साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील धुळे रस्त्यावरील पुन्शी पेट्रोल पंपाजवळ सर्व एसटी बसेस यांना थांबा देण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन गेल्या १९ जुलै रोजी चाळीसगाव शिवसेना महिला आघाडी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्यामार्फत आगार प्रमुखांना देण्यात आले होते. त्याची दखल चाळीसगाव बस आगार प्रमुखांनी घेऊन ८ ऑगस्टपासून धुळे रोड पुन्शी पेट्रोल पंप येथे एसटी बसला थांबा देऊन शिवसेनेची मागणी मान्य केली. याठिकाणी एसटी बस थांबल्यावर परिसरातील नागरिक, महिलांनी बसचे स्वागत करून चालकाचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. चाळीसगाव बस स्थानक ते धुळे जाणाऱ्या व धुळ्याहून चाळीसगाव येणाऱ्या सर्व बसेसला पुन्शी पेट्रोल पंपाजवळ बस थांबा देण्यात यावा. आजपर्यंत या ठिकाणाहून असंख्य महिला आणि…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यात सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प भुजल अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तालुक्यातील तीस शाळांना वृक्षदिंडी उपक्रमाअंतर्गत प्रति शाळा पन्नास झाडे लावण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प व भुजल अभियानाचे गुणवंत दादा आणि सुचित्रा पाटील यांच्या प्रयत्नातून परमहंस हरीगीरीबाबा समाधी संस्थान परिसरात १००० बांबूचे वृक्ष लागवडीसाठी देण्यात आले. बांबूचे रोपण चाळीसगाव शहराचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सुचित्रा पाटील, मा.नगरसेवक नितीन पाटील, पर्यावरण व जलमित्र सोमनाथ माळी, ॲड. शिवाजी बाविस्कर, विरेंद्रसिंग राजपूत, सरदारसिंग राजपूत, राकेश चव्हाण, विलास चव्हाण, अनिल वराडे, संभा राजपूत, निलेश सोनार, राहुल कोळी,…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील लोंढ्री शिवारातील कपाशीच्या शेतात पहूर येथील अविवाहित तरुणाचा इलेक्ट्रिक विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी, १२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पहूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर असे की, तालुक्यातील पहुर पेठमधील आंबेडकर नगर येथील रहिवाशी आनंदा सांडू मोरे यांचा मुलगा समाधान आनंदा मोरे (वय ३४) लोंढ्री शिवारात बेलाचे पाने तोडण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत असलेली त्याची मोठी बहीण आशा मोरे तसेच चुलत बहीण सारिका मोरे, शैला घोडेस्वार हे तीनही जण नेहमीप्रमाणे बेलाचे पान तोडण्यासाठी जात होते. तेव्हा वाटेत कपाशीच्या शेतात इलेक्ट्रिकची तार तुटलेली होती. त्या तारावर…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर मनपा इमारतीत हिरकणी कक्ष नसल्याची बाब गेल्या आठवड्यात निधी फाउंडेशनने केलेल्या पाहणीत समोर आले होते. निधी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी याविषयी महापौर जयश्री महाजन यांची भेट घेऊन नुकतेच निवेदन दिले आहे. राज्य सरकारने प्रत्येक महत्त्वाचे शासकीय कार्यालय, बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि वर्दळीच्या कार्यालयात स्तनदा मातांच्या सोयीसाठी हिरकणी कक्षाची उभारणी केली आहे. निधी फाउंडेशनतर्फे गेल्या आठवड्यात पाहणी करण्यात आली. तेव्हा मनपाच्या इमारतीत हिरकणी कक्षच उभारण्यात आला नसल्याचे दिसून आले. जळगाव शहर मनपात दररोज घरपट्टी, जन्म-मृत्यू दाखला आणि इतर कामानिमित्त कितीतरी महिला येत असतात. मनपा इमारतीत तब्बल १७ मजले आहेत. एखाद्या मजल्यावर लवकरात लवकर…
साईमत, पारोळा : प्रतिनिधी एकीकडे गोंडगावच्या भयंकर घटनेमुळे समाजमन सुन्न झालेले असतांनाच त्याच प्रकारची घटना पारोळा तालुक्यात घडली आहे. अल्पवयीन मुलीने अत्याचाराला विरोध करताच तिची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी रोजी सायंकाळी घडली. पीडित मुलगी जखमी झाली असून तिच्यावर धुळे येथे उपचार सुरू आहेत. पारोळा येथे नागरिकांनी रास्ता रोको करून या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे. पोलिसांनी त्यांची समजूत काढल्याने आंदोलक शांत झाले. सविस्तर असे की, भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील आठ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच…
साईमत, भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वाडे, बहाळ आणि नावरे शिवारात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे वनविभागासह संबंधितांनी त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. सविस्तर असे की, भडगाव तालुक्यातील वाडे, बहाळ तसेच नावरे शेतशिवारात मागील सहा महिन्यांपासून बिबट्याचा वावर सुरु आहे. त्या बिबट्याने आतापर्यंत ८ ते ९ वासरांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. १० ऑगस्ट रोजी वाडे गावातील शेतकरी प्रभाकर विठ्ठल पाटील यांच्याही शेतात तारेचे कुंपण तोडून बिबट्याने वासरीचा फडशा पाडला आहे. अशीच घटना ८ दिवसांपूर्वी विकास नारायण पाटील यांच्या शेतातही घडली होती. अशा घटना वारंवार घडत असून वन विभाग काहीच करताना दिसत…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जामनेर तालुका मराठी पत्रकार संघ, पत्रकार मंच, ग्रामीण पत्रकार संघ संघटनेच्यावतीने आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना शनिवारी, १२ ऑगस्ट रोजी लेखी निवेदन देण्यात आले. पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना पाचोरा आमदार किशोर पाटील यांनी अश्लील शिवीगाळ व धमकी दिल्याची घटना घडली. त्यानंतर संदीप महाजन यांना मारहाण केल्याची घटना घडली. त्यामुळे अशा प्रकारे पत्रकारांवर हल्ले करणाऱ्या आरोपींची चौकशी करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली आहे. यांची होती…
साईमत, शिरपूर : प्रतिनिधी जागतिक आदिवासी दिनानिमित्त लावण्यात आलेला बॅनर फाडल्याच्या कारणावरुन सांगवी-चारणपाडा येथे संतप्त जमावाने तुफान दगडफेक करत मुंबई-आग्रा महामार्ग अडविला. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दाखल झालेल्या आ.काशिराम पावरा यांच्या वाहनाच्या काचा फोडून जमावाने पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह अन्य पोलिसांवर दगडफेक केली. त्यात सुमारे २० पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जमावाने पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केली. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात सुमारे १५० जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, सांगवी गावातील चारणपाडा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा देणारा बॅनर लावण्यात आला होता. हा बॅनर अज्ञाताने फाडल्याचे दिसल्यामुळे १० ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजेनंतर तणावाचे वातावरण निर्माण…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील पाचोरा-भडगाव मतदार संघातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. या घटनेचा तालुका, जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटना, राजकीय नेते यांच्यातर्फे निषेध मोर्चा, आंदोलन करण्यात आले. मात्र, या घटनेतील मुख्य आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी प्रत्येक स्तरातून करण्यात येत आहे. दुसरीकडे या घटनेबाबत आ.किशोर पाटील आणि पत्रकार संदीप महाजन यांच्यामध्ये शिवीगाळ, मारहाण यासारख्या घटना घडून आल्या. या घटनेचाही संपूर्ण राज्यभरात निषेध केला जात आहे. या घटनेला आगळे वेगळे रूपांतर पहावयास मिळत आहे. या घटनेत त्या बालिकेला व तिच्या कुटुंबाला न्याय देणे अत्यंत गरजेचे असल्याने आ.किशोर पाटील…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी येथे दोन महिला आणि पुरूषाला जातीवाचक शिवीगाळ करत दोन महिलांचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी गुरूवारी, १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या दोन महिला आणि पुरूष हे बुधवारी, ९ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील शामखेडा शिवारातील शेतकरी बिपीन जगन्नाथ तिवारी (रा. धरणगाव) शेतात काम करत होत्या. त्यावेळी बिपीनने शेतात काम करणाऱ्या महिला आणि पुरूषांना जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने महिलांना अश्लिल शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर गुरूवारी, १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता…