Author: Sharad Bhalerao

साईमत, जळगाव/पारोळा : प्रतिनिधी जिल्ह्यातील पारोळा शहरात भाजीपाला विक्रेता त्याच्याच लावलेल्या हात गाडीवर पैशांचा हिशेब करत होता. त्याचवेळी अचानक त्या ठिकाणच्या खांबावरील विजेची तार कोसळली आणि त्यात भाजीपाला विक्रेत्याचा मृत्यू झाला. पारोळा शहरातील बूधनाथ मठा जवळील महाराष्ट्र रेस्टॉरंटजवळ शनिवारी, सायंकाळी ७.३० ते ८ वाजेच्या सुमारास घडली. परमेश्वर संतोष महाजन (वय ४२, रा. पेंढारपूर, पारोळा) असे मयत भाजीपाला विक्रेत्याचे नाव आहे. दरम्यान, भाजीपाला विक्रेत्यावर संकट कोसळून त्यांच्या जीवावर बेतल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. भाजीपाला विक्रेत्याच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर असे की, परमेश्वर महाजन हे शनिवारी नेहमीप्रमाणे पारोळा शहरातील बाजारपेठेतील हाकेच्या अंतरावरील हातगाडीवर भाजीपाल्याचे दुकान लावतात. शनिवारी रिमझिम पाऊस…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी शहराच्या उत्तरेस धार रस्त्यावरील मारुती मंदिर जवळील टेकडीचे शिवटेकडी ट्रेकिंग स्पॉट असे नामकरण पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. लोकसहभागातून टेकडीचा विकास करा, नागरिकांना निसर्गरम्य वातावरणात ट्रेकींगचे आवाहन करा. मात्र, याठिकाणी व्यसनाधीन लोकांना आणि गैरप्रकार करणाऱ्या लोकांना येऊ देऊ नका, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देऊन ट्रेकिंग करणाऱ्यांनीच काळजी घेऊन पोलिसांना कळविण्याचे आवाहनही पोलीस निरीक्षक शिंदे यांनी केले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अनिल शिंदे, डॉ.संदीप जोशी, दिगंबर महाले, कुणाल पाटील, माजी नगरसेवक प्रताप शिंपी उपस्थित होते. शहराबाहेरील टेकडी ओसाड पडलेली होती. त्यामुळे प्रताप शिंपी, जीवन पवार आणि त्यांच्या मित्र परिवाराने…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी जीवेठार मारण्याची धमकी देत एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जामनेर तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गेल्या २ जुलै रोजी सकाळी ११ वाजता बोदवड शहरात राहणारा इरफान इस्माईल सैय्यद (वय २५) याने ओळखीचा फायदा घेवून तिला वेळोवेळी सोबत नेवून तिच्यावर जबरी अत्याचार केला. तसेच ही बाब कुणाला सांगितली तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तिने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी इरफान सैय्यद याच्यावर…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील नगरपालिकेच्या मंगल कार्यालयामागे गटारी, नाल्या, घाण पाणीने व नालीत कचरा अडकून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे येथील रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सफाई कामगार आणि त्यांचे मुकडदम सफाई निरीक्षक याकडे लक्ष देऊन या भागातील नाल्या, गटारी व परिसर स्वच्छ करतील का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे नगरपालिका आता याकडे लक्ष देऊन स्वच्छतेचा निर्णय घेतील का, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. या भागातील लहान बालके आजारी पडत आहे. नगरपरिषदेमध्ये अनेक तक्रारी करूनही सफाई कामगार इकडे फिरकण्यास तयार नाही. या भागातील काही माजी नगरसेवक यांच्या घराच्या आजूबाजूला असलेली नाली व परिसर मात्र स्वच्छ हे कर्मचारी करतात.…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी मराठा सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष युगपुरुष इंजि. पुरुषोत्तम खेडेकर आणि प्रा.अर्जुन तनपुरे यांनी चाळीसगाव येथे राज्यस्तरीय जनसंवाद दौऱ्यावेळी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, गणेश देशमुख, जळगाव, सुधीर पाटील, पी.एन.पाटील, प्रमोद पाटील, शेषराव पाटील, शिवाजीराव पाटील (मा. शिक्षणाधिकारी), दीपक पाटील, नगरसेवक, अनिल निकम, संजय पाटील, अविनाश देशमुख, प्रा.सुनील निकम, आर. बी. जगताप, जी.जी.वाघ आदी उपस्थित होते. नवीन कार्यकारिणीने आजपर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा घेतला. तसेच संघटना वाढवा व तरुण पिढीला पुढे आणत संघ मजबूत करा. तसेच तालुकाध्यक्षांना सूचना करत महिला भगिनींना एकत्र आणून जिजाऊ ब्रिगेड संघटना लवकर स्थापित करा असा आदेश पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिला. यांची होती…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेत ना.एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोऱ्याचे आ.किशोर पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, शिवसेना नेते उमेश गुंजाळ, शिवसेना तालुकाप्रमुख राहुल पाटील यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा मूळ शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यात ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. जिल्हाप्रमुख असतांनाही एवढा मोठा कार्यक्रम झाला नव्हता. चाळीसगावची शिवसेना आज तालुकाप्रमुख राहुल पाटील यांच्या नेतृत्वात खऱ्या आर्थाने प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून मुक्त केली असल्याचे प्रतिपादन आ.किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केले. नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.…

Read More

साईमत, भडगाव : प्रतिनिधी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था, भडगाव, संचलीत गोपीचंद पुना पाटील, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव, ता.भडगाव येथील मल्लांनी जिल्हा क्रीडा कार्यालय आणि भडगाव तालुका क्रीडा समितीतर्फे आयोजित तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत १४ खेळाडूंनी विविध गटात विजेतेपद तर ५ खेळाडूंनी उपविजेतेपद प्राप्त केले आहे. विजयी खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेचा निकाल असा- १४ वर्षाआतील (मुले) ओमकार श्रीराम पाटील (३८ कि.प्रथम), भावेश जितेंद्र पाटील (५७ कि.प्रथम), १४ वर्षाआतील (मुली) तनु वाल्मिक पाटील (४६ कि.प्रथम), १७ वर्षाआतील, फ्रीस्टाईल (मुले) कमलेश मनोज पाटील (४१ ते ४५ कि.प्रथम), जयदीप कैलास सोनवणे (५५ कि.प्रथम), सुनील भाऊसाहेब फासगे…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बांभोरी गावाजवळील मोकळ्या जागेत अवैधरित्या वाळूचा साठा महूसल पथकाला शनिवारी, १९ ऑगस्ट रोजी पहाटे आढळून आला. महसूल पथकाने वाळूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी एकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जळगाव तालुक्यातील वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. दरम्यान महसूल आणि पोलीस प्रशासनाच्यावतीन १९ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता धडक मोहीम राबवित अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोठी कारवाई केली. त्यानंतर वाळू साठा करणाऱ्यांवरही कारवाई केली. गिरणा नदीच्या काठावरील बांभोरी गावातील मोकळ्या जागेत १९ ऑगस्ट रोजी पहाटे दोन ठिकाणी ९६ हजार रूपये किंमतीचा ३० ब्रास वाळूचा साठा महसूल प्रशासनाला आढळून आला. गिरणा नदीतून…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील स्तंभ लेखिका तथा साहित्यिका मीना सैंदाणे यांचा मंगळवारी, २२ ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता जळगाव आकाशवाणीवर ‘कानबाई, रानबाई’ ह्या विषयावर खान्देशातील कानबाई उत्सव हा माहितीपर कार्यक्रम सादर होणार आहे. सादरकर्ते नरेंद्रकुमार ठाकुर असणार आहेत. सर्व श्रोते हा कार्यक्रम ‘न्युज ऑन एअर’ वर ऐकू शकता. त्यात श्रोत्यांना ‘कानबाई’ वर आधारित असलेली माहिती सोबत गाणी ऐकण्याचा लाभ घेता येईल. यापूर्वीही मीना सैंदाणे यांनी आकाशवाणीवर विविध कार्यक्रम सादर केले आहेत. गेल्या चार महिन्यांपूर्वी त्यांचा ‘आखाजी’ वर कार्यक्रम झाला होता. त्या विविध विषयांवर सतत लिखाण करीत असतात. त्यांचा जळगाव आकाशवाणीवर कार्यक्रम होणार असल्याने त्यांचे श्रोत्यांमधून कौतुक होत आहे.…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी रेड रिबीन क्लब व राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच आय.सी. टी.सी.विभाग ग्रामीण रुग्णालय, धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच युवा दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विजयानंद वारडे होते. यावेळी प्राचार्य डॉ.ए.डी.वळवी, उपप्राचार्य प्रा.एस.एस.पालखे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे व रेड रिबीन क्लबचे समन्वयक डॉ. अभिजीत जोशी, प्रा. प्रताप साळवे, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. ज्योती महाजन, प्रा. रेखा बिरारी, आयसीटीसी विभागाचे समुपदेशक ज्ञानेश्वर शिंपी, राजेश्वर काकडे, गणेश कुंभार, अमोल सूर्यवंशी, अतुल पाटील आदी उपस्थित होते. यावेळी आर.के. एस.के. समुपदेशक गणेश कुंभार यांनी युवा कसा असावा? याविषयी मार्गदर्शन केले. तसेच एचआयव्ही एड्स…

Read More