मुंबईच्या उत्कर्ष फाउंडेशनला कार्यादेश, प्रत्येक श्वानाची नोंद बंधनकारक साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरासह परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ दिवसागणिक वाढला आहे. अखेर महानगरपालिकेकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मुंबईतील ‘उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनला’ कार्यादेश देण्यात आले. येत्या शुक्रवारी, १ ऑगस्टपासून कुत्रे पकडण्यास सुरूवात होईल. तीन वर्षासाठी कुत्रे निर्बिजीकरणाची जबाबदारी आता फाउंडेशनची असणार आहे. गेल्या महिन्यात चार वर्षीय बालकाचा मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाल्यानंतर झोपलेले प्रशासन जागे झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. अखेर पाच निविदा आल्यावर मुंबईच्या उत्कर्ष फाउंडेशनला कार्यादेश देण्यात आले. प्रती श्वानप्रमाणे फाउंडेशनला १ हजार १९९ रूपये खर्च दिला जाणार आहे. मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून त्यांना ॲन्टी रेबीज…
Author: Sharad Bhalerao
देशभरातून १६ ट्रेकर्संनी ट्रेकसाठी घेतला सहभाग साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील ॲड. प्रसाद वसंत ढाके यांनी ‘युथ होस्टेल’तर्फे आयोजित लडाखची राजधानी लेह ते उमलिंगला पास अशा १९ हजार २४ फुट उंचीवरील ३५० किलोमीटर अंतराच्या सायकल ट्रेकमध्ये सहभाग घेतला होता. उमलिंगला पास हे ठिकाण भारत-चीन सीमारेषेलगत आहे. या ट्रेकसाठी देशभरातून १६ ट्रेकर्संनी सहभाग घेतला होता. ट्रेकचा रस्ता हा लडाखमधील काराकोरम रेंजमधील सिंधू नदीच्या काठाकाठाने आहे. अत्यंत कडाक्याची अंगातील हाडे गोठविणारी थंडी असलेला, अत्यंत खडतर, प्रचंड चढ असलेला, ऑक्सिजन प्रमाण अतिशय अत्यल्प असलेला असा हा रस्ता आहे. प्रवासात ट्रेकर्संना मध्येच पाउस, मध्येच हिमवर्षाव किंवा हिमवादळं, प्रचंड थंडी अशा अडचणींचा सामना करावा लागला. लेह ते…
परिसरात पसरले धार्मिक वातावरण, मध्यरात्रीनंतर विसर्जन मिरवणूक साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील आसोदा येथील चौधरी वाड्यालगतच्या गणपती मंदिराजवळ शशिकांत भोजू येवले यांच्या निवासस्थानी गेल्या ७ वर्षांपासून सलग दशामाता देवीची स्थापना करण्यात येत आहे. यंदाही त्यांनी गेल्या गुरुवारी, २४ जुलै रोजी दशामाता देवीची स्थापना केली आहे. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी कल्पना येवले आणि परिवार परिसरातील भाविक, भक्त भक्तीभावाने पूजा-अर्चा करतात. त्यामुळे परिसरात धार्मिक वातावरण पसरले आहे. येत्या शनिवारी, २ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर मिरवणूक काढून विसर्जन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दशामाता देवीच्या स्थापनेनिमित्त बहुतांश ठिकाणी भाविक दहा दिवस उपवास करतात. आठव्या दिवशी कुमारिका बसविल्या जातात. दहाव्या दिवशी भंडाऱ्याचा कार्यक्रम तर अकराव्या दिवशी दशामातेला नैवेद्य…
लांडोर खोरी वन उद्यानातील भेटीत जाणून घेतली माहिती साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील मातृभूमी रक्षक अभ्यासिका वर्गाच्या विद्यार्थ्यांना व्याघ्र दिनाचे औचित्य साधून २९ जुलै रोजी लांडोर खोरी वन उद्यानातील भारतीय वृक्षांची माहिती, मानवास उपयुक्त आयुर्वेदिक औषधांचे उपयोग, प्रतिकात्मक वन्यप्राण्यांची माहिती देण्यात आली. तसेच खेळ खेळत प्रदूषण रोखण्यासाठी विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांनी संकल्प केला. याप्रसंगी जळगाव वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अजय रायसिंग यांनी वृक्षांची तर वनरक्षक मयूर पाटील यांनी वन्यप्राण्यांविषयी माहिती दिली. लांडोर खोरी वन उद्यानातील दिलेल्या भेटीत विद्यार्थ्यांना वन्य प्राण्यांसह औषधीविषयी धडे देण्यात आले. तसेच त्यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आपदा मित्र जगदीश बैरागी यांनी सापांविषयी…
भविष्यात होणाऱ्या राज्य परिषदेच्या आयोजनाची केली घोषणा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव जिल्हा महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाच्यावतीने नवीन बसस्थानकाजवळील एका हॉटेलात बैठकीचे आयोजन केले होते. ही बैठक प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चौधरी यांच्या पुढाकाराने झालेल्या समाजाच्या भविष्यातील वाटचाल, एकजुटीवर चर्चा करण्यात आली. बैठकीत विजय चौधरी यांनी समाजबांधवांशी संवाद साधत समाजाचा विकास आणि परिवर्तनासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. बैठकीला स्थानिक पंचमंडळ ३५०, महासंघाचे पदाधिकारी, समाजबांधव उपस्थित होते. बैठकीत भविष्यात राज्य परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. ही राज्य परिषद समाजाच्या परिवर्तनासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी व्यासपीठ ठरेल. जुन्या रूढी आणि परंपरांकडे…
दहावीचा ६४.८२ तर बारावीचा ४९ टक्के लागला निकाल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळामार्फत जळगाव जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या दहावीसह बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी, २९ जुलै रोजी जाहीर करण्यात आला. जून-जुलै २०२५ या कालावधीत परीक्षा पार पडली होती. दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातून ७४६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यशाचे प्रमाण ६४.८२ टक्के इतके आहे. हे निकाल विभागात सर्वाधिक टक्केवारीपैकी एक मानले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये समाधानकारक वातावरण आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल बारावीच्या पुरवणी परीक्षेत जळगाव जिल्ह्यातून ५६७ विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी २७६ विद्यार्थी…
जुक्टो संघटनेतर्फे जि.प.च्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले मागणीचे निवेदन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : संपूर्ण राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६पासून अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शालेय शिक्षण विभागाद्वारा राबविण्यास सुरुवात झाली आहे. आजतागायत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत.अद्यापही जळगाव जिल्ह्यातील कुठल्याही उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयात मंजूर विद्यार्थी संख्येइतके प्रवेश झालेले नाही. विशेषतः कला शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत नगण्य असल्याने असंख्य शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील यापुढील रिक्त जागांवरील संवर्गनिहाय प्रवेश तसेच संवर्गाची संख्या पूर्ण झाल्यानंतर उर्वरित खुल्या वर्गातील प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांना देण्यात येऊन अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुकर करावी, अश आशयाची मागणी राज्य कनिष्ठ…
शिक्षण परिषदेत विविध शैक्षणिक विषयांवर केले मार्गदर्शन साईमत/जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील पाळधी येथील केंद्र शाळेत केंद्र स्तरीय शिक्षण परिषद नुकतीच उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख बाबुराव धुंदाळे होते. यावेळी केंद्र आणि शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते. यावेळी केंद्रातील माळपिंप्री येथील पदवीधर शिक्षक पुखराज पवार यांचा केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळाल्याने सत्कार करण्यात आला. यावेळी विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. शैक्षणिक वर्षीतील पहिलीच शिक्षण परिषद असल्याने आगामी काळातील वेगवेगळ्या उपक्रमांचे नियोजन केले होते. सुरवातीला पाळधी बाईज शाळेच्यावतीने आदर्श परिपाठ सादर करण्यात आला.सुरवातीला केंद्रातील मुख्याध्यापकांसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आगामी नियोजनाच्या दृष्टीने केंद्रस्तरीय तज्ज्ञ शिक्षक समितीची निवड करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख बाबुराव धुंदाळे यांनी…
प्रदीर्घ ३२ वर्षांचा सेवाकाळ पूर्ण, अनेकांकडून सपत्नीक सत्कार साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : येथील सुखसागर बहुउद्देशीय सभागृहात तालुक्यातील करगाव आश्रमशाळेतून ३२ वर्षांचा प्रदीर्घ सेवाकाळ पूर्ण करून नुकतेच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक कवी मनोहर आंधळे यांचा सेवापूर्ती समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. अध्यस्थानी चाळीसगाव मसापचे संस्थापक-अध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप होते. याप्रसंगी मसाप शाखेचे कार्यकारी विश्वस्त तथा ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, कवी प्रा. वा. ना. आंधळे, ॲड. प्रशांत पालवे, सेवा सहकारी शि. प्र. मंडळाचे उपाध्यक्ष तथा चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मच्छिंद्र राठोड, सेवा सहकारीचे चिटणीस राजेश राठोड, संचालक योगेश चव्हाण, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकर बागुल तसेच सत्कारमूर्ती कवी मनोहर आंधळे, उर्मिला आंधळे आदी मान्यवर…
कंजरवाड्यात पसरली शोककळा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील कंजरवाडा भागातील रहिवासी रवींद्र वसंत माछरे यांचा मध्यप्रदेश राज्यातील सागर जिल्ह्यातील आसासौद गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी, २८ जुलै रोजी मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे कंजरवाडा परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. त्यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे संबंधितांनी सांगितले. रवींद्र माछरे हे रिक्षा चालवून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी त्यांचे सुपुत्र आकाश माछरे यांचे निधन झाले होते. त्यापूर्वी त्यांच्या मुलीचाही मृत्यू झाला होता. अशा सलग दु:खद घटनांनी कुटुंबाला मानसिकदृष्ट्या मोठा आघात बसला…