चंदू अण्णा नगरातील घटना, तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील चंदू अण्णा नगरात मद्यपान केलेल्या बापाने मोबाईलवरील गाणे बंद केल्याच्या रागातून आपल्या अकरावीत शिकणाऱ्या मुलीला कुकरच्या झाकणाने मारहाण केली तर पत्नीला काचेचा ग्लास फोडून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी समाधान विजयसिंग पाटील (वय ३२, रा. चंदू अण्णा नगर) याच्याविरुद्ध १६ ऑगस्ट रोजी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, शहरातील चंदू अण्णा नगरात समाधान पाटील हा मद्यपान करून घरी आला. त्याने पत्नीच्या मोबाईलवर गाणे लावले. त्यावेळी त्याची मुलगी प्राप्ती पाटील, जी अभ्यासात व्यस्त होती. तिने वडिलांना गाणे बंद करण्यास सांगितले. मात्र, वडिलांनी ऐकले नाही.…
Author: Sharad Bhalerao
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बालगोपालांचा संमेलनात सहभाग साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पहिले अखिल भारतीय आंतरभारती बालकुमार साहित्य संमेलन गेल्या १३, १४, १५ ऑगस्ट असे तीन दिवस नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस होते. उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. साहित्य संमेलनात पुणे, मुंबई, नागपूर, नांदेड, सांगली, सातारा, अमरावती, वाशिम, वर्धा, परभणी, अहिल्यानगर, लातूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ साहित्यिकही सहभागी झाले होते. गेल्या दहा वर्षांपासून समाज चिंतामणी प्रतिष्ठान वाचन संस्कृती वृद्धिंगतसाठी नवोपक्रम राबवित आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी.…
नाशिक विभागातर्फे यंदाचा मानाचा पुरस्कार प्रदान साईमत/जामनेर/प्रतिनिधी : नाशिक विभागामार्फत दरवर्षी प्रदान केला जाणारा यंदाचा मानाचा ‘उत्कृष्ट आरोग्य निरीक्षक’ पुरस्कार २०२४-२५ या वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील नेरी प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील नवनियुक्त आरोग्य निरीक्षक सोपान विठ्ठल राठोड यांनी त्यांच्या पहिल्याच वर्षात आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट नियोजनबद्ध व परिणामकारक कार्य करून हा सन्मान पटकावला आहे, ही जामनेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण साधलेली प्रगती उल्लेखनीय ठरली आहे. जळगाव जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी राठोड यांच्या संपूर्ण दप्तराची तपासणी केल्यावर ती पूर्णपणे योग्य असल्याचे आढळले. त्यांनी नाशिक आरोग्य सेवेचे सहाय्यक संचालक डॉ. विवेक खतगावकर यांच्याकडे…
कार्यक्रमात पारंपरिक खेळ, नृत्यासह गीतांचे सादरीकरण साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील प्रगती शाळेत गोपाळकालानिमित्त शनिवारी, १६ ऑगस्ट रोजी दहीहंडीचे आयोजन मोठ्या उत्साहात केले होते. चिमुकल्यांपासून ते वरिष्ठ विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे आयोजन ज्योती कुलकर्णी यांनी केले होते. दहीहंडी फोडण्यासाठी विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पोशाख घालून दहीहंडीचा आनंद घेतला. सभोवतालचे वातावरण “गोविंदा आला रे आला” च्या जयघोषणांनी परिसर दणाणला होता. शिक्षकांसह पालकांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत टाळ्यांचा कडकडाट केला. कार्यक्रमात पारंपरिक खेळ, नृत्य आणि गीतांच्या सादरीकरणानेही रंगत आणली. शेवटी दहीहंडी फोडल्यानंतर दही, गोळ्या व गोडधोड वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, एकता आणि पारंपरिक सणांविषयी जिव्हाळा वाढतो, असे…
अपर पोलीस निरीक्षक अशोक नखाते यांच्या हस्ते ध्वजारोहण साईमत/जळगाव/प्रतिनिधी : गिरणा नदीच्या काठावरील निसर्गरम्य वातावरणात वसलेले जलाराम बाप्पा श्रीराम मंदिराशेजारील चेतना व्यसनमुक्ती केंद्रात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साह, देशभक्ती आणि सामाजिक जाणीवेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी व्यसनमुक्त भारताची हाक देऊन तसा संकल्पही करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात जळगावचे अपर पोलीस निरीक्षक अशोक नखाते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत आणि मानवंदना देऊन देशभक्तीचा जयघोष करण्यात आला. याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सोमनाथ विसपुते, सुशीला विसपुते, चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.नितीन विसपुते, चेतना विसपुते, डॉ. दीपक वाणी, डॉ. सुनील कोतवाल, डॉ. समीर सोनार, दीपक संगीत, धर्मेंद्र सोनार, तुषार बागुल, अमोल सपकाळे, सुरेश पाटील,…
ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना मिळाला प्रतिसाद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील प्रेमनगरातील बी.यू.एन. रायसोनी स्कूल (सीबीएसई पॅटर्न) येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पाचवीतील तेजस्विनी बेदरकर हिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल तिला ‘झेंडावंदन’चा मान देण्यात आला. यावेळी शाळेतील १०० टक्के विद्यार्थी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात पालक-शिक्षक संघाचे सदस्य, शिक्षक वर्ग आणि पालक सहभागी झाले होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त नृत्य स्पर्धेत प्रथम व गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकविलेल्या विद्यार्थ्यांना तसेच पारोळा येथे आयोजित ध्यानचंद टेनिस क्लबद्वारा आयोजित क्रिकेट टुर्नामेंटमध्ये विजयी विद्यार्थ्यांना पालक-शिक्षक संघाच्या सदस्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. देशभक्तीपर गीतांवर नृत्यासह गीतगायन इयत्ता पहिली…
शाळेच्या परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त काढली प्रभात फेरी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनीत स्थित किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेज, मेहरुण येथे शुक्रवारी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. तुषार फिरके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मनपाच्या माजी महापौर जयश्रीताई महाजन, ज्ञानेश्वर नाईक, मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील आदी मान्यवर, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. “हर घर तिरंगा अभियानांतर्गत” ४ थी व ८ वीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर “कवायत संचलन” केले. यावेळी विद्यालयातील हितल हटकर, भार्गवी पाटील, करुणा सपकाळे, सुप्रिया सुळे, रिंकू तडवी, अनिकेत पाटील,…
राष्ट्रगीत अन् ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दणाणला साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्यदिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कंजरभाट समाज मंदिराच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप नेतलेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताच्या गजरात आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला होता. प्रारंभी कै. दिलीप गागडे, समाजाचे माजी अध्यक्ष सचिन बाटुंगे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्रतिभा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. एस. बाविस्कर, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नंदा पाटील, संजयसिंग पाटील, मंजुषा बियाणी, प्रल्हाद महाजन यांसह समाजातील मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. सुमित…
संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेसह ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती गुरुवारी, १४ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेसह ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व शिक्षकांनी पसायदानाचे सामूहिक गायन केले. प्रा.रूपम निळे यांनी पसायदान गायन केले तर प्रा.संध्या महाजन यांनी पसायदानाचा अर्थ स्पष्ट करून देताना संत परंपरेतील संत ज्ञानेश्वरांचे स्थान किती मोठे आहे हे सांगताना त्यांचे चरित्र श्रोत्यांना उलगडून सांगितले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.आर.बी.ठाकरे होते. अध्यक्षीय भाषणात संत ज्ञानेश्वरांच्या साहित्यिक कार्याचा गौरव करताना ज्ञानेश्वरीचा महिमा किती थोर आहे, याबाबत…
रॅलीत विद्यार्थ्यांनी भव्य ‘तिरंगा’ घेतला हाती साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये “हर घर तिरंगा” अभियानाअंतर्गत परिसरातील नागरिकांना जागृत आणि प्रोत्साहित करण्यासाठी तसेच आपल्या राष्ट्रध्वजाबाबत जागरूकता वाढवून वैयक्तिक बंध निर्माण होण्यासाठी परिसरात तिरंगा यात्रा काढण्यात आली. रॅलीत भव्य अशा तिरंगा विद्यार्थ्यांनी हाती घेतल्याने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कार्यक्रमाला माजी महापौर जयश्रीताई महाजन यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली. यशस्वीतेसाठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील तसेच सरोज पाटील, सरला झांबरे, आशा महाजन, विकास नेहते, प्रफुल्ल नेहते, विजय चौधरी, श्री.सुरवाडे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.