Author: Sharad Bhalerao

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पिंप्री खुर्द गावातून एका छायाचित्रकार (फोटोग्राफर) व्यवसायिकाची दूचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीला आली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, विजय पंडित पाटील (वय ४१, रा. पिंप्री खुर्द, ता. धरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. फोटोग्राफरचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. गेल्या १९ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता विजय पाटील यांनी त्यांची दूचाकी (क्र.एमएच १९ डीएफ ४९८८) ही त्यांच्या घरासमोर पार्किंगला लावलेली होती. दरम्यान सोमवारी, २१ ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार वाजता एक अज्ञात व्यक्ती दूचाकी घेऊन जात असताना गल्लीत राहणारा राहुल पाटील याला दिसला.…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात शहरात एकाला गावठी दारू विक्री करतांना अटक केली आहे. अशा धडक कारवाईमुळे परिसरात अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तसेच यापुढेही असेच धाडसत्र सुरु ठेवणार असल्याचे पाचोरा दारूबंदी विभागाचे दुय्यम निरीक्षक विलास पाटील यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात सध्या सर्वत्र गावठी दारू विरोधात धडक मोहीम सुरू आहे. त्यामध्ये पाचोरा तालुक्यातही गावठी हातभट्टी विक्री व निर्मिती करणाऱ्या विरोधात कारवाईचे धाडसत्र सुरू आहे. यामध्ये पाचोरा शहरातील भारत डेअरी बस स्टॉपजवळ एका गावठी दारू विक्रेत्याविरोधात पाचोरा दारूबंदी विभागाचे दुय्यम निरीक्षक विलास पाटील यांना शरद शेलार हा अवैधरित्या गावठी दारू विक्री करत असल्याची…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी जळगावातील मन्यार गावातील फातीमा नगरमध्ये दररोज कसाई कायदाचे उल्लंघन करत गोहत्या करीत होते. त्याची माहिती पत्रकार विकास पाथरे, प्रमोद रूले यांनी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना दिली. त्यानंतर अवघ्या काही वेळात घटनास्थळी पोलीसदल दाखल होत सकाळी कापल्या गेलेल्या गोवंशाच्या मासांने भरलेली ॲपेरिक्षा मुद्देमालसह जप्त करत दोन जणांना अटक केली. गोवंशची हत्या होत असल्याची माहिती गोरक्षक रोहित महालेंना मिळाली. अपघातात गंभीर जख्मी असतांना आपले सहकारी किशोर खलसे यांच्या मोटर सायकलवर घटनास्थळ गाठले. त्याठिकाणी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये दीडशे ते दोनशे गोमातेचे चामडे, शिंगे, हाडे अवशेष आढळले. या सर्व गोष्टी बघता गोहत्यासाठी तीन गोमाता पोलीस येण्याआधीच कुठे गायब केल्या.…

Read More

साईमत, धुळे । प्रतिनिधी जिल्ह्यातील चंदन उत्पादक शेतकऱ्याच्या शेतातून रात्रीतून चक्क ६५ चंदनाच्या झाडांची तस्करी केल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्याला या चोरीमुळे लाखोंचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. याकडे पोलिसांनी देखील लक्ष देण्याची गरज आहे.  चंदन तस्करीसारख्या घटनांमुळे जीव धोक्यात घालून कोणीही चंदनाचे उत्पन्न घेणार नाही, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या भोरखेडा येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्रसिंग लोटनसिंग राजपूत यांनी १५ वर्षांपूर्वी आपल्या तीन एकर क्षेत्रात एक हजार पांढऱ्या चंदनाच्या झाडांची लागवड केली होती. या क्षेत्राच्या चौफेर बाजुने काटेरी झुडपे लावण्यात आली आहेत. संपूर्ण कुटुंब रात्रंदिवस या चंदनाच्या झाडांची काळजी घेत असतात.आता यातील काही चंदनाचे झाड…

Read More

साईमत, शहादा । प्रतिनिधी तालुक्यातील होळमोहिदा येथे शेतातील बंद घर फोडून चोरट्यांनी घरातील सामान शेजारी असलेल्या केळीच्या शेतात नेऊन अस्ताव्यस्त फेकून दिले. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ग्रामीण भागात चोरट्यांनी मोर्चा वळविल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शहादा पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी करण्यात आली. होळमोहिदा शिवारात उंटावद-आवगे-जुनवणे रस्त्यावर मोहन गुलाल पाटील यांचे घर आहे. दोन दिवसांपासून मोहन पाटील कुटुंबीयांसह पुणे येथे गेले होते. रस्त्यालगतच शेत असल्याने त्यांनी तेथेच घर बांधले आहे. कुलूप लावून ते पुणे येथे गेले होते. दरम्यान, श्री. पाटील गावाला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री घराच्या मागील दरवाजा तोडून घरात प्रव्ोश केला व कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून…

Read More

साईमत, नंदुरबार । प्रतिनिधी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी यांसारख्या जिल्ह्यातील मालमत्तेच्या गुन्ह्यांचा पोलीस दलाकडून तपास करून तो उघडकीस आल्यानंतर हस्तगत केलेला ४८ लाख रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल व वाहने मूळ मालकांना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते परत करण्यात आला. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आगामी सण, उत्सवाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आढावा, गुन्हे आढावा घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे भेट देऊन पोलीस ठाण्याचे गुन्हे अभिलेख, स्वच्छता याबाबत समाधान व्यक्त केले. नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गहाळ मोबाईलबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी…

Read More

साईमत, नाशिक । प्रतिनिधी प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्तीला प्राधान्य न देता पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींना ग्राहकांकडून प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे. शाडूच्या मूर्ती बनविण्यासाठी बुकिंगनुसार मूर्तीकारांनी काम सुरू केले आहे. शाडूच्या मूर्ती बनविण्यासाठी साधारण आठ दिवसांचा कालावधी लागतो. गणेशोत्सव महिनाभरावर येऊन ठेपला आहे. त्या अनुषंगाने मूर्तीकार शाडूच्या गणेशमूर्ती बनविण्यासाठी सज्ज झाले आहेत. शाडूच्या मूर्तीच्या किमती १८० ते तीनशे रुपयांपर्यंत असून, ५० रुपयांची वाढ झाली आहे. मूर्तीवर सोनेरी व स्कीन कलर सर्वाधिक वापरला जातो. रंगांच्या किमतीतही दुप्पट वाढ झाली आहे. नऊ इंचांपासून ते अडीच फुटांपर्यंत गणेशमूर्ती बनविल्या जात असून, दहा हजारांपर्यंत मूर्तीच्या किमती आहेत. घरगुती विसर्जन करणाऱ्यांकडून शाडूच्या मूर्तीला प्राधान्य दिले…

Read More

साईमत, त्र्यंबकेश्‍वर । प्रतिनिधी श्रावणातील पहिला सोमवार असल्याने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. श्रावणी सोमवारच्या आदल्या रात्री म्हणजे रविवारी भाविकांनी त्र्यंबकेश्‍वरला मुक्कामी जात भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासासह ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेसाठी गर्दी केली होती. त्यानंतर सोमवारी पहाटेपासून भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शन घेण्यासाठी आणि कुशावर्त कुंडावर स्नानासाठी भाविकांची मोठी वर्दळ होती. तर त्र्यंबकेश्‍वर मंदिर परिसरात भाविकांनी पहिल्या श्रावण सोमवारी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन भगवान शंकरांच्या पिंडीचे दर्शन घेता याव्ो यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसून आले. ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेसाठी जागोजागी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तर रस्त्याच्या कडेला खासगी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, म्हणून…

Read More

साईमत, नाशिक । प्रतिनिधी गोवा राज्यात निर्मिती केलेले विदेशी मद्याचा साठा अवैधरित्या वाहतूक करून नेणाऱ्या कंटेनरला पाठलाग करून विंचूर चौफुली येथे पकडण्यात आला. कंटेनरमध्ये विदेशी मद्याचे ११०० बॉक्स आढळून आले असून, कंटेनरसह विदेशी मद्य असा एक कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) येवला पथकाने कामगिरी केली आहे. कैलास पांडु लष्कर (३३, रा. शासकीय दूध डेअरी रोड, चक्कर बर्डी, धुळे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. एक्साईजच्या भरारी पथकाला गोवा राज्यातील विदेशी मद्याची अवैधरित्या कंटेनरमधून वाहतूक होत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाने नाशिक-संभाजीनगर (औरंगाबाद) रोडवरील निफाड, विंचूर येथे सापळा रचला होता. एक्साईजच्या पथकाकडून संशयित कंटेनरचा शोध…

Read More

साईमत, नाशिक । प्रतिनिधी महानगर पालिकेच्या हद्दीत अनधिकृत होर्डिंग सर्रास लावण्यात येत आहे. तसेच पंचवटी परिसरात तर त्याचा कहरच झाला आहे. पंचवटीतील चौक आणि रस्ते होर्डिंगने व्यापले आहे. त्यामुळे नागरिकांना, तसेच व्यावसायिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मखमलाबाद, म्हसरूळ, नांदूर नाका, आडगाव, पंचवटी कारंजा, आडगाव नाका, काळाराम मंदिर परिसर, रामतीर्थ आदी परिसरात मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावण्यात आले आहेत. होर्डिंग लावण्यासाठी नियमावली असताना तिचे पालन केले जात नाही. महानगर पालिकेच्या परवानगीशिवाय अनेक होर्डिंग लावण्यात येत आहेत. महानगर पालिकेची यंत्रणाही त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्याला कुणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या मेहरबानीमुळे कारवाई होणार नाही,…

Read More