Author: Sharad Bhalerao

केंद्र शासनाची अंतिम मंजुरी–खा.स्मिताताई वाघ : शेतकऱ्यांसाठी जलक्रांतीचा नवा अध्याय साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी :  अमळनेर तालुक्यातील पाडळसरे (निम्न तापी) सिंचन प्रकल्प महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठवला होता. प्रकल्पासाठी विविध टप्प्यांतील परवानग्या आवश्यक होत्या. प्रारंभी प्रकल्पाच्या तत्त्वतः मान्यतेसाठी तो पीआयबी (पब्लिक इन्व्हेस्टमेन्ट बोर्ड) कडे पाठवण्यात आला. पीआयबीने देशभरातील संबंधित विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्रे घेतली. त्यानंतर हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. अर्थ मंत्रालयाकडून आर्थिक दृष्टीने प्राथमिक मंजुरी मिळाल्यानंतर, संबंधित विभागांकडून त्यांच्या टिप्पणी व ना-हरकत प्रमाणपत्रांची पूर्तता झाल्यावर अर्थ मंत्रालयाचे सचिव (खर्च) वुमलुनमांग वुअलनाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीत प्रकल्पास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आणि पुढील…

Read More

मेळाव्याला आदिवासी मंत्री उईके यांची लाभली उपस्थिती साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ‘जनजातीय गौरव वर्ष’ निमित्त ‘प्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियान’ अंतर्गत भव्य लाभ वाटप आणि लाभार्थी संवाद मेळावा शुक्रवारी, ८ ऑगस्ट रोजी आयोजित केला होता. हा मेळावा आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत  झाला. याप्रसंगी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे, आ.राजूमामा भोळे, आ.चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आदिवासी बांधवांना वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. ज्यामुळे त्यांना त्यांच्या जमिनीवरील हक्क प्राप्त झाला. तसेच विविध शैक्षणिक वर्षांत उत्कृष्ट गुण संपादन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा विशेष सत्कार…

Read More

विशेष शिबिरातंर्गंत १ हजार ८ गर्भवती महिलांची केली तपासणी साईमत/जामनेर/प्रतिनिधी :  जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या सूचनेनुसार प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान कार्यक्रमांतर्गत जामनेर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणि उपकेंद्र स्तरावर विशेष शिबिरातंर्गंत १ हजार ८ गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पहिल्या तिमाहीतील ६७४ तर दुसऱ्या तिमाहीतील ३३४ गरोदर माता होत्या. गरोदर मातांची मोफत रक्तदाब, रक्तातील साखर, एचआयव्ही, ओजीटीटी आदींसह २२ प्रकारच्या तपासणी चाचण्या करण्यात आल्या. तसेच मोफत १६७ लाभार्थ्यांना सोनोग्राफीसाठी संदर्भित करण्यात आले.तीव्र रक्तक्षय असलेल्या ३ मातांना आयर्न सुक्रोज लावून उपचार करण्यात आला. यशस्वीतेसाठी वैद्यकीय…

Read More

रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरा, वृक्षांना जपण्याचा केला संकल्प  साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहरातील प्रेमनगरातील बी.यू.एन. रायसोनी स्कूलमध्ये (सीबीएसई पॅटर्न) रक्षाबंधननिमित्त एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता सातवी ते दहावीमधील विद्यार्थिनींनी शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड केली. त्या झाडांना राखी बांधून त्यांच्याशी बंध बांधला. अशा अनोख्या उपक्रमाअंतर्गंत विद्यार्थिनींनी दररोज शाळेत आल्यावर झाडांना पाणी घालण्याचा, त्यांचे संगोपन करण्याचा आणि वृक्षांना आपल्यासारखे जपण्याचा संकल्प केला. भावनिक नात्याशी जोडलेला उपक्रम शासनाच्या ‘एक पेड माँ के नाम’ सारख्या उपक्रमांना चालना देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. उपक्रमानिमित्त रक्षाबंधन सणाची नवी रूपरेषा शाळेत पहायला मिळाली. शाळेचे मुख्याध्यापक मनोज शिरोळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहित…

Read More

उपक्रमात ४० विद्यार्थ्यांनी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहरातील साने गुरुजी कॉलनी स्थित कै.सुनिताताई जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी ‘टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ’ अश्या राख्या वर्गात कार्यानुभवाच्या तासिकेला बनविण्यात आल्या. ही कल्पना राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख संजय बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना दिली. झाडांना राख्या बांधून झाडांचे संवर्धन, संरक्षण करण्याविषयी मार्गदर्शन केले. उपक्रमात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. रक्षाबंधनाचे औचित्य साधून शाळेचे मुख्याध्यापक एस.पी.निकम, उपमुख्याध्यापक जे.एस.चौधरी, पर्यवेक्षक कैलास पाटील, राष्ट्रीय हरित सेनाप्रमुख संजय बाविस्कर, इको क्लबचे एस.के.तायडे, अनिल शेलकर, विजय पाटील, किशोर पाटील, रवींद्र पाटील, वैशाली बाविस्कर आदी शिक्षक उपस्थित होते. वृक्ष आपल्याला प्राणवायू देतात. पर्यावरणाचे संतुलन राखतात.झाडांपासून फळे, फुले,…

Read More

१५१ पैकी १२० पर्यटकांशी झाला संपर्क  साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी :   उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागातील १५१ पर्यटक अडकले आहेत. अशा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन हे तातडीने उत्तराखंडकडे रवाना झाले आहेत. आज सायंकाळी साडे चार वाजता ते देहरादून येथे दाखल होत आहेत. राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, महाराष्ट्र यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अडकलेल्या १५१ पैकी १२० पर्यटकांशी संपर्क झालेला आहे. ते सुरक्षितस्थळी आहेत. उर्वरित ३१ पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, महाराष्ट्र हे उत्तराखंड राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हा नियंत्रण कक्ष…

Read More

स्थानिक निवडणुका…वेध राजकीय स्थितीचा…! साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी :  आगामी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम दिवाळीनंतर जाहीर होईल. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील राजकीय पक्षातील स्थितीचा ओघवता आढावा घेण्याचा प्रयत्न दै. ‘साईमत’ने ‘स्थानिक संस्था निवडणुका…वेध राजकीय स्थितीचा’ या सदराखाली वृत्तमालिका सुरु केली आहे. याआधी भाजपानंतर शिवसेना शिंदे गट या पक्षाची स्थितीवजा माहिती प्रसिध्द केली तर आजच्या मालिकेत जिल्ह्यातील काँग्रेसच्या विद्यमान स्थितीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसची जिल्ह्यातील विद्यमान स्थिती पाहता पक्षात जिल्ह्यावर प्रभाव पाडू शकेल, अशा नेत्याचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. एकेकाळी जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात एकछत्री अंमल असलेल्या या पक्षाची स्थिती उजाडलेल्या राजवाड्यासारखी झाल्याचे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही. या पक्षाचा गेल्या २०-२५ वर्षातील…

Read More

संत नरहरी महाराजांची ७८२ वी जयंती उत्साहात साजरी साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्ह्याच्यावतीने सुवर्णकार अर्थात सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७८२ वी जयंती शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अखिल भारतीय अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यालयात गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता साजरी करण्यात आली. याप्रसंगी शहराचे आ. सुरेश (राजूमामा) भोळे यांच्यासह सुवर्णकार समाजातील मान्यवरांच्या हस्ते संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनासह आरती करण्यात आली. याप्रसंगी आ. राजूमामा भोळे म्हणाले की, आजपासून संत नरहरी महाराजांच्या ७८२ व्या जयंतीनिमित्त सर्व सुवर्णकार समाजाच्यावतीने ७८२ वृक्षांचे रोपण झाले पाहिजे. त्यामुळे महाराजांचे विचार लोकांपर्यत वृक्षाच्यारूपाने पोहचतील.त्याला खत पाणी…

Read More

कार्यालयातील बैठकीत मोर्चाच्या नियोजनावर चर्चा साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  राज्य शासनाच्या वाढत्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्यासाठी आणि वाचाळवीर मंत्र्यांच्या राजीनामेसाठी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवकांच्या बेरोजगारीच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महिला भगिनी आणि निराधार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी, इतर विविध मागण्यांसाठी शिवसेना उबाठाच्यावतीने सोमवारी, ११ ऑगस्ट रोजी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. शहरातील गोलाणी मार्केटमधील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात मोर्चाच्या नियोजनासाठी गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी जिल्हा पदाधिकारी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत तालुका प्रमुख, तालुका संघटक, युवा सेना तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, महानगर प्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी, विविध अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. बैठकीला शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील, दीपक राजपूत, महानगर प्रमुख शरद तायडे, युवा…

Read More

परिसरातून निघाली पालखी, गुणवंतांचा गुणगौरव साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहरातील ओक मंगल कार्यालयात जिव्हेश्वर युवक मंडळातर्फे साळी समाजाचे आद्यदैवत भगवान जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला सकाळी सहा वाजता भगवान जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव झाला. यावेळी रामदास डहाके यांनी पोथी वाचन केले. तसेच सत्यनारायण महापूजा समाजातील नवदाम्पत्य सागर-लीना दिवटे यांच्या हस्ते झाली. त्यानंतर परिसरातून पालखी काढण्यात आली. त्यात वाजत गाजत लेझीम, फुगडी खेळत समाज बांधव सहभागी झाले होते. कार्यक्रमात समाजातील महिला, मुला-मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी आ.राजु मामा भोळे, उद्योगपती यशवंत बारी, वीज महावितरणचे जळगाव शहर व तालुका कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, संस्थापक-अध्यक्ष अरुण डहाके, जिल्हाध्यक्ष…

Read More