साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील मुडी-बोदर्डे येथील शेतकऱ्याच्या सुमारे तीन बिघे शेतीतील कपाशी समाजकंटकाने उपटून फेकल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याला शासकीय मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सविस्तर असे की, अमळनेर तालुक्यातील मुडी-बोदर्डे येथील शेतकरी देविदास पाटील यांच्या शेतातील काही समाजकंटकांनी त्यांच्या तीन बिघे शेतात कापसाचे दोनशे ते तीनशे झाडे उपटुन फेकले आहेत. याबाबत शेतकरी देविदास पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनाला तक्रार दिली आहे. परंतू शेतात अद्यापही कोणतेही शासकीय अधिकारी पंचनाम्यासाठी पोहोचलेले नाहीत. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला आहे. दरम्यान, नुकसानीचा शासकीय पंचनामा करून त्यांना तात्काळ राज्य शासनातर्फे…
Author: Sharad Bhalerao
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर कैलास आप्पा मित्र मंडळातर्फे आयोजित मोफत पिक विमा शिबिरात मंत्री गिरीश महाजन, सेवानिवृत्त अभियंता जे.के. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा भाजपाच्या माध्यमातून लोहारा, कासमपुरा, म्हसास, रामेश्वर, शहापुरा येथील २०३ शेतकऱ्यांनी मोफत पिक विमा काढला. पिक विमा काढण्याचा ३ ऑगस्ट रोजी शेवटचा दिवस असल्याने शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराची सुरुवात सकाळी नऊ वाजता भाजपाचे ज्येष्ठ नेते शरद सोनार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी भाजपाचे कार्यकर्ते, शेतकरी, भाजपा ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे संचालक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कृषी सहाय्यक जोहरे हे दिवसभर थांबून होते. ग्रामपंचायत सदस्य पती अनिल तडवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सकाळी नऊ ते…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील तहजीब नॅशनल उर्दु शाळेच्या विविध तक्रारींबाबत दैनिक ‘साईमत’मध्ये वृत्त झळकल्यानंतर पालकांसह शेख मुस्ताक यांनी तहजीब नॅशनल उर्दु शाळेचे संचालक, मुख्याध्यापक यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. शाळेचे सचिव तसेच काही संचालक, मुख्याध्यापक मनमानी करतात. सचिवांची बेहिशोबी मालमत्तेची चौकशी व्हावी, अशी मागणी काही पालकांनी केली आहे. तहजीब नॅशनल उर्दु शाळेचे शिक्षक शफी नामक हे व काही शिक्षक शाळेतील जास्त क्लास म्हणून घरी खासगी क्लास चालवितात. खासगी शिकवणीवर बंदी असून हे शिक्षक खासगी शिकवण्या घरी घेतात. त्यांना मुख्याध्यापकांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येते. दुपारून जी शाळा भरते ते शिक्षक विद्यार्थ्यांना न शिकविता तासन्तास मोबाईलवर बोलतांना व सोशल…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि खा.उन्मेश पाटील यांच्या खंबीर पाठपुराव्यामुळे चाळीसगावच्या विकासात मोठी भर पडली आहे. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी, ६ ऑगस्ट रोजी चाळीसगाव रेल्वे स्टेशनचा ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेत ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. चाळीसगाव रेल्वे स्टेशनचा १६२ वर्षानंतर कायापालट होऊन “अमृत भारत स्टेशन” योजनेमुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच चाळीसगाव स्टेशनला आधुनिकीकरणाचा साज चढणार आहे. कार्यक्रमाला खा.उन्मेश पाटील, आ.मंगेश चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री एम.के. आण्णा पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज, रेल्वे समितीचे अध्यक्ष के.बी.साळुंखे, योगाचार्य वसंतराव चंद्राते, रेल्वे अधिकारी, भाजपाचे पदाधिकारी यांच्यासह यांच्यासह सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद, पंचायत…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे घडलेल्या अमानवीय घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकलीच्या घरी रविवारी आ.मंगेश चव्हाण यांनी भेट देऊन परिवाराचे सांत्वन केले. यावेळी चाळीसगाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल पाटील आदी उपस्थित होते. पीडित बालिकेचे वडील दिव्यांग आहेत. घरही लाकडी फळ्या लावलेले पत्र्याचे आहे. त्यांची अतिशय साधारण अशी आर्थिक परिस्थिती आहे. छोटीशी टपरी चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाला आ. मंगेश चव्हाण यांनी १ लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. तसेच शासनाच्या माध्यमातून कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी तसेच आरोपीवरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू करून लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ.चव्हाण…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील ६० माजी सैनिकांचा आणि एका विरपत्नीचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. राज्य शासनाच्या महसूल सप्ताहानिमित्त येथील तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विविध विभागाशी निगडित माजी सैनिकांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या. त्यात १० माजी सैनिकांनी यावेळी विविध विभागाशी निगडित तक्रारी दाखल केल्या. त्या तक्रारींवर कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभाग प्रमुखांना तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिले आहेत. तसेच महसूल सप्ताहानिमित्त तालुक्यातील विविध मंडळ अधिकारी कार्यालयात फेरफार अदालतीचे आयोजन केले होते. त्यात आत्महत्याग्रस्त वारसांच्या नोंदी घेण्यात आल्या. यासह नवीन नोंदी स्वीकारून पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध असल्याचे जामनेरचे नवनिर्वाचित मंडळ अधिकारी…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील पीडित बालिकेचा मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी हा खटला जलद गती न्यायालयात चालवून एक महिन्याच्या आत निकाल लावण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा, स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी, ६ ऑगस्ट रोजी गोंडगाव येथे पीडिताच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, स्थानिक ग्रामस्थ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. त्यानंतर तिचा…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी किरण देवी सारडा सत्कार्य निधीतर्फे आयोजित कै.मामासाहेब दांडेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नुकत्याच घेण्यात आलेल्या ज्ञानेश्वरी स्पर्धेत कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल शाळेतील ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा परीक्षा ज्ञानेश्वरीच्या पाचव्या अध्यायावर आधारित घेण्यात आली. त्यात नाशिक, अमरावती, धुळे, नंदुरबार आणि जळगाव अशा पाच जिल्हा अंतर्गत स्पर्धेत शाळेतील राजश्री दिलीप खैरनार या विद्यार्थिनीने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. तिला किरण देवी सारडा सत्कार्य निधी यांच्याकडून १ हजार रुपयाचे पारितोषिक धनादेश स्वरूपात देण्यात आले. याबद्दल शाळेचे ज्येष्ठ शिक्षक तथा शिक्षक पतपेढीचे मा. अध्यक्ष एस.डी.भिरूड यांच्या हस्ते राजश्रीला पारितोषिक आणि पुष्पवृक्ष भेट म्हणून देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सीमा…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथून जवळील ऋषीबाबांकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली होती. लोहारा गावापासून जवळपास ३ किलोमीटरचा रस्ता गेल्या ५ वर्षांपासून हा रस्ता दुरुस्ती करण्यात यावा, म्हणून लोकप्रतिनिधींना साकडे घालण्यात येत होते. मात्र, गावातील व विकास कामांच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधीनीही या रस्त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष न दिल्याचे आरोप त्या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे. त्या रस्त्याने पायी चालणे अवघड झाले होते. अखेर शेतकऱ्यांना जाणीव झाली. आपला कोणी वाली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर सर्व शेतकऱ्यांनी मिळून लोकवर्गणीतून हा रस्ता थोड्याफार प्रमाणात का होईना दुरुस्त केला आहे. रस्त्याच्या कामासाठी माळी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र माळी, रामा पाटील, गजानन कोळी, तुषार गोंधळे,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील रांजणगाव येथे शेळ्यांच्या शेडच्या जाळ्या तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन बकऱ्या आणि एक बोकड (पशुधन) अशा २५ हजारांच्या बकऱ्या चोरून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील रांजणगाव येथे बकऱ्यांसाठी असणाऱ्या शेडमधून अज्ञात चोरट्याने लोखंडी जाळी तोडून दोन बकऱ्या आणि एक बोकड असे २५ हजार रुपयांच्या शेळ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर जंजाळे करीत आहे.