Author: Sharad Bhalerao

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी जिल्हा दूध संघाच्या माजी संचालिका भैरवी वाघ-पलांडे यांची कामाची पावती म्हणून बढती करत प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे. या माध्यमातून त्यांना ‘प्रमोशन’ मिळाले आहे. आर्किटेक्ट भैरवी वाघ-पलांडे यांनी महाविद्यालयीन काळात जळगाव येथे अभाविपच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळीत सक्रीय सहभाग घेतला आहे. भारतीय जनता युवा मोर्चामधील महत्त्वपूर्ण कार्यामुळे त्यांच्याकडे पुणे महानगर उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्यानंतर त्यांच्यावर प्रदेश सचिव म्हणून जवाबदारी देण्यात आली होती. पक्ष संघटनेत त्यांची कारकीर्द अधिकच उज्ज्वल राहिल्याने त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मोठी जवाबदारी देण्यात आली आहे. भैरवी या माजी आमदार तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ आणि…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथे तहसील कार्यालयातर्फे महसूल सप्ताहानिमित्त ‘सैनिकांनो तुमच्यासाठी’ या कार्यक्रमांतर्गत आजी-माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. तहसील कार्यालयातर्फे महसूल सप्ताह साजरा केला जात आहे. या माध्यमातून ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जामनेर तहसील विभागातर्फे सुमारे ५० आजी-माजी सैनिकांचा तहसीलदार नानासाहेब आगळे, नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर यांच्या हस्ते प्रशक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी सैनिक, नागरिक उपस्थित होते.

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील निपाणे येथे ३५ वर्षीय शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून विषारी औषध प्राशन करत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी, ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शरद भगवान पाटील (वय ३५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, तिन भाऊ असा परिवार आहे. शरद पाटील यांच्या अकस्मात निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. सविस्तर असे की, पाचोरा तालुक्यातील निपाणे येथील शरद भगवान पाटील या शेतकऱ्याने निपाणे शेत शिवारात विषारी औषध प्राशन करत आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील तहजीब नॅशनल उर्दु शाळेत पाचवी ते आठवीला भेटलेले शिक्षक हे एक संचालक व मुख्याध्यापक यांनी आपल्या सोयीसाठी नववी ते दहावीला शिक्षक दिले आहे. शाळेत सद्यस्थितीला पाचवी ते आठवीला जास्त शिक्षकांची गरज आहे. पाचवी ते आठवीच्या प्रत्येक वर्गात १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या आहे. मात्र, तिथे एका संचालक आणि मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभारामुळे शिक्षक दिले गेलेले नाही, अशी काही पालकांनी माहिती दिली. त्यामुळे शाळेतील मनमानी कारभाराची संबंधितांनी चौकशी करावी, अशी मागणी सुज्ञ पालकांनी केली आहे. अँग्लो उर्दु शाळा आणि तहजीब नॅशनल उर्दु शाळा या दोघी शाळेत शहरातील मुस्लिम समाजाच्या मुलांचे शिक्षण डीएड, बीएड झाले आहे. त्यांना भरती…

Read More

साईमत, भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील गोंडगाव येथील चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या भयंकर घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शनिवारी, ५ ऑगस्ट रोजी भडगाव शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील नऊ वर्षाच्या बालीकेवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडल्याने परिसर हादरला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. असे असले तरी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून त्याला कठोर शिक्षा व्हावी. तसेच या प्रकरणात ॲड.उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी, अशा मागण्या करण्यात येत आहेत. या मागण्यांसाठी शुक्रवारी भडगावात भव्य मूक मोर्चासह ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यात सकल…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी हिंदू मंदिर पुनर्बांधणीसाठी संभाजी सेनेने मंत्रालयाच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे. मुंबई बोरिवली येथील गोराई परिसरातील पॅगोडा या संस्थेने तेथील हिंदू देवता स्वयंभू वांगणादेवीचे शेकडो वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर उद्ध्वस्त केले आहे. ग्रामदैवत आणि ग्रामस्थांची श्रद्धास्थान असलेली माता वांगणा देवीचे मंदिर उद्ध्वस्त केल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या भावना तीव्र असल्यामुळे संभाजी सेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पॅगोडा संस्थेचे सर्व विश्वस्त यांच्यावर गोराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. अद्यापही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे संभाजी सेनेचे संस्थापक-अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी विश्वस्तांना तात्काळ अटक करावी. तसेच त्याच जागेवर माता वांगणा देवीचे भव्य असे मंदिर उभारून प्राणप्रतिष्ठापना करून सर्व हिंदू समाज बांधवांसाठी…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून खून करणाऱ्या संशयित आरोपी स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील या आरोपीला फास्ट ट्रॅक जलद गतीचा न्यायालयात खटला चालवून, यासाठी सरकारी वकील म्हणून ॲड.उज्ज्वल निकम यांची नेमणूक करुन ६ महिन्यात फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी, शिवसेना, युवासेना धरणगाव तालुक्याच्यावतीने करण्यात येऊन अशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना शनिवारी, ५ ऑगस्ट रोजी देण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी, उपजिल्हा प्रमुख शरद माळी, उपजिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे, शहर प्रमुख भागवत चौधरी, महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, जनाबाई पाटील,…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळगाव गोलाईतजवळ ट्रकला ओव्हरटेक करतांना आयशरने समोरून येणाऱ्या आयशरला जोरदार धडक दिली. त्यात २ जण जागीच ठार तर २ जण गंभीर जखमी झाले आहे. ज्या ट्रकला ओव्हरटेक केले तोही रस्त्याच्या खाली जाऊन उलटला होता. हा अपघात शुक्रवारी, ४ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी अज्ञात आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, पहुरकडून जामनेरकडे आयशर गाडी ( क्र.एम.एच.१५ एफ.व्ही.५४६७ ) भरधाव वेगाने जात असतांना ट्रकला ( क्र.टी.एन.२८, बी.डी.२८-७१६६ ) ओव्हरटेक करतांना जामनेरकडून पहुरकडे येणाऱ्या आयशर गाडीला (क्र. एम.एच.०९ई.एम.६६९४) समोरून धडक दिली. त्यात रतन तुकाराम चव्हाण ( वय २७,…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील आमोदे येथील कैलास भालेराव पाटील (वय 36) हा त्याच्या गट नं.59 मधील शेतात काम करीत होता. तेव्हा एमएससीबीचा पोलच्या लोखंडी आधाराच्या तारला शॉक लागून बेशुद्ध झाला. यानंतर शेताच्या परिसरातील इतर शेतात काम करणारे चंदनलाल दिलबर पाटील, नंदलाल दिलबर पाटील, अमृत काशीराम पाटील, जितेंद्र अमृत पाटील यांच्या मदतीने कैलासला अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी कैलासची तपासणी करुन त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पी.एम.रूममध्ये ठेवण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहे.

Read More

साईमत, शिरपूर : प्रतिनिधी तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलगी अल्पवयीन असतांना तिचे लग्न लावून दिले. त्यानंतर वैवाहिक संबंधातून गर्भधारणा झाल्याने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात तिने गुरुवारी, ३ ऑगस्ट रोजी एका बाळाला जन्म दिल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेची वडील मयत झाले असून आईने दुसरे घर केल्याने पालनपोषण करणाऱ्या आजीने अवघ्या १५ वर्षे वयाच्या मुलीचे लग्न लावून दिले. लग्नानंतर १६ व्या वर्षीच मुलीला गर्भधारणा होऊन तिच्यावर मातृत्व लादले गेले. हा प्रकार शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आजीसह पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, शिरपूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे तिच्या आजीने २०२२ मध्ये लग्न…

Read More