साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी ‘तहजीब उर्दु शाळेतील विद्यार्थ्यांचा चिखलातून प्रवास’ अशा ठळक मथळ्याखाली दैनिक ‘साईमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याबाबत प्रशासकासह माजी नगरसेवकांबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता. त्याची नगरपालिकाने दखल घेत तहजीब नॅशनल उर्दु शाळेच्या रस्त्यावर मुरूम टाकला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा चिखलातून प्रवासापासून होणारा त्रास दूर केला आहे. तसेच वार्ड क्रमांक १४ व १५ मधील मदनी नगरसह अनेक भागाच्या रस्त्यावर नगरपालिकाने मुरूम टाकला. याकामी सामाजिक कार्यकर्ते सलमान खान, आदिल चाऊस, वसीम शेख यांनी पाठपुरावा केला. याबद्दल नागरिकांनी दैनिक ‘साईमत’सह सलमान खान, आदिल चाऊस आणि वसीम शेख, मित्र मंडळ यांचे आभार मानले आहे.
Author: Sharad Bhalerao
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील वरखेडे मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येत असलेल्या तामसवाडी गावाचा पुनर्वसन प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर याप्रश्नी आ.मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेत तामसवाडी गावासाठी मालेगाव रस्त्यालगत पिलखोड गावाच्या अलीकडे जागा निश्चित करून दिल्याने मोठ्या प्रतिक्षेनंतर तामसवाडी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी तामसवाडी गावाचे मुख्य रस्त्यालगतच पुनर्वसन होणार असल्याने तामसवाडी ग्रामस्थांनी आ.मंगेश चव्हाण यांचे आभार मानले आहेत. अखेर तामसवाडी गावाच्या पुनर्वसनाचा तिढा सुटला आहे. सध्या पूर्णत्वास आलेल्या वरखेडे धरणाच्या बुडीत क्षेत्रात तामसवाडी गाव येत आहे. गावाच्या पुनर्वसनासाठी शासनाच्यावतीने देण्यात येणारी शासकीय जमीन तामसवाडी ग्रामस्थांना मान्य नसल्याने त्यांनी गावासाठी पिलखोड व टाकळी…
साईमत, शिरपूर : प्रतिनिधी तालुक्यातील उपरपिंड शिवारात तापी नदीपात्रात मंगळवारी, ८ ऑगस्ट रोजी सकाळी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पट्टीच्या पोहणाऱ्यामार्फत मृतदेह दुपारी पाण्याबाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. याप्रकरणी उपरपिंडचे पोलीस पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, शहर पोलिसांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना माहिती देत हद्दीत कोणी बेपत्ता असल्याची माहिती जाणून घेतली. तसेच पोलिसांनी नागरिकांना मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. सविस्तर असे की, तालुक्यातील उपरपिंड शिवारात तापी नदी काठावर मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पाण्यावर तरंगताना एक ३५ वर्षीय अनोळखी पुरुष व्यक्तीचा मृतदेह…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील चिमुकलीसोबत अमानुषपणे कृत्य करुन निर्घुण खून करणारा आरोपी व त्याला सहकार्य करणारे सहआरोपी यांना फाशीची शिक्षा व्हावी, याबाबत सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, सर्व पुरोगामी विचारसरणी संघटना तसेच सुजान नागरिकांच्यावतीने मोर्चा काढून चोपडाचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले. बालिकेच्या हत्येप्रकरणी सीआयडी चौकशी करण्यात यावी. हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येवून खटल्याचे कामकाज विधीतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात यावे. त्याबरोबरच पीडित कुटूंबाला आर्थिक मदत मिळावी, आरोपीला मुत्यूदंडाची शिक्षा व्हावी व पीडित चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा, असेही निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या निवेदनावर रवींद्र मराठे, आत्माराम मराठे,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील ९ वर्षीय बालकेवर अत्याचार करून तिला जिवे मारणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशा आशयाचे निवेदन मुस्लिम समाजातर्फे तीव्र निषेध करत पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले, तहसीलदार प्रशांत पाटील यांना देण्यात आले. ही घटना माणुसकीला काळीमा साधणारी ठरली आहे. अशा घटनांमध्ये अनेक ठिकाणी वाढ होत आहे. अगदी मोठमोठ्या शहरांपासून ते ग्रामीण भागात अशा माणुसकीला लाजविणारे कृत्य घडू लागले आहे. चिमुकलीच्या खूनप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी मुस्लिम समाजाने निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतेवेळी मुस्लिम समाजाचे कार्येकर्ते सलमान खान, नगरसेवक फकिरा मिर्झा, वसीम शेख, अलीम शेख,…
साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या गोंडगाव येथे झालेल्या बालिकेवर अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन कजगावच्या ग्रामस्थांनी भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि चाळीसगावचे आ.मंगेश चव्हाण यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, आपण आपल्या स्तरावरून योग्य तो पाठपुरावा करावा. आपण संपूर्ण राज्यात महिला नेत्या म्हणून परिचित आहात. आपल्याला महिलांची विशेष जाण असल्याने आपण हा विषय नक्कीच गांभिर्याने घेऊन त्या नराधमाला फाशीपर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न कराल, अशी मागणीही कजगाव ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी अनिल महाजन, मनोज धाडीवाल, प्रमोद ललवाणी, प्रमोद पवार, नितीन सोनार, अनिस मन्यार, निलेश पाटील, रवींद्र पाटील,…
साईमत, भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील गोंडगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. याप्रकरणी खटला चालविण्याची विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी तयारी दर्शविली आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंगळवारी, 8 ऑगस्ट रोजी गोंडगाव येथील पीडित कुटुंबाची भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्या सोबत आ.मंगेश चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी चित्रा वाघ यांनी या कुटुंबाशी संवाद साधून त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. घटनेतील नराधम पीडित कुटुंबाच्यांचाच शेजारी राहणारा असून त्यांच्या कुटुंबाशी कोणतेही वाद नव्हते. मात्र, या नराधमाने भयंकर कृत्य करून चिमुकलीची क्रूर हत्या केली असल्याची माहिती त्यांना सांगण्यात आली. याप्रसंगी आम्हाला न्याय हवा आणि या…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा करावी, या मागणीसाठी धरणगाव शहरातील सर्वपक्षियांतर्फे मंगळवारी, ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मूक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा बजरंग चौक, मराठे गल्ली मार्गे निघून धरणगाव तहसील कार्यालयासमोर धडकला. मूक मोर्चात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी धरणगाव तालुका प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील आठ वर्षीय चिमुकलीवर गावात राहणारा स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय १९) याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दगडाने मारून तिला कडबा कट्टीत झाकुन ठेवले. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर संशयित आरोपी स्वप्निल पाटील…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथून मुंबई येथे जाण्यासाठी सायंकाळी सहा वाजेनंतर गाडी नसल्याने ‘पंजाब मेल’ आणि ‘विदर्भ एक्सप्रेस’ या गाड्यांना थांबा मिळावा, देवळाली-भुसावळ पॅसेजरचे (मेमो) डबे वाढवून त्या गाडीची वेळ पूर्वीच्या देवळाली-भुसावळ शटलच्या वेळेनुसार करावी, कोरोना काळात विस्कळीत झालेले रेल्वेचे वेळापत्रक पूर्ववत करण्यात यावे, अशा आशयाच्या मागण्यांचे निवेदन पाचोरा रेल्वे प्रवाशी कृती समितीतर्फे पाचोरा रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक यांना नुकतेच देण्यात आले. याप्रसंगी पाचोरा रेल्वे प्रवाशी कृती समितीचे ॲड. अविनाश भालेराव, सुनील शिंदे, खलील देशमुख, भरत खंडेलवाल, संजय जडे उपस्थित होते. जनतेच्या संतप्त भावनांना सनदशीर मार्गाने व्यक्त करण्यासाठी ‘क्रांतीदिनी’ बुधवारी, ९ ऑगष्ट रोजी पाचोरा रेल्वे स्टेशन समोर धरणे आंदोलनासह निदर्शने…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यात पावसाने अवकृपा केली आहे. त्यामुळे अनेक गावात पिके सुकू लागली आहेत. अशातच तालुक्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी चाळीसगाव तालुका विकास मंचचे प्रफुल्ल साळुंखे यांनी एका पत्रकाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे. तालुक्यात काही गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांसोबत बोललो असता देवळी, अंधारी, तळेगाव, माळशेवागे तसेच पाटणादेवी परिसर डोंगरपट्टा आणि तालुक्यातल्या इतर अनेक गावात यावर्षी दुबार पेरणी झाली. दुसऱ्यांदा पेरणी करुनही पिक एक वितभरही वाढलेले नाही. ऑगस्ट महिना अर्धा झाला. आता पाऊस येऊनही त्याचा उपयोग होणार नाही. कारण ही पिकं किती उत्पादन देतील यात शंका आहे. अनेक गावात पिण्याच्या पाण्याचे ट्रँकर सुरु…