Author: Sharad Bhalerao

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथे जनावरांचे चामडे व हाडे घेवून जाणाऱ्या ट्रक जाळल्याची घटना गुरूवारी घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी दुपारी धरणगाव पोलीस ठाण्यात १९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, छत्रपती संभाजीनगर येथून गुरुवारी, १७ ऑगस्ट रोजी मालवाहू ट्रक (क्र. युपी ९३, एटी ८१३५) हा जनावरांची कातडे भरुन ट्रक चालक सल्लू खान बाबू खान व क्लिनर मानसिंग श्रीराम कुशवाह हे उत्तरप्रदेशातील कानपूर येथे लेदर फॅक्टरी येथे प्रक्रियेकरीता घेवून जात होते. त्यावेळी धरणगाव तालुक्यातील बांभोरीजवळ काही जणांनी ट्रकचा पाठलाग करुन पाळधी येथे थांबवून जमाव जमविला होता. तेव्हा पोलिसांनी जमावाला कायदा हातात न घेता कायदेशीर…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी चोरी करणाऱ्या चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लोखंडी टॉमीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दिलीप पाटील आणि पोलीस नाईक सचिन पवार हे शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गस्तीवर होते. त्यावेळी संशयित आरोपी अशोकसिंग ईश्वरसिंग बावरी (वय २२, रा. मलकापूर) हा संशयितरित्या फिरत होता. त्यानंतर तो चोरी करून पळत होता. दरम्यान, पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. त्यानंतर अशोकसिंग बावरी या संशयित आरोपीने पोलीस कर्मचारी सचिन पवार यांच्यावर लोखंडी टॉमीने मारहाण करून गंभीर दुखापत…

Read More

साईमत, शेंदुर्णी, ता.जामनेर : वार्ताहर येथील नगरपंचायतीकडून २०२२/२३ चे मालमत्ता करात २० टक्के करवाढ करण्यात आली आहे. कर विभागाकडून वसुली केली जात आहे. तसेच २०२३ ते २०२६ या पुढील ४ वर्षाकरीता नगर रचना विभाग मूल्यांकन अधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांकडून प्रचंड करवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. शेंदुर्णी नगरपंचायतने लागू केलेल्या व प्रस्तावित करवाढी विरोधात शेंदुर्णी शहर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना(उबाठा), भा.राष्ट्रीय काँग्रेस मित्रपक्ष महाविकास आघाडीच्यावतीने सोमवारी, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नगरपंचायत कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून गोंधळपुरा, पारस पतसंस्था चौक, महावीर मार्गाने नगरपंचायत कार्यालयावर नेऊन करवाढ रद्द करणे व करवाढीवर हरकती घेण्यासाठी कराची थकबाकी भरण्याची…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद आणि जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे १४, १७ व १९ वयोगटासाठी तालुकास्तरीय शालेय शासकीय कुस्ती स्पर्धा शनिवारी, १९ ऑगस्ट रोजी घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्‌‍‍घाटन ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ संचालक ॲड.शिवाजी सोनार यांच्या हस्ते हनुमान प्रतिमेचे पूजन श्रीफळ वाढवून तथा कुस्ती जोड लावून करण्यात आले. स्पर्धेत तालुक्यातून १० वजन गटातून १३४ कुस्तीपटूंनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी ज्ञानगंगा विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र सोनवणे, राज्य कुस्ती पंच दिलीप संगेले(यावल), तालुका क्रीडा संयोजक डॉ.आसिफ खान, दीपक चौधरी, प्रा.समीर घोडेस्वार, वर्षा लोखंडे (शेंदुर्णी) आदी मान्यवर उपस्थित होते. यांनी…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी जळगाव कंजरभाट समाजातर्फे कंजरभाट समाज मंदिराच्या प्रांगणात प्रथमच स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कंजरभाट समाजाचे ज्येष्ठ नेते बिरजू नेतलेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी समाज बांधवांसह विविध स्तरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक नेत दीपक माछरेकर, ह.भ.प.सनातन महाराज, सामाजिक कार्यकर्ते विजय दहियेकर, सूर्यभान अभंगे, कंजरभाट समाजाचे संस्थेचे अध्यक्ष विजय अभंगे, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, उपाध्यक्ष सचिन बाटुंगे, सचिव राहूल नेतलेकर, खजिनदार योगेश बागडे, मोहन गारुंगे, नरेश बागडे, मोहन चव्हाण, मंगल गुमाने, संजय गारुंगे, विजय बागडे, संतोष इंद्रेकर, प्रदीप नेतलेकर, प्रकाश दहियेकर, संतोष बागडे, सुरज गारुंगे, अविनाश अभंगे, विशाल नेतले, अमित गागडे, उत्तम गुमाने, राकेश गारुंगे,…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी पावसाळ्यात पाण्यामार्फत रोगराई पसरते. त्यामुळे घरी नळाद्वारे आलेले पिण्याचे पाणी उकळून प्यावे. पाणी व्यवस्थित झाकून ठेवावे की जेणेकरून रोगराई पसरणार नाही व रोगराईला आळा बसेल. याविषयीची जनजागृती व्हावी, या उद्देश्याने प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक मनोज भालेराव यांनी सहावीच्या वर्गात स्तुत्य उपक्रम राबविला. पावसाळ्यातील भरलेल्या डबक्यातील पाणी घेतले. ते पाणी काचपट्टीवर घेऊन एक स्लाईड बनविली. तिला सूक्ष्मदर्शी खाली ठेऊन त्यात असलेले जिवाणू, विषाणू विद्यार्थ्यांना दाखविले. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना पाण्यात असलेले अमिबा, पॅरामेशिअम असे सुष्मजीवांची हालचाल होताना मायक्रोस्कोपच्या साहाय्याने दाखविण्यात आले. हे बघून विद्यार्थ्यांना आश्चर्यच वाटले. पाण्यात एवढे लहान लहान जीव असतात. त्यानंतर त्यांना पावसाळ्यात पाणी दूषित होत असते.…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलचा शताब्दी महोत्सवानिमित्त समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे भगीरथ शाळेत वर्षभर भारत प्रज्ञाशोध प्रश्नमंजूषा स्पर्धा हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थीप्रिय ठरलेल्या स्पर्धेत दहावीचा विद्यार्थी हितेश जितेंद्र महाले याने प्रथम क्रमांक मिळवित विजयाचा मानकरी ठरला. तसेच सिमरन जितेंद्र बोरसे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर, मुख्याध्यापक श्याम ठाकरे, उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे, पर्यवेक्षक एस.पी.निकम, सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षिका संगीता पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर.डी.कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वाचन संस्कृती वाढावी, विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने प्रतिष्ठान अनेक विविध…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पिंप्री येथे बुधवारी, १६ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता दोन जणांना ५०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण नंदलाल जैस्वाल (मध्य प्रदेश) आणि राधेशाम शरद जाखेटे (रा. वडगाव बु., ता. चोपडा, ह.मु.फॉरेस्ट कॉलनी, जळगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे. सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे दोन तरुणांनी बुधवारी, १६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता वेगवेगळ्या दुकानांवर जाऊन त्यांच्याकडील ५०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला. त्यात भाजीपाला विक्रेते विजय प्रकार बडगुजर (वय ४३, रा. पिंप्री, ता. धरणगाव)…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी गावठी हातभट्टीची दारु तयार करणाऱ्यांवर शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी विशेष मोहीम राबवून कार्यवाही करावी, असे पोलीस अधीक्षकांनी पोलीस अधिकाऱ्यांना आदेशित केले होते. त्यावरुन पथकातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी चाळीसगाव शहर पो.स्टे. हद्दीतील टाकळी प्र.चा., ओझर, पातोंडा शेतशिवारातील अवैध गावठी हातभट्टीची दारु तयार होत असलेल्या ५ ठिकाणी धाड टाकली. त्यात १ लाख ३८ हजार ४० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पाच जणांवर कारवाई करुन गुन्हे दाखल केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. सविस्तर असे की, चाळीसगाव तालुक्यात अधिकाऱ्यांसह अंमलदारांनी ५ ठिकाणी धाड टाकली. त्यात गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याच्या साहित्यासह मोटार सायकल, मोबाईल असा १ लाख ३८ हजार ४० रुपयाचा…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहुरपेठ परिसरातील नवकार बंगला येथे बंद घर फोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने, देवळातील मूर्त्या असा ७० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, तालुक्यातील पहूर येथे नवकार बंगला येथील रहिवासी दिनेश अनिल जैन (वय ३५) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. ते व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात ते १७ ऑगस्ट सकाळी ९ वाजता दरम्यान त्यांचे घर बंद होते. त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच देवळातील मूर्त्या असा…

Read More