साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव हे गुटखा विक्रीचे केंद्र असल्याची तक्रार अनेकदा करण्यात आली आहे. चाळीसगावातील गोदामांमध्ये गुटखा साठवून तो देशभर पाठविला जातो. गुटखा विक्रीतून चाळीसगावात करोडो रुपयांचा ‘टर्न ओव्हर’ असल्याचे चर्चिले जात आहे. येथे वारंवार धाडी टाकून गुटखा जप्त केला जात असल्यामुळे त्यात असल्याचे स्पष्ट होते. गुरुवारी, १० ऑगस्ट रोजी सायंकाळी अन्न व औषध विभागाच्या पथकाने धाड टाकून सुमारे वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तपास करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
Author: Sharad Bhalerao
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी नांदुरा बायपासवरील बुलढाणा रोड क्रॉस करणाऱ्या ब्रिजवर दुचाकीची अज्ञात ट्रकला धडक लागून मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील दोन सख्खे आणि एक चुलत भाऊ जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. झोडगा गावातील तिघे अपघातात ठार झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. सविस्तर असे की, मलकापूर तालुक्यातील झोडगा येथून आंबोडा येथे दुचाकीने (क्र.एमएच २८-बीएन-२७३९) जात असतांना नांदुरा बायपासवरील बुलढाणा रोड क्रॉस करणाऱ्या ब्रिजवर दुचाकीची अज्ञात ट्रकला धडक लागली. अपघातामध्ये दुचाकीवरील उमेश विठ्ठल कंडारकर (वय २३), प्रशांत किसन कंडारकर (वय २६), नितीन किसन कंडारकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळतात आ. राजेश एकडे आणि ओम साई फाउंडेशनचे विलास निंबोळकर,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव महावितरण कंपनीच्या कामकाजासाठी दिलीप कॉन्ट्रॅक्टर नाशिक एजन्सीमार्फत बाह्यस्त्रोत कर्मचारी मदतनीस म्हणून भरती केले आहे. कामगारांनी चाळीसगाव महावितरण कंपनीचे १८ तास काम करूनही ऑक्टोबर २०२२ चा पगार कर्मचाऱ्यांना ८ महिने होऊनही पगार व सुरक्षा साधने पुरविले गेले नाही. त्यामुळे २० जुलै २०२३ रोजी चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर रयत सेना आणि बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्यावतीने ५ तास धरणे आंदोलन केले होते. आंदोलनप्रसंगी चाळीसगावचे कार्यकारी अभियंता आणि दिलीप कॉन्ट्रॅक्टर नाशिक एजन्सी यांनी ऑक्टोबर २०२२चा पगार १० दिवसात देण्याचे रयत सेनेला आश्वासन देवूनही आजतागायत पगार न झाल्याने पुन्हा रयत सेना व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांनी चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड येथे रास्ता रोको आंदोलन केले.…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी प्रतिबंधक कारवाईच्या प्रस्तावात तारीख न देता जामिनावर मुक्तता करण्यासाठी अडीच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना चाळीसगाव तहसील कार्यालयातील फौजदारी लिपिक दीपक बाबुराव जोंधळे (वय ४७, रा.शास्त्रीनगर, प्लॉट नंबर १६, कापड मिल मागे, चाळीसगाव) यास गुरुवारी, १० ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता तहसीलमधील दालनातच अटक करण्यात आली. या कारवाईमुळे लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. सविस्तर असे की, ३० वर्षीय तक्रारदार यांच्या पक्षकारांविरुद्ध दाखल गुन्ह्यात मेहुणबारे पोलिसांकडून प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी चाळीसगाव यांच्याकडे सादर करण्यात आला. प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण दाखल करून त्यामधील आरोपी यांना पुढील तारीख न देता जामिनावर मुक्त करण्याकरीता तसेच मदत करण्यासाठी…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान राबविण्यात आले. विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये ‘माझी माती, माझा देश’ या उपक्रमाची जाणीव व जागृतीकामी सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्या सूचनेप्रमाणे सकाळी १० वाजता पंचप्राण शपथ देण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमाबद्दल माहिती विशद केली. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळेस विद्यार्थ्यांनी ‘वसुधा वंदन आणि स्वातंत्र्यसैनिक’ या विषयावर आधारित निबंध स्पर्धेत सहभाग घेतला. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी डॉ. सौ. प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालय येथे ९ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून “मेरी माटी, मेरा देश” या उपक्रमांतर्गत विद्यालयात विद्यार्थ्यांनी ७५ दिवे लावून दिव्यांची रांगोळी साकारण्यात आली. मुख्याध्यापक रमेश सोनवणे यांच्यामार्फत विद्यार्थी व शिक्षकांनी पंच प्रण शपथ घेतली. यावेळी ज्येष्ठ शिक्षक आनंद जगताप, नरेंद्र पवार, राकेश चित्ते, श्रीमती लता निकम आदींनी शहीद क्रांतीकारकांना अभिवादन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक रमेश सोनवणे यांनी मनोगतात “मेरी माटी, मेरा देश” उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन योगेश साळुंखे यांनी केले.
साईमत, चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील वेळोदे येथील भोई समाजाचे कुटुंबातील स्व.अमोल भाऊ यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेऊन परिस्थिची विचारणा केली. त्याच्या आईवडिलांना आर्थिक मदतीचा आधार म्हणून दूध संघाचे संचालक, भाजप नेते रोहीत निकम यांनी एक लाख रूपये मदतीचा हात दिला. भोई समाजाच्या कुटुंबातील कर्ता, करविता शालेय विद्यार्थी वन विभागाची परीक्षा हॉल तिकिट घेण्यासाठी जात असतांना काळाने झडप घातली. त्यात अमोल हे आपल्यातून कायमचे निघुन गेले. त्यामुळे स्व.अमोल यांचे सांत्वन करण्यासाठी दूध संघाचे संचालक रोहीत निकम, भाजपाचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, चोपडा विधानसभा निवडणूक प्रमुख गोविंद सैंदाणे, जैन प्रकोष्टचे तालुकाध्यक्ष संजय जैन, चिटणीस भरत सोनगिरे, चंद्रशेखर पाटील आदी उपस्थित होते.
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील नगाव येथील सुयोग शिक्षण मंडळाने चालविलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नगाव-गडखांब विद्यालयाची ६ वीची विद्यार्थिनी प्राची भूषण गिरी हिची ‘एबीपी माझा’ लाईव्हवर शुक्रवारी, ११ ऑगस्ट रोजी ११ वाजता प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुंबई येथे निवड झालेली आहे. ज्ञान की चळवळ, पुणे व ‘एबीपी माझा’ लाईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत महोत्सव स्वतंत्र भारत अभिनव पोस्ट कार्ड स्पर्धेत प्राचीची निवड झालेली आहे. तिच्यासोबत समन्वयक शिक्षक प्रा.कैलास सोनवणे यांची निवड झालेली आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक, प्रदीप लोखंडे आदी उपस्थित राहणार आहेत. या निवडीबद्दल प्राचीचे जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, अमळनेरचे…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील विजय नाना पाटील आर्मी स्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांची स्त्रीची भूमिका लक्षवेधी ठरली. १० वीच्या विद्यार्थ्यांचे आदिवासी नृत्य प्रमुख आकर्षण ठरले. काही विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांचा इतिहास गाण्यातून व्यक्त केला. अध्यक्षस्थानी आर्मी स्कूलचे प्राचार्य पी.एम.कोळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, लोक संघर्ष मोर्चाचे विभागीय संघटक तसेच आदिवासी पारधी विकास परिषदेचे खान्देश प्रांताध्यक्ष पन्नालाल मावळे, श्रीमती मावळे, नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी श्याम पवार, प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, केंद्रप्रमुख दिलीप सोनवणे, केंद्रप्रमुख रवींद्र साळुंखे, केंद्रप्रमुख राजेंद्र गवते, संदीप…
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे देशभरात नऊ ऑगस्ट रोजी आदिवासी गौरव दिवसानिमित्त ‘आदिवासी गौरव पर्व’ साजरा करण्यात आला. त्या अंतर्गतच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व जळगाव जिल्हा काँग्रेसच्या आदेशाने ९ ऑगस्ट रोजी पाळधी येथे धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीने ‘आदिवासी गौरव पर्व’ दिवस साजरा करण्यात आला. पाळधी येथील गायत्री मंदिराच्या बाजूला असलेल्या आदिवासी वस्तीत भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करून आणि त्यांच्या कार्याचे स्मरण करून हा दिवस साजरा केला. यावेळी धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.व्ही.डी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला साजिद पटेल, किरण अत्तरदे, शेख बशीर यांच्यासह तालुका काँग्रेसचे पदाधिकारीही उपस्थित होते. तसेच रमेश बारेला, विक्रम बारेला महाराज…