Author: Sharad Bhalerao

किशोर महोत्सवाअंतर्गत सुमधुर गायनासह आकर्षक नृत्य सादर साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा. विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात किशोर महोत्सवाअंतर्गत ‘विविध गुणदर्शन’ हा विद्यार्थ्यांचा आवडता कार्यक्रम नुकताच जल्लोषात पार पडला. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त व प्रमुख समन्वयिका पद्मजा अत्रे, सहसचिवा मीरा गाडगीळ, मुख्याध्यापक सचिन देशपांडे, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका रमा तारे, सांस्कृतिक प्रमुख सुवर्णा वंजारी, उपप्रमुख स्मिता करे, विविध गुणदर्शन समिती प्रमुख पांडुरंग सोनवणे, संपदा तुंबडे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, गोंधळ, सिनेगीत, भक्तीगीत, भावगीते यांचे सुमधुर गायन तसेच आकर्षक नृत्य सादर केले. डफ, बासरी व संबळ वाद्यांचे वादनही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. विद्यार्थ्यांना संपदा…

Read More

भारतीय संस्कृतीचे रंगतदार दर्शन ; कलाकारांवर बक्षीसांचा वर्षाव साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ शाळेत नुकताच सांस्कृतिक कार्यक्रम ‘आनंदोत्सव–२०२५’ उत्साहात आणि दिमाखात पार पडला. इयत्ता पाचवी ते दहावीतील तब्बल ३०० विद्यार्थी कलाकारांनी सहभाग नोंदवून पंजाबी, कोळी, कथ्थक, घुमर, भारुड, नटरंग, महाकाली आदी १४ बहारदार व नेत्रदीपक नृत्याविष्कार सादर केले. दमदार सादरीकरणामुळे प्रेक्षक अक्षरशः दोन तास मंत्रमुग्ध झाले. उत्कृष्ट सादरीकरणासाठी कलाकारांना १५ हजार रुपयांची रोख बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी अध्यक्ष मेजर नानासाहेब वाणी होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रमोद चांदसरकर, उपाध्यक्षा सीमा चांदसरकर, शालेय समिती अध्यक्षा…

Read More

दिनदर्शिकेत हिंदू धर्मातील पवित्र सणांच्या माहितीचा समावेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   सभासदांसाठी विविध योजना राबविणाऱ्या जळगाव जनता सहकारी बँकेच्यावतीने दरवर्षी अतिशय माहितीपूर्ण अशा विविध सामाजिक विषयांवर आधारित दिनदर्शिका तयार करण्यात येते. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असतो. २०२६ साठी बँकेच्यावतीने वैदिक सणांचे शास्त्रीय व आध्यात्मिक महत्व या विषयास अनुसरुन हिंदू धर्मातील पवित्र सणांच्या माहितीचा समावेश दिनदर्शिकेत केला आहे. याप्रसंगी श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी, संत मुक्ताबाई संस्थानचे ह.भ.प.रवींद्र महाराज हरणे, चिमुकले राम मंदिराचे दादा महाराज जोशी, वैद्य डॉ. प्रणिता वडोदकर, केशव स्मृती सेवा संस्था समूहाचे प्रमुख डॉ. भरत अमळकर, बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, उपाध्यक्ष डॉ.अतुल सरोदे, संचालक अनिल राव, हरीशचंद्र…

Read More

कर्मचाऱ्यांनी विविध गुणदर्शन सादर करून उपस्थितांना केले मंत्रमुग्ध साईमत/जळगाव/प्रतिनिधी :    महावितरणच्या जळगाव परिमंडल व मंडलातील कर्मचाऱ्यांचे ‘स्नेहबंध’ हे कौटुंबिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. ग्राहकांना अविश्रांत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोहळ्यामुळे नवी ऊर्जा मिळाली. हा सोहळा जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाबळ येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात रंगला. प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता विनोद पाटील, सहायक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर, कार्यकारी अभियंता मानसी सुखटनकर उपस्थित होते. सोहळ्यात कर्मचाऱ्यांनी विविध गुणदर्शन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. योगेश गांगुर्डे, ज्योती दुसाने, सुरेश गुरचळ, विशाल आंधळे, योगेश जैस्वाल व अंकिता पांडे यांनी सुमधुर गाणी गायली.…

Read More

घटनेनंतर तातडीने रुग्णालयात उपचार; तपासाला वेग   साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील उद्योजक संजय रामगोपाल तापडिया यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळच १७ डिसेंबर रोजी रात्री जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. आपल्या कंपनीतून घरी परतत असताना एका अज्ञात रिक्षा चालकाने त्यांची कार अडवून रिक्षात बसलेल्या चार ते पाच जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच डोक्याच्या मागील बाजूस टणक वस्तूने वार केला. याप्रकरणी १८ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एफआयआर क्र. ९१० दाखल केला आहे. ही तक्रार दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), १२६ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला…

Read More

खोटे नगरात बंद घर फोडले ; रोकडसह दागिन्यांवर डल्ला साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   शहरातील खोटे नगर भागात एका बंद घराला लक्ष्य करून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अशा घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राप्त माहितीनुसार, खोटे नगर येथील रहिवासी योगेराज पुंडलिक पाटील हे गेल्या १० डिसेंबरपासून आपल्या पत्नीसह नेपाळ येथे देवदर्शनासाठी गेले आहेत. घर बंद असल्याने त्यांचे भाऊ ज्ञानेश्वर पाटील हे घराची देखरेख करत होते. मंगळवारी, १६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर पाटील घराची पाहणी करण्यासाठी गेल्यावर त्यांना घराच्या…

Read More

महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश नन्नवरे यांची माहिती साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महसूल अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी, १९ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारणार असल्याची माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष योगेश नन्नवरे यांनी दिली. महसूल मंत्र्यांकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विनाचौकशी करण्यात येणाऱ्या निलंबन कारवाया तसेच महसूल विभागाच्या दीर्घकाळ प्रलंबित आर्थिक व सेवा विषयक मागण्यांकडे शासनाकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे हा टोकाचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महासंघाच्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत २८ नायब तहसीलदार व तहसीलदार, चार उपजिल्हाधिकारी, आठ मंडळ अधिकारी, १४ ग्राम महसूल अधिकारी तसेच इतर कर्मचारी निलंबित झाले आहेत. अशा सातत्यपूर्ण निलंबन कारवायांमुळे महसूल…

Read More

बीडला ६१ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा  साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्यावतीने २०२५-२६ साठी आयोजित ६१ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा बीड येथे होत आहे. स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा पुरुष व महिला संघ सहभागी होत आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारपदी अनुक्रमे मोहित गुंजकर, किरण बोदडे यांचा निवडीत समावेश आहे. जळगाव जिल्हा संघाची निवड प्रक्रिया निवड समितीचे सदस्य दत्तात्रय महाजन, दिलीप चौधरी, विशाल पाटील, निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना संघटनेचे पदाधिकारी आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे, प्रा. डी. डी. बच्छाव, उदय पाटील, एन. डी. सोनवणे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतराव…

Read More

शेकोटी कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कुलमध्ये स्काऊट-गाईडचे शिबिर उत्साहात पार पडले. शिबिराचा उद्देश के. पी. पाटील यांनी स्पष्ट करुन सांगितला. यावेळी स्काऊट प्रमुख डॉ. व्ही. एस. पाटील यांनी स्काऊट-गाईड यांना स्काऊटचे नियम, ध्येय, वचन, बेडन पॉवेल व्यायाम, दोरीच्या गाठी, स्कार्फची बंधने, स्ट्रेचर बनविणे तसेच प्रथमोपचार याविषयी प्रात्यक्षिकासह उपयुक्त, अशी माहिती सांगितली. गाईड प्रमुख रत्नमाला सपकाळे यांनी सर्व गाईड कॅप्टनच्या मदतीने भेळ बनवली.यावेळी स्काऊट- गाईड यांनी भेळचा आस्वाद घेतला. शेवटी शेकोटी कार्यक्रमात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. शेकोटी कार्यक्रमात बहारदार गीते सादर करण्यात आली. शिबिराची सांगता ‘वंदे मातरम्‌’ गीताने करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक…

Read More

उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला मिळाली चालना साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   प्रबोधन संस्था व आपण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गंमतगोष्टी’ उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त व आनंददायी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ईश्वर पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून त्यांचे नाव, शाळेचे नाव व आवडत्या गोष्टींची ओळख करून घेत संवादात्मक वातावरण निर्माण केले. त्यानंतर मुलांना ताजेतवाने व प्रसन्न करण्यासाठी ‘आ टमाटर’, ‘रम सम रम’ व ‘एक कच्चा घडा हूं मैं’ या गाण्यावर सामूहिक नृत्य करून घेण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून काही निवडक गोष्टींचे वाचन करून घेण्यात आले. चंचल धांडे यांनी ‘कावळा मोर झाला पण’ ही गोष्ट प्रभावी शैलीत कथन करत विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व, वाचनाचे फायदे व योग्य वाचन पद्धती याबाबत…

Read More