साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील मांडळ येथे गुरुवारी, १० ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एकाचवेळी वेगवेगळ्या सात ठिकाणी चोरांनी दुकानांसह घरफोडी केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी मारवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, महेश जैन यांच्या किराणा दुकानातून अंदाजित २५ ते ३० हजार रुपये तर निलेश पाटील कृषी केद्राचे कुलूप तोडून लँपटॉप, रोख ३० हजार व वाल्मिक पाटील रेशन दुकानदार यांच्या गोदामातून ज्वारीची गोणी, दोन ते तीन हजार रोख तसेच अमोल सोनार यांच्या दत्तात्रय ज्वेलर्स या दुकानातून ४०० ग्रॅम चांदी तर १६ ग्रॅम सोने इतर दोन हजार रोख तर कमलाकर अहिरराव यांच्या ज्वेलर्स दुकानातून सहा ते सात…
Author: Sharad Bhalerao
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी बास्केटबॉल स्पर्धेत अतिशय चमकदार कामगिरी करून राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या धैर्यशील पाटील याचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पाचोरा येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी सत्कार केला. तसेच धैर्यशीलचे वडील कृषी सहाय्यक रामेश्वर पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, तालुकाप्रमुख शरद पाटील, शहरप्रमुख ॲड.दीपक पाटील, शहर प्रमुख अनिल सावंत, ॲड.अभय पाटील, भरत खंडेलवाल, दादाभाऊ चौधरी, पप्पू राजपूत, मनोज चौधरी, हरीश देवरे, चंद्रकांत पाटील, पप्पू जाधव, संजय चौधरी, गफ्फार भाई, निखिल सोनवणे, जयश्री येवले, अनिता पाटील, मंदाकिनी पारोचे, कल्पना पुणेकर, पूजा पाटील, सीमा पाटील,मनीषा पाटील, ममता पाटील, संगीता पाटील, आबासाहेब भीमराव…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तीन ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा फलकाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. त्यात करगाव तांडा ४.क्र, चिंचगव्हाण तांडा, विसापूर तांडा हातगाव या शाखांचा समावेश आहे. यावेळी मोठ्या संख्येने अनेकांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांच्या हस्ते पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रजल चव्हाण, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, तालुका संघटक श्याम पाटील, तालुका उपाध्यक्ष राज राठोड, गणेश चव्हाण, सचिन पाटील, तालुका सरचिटणीस ईश्वर राठोड, म.न.वि.से.चे कल्पेश सुतार, शाखाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील तहजीब नॅशनल उर्दु हायस्कूलमधील काही शिक्षक शाळेतील जास्तीचे क्लास म्हणून घरी खासगी क्लासेस चालवित होते. यासंदर्भात दैनिक ‘साईमत’ने ठळक मथळ्याखाली प्रस्तुत प्रतिनिधीने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भोई यांनी तात्काळ दखल घेतली आहे. त्यामुळे शाळेत खासगी क्लासेस घेणार नाही, असे हमी पत्र शिक्षकांकडून मुख्याध्यापकांनी लिहून घेतले आहे. त्यामुळे शिक्षकांनी खासगी क्लासेस घेणे बंद केले आहे. तहजीब नॅशनल उर्दु शाळेत काही संचालक शिस्त चांगली लावतात तर काही शिक्षक आपलेच नातेवाईक संस्थेत नोकरीला आहेत. त्यांचे संरक्षण म्हणून शाळेत टाईमपास करतात. मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या कामात अडथळे आणत असतात. संचालक, सचिव यांच्यात आपसात मतभेद आहेत.…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शिक्षण घेताना इंग्रजी माध्यमाच्या शाळाच पाहिजे असे नाही. कारण मराठी शाळेतही चांगले शिक्षण मिळते. विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीने अभ्यास केल्यास यश तुमचेच असेल, असे प्रतिपादन चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी केले. ते शहरातील पवारवाडी स्थित विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृहात रयत सेनेतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व शालेय साहित्य वाटपप्रसंगी बोलत होते. १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनीचा गौरवपत्र देवून सत्कार करण्यात आला. ५ ते ७ वीच्या १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक संदीप पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून रा. वि. चे संचालक प्रमोद पाटील, डॉ.संदीप देशमुख,…
साईमत, जामनेर l प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील चिमुकलीच्या खून प्रकरणी नराधम आरोपीस आणि आरोपीला मदत करणाऱ्या सर्वांना कडक शासन होण्यासाठी जामनेर येथील तहसीलदारांना अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे नुकतेच निवेदन देण्यात आले. आरोपीस मृत्यूदंडसारखे शासन व्हावे जेणेकरून समाजात अशा प्रवृत्ती जन्माला येणार नाहीत. अशा आशयाचे निवेदन तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्यावतीने नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर यांनी स्वीकारले. आरोपीच्या कुटूंबातील सर्वांची सखोल चौकशी करुन त्यांनी या गुन्ह्यात मदत केली असेल तर त्यांनाही कठोर शासन करावे, आरोपी हा गुंड प्रवृतीचा असून त्याची मागील पार्श्वभूमी तपासावी, अशा गुंड प्रवृत्तीपासून समाजाला अजून धोका पोहचू शकतो, म्हणून जामीन मिळू नये, हा खटला जलदगतीने न्यायालयात चालवावा, खटल्यात…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा पोदार जीनियस स्कूलच्या मैदानावर नुकत्याच झाल्या. त्यात इंदिराबाई ललवाणी शाळेच्या मुले, मुली १४, १७ व १९ सर्व वयोगटात मुला-मुलींनी यश संपादन करून आपले वर्चस्व राखले. स्पर्धेचे उद्घाटन जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोदार जीनियस स्कूलचे संस्थाध्यक्ष प्रकाश पाटील, नगर परिषद संगणक संचालक सूरज पाटील, राष्ट्रीय शुटींगबॉल खेळाडू हितेश पाटील, तालुका क्रीडा संयोजक डॉ.आसिफ खान, स्पर्धा समिती प्रमुख जी.सी.पाटील, उपमुख्याध्यापक शेख जलाल, इंदिराबाई ललवाणी विद्या. क्रीडा…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव हे गुटखा विक्रीचे केंद्र असल्याची तक्रार अनेकदा करण्यात आली आहे. चाळीसगावातील गोदामांमध्ये गुटखा साठवून तो देशभर पाठविला जातो. गुटखा विक्रीतून चाळीसगावात करोडो रुपयांचा ‘टर्न ओव्हर’ असल्याचे चर्चिले जात आहे. येथे वारंवार धाडी टाकून गुटखा जप्त केला जात असल्यामुळे त्यात असल्याचे स्पष्ट होते. गुरुवारी, १० ऑगस्ट रोजी सायंकाळी अन्न व औषध विभागाच्या पथकाने धाड टाकून सुमारे वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तपास करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी नांदुरा बायपासवरील बुलढाणा रोड क्रॉस करणाऱ्या ब्रिजवर दुचाकीची अज्ञात ट्रकला धडक लागून मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील दोन सख्खे आणि एक चुलत भाऊ जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. झोडगा गावातील तिघे अपघातात ठार झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. सविस्तर असे की, मलकापूर तालुक्यातील झोडगा येथून आंबोडा येथे दुचाकीने (क्र.एमएच २८-बीएन-२७३९) जात असतांना नांदुरा बायपासवरील बुलढाणा रोड क्रॉस करणाऱ्या ब्रिजवर दुचाकीची अज्ञात ट्रकला धडक लागली. अपघातामध्ये दुचाकीवरील उमेश विठ्ठल कंडारकर (वय २३), प्रशांत किसन कंडारकर (वय २६), नितीन किसन कंडारकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळतात आ. राजेश एकडे आणि ओम साई फाउंडेशनचे विलास निंबोळकर,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव महावितरण कंपनीच्या कामकाजासाठी दिलीप कॉन्ट्रॅक्टर नाशिक एजन्सीमार्फत बाह्यस्त्रोत कर्मचारी मदतनीस म्हणून भरती केले आहे. कामगारांनी चाळीसगाव महावितरण कंपनीचे १८ तास काम करूनही ऑक्टोबर २०२२ चा पगार कर्मचाऱ्यांना ८ महिने होऊनही पगार व सुरक्षा साधने पुरविले गेले नाही. त्यामुळे २० जुलै २०२३ रोजी चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर रयत सेना आणि बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्यावतीने ५ तास धरणे आंदोलन केले होते. आंदोलनप्रसंगी चाळीसगावचे कार्यकारी अभियंता आणि दिलीप कॉन्ट्रॅक्टर नाशिक एजन्सी यांनी ऑक्टोबर २०२२चा पगार १० दिवसात देण्याचे रयत सेनेला आश्वासन देवूनही आजतागायत पगार न झाल्याने पुन्हा रयत सेना व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांनी चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड येथे रास्ता रोको आंदोलन केले.…