साईमत, अमळनेर : प्रतिनिधी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही उज्ज्वल परंपरा असलेली संघटना आपले यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यासाठी अमळनेर येथे तातडीची आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्यात जोरदार तयारी आणि जिल्हाध्यक्षांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य नरेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश तायडे, जिल्हा सचिव ॲड.सुभाष तायडे, तालुका पालक मकसुद बोहरी, तालुकाध्यक्ष तथा प्रांत महिला प्रमुख ॲड.भारती अग्रवाल, उपाध्यक्ष स्मिता चंद्रात्रे, सहसचिव ज्योती भावसार, कोषाध्यक्ष वनश्री अमृतकर, श्रीमती विमल मैराळे, रोटेरियन नूतन सदस्य महेश पाटील, साहित्य लेखक तथा कवी गोकुळ बागुल, शांतीलाल रायसोनी, पी.आर.ओ. जयंतीलाल वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेत…
Author: Sharad Bhalerao
साईमत, जळगाव : प्रतिनिधी पिंप्राळ्यालगतच्या सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरात शोभायात्रेसह विविध कार्यक्रम आयोजित केले होते. श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी उद्योजक ललित लढ्ढा आणि तृप्ती लढ्ढा यांच्या हस्ते स्वयंभू महादेव शिवलिंगाचा दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली. यावेळी पितळी कळसाची चंद्रकांत अत्तरदे तर व नंदी देवताची अक्षय अग्रवाल यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तसेच ११ जोडप्यांचा हस्ते हवन पूजा करण्यात आली. ट्रॅक्टरवर नंदी देवता व पितळी कळस ठेवण्यात आले होते. शोभायात्रा सोनी नगर परिसरात फिरविण्यात आली. शोभायात्रेत परिसरातील कळसधारी महिला ज्येष्ठ नागरिक, वृध्द महिला, युवा मुले, मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांनी फुगडी, गरबा, खेळत नाचत आनंद लुटला तर तसेच…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील जामनेरपूरा भागातील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी भूषण भगवान बराडे याने शिवगंगा रूप बेळगाव (कर्नाटक) रोज यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या रोलर स्केटींग स्पर्धेत १०० मीटर अंतर हे ११.२१ सेकंदात पूर्ण करुन गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव समाविष्ट केले आहे. तो जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भगवान वराडे यांचा चिरंजीव आहे. भूषणला प्रशिक्षक आनंद मोरे आणि जे.सी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. भूषणने कमी वयात जामनेर, वंजारी समाज, इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालय, त्याचे मार्गदर्शक आणि त्याच्या आईवडिलांचे नाव लौकीक केले आहे. याबद्दल जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालयाचे सर्व संचालक मंडळ, शिक्षक…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी ईकेवायसी केलेल्या ३ लाख शेतकऱ्यांकरीता मदतीचा २१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याकरीता त्यांनी संगणकीय प्रणालीवर कळ दाबून हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची प्रक्रिया मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. मागील पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता शासनाने विशेष बाब म्हणून १५००.०० रुपये कोटी इतका निधी बाधित शेतकऱ्यांकरीता मंजूर केला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने निश्चित केलेल्या डिबीटी प्रणालीमार्फत निधीचे वितरण सुरु आहे. मंत्रालयामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी निधी वितरणाबाबत आढावा घेतला. हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल.…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी वाणिज्य व व्यस्थापनशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक बालाजी कांबळे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यानी पीएच.डी पदवी देऊन नुकतेच सन्मानित केले. प्रा.बालाजी कांबळे यांनी ‘A study of the impact of Pradhan Mantri Fasal Bima Yojna in Development of Agriculture Sector in Nanded District , Maharashtra’ विषयावर आपले शोध प्रबंध विद्यापीठास सादर केले होते. त्यांनी प्रा.आर.व्ही.तेहरा यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य पूर्ण केले. याबद्दल प्रताप कॉलेज(स्वायत्त), अमळनेरचे प्राचार्य डॉ.अरुण जैन यांनी प्रा.कांबळे यांचा सत्कार केला. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.पराग पाटील, प्रा.जे.सी.अग्रवाल, डॉ.विजय तुंटे, डॉ.मुकेश भोळे, डॉ.आर.सी सरवदे, डॉ.माधव भूसनर, प्रा.जयेश साळवे आदी उपस्थित होते.
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी विद्याविहार कॉलनीतील भाविकांचे श्रध्दास्थान विद्येश्वर महादेव मंदिरात महादेव, नंदी, गणपती, दुर्गादेवी, राधाकृष्ण यांची स्थापना करण्यात आली. अमळनेर तालुक्यातील हे एकमेव मंदिर आहे. यासाठी अनेक भाविकांनी महादेवाच्या मंदिरात दर्शनासह पूजा केली. सोमवारी, २८ रोजी बारा वाजता कळसाची स्थापना, होम हवन सकाळी ९ ते ११ वाजता झाली. मुर्तीची स्थापना ११ वाजता तर कळसाची स्थापना १२ वाजता करण्यात आली. यावेळी महामंडलेश्वर स्वामी हसानंद तिर्थजी महाराज कपीलेश्वर मंदिर येथील महाराज यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली. मंदिरात प्रवचन करण्यात आले. नंतर महादेव मंदिरातील पूजाअर्चा यासंदर्भात महामंडलेश्वर महाराज यांनी सखोल माहिती सांगितली. त्यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पिंताबर पाटील यांनी सहपत्नीक केला…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी शहरातील वाकी रोड भागातील फेस्कॉम संलग्न असलेला स्वाभिमानी ज्येष्ठ नागरिक संघाची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी संघाचे संस्थापक-अध्यक्ष डी.डी.पाटील होते. सभेला संतोष पाटील, सचिव भगवान पाटील, उपाध्यक्ष कडूबा पाटील, उत्तम पाटील, पंडित दुबे, भीमराव पाटील सिल्लोड, प्रल्हाद साबळे यांच्यासह सभासद उपस्थित होते. सभेत विषय सुचीतील सर्व विषयावर सखोल चर्चा करून ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. आपल्या संस्थेचे अजूनही बँकेत खाते उघडले नसल्याचे अध्यक्षांनी सांगितले. म्हणून अध्यक्ष व सचिव यांच्या नावाने संयुक्त खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडावे, असे ठरविण्यात आले. २०२२-२३ चा अहवाल व जमा खर्च टाळ्या बंदलाही सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. २०२३ -२४…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवड सोमवारी, २८ ऑगस्ट रोजी पार पडली. सरळ गुप्त पद्धतीने मतदान होऊन त्यात सत्ताधारी अक्षय जैस्वाल यांच्या गटातील एक सदस्य फुटल्याने भाजपाचे युवा ग्रामपंचायत सदस्य दीपक रामदास खरे हे नऊ मते घेऊन उपसरपंचपदी विजयी झाले. सरपंच जैस्वाल यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. उपसरपंचपदी दीपक खरे यांची निवड जाहीर होताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके, गुलालाची उधळण करत गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली. तत्कालीन उपसरपंच अशोक चौधरी यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी अध्यासी निवडणूक अधिकारी तथा सरपंच अक्षय जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत १७ सदस्य…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी नवी मुंबई येथील अ.भा.गांधर्व महाविद्यालय मंडळातर्फे तबला, गायन क्षेत्रात अतुलनीय योगदानाबद्दल चोपडा येथील सेवानिवृत्त संगीत शिक्षक वसंत मयूर यांना कै.पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर राष्ट्रीय संगीत रव पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. एका कार्यक्रमात नवी मुंबई वाशी येथे पं.पलुस्कर यांच्या १५० व्या जयंती निमित्त आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यात कथ्थक नृत्य संगीताचार्य पद्मश्री पुरू दाधीच, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, गां.म.वि मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी, उपाध्यक्ष डॉ. देवेंद्र कुळकर्णी, कोषाध्यक्ष डॉ. किशोर देशमुख या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. वसंत मयूर हे चोपडे शिक्षण मंडळ संचलित प्रताप विद्या मंदिरातून संगीत शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. ते सातत्याने…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी जळगाव येथे जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यात कस्तुरबा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी प्राजक्ता रमाकांत बोरसे हिने “भरड धान्य एक उत्कृष्ट पौष्टिक अन्न की आहार भ्रम” या विषयावर उत्कृष्ट सादरीकरण केले. तिने तालुक्यातून “प्रथम क्रमांक” मिळविला होता. जळगाव येथे जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यात येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावत विद्यालयाची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. देशातील युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धींगत करणे असे उद्दिष्ट समोर ठेवून राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद दरवर्षी विज्ञान मेळावा आयोजित करते. यावर्षीही हा विज्ञान मेळावा आयोजित केला होता. त्यात जिल्ह्यातील शाळांनी सहभाग घेतला होता. प्राजक्ता रमाकांत बोरसे या विद्यार्थिनीने…