नंदिनीबाई विद्यालय ‘बेस्ट इंटरॅक्ट क्लब’चे मानकरी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील रोटरी क्लब जळगावतर्फे आयोजित रोटरी डिस्ट्रिक्ट इंटरॅक्ट ज्ञानसंकल्प परिषदेत लोकगीत समूह नृत्य स्पर्धेत भगीरथ इंग्लिश स्कुलने तर देशभक्तीपर गीत स्पर्धेत ए.टी.झांबरे विद्यालयाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. जैन हिल्स येथे झालेल्या परिषदेत बेस्ट इंटरॅक्ट क्लबचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी नंदिनीबाई मुलींचे विकास विद्यालय ठरले तर जिजामाता माध्यमिक विद्यालयाने तृतीय क्रमांक मिळविला. समूहनृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक नंदिनीबाई मुलींचे विकास विद्यालय तर तृतीय क्रमांक पाचोरा शाळेने मिळविला. स्पर्धेचे परीक्षण डॉ. शमा सराफ व स्नेहा भुसारी यांनी केले. देशभक्तीपर गीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक नंदिनीबाई मुलींचे विकास विद्यालय यांनी तर तृतीय क्रमांक पाचोरा विद्यालयाने प्राप्त केला. स्पर्धेसाठी…
Author: Sharad Bhalerao
स्पर्धेत देशभरातील ७२ विद्यापीठांनी नोंदविला सहभाग साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पुरुष मलखांब संघाने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मलखांब स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. विनायका मिशन फाऊंडेशन अॅण्ड रिसर्च विद्यापीठ, चेन्नई येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील तब्बल ७२ विद्यापीठांनी सहभाग नोंदविला होता. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघाने उत्कृष्ट समन्वय, शारीरिक ताकद, लवचिकता व कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीतही दमदार खेळ साकारत संघाने रौप्य पदकावर आपले नाव कोरले. यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी खेळाडूंचे कौतुक केले. त्यांनी खेळाडूंशी संवाद साधत स्पर्धेतील अनुभव जाणून…
कार्यालयात मुलाखतीसाठी इच्छुकांच्या रांगा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) उमेदवारांची निवड प्रक्रिया गतिमान केली आहे. पक्षाने सोमवारी, १५ डिसेंबर रोजी शहरातील जी.एम. फाउंडेशन भाजपा कार्यालयात निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची कसून चाचपणी सुरू केली आहे. ही महत्त्वाची प्रक्रिया पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. या चाचपणीदरम्यान इच्छुकांचा जनसंपर्क, पक्षासाठी केलेले कार्य आणि निवडणुकीत विजय मिळवण्याची त्यांची क्षमता या निकषांवर तपासणी केली जात आहे. मुलाखती सत्राला मंत्री संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन लढ्ढा यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सर्व नेत्यांनी संभाव्य उमेदवारांशी…
मनपा निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीचे बिगूल वाजताच सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटानेही उमेदवारांच्या चाचपणीला जोरदार सुरुवात केली आहे. सोमवारी, १५ डिसेंबरला शहरातील केमिस्ट भवनात मनपाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी इच्छुकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. मुलाखती सत्राला पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आणि महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी-कोल्हे यांचा सहभाग होता. नेत्यांनी प्रभागनिहाय इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या विजयाच्या संभाव्यता, जनसंपर्क तसेच पक्षासाठी केलेल्या कार्याची माहिती…
१५ जानेवारीला मतदान, दुसऱ्या दिवशी निकाल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव, धुळे महानगरपालिकेसह राज्यातील प्रलंबित २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज दुपारी जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी एक महिन्याने म्हणजेच १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल १६ जानेवारी रोजी लागणार आहे. त्यासाठी सोमवारी, १५ डिसेंबरपासून आचारसंहिता लागू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यातील २९ महापालिकांसाठी ३ कोटी ४८ लाख मतदार मतदान करणार आहेत. जळगाव महापालिका मतदानाचा कार्यक्रम असा- अर्ज भरण्यास सुरुवात : २३ ते ३० डिसेंबर २०२५ , छाननी ३१ डिसेंबर २०२५, अर्ज माघारी २ जानेवारी २०२६, चिन्ह वाटप ३ जानेवारी २०२६, मतदान : १५…
पवन माळी, रवि झाल्टे, अंबिका डोहाकडे यांना सन्मानपत्र प्रदान साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जळगाव जि.प.च्या दिव्यांग कल्याण विभागातर्फे शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात दिव्यांगांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात जामनेर येथील विश्वशांती दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पवन माळी यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच नवी दिशा दिव्यांग संस्थेचे रवि झाल्टे, अंबिका डोहाकडे यांनाही सन्मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रोहन घुगे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी…
दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, शहर पोलिसात गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील एसएमआयटी कॉलेज परिसरात तरूणाच्या घरासमोर पार्किंगला लावलेली कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी, १३ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. हा प्रकार नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून यात दोन चोरटे दिसून आले. याप्रकरणी १४ डिसेंबर रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ललित रमन साठे (वय ३४, रा. एसएमआयटी कॉलेज परिसर, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह याच भागात वास्तव्यास आहेत. १२ डिसेंबर रोजीच्या रात्री त्यांनी आपली मालकीची कार (क्र. एमएच १९ वाय ७७०७) नेहमीप्रमाणे घरासमोर पार्किंगला लावली होती. दरम्यान, १३ डिसेंबर रोजी मध्यरात्री १…
अयोध्या नगर रस्त्याचा प्रश्न १० दिवसात सोडवा, अन्यथा रास्ता रोकोचा इशारा साईमत/जळगाव/जळगाव : शहरातील अतिव्यस्त आणि महत्त्वाच्या अजिंठा चौफुलीवरून अयोध्या नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या गंभीर समस्येकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे अयोध्या नगर परिसरातील नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अशा प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे. जळगाव शहरातील अजिंठा चौफुली हा प्रमुख चौक आहे. येथून सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. याच चौकावरून अयोध्या नगरकडे जाणारा एकमेव मार्ग असल्याने सुमारे ३० ते ४० हजार लोकसंख्येच्या परिसरातील…
एमआयडीसी पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : मेडीकलवर औषधी घेण्यासाठी गेलेल्या एकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून ८३ हजार रुपयांची रोकड लांबविली आहे. ही घटना १० डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शेरा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरातील रामेश्वर कॉलनीतील रहिवासी दीपक रमेशचंद गगराडे यांचे संतोषी माता नगर येथे किरणा दुकान आहे. ते १० डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास दुकान बंद करुन दिवसभरात झालेला ग्राहकांचे गल्ल्यातील ८३ हजार रुपये दुचाकीच्या डिक्कीत ठेवले आणि ते (एमएच १९, सीएम, ३०३८) क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे निघाले. काशिनाथ चौकाकडून शेरा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भूमी हॉटेलच्या समोर…
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची संकल्पना साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून रक्त केंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यातर्फे पोलीस मुख्यालयात रक्तदान शिबिर नुकतेच पार पडले. शिबिरात पोलीस दलातील ३० अंमलदारांनी रक्तदान केले. त्यांना राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक (गृह) अरुण आव्हाड, राखीव पोलीस उपनिरीक्षक सचिन चिवंडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे पॅथालॉजी प्रमुख डॉ. दीपक शेजवळ, रक्त केंद्र प्रमुख डॉ. कविता पाटील, डॉ. कृणाल देवरे, डॉ. श्रृती उमाळे, डॉ. श्रद्धा गायगोळ, तंत्रज्ञ…