Author: Sharad Bhalerao

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील मालेगाव रस्त्यावरील हॉटेल आशिषजवळ नगरपालिकेची मुख्य जलवाहिनीवरील पाईपलाईन गेल्या पंधरा दिवसापासून लिक झाली आहे. याबद्दल परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी नगरपालिकेत सूचना देऊनही लिकेज असलेल्या पाईपलाईनचे काम न केल्यामुळे येथे पाईपमधून पाणी लिकेज होत आहे. ते एका खड्ड्यात जमा होत आहे. पुढे पाणी पुरवठा होत असतांना नागरिकांना हेच दूषित पाणी मिळत आहे. नळाला आलेले पाणी पूर्ण हिरवे आहे. नगरपालिकेमध्ये वारंवार तक्रारी करूनही पंधरा दिवसापासून पाईपलाईन फुटलेली आहे. याकडे कोणी लक्ष देत नाही. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे सोडलेले पाणीच हिरवेगार रंगाचे येत आहे. या परिसरात डेंग्यूसारखे डास तयार होत आहे. त्यामुळे रोगराईस निमंत्रण…

Read More

साईमत, शेंदुर्णी, ता.जामनेर : वार्ताहर घाटी येथील शासकीय रुग्णालयातील प्रसूती वार्ड, अस्थिव्यंग विभागामध्ये रुग्णालयातील महिला रुग्णांना ‘एक राखी एक साडी’ अशा स्तुत्य उपक्रमाअंतर्गत साड्यांचे वाटप करण्यात आले. आवश्यक रुग्णांना औषधीसाठी १०० रुपयांची भेट देवून साड्यांची भेट दिल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तसेच माणुसकीचे दर्शन झाल्याचे समाधान वाटले. यावेळी ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावणे यांनी चार्ली चॅपलीनच्या मुक आणि मुख अभिनयातून राखी बांधून घेऊन रूग्णांचा आनंद व्दिगुणीत केला. चार्लीने आपल्या मुखकलेतून हसवत रुग्णांना आत्मियतेने माणुसकीचे दर्शन घडवून देत धमाल केली. भाऊ बहिणीच्या नात्याला नव्याने उजाळा दिल्याचे महिला रुग्णांनी भाऊक होत प्रतिक्रिया व्यक्त केली. माणुसकी व्हॉट्‌‍सअप गु्रप व सु-लक्ष्मीचे अध्यक्ष सुमित पंडित यांच्या…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी गेल्या २ वर्षांपासून रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त असलेले प्रमुख वैद्यकीय अधिकारी तसेच इतर सर्व कर्मचारी पदे तात्काळ भरण्यात यावे, यासाठी चाळीसगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत पाटील यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना माजी सरपंच जिभाऊ पाटील, सरपंच प्रमोद चव्हाण तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद खैरनार, अनिल पाटील, रावण वाघ आदी उपस्थित होते. तसेच रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त असलेली सर्वच्या सर्व ८ पदे तात्काळ भरण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Read More

साईमत, भडगाव : प्रतिनिधी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था, भडगाव, संचलीत “किसान स्पोर्ट्‌स अकॅडमी, भडगाव” येथे स्व.मेजर ध्यानचंद यांच्या 118 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी आपल्या चपळ खेळाने जगभरात भारताचे क्रीडा विश्वात नाव अजरामर करणारे स्व.मेजर ध्यानचंद यांचे योगदान तसेच राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व उपस्थितांसमोर स्पष्ट केले. त्यानंतर खेळाडूंनी स्केटींगची विविध कला दाखवून उपस्थितांची मने जिंकली. खेळाडूंच्या कौशल्याचे उपस्थितांतर्फे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे कौतुक संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रतापराव पाटील, संस्थेच्या सचिव तथा जळगाव जिल्हा दूध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पूनम पाटील, मंत्रालयीन अव्वर सचिव प्रशांतराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाला…

Read More

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर येथील सूर्या फाउंडेशन संचलित नोबल इंटरनॅशनल स्कूल येथे रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रक्षाबंधन उत्सवाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थीनींनी पाळधी पोलीस स्टेशनला भेट दिली. समाजसेवेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. चिमुकल्या मुलींचे कौतुक करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी चॉकलेटचे वाटप केले. त्यानंतर शाळेत विद्यार्थिनींसाठी रांगोळी स्पर्धा, राखी बनविणे आदी उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. यासाठी शाळेच्या अध्यक्षा अर्चना सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थीनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या झाडांना बांधून प्रेम व्यक्त केले. जवळजवळ ८० विद्यार्थीनींनी शालेय परिसरातील वेगवेगळ्या झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय हरित सेना प्रमुख संजय बाविस्कर, अनिल शेलकर यांनी केले होते. तसेच कार्यक्रमासाठी जे.एस.चौधरी, नरेश फेगडे, हर्षदा जगताप, वैशाली कोठावदे, पल्लवी पाटील, नीता पाटील, अर्चना कोठावदे यांचे योगदान लाभले. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर, उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे, पर्यवेक्षक निकम, राष्ट्रीय हरित सेना प्रमुख संजय बाविस्कर आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम ज्येष्ठ शिक्षक एस.डी.भिरूड यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.

Read More

साईमत, अक्कलकुवा : प्रतिनिधी आर. एफ. एन.एस. वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व क्रीडा विभागाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा आणि फिटनेसची संस्कृती रुजविण्यासाठी विविध मैदानी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. पी. सावंत यांनी हॉकीचे खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. यावेळी फिट इंडिया मोहिमेची सामूहिक शपथ घेण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. विजय पाटील, रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेश्वरसिंग पाडवी, क्रीडा संचालक प्रा. विनीश चंद्रन, रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अंकुश खोब्रागडे उपस्थित होते. स्पर्धेत ९० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यशस्वी स्पर्धकांना प्राचार्य डॉ. सी. पी. सावंत, राष्ट्रीय…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी वावडे येथील जि.प.केंद्र शाळेत सुनिता रत्नाकर पाटील यांच्या संकल्पनेतून राखी निर्मिती उपक्रम (टाकाऊतून टिकाऊ) घेण्यात आला. त्यात सर्व विद्यार्थ्यांनी जुन्या लग्नपत्रिका, पुठ्ठे, थर्माकोल, मणी, जुन्या साडी किंवा ड्रेसमधील टिकल्या डायमंड, कापूस अशा साहित्याचा वापर करून सुंदर अशा राख्या तयार केल्या. यानंतर सर्व विद्यार्थीनींनी विद्यार्थ्यांना राखी ओवाळून राखी बांधली. तसेच पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी वृक्षास राखी बांधून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार सर्व विद्यार्थ्यांनी केला. स्वनिर्मित राखी बांधण्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर भरभरून दिसत होता. आपणही लहान व्हावे अन्‌‍‍ त्या सोबतच मौज करावी, असे म्हणून सर्व शिक्षिकाही त्यात सहभागी झाल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपक्रमासाठी मुख्याध्यापक मगन चौधरी, उपशिक्षिका…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी साळी समाजाचे आद्यदैवत आणि सृष्टीचे मूळ वस्त्र निर्माता भगवान जिव्हेश्वर यांची जयंती मंगळवारी, २९ रोजी राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला सकाळी सहा वाजता भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते रामदास डहाके यांनी पोथी वाचन केले. सत्यनारायण पूजा अभिषेक व कल्याणी आदमने, सौरभ व दिव्या वाव्हळ या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाज बांधव सुधाकर वाव्हळ होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष अरुण डहाके, विद्यमान अध्यक्ष राजु खेडकर, जिल्हाध्यक्ष अशोक दिवटे, कोषाध्यक्ष नाना भोगरे, सहसचिव पद्माकर आखडकर, नाना भागरे आदी उपस्थित होते. स्वागतगीत दीपाली खंडारे, नेहा खंडारे यांनी म्हटले. कार्यक्रमात गुणवंत…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ आणि जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाची पाचोरा तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय संघाचे एस.डी. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य गणेश देशमुख, कार्यवाह संजय पाटील, वाचनालय संघाचे व्यवस्थापक सागर भगुरे होते. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ आणि जळगाव जिल्हा ग्रंथालय संघ प्रणित पाचोरा तालुका ग्रंथालय संघाची हुतात्मा स्मारक, पाचोरा येथे नुकतीच पुढील तीन वर्षासाठीची कार्यकारिणीची प्रथमतःच बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सतीश डी. पाटील यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन निवड कार्यकारिणीत पाचोरा…

Read More