साईमत, चाळीसगाव : ( मुराद पटेल ) येथील शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी संदीप पाटील चाळीसगावला रुजू झाल्यापासून एकही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी गुन्हेगारावर कारवाई नाही. दररोज कोणत्या ना कोणत्या गुन्हेगारावर कारवाई सत्र सुरूच आहे. काही घटना तर अश्या त्यांच्या काळात घडल्या काही तासातच गुन्ह्यांचा तपास उलगडला आहे. ‘अधिकारी असावा तर असा’, असा सूर चाळीसगाव शहर जनतेतून संदीप पाटील यांच्याबद्दल उमटत आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे नेहमीच पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, सहाय्यक पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आपले कर्तव्य करत असतात. त्यांना नेहमीच मोलाचे सहकार्य आपल्या सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील समता सैनिक दलाच्या केंद्रीय कार्यालयात येत्या ३० सप्टेंबर २०२३ रोजी चाळीसगाव येथे तालुकास्तरीय भव्य रॅली काढण्यासंदर्भात नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. ही बैठक समता सैनिक दलाचे मुख्य केंद्रीय प्रचारक धर्मभूषण बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आंबेडकरी चळवळ सक्षम करण्यासाठी आणि अन्याय, अत्याचाराच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी, अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी, अन्यायग्रस्त जनतेची एकजूट करण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी रॅली आयोजित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. रॅली यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घ्यावी, असे आवाहन बागुल यांनी केले. बैठकीत चाळीसगाव तालुक्यातील वेगवेगळ्या २५ ते २६ गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा प्रचारक स्वप्नील जाधव यांनी करून बैठकीचा हेतू विशद…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील गंगापुरी येथील विवाहितेचा विद्युत वजन काट्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी, २७ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. यामुळे कानुमातेच्या उत्सवासाठी घरी आलेल्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भारती घनश्याम पाटील (वय ३०, रा. गंगापुरी, ता. धरणगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे. सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील गंगापुरी येथील घनश्याम रायभान पाटील हे पत्नी भारती पाटील आणि दोन मुलांसह सुरत येथे वास्तव्याला आहे. कानुबाईचा उत्सव असल्याने घनश्याम पाटील हे पत्नी व दोन्ही मुलांसह गंगापुरी येथे आलेले होते. रविवारी, २७ ऑगस्ट रोजी घनशाम पाटील हे आईवडिलांसह सकाळी शेतात भेंडी तोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी खान्देशातील महत्वाचा मुख्य सण म्हणून ओळखला जाणारा “रोट म्हणजे” कानबाईचा उत्सव पाडळसरे येथे साजरा करण्यात आला. सलग तीन दिवस गावात कामानिमित्त बाहेरगावी, परराज्यात गेलेले भाऊबंदकीतील लोक परिवारासह गावात दाखल झाले होते. त्यामुळे गावात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. कानबाईची सवाद्य मिरवणूक काढून गावभर पूजन, ‘हंगाम चांगला येऊ दे…’ म्हणत कानबाईचे तापीत विसर्जन करण्यात आले. गेल्या पंधरा दिवसांपासून कानबाईच्या उत्सवासाठी महिला वर्ग साफसफाईच्या कामात व्यस्त होत्या. गावात भरपूर वर्षे झाली अडीअडचणीमुळे बंद केलेला कानबाईचा उत्सव यावर्षी साजरा करण्यात आला. त्यासाठी सर्व समावेशक परामर्श करून पूर्वापार चालत आलेली परंपरा कायम ठेवण्यासाठी पुढाकार घेऊन तरुण पिढीला आदर्शवत असलेल्या व…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी रिक्षातून जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या पिशवीतून चांदीचे देव चोरुन पसार झालेल्या दोन महिलांना रिक्षा चालकाच्या सतर्कतेने पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्या महिलांकडून चोरी केलेले चांदीचे देव पोलिसांनी हस्तगत करत दोन्ही महिलांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सविस्तर असे की, नवीन चांदीचे देव बनविण्यासाठी आशा प्रभाकर जाधव (वय ६८, रा. दत्त कॉलनी, पाचोरा) ह्या सराफ दुकानात गेल्या होत्या. त्या देव बनवुन झाल्यानंतर रिक्षातून जाण्यासाठी निघाल्या. रिक्षात दोन महिला बसल्या होत्या. आशा जाधव ह्या महाराणा प्रताप चौकात रिक्षातून उतरुन घरी गेल्यावर त्यांना पिशवीत चांदीचे देव आढळून आले नाही. आशा जाधव यांनी लागलीच रिक्षा चालकास फोन करुन प्रकार सांगितला.…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र लष्करे यांना जळगाव जिल्हा क्रीडा महासंघातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रविवारी, २७ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये मार्गदर्शन केले. जिल्हास्तरावर क्रिकेट, बुद्धिबळ अशा विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. त्यांच्या कार्याची पावती म्हणून जिल्हास्तरीय मुख्याध्यापक आदर्श क्रीडा पुरस्कार देण्यात आला. जळगाव येथे नुकताच कार्यक्रम झाला. यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक मनोहर महाजन, प्रवीण पाटील उपस्थित होते. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
साईमत, चोपडा : प्रतिनिधी जे समाजाचे हित पाहते ते साहित्य, ही संत विनोबाजींची साहित्याची व्याख्या पूर्णपणे प्रत्ययकारी आहे. साहित्य समाजात स्नेह, वात्सल्य निर्माण करते. अमळनेरात होऊ घातलेले साहित्य संमेलन खान्देशसाठी मोठी पर्वणी ठरणारे आहे. हे संमेलन फक्त अमळनेरचे नसून खान्देश यांचे आहे. संमेलनात सर्वांनी तन-मन आणि धन देत सहभागी होऊन हे संमेलन यशस्वी करावे, असे आवाहन माजी विधानसभा अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी केले. अमळनेर येथे फेब्रुवारी २०२४ मध्ये होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर येथील भगिनी मंडळाच्या सांस्कृतिक सभागृहात सहविचार सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अमळनेरच्या मराठी वाडःमय मंडळाचे अध्यक्ष डॉ.…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील गोरखपूर तांडा (पिंपरखेड) येथे भर दिवसा घराचे कुलूप तोडून घरातून रोकड रकमेसह सोन्याचे दागिने असा सुमारे २ लाख २४ हजार २०० रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला शुक्रवारी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून काही तासातच चोरीचा उलगडा केला. त्यात मामाच्या घरी राहणाऱ्या व १२ वीत शिकणाऱ्या १७ वर्षीय भाच्यानेच आपल्या दोघा मित्रांच्या सहाय्याने ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून प्रत्येकी १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस व प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाच्या ५ सोन्याचा अंगठ्या असा ऐवज जप्त…
साईमत, भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कोळगाव येथील बंद घर फोडून घरातून ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, अनिल पुंजू केदार (वय ४७, रा.कोळगाव, ता. भडगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २६ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास त्याचे घर बंद असताना अज्ञातांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर ७५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार घडल्यानंतर अनिल केदार याने भडगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. ही चोरी आनंदा प्रकाश खैरे यांनी केली असल्याचा आरोपही करण्यात आला. याप्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ८ वर्षीय चिमुुकलीशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग करून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्याला अटक केली आहे. सविस्तर असे की, चोपडा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ८ वर्षीय मुलगी ही २६ ऑगस्ट रोजी दुपारी एक ते तीन महिन्याच्या सुमारास घरी असताना संशयित आरोपी ज्ञानेश्वर बन्सीलाल रायसिंग याने पीडित मुलीला घरी बोलून तिच्याशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्यानंतर अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर तिच्या आई-वडिलांसह तिने चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन…