Author: Sharad Bhalerao

पालकमंत्र्यांनी सफारीचे दोन तिकीट केले बुक साईमत/जळगाव/प्रतिनिधी : सातपुडा जंगल सफारीचा पहिला टप्पा सुमारे अडीच कोटी रुपये निधीतून पूर्ण केला आहे. सुरुवातीला फक्त मूलभूत पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. त्यात प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते, पाच सफारी वाहने, १८ प्रशिक्षित गाईड आणि चालकांची नियुक्ती यांचा समावेश आहे. जैवविविधतेचे संवर्धन, स्थानिक रोजगार निर्मिती आणि पर्यावरण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारीला प्रारंभ झाला आहे.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सफारीचे दोन तिकीट बुक केले आहे. दरम्यान, सातपुड्याच्या कुशीत वसलेली ही अभयारण्यसंपन्न जागा जैवविविधतेचे संरक्षण, पर्यावरण पर्यटन आणि स्थानिक रोजगारासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. यावेळी मंत्री गुलाबराव…

Read More

आईच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्ष लागवड ; शैक्षणिक साहित्य वाटपाचा केला संकल्प साईमत/जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील टाकळी खुर्द येथील रहिवासी विकास सोसायटीचे चेअरमन आनंदा संतोष महाजन, अशोक महाजन, रेल्वे विभागाचे सेवानिवृत्त इंजिनिअर रंगनाथ महाजन यांच्या मातोश्री चंद्रभागाबाई संतोष महाजन ह्या गेल्या २० जुलै रोजी निसर्ग विलिन झाल्या होत्या. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सत्यधर्म म्हणजेच सत्यशोधक पद्धतीने त्यांचा दशक्रिया आणि गंधमुक्ती विधी विधीकर्ते रमेश वराडे यांच्या हस्ते नुकताच पार पडला. यावेळी परंपरागत कर्मकांडाला पूर्णपणे नाकारून महात्मा फुले निर्मित सत्यशोधक पद्धतीने सर्व विधी करण्यात आला. सर्वप्रथम कुलदैवत पूजन, महापुरुषांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच आईच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच जि. प.…

Read More

उत्कृष्ट युवा प्रशिक्षणार्थी म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित साईमत/जामनेर/प्रतिनिधी: येथील तहसील कार्यालयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गंत रुपेश राजाराम बिऱ्हाडे यांना महसूल दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्षा साधना महाजन, सेवानिवृत्त अभियंता जे. के. चव्हाण, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या हस्ते उत्कृष्ट युवा प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांनी ई- पीक पाहणी, विधानसभा निवडणूक, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान, सोशल मीडियावर विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी आदींमध्ये सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या यशाबद्दल त्यांच्यावर सामाजिक, शैक्षणिक स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Read More

संशयित फरार, जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील उच्चभ्रू कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या आईच्या मित्राने वारंवार विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर संशयित मित्रासह आईवरही विनयभंग आणि पोक्सो कायद्यान्वये शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संशयित आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले. शहरातील उच्चभ्रू कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये मुलीसह आई-वडील वास्तव्यास आहेत. मुलीच्या आईचा मित्र तथा शहरातील कांचन नगर येथील रहिवासी मयूर रमेश शिंपी हा वारंवार घरी येत होता. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी साडे सात वाजता मुलीचे वडील घरी नसताना मयूर शिंपी पिझ्झा पार्सल घेऊन आला. मुलीची…

Read More

महसूल दिनानिमित्त नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशातील प्रत्येक नागरिकाचे बँकेचे खाते उघडले गेले. त्यामुळे कोणताही शासकीय लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहचत आहे. यामुळे महसूल विभागाचे काम अधिक गतीशील झाले असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी केले. महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याच्या महसूल कामकाजाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आ.सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महानगरपालिकाचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे आदी मान्यवर…

Read More

शासकीय रुग्णालयात राजकीय क्षेत्रासह नागरिकांनी केली गर्दी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील प्रभाग क्रमांक १२ चे माजी नगरसेवक बंटी उर्फ अनंत हरिश्चंद्र जोशी (वय ४८, रा. ओंकारेश्वर मंदिराजवळ, जळगाव) यांनी शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते तीन वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करुन ‘आयुष्य’ संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. यावेळी परिवाराने एकच आक्रोश केला होता. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही. हसतमुख, मनमिळावू असा स्वभाव असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या अकस्मात मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटातून अनंत हरिचंद्र जोशी उर्फ बंटीभाऊ हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते.…

Read More

पर्यावरण, पक्षप्रेमींकडून बगळ्याला वाचविणाऱ्यांचे कौतुक साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील टॉवर चौकजवळील डॉ.श्यामा मुखर्जी उद्यानात शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास झाडावर एक बगळा मांजात अडकला होता. याविषयीची माहिती निलेश पाटील यांनी लागलीच वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव योगेश गालफाडे यांना भ्रमणध्वनीवरुन दिली. त्यांनी वेळ न दवडता तात्काळ घटनास्थळी जाऊन बगळ्याची मांज्याच्या तावडीतून सुटका करुन त्याला ‘जीवदान’ दिले आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी श्री.गालफाडे आणि मयूर वाघुळदे यांनी जाऊन पाहणी केली. तेव्हा जवळजवळ ७० फुट उंच झाडावर बगळा पक्षी मांजात अडकल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तातडीने महानगरपालिकेचे अग्निशमक वाहन बोलावून तिच्या शिडीवर मनपाचे अग्निशमन कर्मचारी अश्वजीत, योगेश गालफडे, मयूर वाघूळदे यांनी सर्वप्रथम बगळ्यास…

Read More

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील रामेश्वर कॉलनीतील किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी व्ही.डी.नेहेते, विजय चौधरी यांनी प्रतिमांचे पूजन केले. यावेळी पी.डी.नेहेते यांनी लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांच्या महान कार्याची विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच विद्यालयातील विद्यार्थी गीतांजली पाटील, निधी मौर्य, धनश्री सावंत, मोहिनी देवकर, बळीराम सुळे यांनी भाषणे दिली. यशस्वीतेसाठी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मानसी पाटील तर आभार समीक्षा चौधरी यांनी मानले.

Read More

दोन वर्षापासून दररोज नियमित राबविला जातोय उपक्रम साईमत/नंदुरबार/प्रतिनिधी : नवापूर तालुक्यातील आमलाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक बाळकिसन ठोंबरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी अभ्यासिका सुरू केल्या आहेत. त्यासाठी स्वयंसेवक प्रियंका गावित, बबीता वसावे, रूपाली वसावे, सुवर्णा वसावे, वैशाली वसावे, मीना कोकणी यांची स्वयंसेवक म्हणून नेमणूक केली आहे. त्यांनीही स्वयंप्रेरणेने होकार देत रात्र अभ्यासिका सुरू केल्या आहेत. गेल्या दोन वर्षापासून दररोज नियमित रात्र अभ्यासिका घेतली जात आहे. अशा स्तुत्य उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे, विस्तार अधिकारी रमेश देसले, केंद्रप्रमुख भगवान सोनवणे यांनी कौतुक केले. सर्व स्वयंसेवकाचा सांस्कृतिक कार्यक्रमाच्यावेळी सत्कार करून कौतुक केले आहे. शाळेतून दिलेला अभ्यास विद्यार्थी रात्र अभ्यासिकेत एकत्र बसून पूर्ण करतात.…

Read More

उपक्रमाचे गटशिक्षणाधिकाऱ्यांसह अनेकांनी केले कौतुक साईमत/नवापूर/प्रतिनिधी : तालुक्यातील आमलाण येथे नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत ‘असाक्षर’ असणारे आता ‘साक्षरतेचे’ धडे गिरवून साक्षरतेकडे वाटचाल करु लागले आहेत. आमलाण येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बाळकिसन ठोंबरे, अलका पाडवी, लीना गावित यांनी असाक्षरांचा सर्व्हे करून उल्हास ॲपवर असाक्षरांची माहिती भरली. अशा स्तुत्य उपक्रमाचे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे, विस्ताराधिकारी रमेश देसले, केंद्रप्रमुख भगवान सोनवणे यांच्यासह अनेकांनी कौतुक केले. स्वयंप्रेरक नेमून त्यांना असाक्षरांची यादी वाटून देऊन वर्ग सुरू करण्याची विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन स्वयंसेवक अशा अक्षरांना साक्षर करण्यासाठी काम करत आहेत.त्यासाठी स्वयंप्रेरक म्हणून प्रियंका गावित, बबीता वसावे, सुवर्ण गावित, रूपाली वसावे ह्या स्वयंसेविका काम…

Read More