विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मान्यवरांचे मार्गदर्शन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेच्या प्रगती विद्या मंदिर आणि प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये नुकताच गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये बालवाडी ते दहावीपर्यंतच्या वार्षिक परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्हासह पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रवक्ते मनोज गोविंदवार, विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मंगला दुनाखे, माजी उपशिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड उपस्थित होते. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून त्यांना शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केले. विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल यांनी गौरव दिनानिमित्त पारितोषिक मिळालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करुन भविष्यातही अशीच प्रगती करावी,…
Author: Sharad Bhalerao
सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान साईमत/जळगाव/प्रतिनिधी : रोटरी क्लब जळगावतर्फे जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त आयोजित ‘वारसा’ फोटो प्रदर्शन स्पर्धेत वृत्तपत्र छायाचित्रकार गटात संधीपाल वानखेडे प्रथम क्रमांकाचे विजेते मानकरी ठरले तर छायाचित्रकार सुमित देशमुख, सचिन पाटील यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये खा.स्मिता वाघ यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, मानद सचिव सुभाष अमळनेरकर, पब्लिक इमेज कमिटी चेअरमन तथा प्रोजेक्ट चेअरमन राजेश यावलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी खा.वाघ यांच्या हस्ते हौशी गटातील विजेते छायाचित्रकार प्रथम तुषार मानकर, द्वितीय विशाल चौधरी (अमळनेर), तृतीय केतन महाजन आणि उत्तेजनार्थ जे.पी.…
सार्वजनिक विद्यालयात जयंतीनिमित्त अभिवादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील असोदा गावाचे भूषण मानल्या जाणाऱ्या, जीवनाचे सार सांगणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना असोद्यातील सार्वजनिक विद्यालय येथे त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमातून उजाळा देत अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिन जंगले यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मनोगत व्यक्त केले. गावातील शेतकरी जनार्दन चौधरी यांनी बहिणाबाई चौधरी, सरस्वतीला माल्यार्पण करून पूजन केले. याप्रसंगी पर्यवेक्षक लालसिंग पाटील, मंगला नारखेडे आदी उपस्थित होते. यावेळी प्रीती पाटील, नूतन वाणी यांनी बहिणाबाईविषयी माहिती दिली. तसेच हेतल कोल्हे, तिच्या मैत्रिणी, सिद्धार्थ कापडणे यांनी बहिणाबाईची गाणी म्हटली. विशाखा भोळे, तिच्या मैत्रिणी यांनी “अरे…
‘बहिणाईंचे भावविश्व’ कार्यक्रमाप्रसंगी कवी किरण डोंगरदिवे यांनी व्यक्त केली अपेक्षा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शंभर वर्षांपूर्वी साहित्यातून बहिणाबाई चौधरी यांनी जो विचार समाजापुढे ठेवला, त्यातून आजची पिढी घडत आहे. अध्यात्मासह विज्ञान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या कर्मावर विश्वास ठेवण्यास शिकविते. ह्या शिकवणीवर साहित्य क्षेत्रातील नामांकित ज्ञानपीठ, साहित्य अकादमीसह अन्य पुरस्कार त्यांच्या ओव्यांपुढे मागे पडून जातात. कारण मराठीतील प्रत्येक साहित्यिक, विद्यार्थी, अभ्यासक हे बहिणाबाईंच्या कविता वाचल्याशिवाय राहत नाही, हाच खऱ्या अर्थाने त्यांचा ‘लोक पुरस्कार’ होय. आगामी पाच वर्षानंतर बहिणाबाई चौधरींची १५० व्या जयंतीनिमित्त शासनाने बहिणाबाईंची गाणी आणि संतवाणीसाठी शाळांमध्ये विशेष कार्यक्रम घेतले पाहिजे, अशी अपेक्षा बुलढाणाचे कवी किरण डोंगरदिवे यांनी व्यक्त केली. बहिणाबाई…
चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे आयोजित कार्यशाळेत आ.सुरेश भोळे यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : सर्वत्र वाढत जाणारे मोबाईलचे व्यसन ही सामाजिक, मानसिक समस्या सद्यस्थितीला गंभीर बनू पाहत आहे. मोबाईलमुळे लहान मुलांच्या संस्कारांवर नकारात्मक परिणाम होऊ लागला आहे. सोबतच मोबाईलच्या अतिवापरामुळे परिवारातील ‘संवाद’ हरपत चालला आहे. त्यासाठी परिवारातील नातेसंबंध दृढ ठेवण्यासाठी प्रत्यक्ष ‘संवाद’ महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन शहराचे आ.सुरेश भोळे ऊर्फ राजू मामा यांनी केले. मोबाईलच्या वाढत्या अतिवापराच्या पार्श्वभूमीवर चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे रविवारी, २४ ऑगस्ट रोजी जलाराम नगर गिरणा नदीच्या किनारी जलाराम बाप्पा मंदिराच्या सभागृहात सर्वांसाठी विनामूल्य आयोजित ‘मोबाईल मुक्ती’च्या कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांनी मार्गदर्शन करताना मोबाईलच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम उपस्थितांसमोर…
रोटरी क्लबच्या सभागृहात “अराजकीय’ विचारमंथन बैठकीला प्रतिसाद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : आपले शहर सोन्याची बाजारपेठ आणि केळीसाठी विख्यात आहे. मात्र, शहराचा विकास रोडावला आहे. उदासीनता आहे, ती दूर सारून महाराष्ट्रातील आदर्श शहर म्हणून पुढे यावे, अशी ठाम भूमिका मायादेवी नगरातील रोटरी क्लबच्या सभागृहामध्ये झालेल्या “अराजकीय विचारमंथन बैठकीत” मांडण्यात आली. “जळगाव प्रथम” घोषवाक्याने सुजाण व सुशिक्षित नागरिकांचे एकत्रित व्यासपीठ बैठकीतून उभे राहिले. बैठकीचे आयोजन माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी शहरातील मान्यवर नागरिक, उद्योजक, समाजसेवक व सुज्ञ नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यातून अशा व्यासपीठाची निर्मिती झाली. यावेळी माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी आमदार…
मुलासह लेकही करताहेत पीएच.डी. साईमत/जळगाव/प्रतिनिधी : वडिलांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारी लेक चित्रांगा अनिल चौधरी यांनी पीएचडी प्राप्त केली आहे. ‘इम्पॉवरमेंट ऑफ वुमेन विथ रेफ्रेंस टू सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस-ॲन ऐनालिटिकल स्टडी’ विषयावर त्यांनी संशोधन प्राप्त केले आहे. त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षापासून मोफत क्लासेस शिकविणे किंवा इतर ठिकाणी जॉब केले. त्यांना ४० वर्षाचा अनुभव आहे. त्या सध्या जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विधी व माहितीचा अधिकार विभागात कार्यरत आहे. त्यांना विद्यापीठाने विधी विषयात पीएच.डी. जाहीर केली आहे. जळगाव येथील एस.एस.मणियार विधी महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक डॉ. विजेता सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रांगा यांनी वरील विषयावर संशोधन करुन…
विद्यार्थ्यांमध्ये अँटी-रॅगिंगविषयी जनजागृती करुन मार्गदर्शन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये १२ ते १८ ऑगस्ट दरम्यान ‘युथ अगेंस्ट रॅगिंग’ घोषवाक्यांतर्गत आणि ‘युनिफॉर्म ऑफ हिलिंग नॉट हर्टींग’ शीर्षकासह अँटी-रॅगिंग सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा केला. कार्यक्रमात अँटी-रॅगिंग प्रतिज्ञा घेण्यात आली. सप्ताहाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये अँटी-रॅगिंगविषयी जनजागृती करणे, आपुलकी व ऐक्य दृढ करणे आणि रॅगिंगमुक्त परिसराची उपलब्धता करून देणे असा होता. सप्ताहाचा प्रारंभ प्राचार्यांच्या स्वागतपर भाषणाने झाला. त्यांनी अँटी-रॅगिंग जनजागृतीचे महत्त्व स्पष्ट केले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उल्हास पाटील लॉ कॉलेजच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. ललिता सपकाळे यांनी रॅगिंगचे कायदेशीर परिणामावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्राचे वाटप विद्यार्थ्यांनी पोस्टर मेकिंग स्पर्धा, रिल्स मेकिंग…
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : समाजाच्या गरजा लक्षात घेऊन त्या ष्टीने अध्यापकांनी संशोधन केले पाहिजे. संशोधन करतांना ते अधिक प्रभावशाली व समाजोपयोगी होईल, अशा रीतीने झाले पाहिजे, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि पुणे महाराष्ट्र राज्य शिक्षक विकास अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी उच्च श्रेणीतील उपकरणावर सहा दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर जैवशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. भूषण चौधरी, पर्यावरण भूशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. एस.एन पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षक विकास अकादमीतर्फे वलांजू भार्गव आदी उपस्थित होते. कुलगुरू पुढे म्हणाले की, प्रशिक्षण…
असोदातील सार्वजनिक विद्यालयात बैलपोळा उत्साहात साजरा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित असलेला बैलपोळा सण प्रत्यक्ष कृतीद्वारे साजरा करण्यात आला. विद्यालयातील यश पाटील, वैभव येवले यांनी त्यांचे बैल छान सजवून शाळेत आणले. देवयानी कोळी, ललिता कोळी, सारिका चौधरी, देवयानी कोळी, भाग्यश्री कोळी, श्रद्धा निकम या विद्यार्थिनींनी बैलांचे औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला. तसेच गावातील शेतकरी जनार्दन चौधरी बैलांसोबत उपस्थित राहिले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून किरण तायडे यांनी उपस्थिती दिली. त्यांनी आपल्या वक्तव्यातून बैलांविषयीचा आणि शेतकऱ्यांविषयी आदर व्यक्त केला. तसेच देवयानी कोळी हिने बैलपोळा सणाविषयी माहिती सांगितली. ‘आम्ही जातीचे शेतकरी, खातो कष्टाची भाकरी’ ह्या गीतावर डिंपल…