मेहरुण तलावावरील गणेश घाटावर लाडक्या ‘गणरायाला’ निरोप साईमत/जळगाव/प्रतिनिधी : गेल्या दहा दिवसांपासून घराघरात विराजमान राहून भक्तीचा उत्सव रंगवणाऱ्या लाडक्या गणरायाला मेहरुणमधील गणेश घाटावर शनिवारी, ६ सप्टेंबर रोजी भावनिक वातावरणात निरोप देण्यात आला. उत्साह, भक्तिभाव आणि विरह यांच्या संगमाने घाट परिसर दुमदुमला होता. घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी पहायला मिळाली. ‘गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…!’ असा जयघोष सर्वत्र दणाणून ‘बाप्पांचे’ शांततेत विसर्जन करण्यात आले. गणेश घाटावर सकाळपासूनच पुरुष, महिला आणि चिमुकल्यांनी हजेरी लावली होती. ढोल-ताशांच्या गजरात, फुलांनी सजवलेल्या मखरातून बाहेर पडलेले गणरायाचे रूप भक्तांना मंत्रमुग्ध करत होते. चिमुकल्यांमध्ये एक वेगळीच भावना दिसून आली. “माय फ्रेंड गणेशा”ला निरोप देताना त्यांचा…
Author: Sharad Bhalerao
शिक्षक दिनानिमित्त शिक्षक कृतज्ञता सन्मान सोहळा उत्साहात साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित रावसाहेब रुपचंद (आर.आर.) विद्यालयाचे स्काऊटचे शिक्षक गिरीष रमणलाल भावसार यांचा शिक्षक दिनानिमित्त माजी शिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सरस्वती विद्या प्रसारक मंडळाच्यावतीने शिक्षक दिनानिनिमित्त शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करून त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव करण्यासाठी शिक्षक कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ग. स. सोसायटीचे अध्यक्ष अजबसिंग पाटील, संचालक सुभाष देशमुख, सरस्वती विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, नगरसेवक डॉ. चंद्रशेखर पाटील, ला. ना. विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका राजकमल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या २९ वर्षांपासून जळगावातील रावसाहेब रुपचंद…
निवडीत उपाध्यक्षपदी जयेश गवळी तर सचिवपदी ॲड.विनोद धनगर यांचा समावेश साईमत/जामनेर/प्रतिनिधी : शहरातील जळगाव रस्त्यालगतच्या प्रकाश नगर, प्रेम नगर, गोविंद कॉलनीत सालाबादप्रमाणे यंदाही सप्तश्रृंगी दुर्गा उत्सव मित्र मंडळाची नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यात सर्वानुमते मंडळाच्या अध्यक्षपदी पुनश्च: अध्यक्षपदी जगदीश बाबुराव सोनार यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच उर्वरित कार्यकारिणी जाहीर करण्यात येऊन मंडळातर्फे यंदा राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. निवड जाहीर झाल्यानंतर जगदीश सोनार यांचा परिसरातील अनेकांनी सत्कार करुन त्यांच्यासह सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचेही कौतुक केले आहे. उर्वरित नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी जयेश समाधान गवळी तर खजिनदारपदी ॲड.महेंद्र पाटील, ॲड.आशुतोष चंदेले, सचिवपदी ॲड.विनोद जनार्दन धनगर, सहसचिवपदी मनोज महाजन, सल्लागारपदी…
गणरायाच्या विसर्जनासाठी पदाधिकाऱ्यांकडून श्रमदान करून सहकार्य साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मेहरुण तलावावरील गणेशघाट येथे नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून पर्यावरण वाचविण्याच्या दृष्टीने गणपती विसर्जनानिमित्त शनिवारी, ६ सप्टेंबर रोजी पर्यावरणपूरक निर्माल्य संकलन उपक्रम राबविण्यात आला. निर्माल्य संकलन करून गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. निर्माल्य पाण्यात विसर्जन करून कोणत्याही प्रकारची जलहानी होऊ नये. तसेच परिसरात प्रदूषण होणाऱ्या रोखण्याच्यादृष्टीने सर्व निर्माल्य एकाच ठिकाणी संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था ग्रुपच्या महिलांनी सकाळी साडे आठ वाजेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत निर्माल्य संकलन केले. नारीशक्तीने श्रमदान करून गणेश विसर्जनासाठी सहकार्य केले. याप्रसंगी संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष मनिषा पाटील, नूतन तासखेडकर, हर्षा गुजराती, रेणुका…
महावितरणच्या विद्युत तारा, सीसीटीव्ही कॅमेरासह पोलचे नुकसान साईमत/जामनेर/प्रतिनिधी : शहरातील बांधकाम विभाग आणि रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाकी रस्त्यावर २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान अचानक एक झाड पडले. सुदैवाने, झाडाखाली कोणीही सापडले नसल्याने जीवितहानी टळली असल्याचे सांगण्यात आले. मात्र, याठिकाणी काही मोटार सायकली उभ्या होत्या. त्यांचे किरकोळ नुकसान झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात महावितरणच्या विद्युत तार तुटल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.नगर परिषदेने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा व पोल जमीनदोस्त झाल्याने अधिकचे नुकसान झाले आहे. सविस्तर असे की, शहरातील ‘वाकी रोड’ चा भाग नेहमीच गर्दी असलेला आणि वाहनांची मोठ्या संख्येने वर्दळ असलेला म्हणून ओळखला जातो. त्याच रोडाच्या बाजूला…
अथर्वशीर्षासह आवर्तनाचे होणाऱ्या फायद्यावर सेवेकऱ्यांकडून मार्गदर्शन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील स्थित किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण करण्यात आले. “त्वमेव केवलं कर्तासि” असे म्हणत अहंकाराची ज्योत विझविणाऱ्या मन व बुद्धीला शांत ठेवणाऱ्या अथर्वशीर्षाचे पठण चैतन्यमय, भक्तीमय वातावरणात झाले. गणेशोत्सवाचे औचित्य साधून मनाला प्रसन्न करणारे अथर्वशीर्षाचे पठण करण्यात आले. सर्वव्यापी गणेशाला मनोभावे वंदन करून सुबुद्धी, विवेक व सुयशाचे मागणे मागून अथर्वशीर्षाच्या पठणाला सुरुवात केली. तत्पूर्वी वैष्णवी नालकोल, सोनल राठोड यांनी गणपती अथर्वशीर्ष, त्याच्या आवर्तनाचे होणारे फायदे, याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापकांसह शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांच्या स्तुत्य उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मेहरुणमधील श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात संस्थेचे सचिव तथा माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांच्यातर्फे इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गातील २०० विद्यार्थ्यांना मंगळवारी, २ सप्टेंबर रोजी रा.काँ.शरद पवार गटाचे आ.एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी रा.काँ.शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. रवींद्रभैय्या पाटील होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, एजाज मलिक, जिल्हा समन्वयक विकास पवार, जिल्हा सरचिटणीस वाय.एस.महाजन, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, माजी नगरसेवक राजु मोरे, सुनील माळी, डॉ.रिजवान खाटीक, ओबीसी सेल आघाडी महानगरचे जिल्हाध्यक्ष नामदेव वाघ, महानगरचे जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत,…
पूर्वतयारी बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे निर्देश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज अभियानातंर्गत सेवा पंधरवाडा, महसूल पंधरवाडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहे. पंधरवाडा दरम्यान सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश केंद्रीय क्रीडा-युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिले. कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात पूर्वतयारी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खा. स्मिता वाघ, आ.चंद्रकांत सोनवणे, आ.मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिकाचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आदी मान्यवर उपस्थित होते. सेवा पंधरवड्या दरम्यान, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत प्रत्येक तालुक्यात…
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली प्रशंसा, आरास पाहून भारावले साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : गेल्या अठरा वर्षांपासून जय गणेश फाउंडेशन अठरा इंचाची शाडू मातीची गणेशमूर्ती मूर्तीची स्थापना करत आहे. मूर्तीपेक्षा विचारांची उंची वाढणं गरजेचे आहे. अगदी निकोप विचारधारेतून फाउंडेशन दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाची आखणी करते हे भुसावळचे सांस्कृतिक वैभव आहे. अशा शब्दात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी फाउंडेशनची प्रशंसा केली. गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी अर्थात रविवारी त्यांनी भुसावळ येथे सुरभी नगरातील जय गणेश फाउंडेशनच्या नवसाचा गणपती येथे सायंकाळी सपत्नीक भेट दिली. अलौकिक गणपती विवाह सोहळ्याची चलचित्र आरास पाहून ते भारावले. पुणे, मुंबई, नाशिक अशा महानगरात जसे कसब पणाला लावून आरास साकारलेल्या असतात त्याच धर्तीवर भुसावळात…
वीज महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे रयत सेनेची मागणी साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : वीज ग्राहकांकडे वीज मिटर सुस्थितीत असताना वीज महावितरण कंपनीच्यावतीने ग्राहकांकडे नवीन स्मार्ट मिटर बसविले जात आहेत. ते जास्त गतीने फिरतात. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त दरमहा १ ते ३ हजार रुपये भूर्दंड बसत आहे. त्यामुळे ते बसविणे वीज महावितरण कंपनीच्यावतीने बंद करावे, अशी मागणी रयत सेनेने सहा. अभियंता सुनील कांदे यांच्याकडे सोमवारी, १ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास रयत सेनेच्यावतीने मोठे जन आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रत चाळीसगावचे आमदार, प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार यांना पाठविण्यात आल्या आहेत. स्मार्ट मीटरमध्ये जास्त रिडिंग येईल,…