संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : राज्य शासनाच्या अन्यायकारक कर धोरणांविरुध्द जळगाव शहरात असंतोषाची लाट उसळली आहे. वॅट, नूतनीकरण फी व एक्साईज ड्युटीमध्ये झालेल्या वाढीमुळे हतबल झालेल्या बियर बार मालक, वाईन शॉप चालक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी शिवतीर्थ मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सोमवारी, १४ जुलै रोजी मूक मोर्चा काढत कर धोरणांविरुध्द विरोध व्यक्त केला. मोर्चानंतर संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले. संघटनेतर्फे काढण्यात आलेला मोर्चा शांततेत पार पडला. त्यानंतरही आंदोलन अधिक तीव्र रूप धारण करणार असल्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे. जळगाव जिल्हा रिटेल वाईन असोसिएशन, बियर बार मालक संघटनेच्या संयुक्त नेतृत्वाखाली झालेल्या मूक आंदोलनात शहरातील सर्व मद्यविक्री दुकानांसह बियर बार…
Author: Sharad Bhalerao
जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील चिंचोली येथे उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकुलात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आयुष्मान भारत इन्फ्रास्ट्रकचर योजनेतून मंजूर ५० खाटांच्या क्रिटिकल केअर युनिट इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन रविवारी, १३ जुलै रोजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी खा. स्मिताताई वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आयुष्मान भारत इन्फ्रास्ट्रकचर योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या क्रिटिकल केअर युनिटसाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात येत आहे. त्यामध्ये ५० खाटांची उच्चस्तरीय उपचार सुविधा असणार आहे. हे युनिट भविष्यातील आपत्कालीन…
बहिणाबाई-सोपानदेव चौधरी खान्देशस्तरीय मराठी साहित्य संमेलनात विविध परिसंवादासह कवी संमेलन, पुरस्कार वितरण उत्साहात साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील लोक बोलीतून संवाद साधण्यात संकोच करतात. बरे ते प्रमाण मराठीही व्यवस्थित बोलत नाहीत. त्यांच्या तोंडी येणारे वाक्यही इंग्रजी वळणाचे आहे. तेव्हा ग्रामीण लोकच बोलीभाषेचे तारणहार आहेत. ग्रामीण बोलीतून व्यक्त होणाऱ्या माय ‘बहिणाबाईंचा’ आम्हाला सार्थ अभिमान राहील, असे प्रतिपादन अठराव्या बहिणाबाई सोपानदेव खान्देश साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. फुला बागुल यांनी केले. शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात पवन चारिटेबल ट्रस्ट, अर्पण सेवा ट्रस्ट, कविवर्य स्व.पुरुषोत्तम नारखेडे बहुउद्देशीय संस्था, युवा विकास फाउंडेशन यांच्या सौजन्याने कविवर्य स्व.पुरुषोत्तम नारखेडे (मालतीकांत) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बहिणाबाई सोपानदेव खान्देश खान्देस्तरीय मराठी साहित्य संमेलन…
११ विद्यार्थिनींना प्रत्येकी १५ हजार रुपये विद्यावेतनाची केली घोषणा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय आणि टेन एआयज् प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात विद्यार्थिनींच्या कौशल्य विकासासाठी एक महत्त्वपूर्ण असा सामंजस्य करार (एमओयु) नुकताच झाला आहे. या करारातंर्गंत टेन एआयज् कंपनीने महाविद्यालयातील ११ निवडक विद्यार्थिनींना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील प्रगत प्रशिक्षण देण्यासाठी १० आठवड्यांचा विशेष कोर्स मोफत उपलब्ध करून दिला आहे. यासोबतच प्रत्येक विद्यार्थिनीला १५ हजार रुपये विद्यावेतन देण्याची घोषणाही कंपनीने केली आहे. कोर्सच्या उद्घाटनाचा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.जे. पाटील यांच्या हस्ते शनिवारी, १२ जुलै रोजी ऑनलाइन पद्धतीने पार पडला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद तायडे, उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे,…
मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे कार्य देशपातळीवर गाजले साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जामनेर तालुक्यातील गोद्री गावाचे भुमिपुत्र तथा मुंबईतील मुख्यमंत्री सहाय्यता निधी मंत्रालय कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांना टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपतर्फे “सोशल इम्पॅक्ट समिट- सीएसआर २०२५” अशा भव्य कार्यक्रमात सन्मानपूर्वक स्पीकर म्हणून आमंत्रित केले होते. हा कार्यक्रम मुंबईतील ताज लँड्स एंड, वांद्रे येथे नुकताच पार पडला. रामेश्वर यांनी गावाचे नाव देशपातळीवर उज्ज्वल करणाऱ्या गौरवाने गोद्रीकरांचा अभिमान द्विगुणित झाल्याचा सूर ग्रामस्थांमधून उमटत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रभावी कार्यपद्धती, विविध यशस्वी उपक्रम आणि भविष्यातील योजनांबाबत उपस्थित मान्यवरांना रामेश्वर यांनी सविस्तर माहिती दिली. देशभरातील दिग्गज उद्योगपती, नामवंत डॉक्टर्स, सीएसआर प्रमुख, विविध एनजीओ प्रतिनिधी उपस्थित होते. याबद्दल…
विद्यापीठात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सचिवांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : नव्या शैक्षणिक धोरणात सहज उपलब्धता, समान संधी, जबाबदारी, गुणवत्तापूर्ण शिक्षण, माफक दरात शिक्षणाची व्यवस्था ही पाच उद्दिष्टे असल्याने देशातील विद्यापीठांनी त्या अनुषंगाने कार्य करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा. मनिष जोशी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पुस्तक प्रकाशनासह लेखक सन्मान कार्यक्रमात केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शनिवारी, १२ जुलै रोजी पुस्तक प्रकाशनासह लेखकांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही. एल माहेश्वरी होते. यावेळी मंचावर आग्रा येथील केंद्रीय हिंदी संस्थानचे निदेशक प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी, प्र. कुलगुरू…
उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी दिली माहिती साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील आर. आर. विद्यालयात नववीत शिकत असलेल्या कल्पेश इंगळे या विद्यार्थ्याचा शाळेतीलच एका अल्पवयीन मुलाकडून झालेल्या हाणामारीत मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी शनिवारी, १२ जुलै रोजी दिली. दरम्यान, कल्पेशच्या शवविच्छेदनानंतर इंगळे कुटुंबाने त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन कल्पेशवर अंत्यसंस्कार केल्याचेही त्यांनी सांगितले. सुरुवातीला त्याच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, त्याच्या मृत्यूचा उलगडा झाल्यानंतर आता जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणातील त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला आरोपी हा विधिसंघर्षित (अल्पवयीन) विद्यार्थी आहे, हे विशेष. त्याला बाल…
संमेलनात विविध सत्रांचा असणार समावेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पवन चॅरिटेबल ट्रस्ट, अर्पण सेवा ट्रस्ट, कविवर्य स्व.पुरुषोत्तम नारखेडे बहुउद्देशीय संस्था, युवा विकास फाउंडेशन यांच्या सौजन्याने कविवर्य स्व.पुरुषोत्तम नारखेडे (मालतीकांत) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अठरावे बहिणाबाई सोपानदेव खान्देश खान्देशस्तरीय मराठी साहित्य संमेलन रविवारी, १३ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जळगावातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन हॉलमध्ये होत आहे. संमेलनाचे उद्घाटन आ.राजू मामा भोळे यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी डॉ.फुला बागुल राहतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा.स्मिताताई वाघ, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, माजी नगरसेवक अमित काळे, माजी संमेलनाध्यक्ष संजीवकुमार सोनवणे असतील. स्वागताध्यक्ष म्हणून पुष्पाताई साळवे, कार्याध्यक्ष विजय लुल्हे आहेत. यासोबतच सेवानिवृत्त डीवायएसपी राजेंद्र रायसिंग,…
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते मान्यवरांचा स्मृतीचिन्ह देवून गौरव साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्हा पोलीस दलाच्यावतीने गुरुपौर्णिमेनिमित्त जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील गुरुंचा सन्मान सोहळा पोलीस मुख्यालयातील पद्मालय हॉलमध्ये नुकताच पार पडला. कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळया क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांसह शिक्षकेतर मान्यवरांना आमंत्रित केले होते. यावेळी डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते मान्यवरांचा स्मृतीचिन्ह देवून सन्मान केला. कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रेश्मा अवतारे, स्टाफ, मानव संसाधन विभागाने केले होते. कार्यक्रमात पोलिसांसह उपस्थित मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करुन सकारात्मक चर्चा झाली. सन्मानार्थींमध्ये गणपतराव पोळ, यजुर्वेद्र महाजन, डॉ. अनिल डोंगरे, अशोक कोतवाल, डॉ.वी.वाय…
प्रत्येकाने अंगी खेळाडूवृत्ती जोपासावी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : उत्तम खेळीचे प्रदर्शन करत पंजाब संघाने कर्नाटक संघावर २-० ने विजय मिळवून सलग दुसऱ्यावर्षीही १७ वर्षांखालील सीआयएससीई राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेत विजयश्री खेचून आणली. उपविजेता संघानेही आपला सुयोग्य बचाव केला. त्यांना उपविजयी म्हणून समाधान मानावे लागले. खेळ आला तिथे पराभव आणि विजय तर होणारच. फुटबॉल हा असा खेळ आहे की, ज्याने सांघिक भावना व समन्वयाची वृद्धी होते. त्यासाठी खेळाडूंनी अंगी खेळाडूवृत्ती जोपासणे गरजे असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते विजयी उपविजयी संघाचा चषक, रोख पारितोषिकाचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सीआयएससीईचे अर्णवकुमार शॉ, सिद्धार्थ किर्लोस्कर,…