पाटील यांच्यासह शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांनी धाव घेतली. त्याला खाली उतरवून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल…
Author: Sharad Bhalerao
जळगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील कानळदा रस्त्यावरील लक्ष्मी नगरातील २४ वर्षीय रामेश्वर लक्ष्मण भोई या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी, ८ जुलै रोजी सकाळी ७ वाजता घडली. विशेष म्हणजे, पंढरपूरहून विठूरायाचे दर्शन घेऊन परतलेल्या आईला मुलाने आत्महत्या केल्याचे चित्र समोर दिसून आले. या घटनेनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, नियतीने क्रूर डाव साधून आईच्या आयुष्यात न भरून येणारा अंधार पसरला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पांडुरंगाच्या भेटीसाठी रामेश्वरची आई मंगला भोई ह्या काही दिवसांपासून पंढरपूरला गेल्या होत्या. आपल्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला भेटण्याच्या ओढीने त्या…
जळगावात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा, आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) गुरुकुल कॉलनी, क्राऊन बेकरी मागे, सेट. जोसेफ स्कूलजवळ, एम. जे. कॉलेज रोड, जळगाव यांच्यावतीने गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन केले आहे. हा उत्सव स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी एक आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे. गुरुवारी, १० जुलै रोजी सकाळी ८ वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात सकाळी ८ वाजता भूपाळी आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर दिवसभर सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत गुरुपूजनाचा कार्यक्रम सुरू राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी आरती, महानैवैद्य अर्पण करण्यात येईल. सकाळी ११ वाजता मार्गदर्शन…
प्रलंबित बदल्यांविरोधात कामगार महासंघ आक्रमक साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव विभागातील कामगारांच्या बदल्या प्रलंबित असल्याने कामगार महासंघाने विभागीय कार्यालयासमोर मंगळवारी, ८ जुलैपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. तसेच २ कर्मचाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाला प्रारंभ केला आहे. ते न्याय मिळेपर्यंत कायम उपोषणाला बसणार आहेत. मुख्य कार्यालयाच्या परिपत्रकानुसार १५ टक्के बदल्या करण्याचे आदेश असताना आणि बदल्यांसाठीची टक्केवारी शिल्लक असतानाही कामगारांच्या बदल्या केल्या नसल्यामुळे कामगारांना अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. उपोषणाला कामगार संघटनेने पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. आंदोलन संघटनेच्या नेतृत्वाखाली होत असल्याचे स्पष्ट केले आहे. संघटनेने प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल. आंदोलनामुळे औद्योगिक…
भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे मरीआई देवस्थानतर्फे आवाहन साईमत/जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील आमखेडा देवी येथील भाविकांचे श्रद्धास्थान श्री तीर्थक्षेत्र मरीआई देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून गुरुवारी, १० जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री मरीआई मातेस वंदन करून प.पू. अशोक महाराज यांचे आशीर्वाद घेऊन महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा कार्यक्रम ब्रह्मलीन प.पू. संत अशोक महाराज यांच्या भक्त परिवाराच्यावतीने होणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी जामनेर आगारातून जामनेरहून सकाळी ६:४५, सकाळी १० वा., सायंकाळी ७ वा. अशा बस फेऱ्या उपलब्ध राहतील. सर्व भाविकांनी उपस्थित…
शाळेतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा ट्रॉफीसह प्रमाणपत्र देऊन गौरव साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील प्रेमनगरातील रायसोनी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या ‘मंथन’ स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली. स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेच्यावतीने ट्रॉफीसह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय अशा विविध गटातील अनेक विद्यार्थ्यांनी यशात आपला ठसा उमटविला आहे.शाळेच्या यशात शिक्षकांसह पालक, विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे मुख्याध्यापक मनोज शिरोळे यांनी सांगितले. रायसोनी स्कूलमधील विद्यार्थ्यांना शालेय वेळेतच स्पर्धा परीक्षांची तयारी करून दिली जाते. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मकतेकडे झुकणारा दृष्टिकोन यासाठी शाळेने नर्सरीपासूनच स्पर्धा परीक्षा अनिवार्य केली आहे. अशा अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेतच मार्गदर्शन केले जाते. त्यात स्पर्धा…
परिसरातून पालखीसह निघाली दिंडी, आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते महाआरती साईमत/जळगाव/प्रतिनिधी : प्रती पंढरपूर असलेल्या पिंप्राळा येथील पांडुरंग साई रेसिडेन्सीमधील विठ्ठल मंदिरात देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त सकाळी सौ. कुमुद-यश धन्यकुमार जैन, वर्षा-सचिन अशोक चौधरी अशा दोन्ही नवदाम्पत्यांच्या हस्ते महापूजेसह दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच चित्रादेवी प्रभाकर लाठी, नेहा जितेंद्र लाठी यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी कॉलनी परिसरातून पालखीसह दिंडी काढण्यात आली. रात्री आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी पांडुरंग साई रेसिडेन्सीमधील महिला पारंपरिक वेशात सहभागी झाल्या होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी, माजी नगरसेवक विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर पांडुरंग साई भजनी मंडळातर्फे भजनसंध्याचा कार्यक्रम…
शिवलिंग पितळी आवरणाच्या अभिषेकासह विविध कार्यक्रम साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील पिंप्राळा शिवारातील सोनी नगरात मनोकामना पूर्ती करणाऱ्या जागृत स्वयंभू महादेव मंदिराला ७ वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे शुक्रवारी, ११ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता स्थापना दिनानिमित्त शिवलिंगाला पितळी आवरण बसविण्यात येईल. मंदिराच्या स्थापनादिनानिमित्त राजेश वाणी, गणेश राणे, प्रकाश गजाकुश यांच्यासह आदी मान्यवरांच्या हस्ते जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राक्षाभिषेक त्यानंतर सकाळी ९ वाजता महाआरती होईल. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात येईल, असे नरेश बागडे यांनी सांगितले. जागृत स्वयंभू महादेव मंदिराची स्थापना गेल्या ११ जुलै २०१८ रोजी केली होती. त्यानंतर दानशूर दाते यांच्या सहकार्याने मंदिराचा जिर्णोद्धार झाले आहे. मनोकामना पूर्ण होत असल्याची भावना परिसरातील सोनी नगर,…
सावदा पोलिसात गुन्हा दाखल, धुळे एसीबी विभागाची कारवाई साईमत/सावदा, ता.रावेर/प्रतिनिधी : रावेर तालुक्यातील खिरोदा येथील जनता शिक्षण मंडळ संचलित धनाजी नाना विद्यालयातील मुख्याध्यापिकेसह लिपीकाला सोमवारी, ७ जुलै रोजी दुपारी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. महिला उपशिक्षिकेची प्रसुती रजा मंजूर करण्यासाठी ही लाच मागितली होती. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुख्याध्यापिका मनिषा पितांबर महाजन (वय ५७) आणि कनिष्ठ लिपीक आशिष यशवंत पाटील (वय २७, दोन्ही रा.खिरोदा, ता. रावेर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सविस्तर असे की, तक्रारदार यांची सून ही खिरोदा…
विठ्ठलाच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले साईमत/मालेगाव/प्रतिनिधी : येथील मालेगाव कॅम्पमधील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित के.बी.एच. विद्यालय (दुपार सत्र) येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र टाकळीतील शिवसेवा वारकरी शिक्षण सेवा संस्थेचे संस्थापक सचिन महाराज यांच्यातर्फे ह.भ.प. परमेश्वर महाराज घाटे (बुलढाणा) यांचे प्रवचन आणि दिंडी काढण्यात आली. यावेळी त्यांच्या हस्ते श्रीविठ्ठलांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य प्रफुल्ल निकम यांनी ह.भ.प. परमेश्वर महाराज यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. महाराजांनी वारकरी संप्रदायाचे महत्त्व पटवून विद्यार्थ्यांना दृष्टांत सांगून मार्गदर्शन केले. याप्रसंगी पर्यवेक्षक के.डी. देवरे, व्ही.ए.दासनूर, ज्येष्ठ शिक्षक डी.डी.शिरोळे, एम.एम.बच्छाव, कार्यालयीन प्रमुख मानूर भाऊसाहेब, ग्रंथपाल एम.एस.भदाणे आदी उपस्थित होते. दिंडीला पी.जे.पवार, वाय.एस. ठोके यांच्या…