खा.स्मिताताई वाघ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाना यश साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील डांगर बु.गावाला अखेर ‘उदयनगर’ नावाची अधिकृत ओळख मिळाली आहे. केंद्र शासनाच्या अंतिम मंजुरीनंतर महाराष्ट्र शासनाने २७ मे २०२५ रोजी राजपत्रात ‘उदयनगर’ नाव जाहीर केले आहे. त्यामुळे गावाच्या इतिहासात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. गेल्या सहा वर्षांपासून खा.स्मिताताई वाघ यांनी सातत्याने पाठपुरावा करत ही प्रक्रिया पूर्णत्वास नेली. नामांतर ही केवळ औपचारिक बाब नाही. तर ती ग्रामस्थांच्या भावना, अस्मिता आणि स्वाभिमानाचे प्रतीक ठरली आहे.दिल्लीतील गृह विभागाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर मुंबई मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने या निर्णयाला अंतिम स्वरूप दिले. गावाच्या नामांतराची बातमी समजताच गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी फटाके, मिठाई, पुष्पगुच्छ, ढोल-ताशांच्या…
Author: Sharad Bhalerao
पुरुषांच्या नसबंदीसाठी लाभार्थ्यांचे मत परिवर्तन करण्याचे आवाहन साईमत/जामनेर/प्रतिपादन : तालुक्यात लोकसंख्या नियंत्रणासाठी शस्त्रक्रिया तसेच साधनांद्वारे उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या हस्ते जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजनासह दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. २०२४- २०२५ या वर्षात जामनेर तालुक्यात १ हजार १९५ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. पुरुष नसबंदी ही स्त्री शस्त्रक्रियेपेक्षा सुलभ आणि सोपी आहे. त्यामुळे अधिकाधिक कर्मचाऱ्यांनी पुरुषांच्या नसबंदीसाठी लाभार्थ्यांचे मतात परिवर्तन करावे, असे प्रतिपादन डॉ. भायेकर यांनी अध्यक्षीय भाषणात केले. याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, डॉ.पल्लवी राऊत, डॉ.मोहित जोहरे, डॉ.संदीप कुमावत,…
गुरुमुळे मिळाली जगाला दिशा : ब्रह्मकुमारी जयश्री दीदी साईमत/चोपडा/प्रतिनिधी : तालुक्यातील आडगाव येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात ओम शांती केंद्रात आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात गुरुजनांचा गौरव करण्यात आला. आडगाव येथील नीलकंठेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.मगरे यांच्यासह सर्व सहकाऱ्यांना ओम शांती केंद्रात जयश्री दीदी यांनी गौरविले. यावेळी दीदी म्हणाल्या की, गुरु पौर्णिमेला गुरुचे महत्व अनन्य साधारण आहे. गुरुमुळे जगाला दिशा मिळाली आहे. गुरुंनी केलेल्या संस्कारामुळे जगाची प्रगती होत आहे. ब्रह्मा बाबा आमचे गुरु भगवान आहेत, अशा शब्दात त्यांनी गुरूंचा महिमा विशद केला. यावेळी चंद्रशेखर भाई, माणिक पाटील, ईश्वर पाटील यांच्यासह ओम शांती केंद्रातील दीदी, भगिनी तसेच प्राथमिक विद्यामंदिर…
पालक-शिक्षक सभेला पालकांचा मिळाला प्रतिसाद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक, डॉ. सुनील महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये शनिवारी, १२ जुलै रोजी पालक-शिक्षक सभा घेण्यात आली. सभेत कॉल इंडिया लिमिटेडचे सामुदायिक विकास अधिकारी डॉ. आशिष सूर्यवंशी यांच्याकडून विद्यालयास ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमासाठी कचराकुंडी भेट देण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी महापौर जयश्रीताई महाजन होत्या. सभेला पालक प्रतिनिधी म्हणून रामकृष्ण जंगले, मनीषा पाटील उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. सभेत मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांनी पालकांशी चर्चा केली. तसेच केतन बऱ्हाटे यांनी पालकांना शिष्यवृत्तीविषयी माहिती दिली. यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ज्ञानचंद बऱ्हाटे…
विद्यार्थ्यांकडून मारहाण झाल्याचा पालकांनी केला आरोप साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील आर.आर.विद्यालयात खेळत असताना नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा अचानक जमिनीवर पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी, ११ जुलै रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. कल्पेश वाल्मीक इंगळे (वय १५, रा. कठोरा, जि. बुलढाणा, ह.मु. कासमवाडी, जळगाव) असे मयत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. दरम्यान, त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कल्पेशच्या आई-वडिलांनी इतर विद्यार्थ्यांकडून त्याला मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. सविस्तर असे की, शहरातील कासमवाडीत कल्पेश इंगळे हा विद्यार्थी आई-वडील, बहीण आणि लहान भावासोबत वास्तव्याला होता. तो ११ जुलै रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. शाळेच्या…
बैठकीत सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे निर्देश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यातील नगरपरिषद, नगर पंचायतीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या, प्रलंबित रजा रोखीकरणाबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनु सारवान यांनी दिले आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या, अडचणींसह निवेदनांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी, ११ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते अध्यक्षपदावरुन बोलत होते. बैठकीला सहआयुक्त नगरपरिषद, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांचे मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीत हाताने मैला उचलण्यास प्रतिबंध व पुनर्वसन अधिनियम २०१३ ची प्रभावी अंमलबजावणी, सफाई कर्मचाऱ्यांचे सुरक्षित कार्य वातावरण,…
अधीक्षिकेवर गंभीर आरोप, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील आशादीप शासकीय महिला वस्तीगृहात एका गतिमंद मुलीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वस्तीगृहात तैनात असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर तब्बल सात दिवसांनी हे प्रकरण उघडकीस आले. किरकोळ वादातून वस्तीगृहातीलच एका मुलीने गतिमंद मुलीला मारहाण केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दरम्यान, अशा सर्व प्रकारामुळे सध्या आशादीप वस्तीगृह वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच याप्रकरणी संबंधितांनी चौकशीला कसून सुरूवात केली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रफिक तडवी यांनी तात्काळ चौकशी समिती नेमली. चौकशीत वस्तीगृहाच्या अधीक्षिका सोनिया देशमुख यांनी हे प्रकरण…
सोहळ्यात पाद्यपूजन अभिषेक, दासबोध ग्रंथाच्या वाचनासह विविध कार्यक्रमांचा समावेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरापासून जवळील कुसुंबा येथील गट नं. ३८६, सद्गुरू धाम पुरुषोत्तम पाटील नगरात सद्गुरू समर्थ दत्ता आप्पा महाराज सेवा प्रतिष्ठानतर्फे कल्पवृक्ष शिवमंदिरात गुरुपाैर्णिमेच्या दिवशी दत्ता आप्पा महाराज पादुका मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात पाद्यपूजन अभिषेक, दासबोध ग्रंथ वाचन, गुरुपूजन नामसंकीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांनी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रभु सुनील जाखेटे (कृष्णदास) यांचे डी. के. चोपडे यांनी स्वागत केले. तसेच ह.भ.प. मयूर महाराज जावळे यांचे स्वागत धनराज सावदेकर यांनी केले. यावेळी प्रभु सुनील जाखेटे इस्कॉन परिवाराने सुश्राव्य भजन तसेच हरीनामाचे जीवनात असलेले महत्त्व गीता भागवतमधील अनेक उदाहरण देवून…
महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना मनसेतर्फे दिले निवेदन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : वीज महावितरण विभागातर्फे ग्राहकांना वेळोवेळी वीजबिल भरण्याची तारीख, थकीत बिलामुळे वीज कनेक्शन तोडण्याची चेतावणी, देखभाल-दुरुस्तीमुळे होणारी वीज खंडित सेवा आदी प्रकारचे एसएमएस मोबाईलवर पाठविले जातात. मात्र, हे सर्व एसएमएस इंग्रजी भाषेत असतात. महाराष्ट्रातील बहुसंख्य नागरिक मराठी भाषिक आहेत. त्यांना इंग्रजी भाषेतील एसएमएस (संदेश) समजणे कठीण जाते. परिणामी अनेकवेळा ग्राहकांना योग्यवेळी महत्त्वाची माहिती मिळत नाही. त्यामुळे गैरसमज, त्रास व मानसिक तणाव निर्माण होतो. यासाठी वीज महावितरणतर्फे ग्राहकांना पाठविले जाणारे एसएमएस मराठीतच पाठविण्यात यावे, अशा आशयाची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वीज महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंत्यांकडे दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र शासनाचा स्पष्ट आदेश…
१५ जोडप्यांच्या हस्ते अभिषेक, १०१ भाविकांच्या हस्ते महाआरती साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील पिंप्राळा परिसरातील सोनी नगरातील भाविकांची मनोकामना पूर्ती करणाऱ्या जागृत स्वयंभू महादेव मंदिराला ७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दानशूर दात्यांकडून मंदिरात गुरुवारी, १० जुलै रोजी साडे सात किलो वजनाचे पितळी शिवलिंग बसविण्यात आले. तसेच १५ जोडप्यांच्या हस्ते रुद्राक्ष अभिषेक, पंचामृत विधिवत पूजा करून १०१ भाविकांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. शिल्पकार गजानन तांबट यांनी १० जुलै रोजी शिवलिंग बसविल्यानंतर ११ जुलै रोजी मंदिरात महिलांनी रांगोळी काढली होती. त्यानंतर सकाळी साडे सात वाजता राजेश वाणी, गणेश राणे, प्रकाश गजाकुश यांच्या हस्ते महादेव शिवलिंगाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर चेतन कपोले महाराज यांच्या अमृतवाणीतून १५…