साईमत, पाचोरा : प्रतिनिधी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा शिवसेना नेत्या उबाठा वैशाली सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे व शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. पोलीस प्रशासनाने केलेल्या अमानुष लाठीचार्जची चौकशी होऊन संबंधितावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही व्हावी, असे न झाल्यास उबाठा शिवसेना पाचोरा रस्त्यावर उतरेल. त्यांच्या होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी. असेही निवेदनात नमूद केले आहे. याप्रसंगी वरिष्ट नेते रमेश बाफना, तालुकाप्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख अनिल सावंत, शहर प्रमुख दीपक पाटील, शहर संघटक राजेंद्र राणा, शहर संघटक दत्ताभाऊ जड़े, शहर संघटक दादाभाऊ…
Author: Sharad Bhalerao
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी जालन्यातील आंतरवाली सराटी येथील मराठा समाज आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी पाचोरा येथे आ.किशोर पाटील यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या सर्व शिवसैनिकांनी तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध व्यक्त केला. जालना येथील मराठा बांधवावर झालेल्या अमानुष लाठीचार्ज तसेच घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, तसेच तात्काळ मराठा समाजबांधवांना आरक्षण मंजूर करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना दिल्या आहेत. निवेदन देतेवेळी युवा नेता सुमीत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, तालुका प्रमुख सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. बेरोजगारी वाढत चालली आहे. विकास, विकासकामांकडे सरकारचे अजिबात लक्ष नाही, यासह अनेक मुद्दे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीने रविवारी, ३ सप्टेंबर रोजी जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे. जनसंवाद यात्रेत कुणाल पाटील, माजी खासदार उल्हास पाटील, यावलचे आ.शिरीष चौधरी, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पवार, माजी अध्यक्ष संदीप पाटील, डी.डी पाटील, प्रभाकर सोनवणे त्यांच्या समवेत जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. ही जनसंवाद यात्रा रविवारी दुपारी ३ वाजता अमळनेर तालुक्यात येत आहे. सावखेडा-मुंगसे-रूंधाटी-मटगव्हाण-, पातोंडा-नंद्री-खवशी-खेडी-अमळगाव-गांधली अमळनेर असा जनसंवाद यात्रेचा मार्ग असणार आहे. सोमवारी, ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता धार-मालपूर-मारवड-कळमसरे-, निम-परत अमळनेर…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार मंगळवारी, ५ सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आ.रोहित पवार आणि युवा नेतृत्व रोहित पाटील रविवारी, ३ सप्टेंबर रोजी अमळनेर दौऱ्यावर येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सकाळी १० वाजता कार्यक्रम होणार आहे. शेतकरी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. रा.काँ.चे अध्यक्ष शरद पवार हे ५ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. कार्यक्रमाला पाच हजार कार्यकर्ते अमळनेर तालुक्यातून जातील, अशी माहिती रा.काँ.चे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दौरा यशस्वी करण्यासाठी आणि पूर्व तयारीसाठी आ.रोहित पवार आणि रोहित पाटील…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी पिंप्राळा परिसरातील सावखेडा रस्त्याजवळील सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरात सोमवारी, ४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांच्या हस्ते सिद्ध केलेले रुद्राक्ष भाविकांना वाटप करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ७ वाजता आ.सुरेश भोळे (राजु मामा), नगरसेवक सुरेश सोनवणे, अतुल बारी तसेच कंजरभाट युवा फाउंडेशनचे अध्यक्ष विजय अभंगे, शशिकांत बागडे, राहुल नेतलेकर, संतोष रायचंदे, योगेश बागडे, मोहन गारूंगे, सचिन बाटुंगे संदीप बागडे, क्रांती बाटुंगे, गौतम बागडे, संदीप गारूंगे यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता रमेश पेहलानी गु्रप प्रस्तुत भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील जळगाव जिल्हा साहित्य विकास मंडळातर्फे मंगळवारी, ५ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २.०० वाजता शिक्षक दिनानिमित्त डॉ.शामा प्रसाद मुखर्जी उद्यान येथे आजी-माजी शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रा.गोविंदराव पाटील, प्रा. प्रकाश महाजन, प्रा. किरण पाटील, प्रा. विजय लुल्हे. प्रा. प्रकाश पाटील, प्रा. विरेंद्र पाटील, प्रा. अरुण वांद्रे, प्रा.भास्करराव चव्हाण यांची उपस्थिती लाभणार आहे. सर्व शिक्षकांचा सत्कार जळगाव साहित्य विकास मंडळाचे संस्थापक तथा ज्येष्ठ कवी गोविंदराव देवरे यांच्या हस्ते करण्यात येईल. कार्यक्रमाला इंदिरा जाधव, संतोष साळवे, वैशाली तायडे, मंदा मोरे, पुष्पलता कोळी, एन.के. कोळी, कड्डु बाभुळकर, घनश्याम भुते, सुकदेव वाघ, गोपी कोळी, उ.का. वाणी, प्रवीण महाजन,…
साईमत, कासोदा, ता.एरंडोल : वार्ताहर एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील शेतकरी कुटूंबातील शेरॉन देशमुख याने एलएलएम पदवी जळगावच्या मन्यार लॉ कॉलेजमधून ‘ए’ ग्रेड घेऊन मिळविली आहे. मुस्लीम देशमुख समाजातून एलएलएम ‘ए’ ग्रेडसह उत्तीर्ण होणारा तो एकमेव ॲडव्होकेट ठरला आहे. त्याने कायद्याची एलएलबी परीक्षाही ९४.७ टक्के मार्क घेऊन प्राविण्यासह उत्तीर्ण केली होती. त्याचे प्राथमिक शिक्षण उत्राण येथील जि. प. शाळेत तर बीए पदवीचे शिक्षण एमएम कॉलेज, पाचोरा येथे झाले आहे. विशेष म्हणजे पहिली तर थेट मास्टर डिग्री लॉ एलएलएम पर्यंतचे पूर्ण शिक्षण शेरॉनने कोणताही क्लासेस न लावता कठोर परिश्रमातून यश संपादन केले आहे. शेरॉन हा उत्राण येथील वार्ताहर अ.हक देशमुख यांचा चिरंजीव…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथे महाराष्ट्र योगा असोसिएशन आणि जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत राज्यभरातून ४१९ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र योग असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ.अनिता पाटील यांनी केले होते. महाराष्ट्र योग असोसिएशन सचिव जातीन सोलंकी, चेअरमन चंद्रकांत पांगारे यांनी तांत्रिक कारभार सांभाळला. बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे उपमहापौर कुलभूषण पाटील, डॉ.निलेश चांडक, हरीश मुंदडा, सुभेदार मेजर प्रेमकुमार अर्चना सूर्यवंशी, गायत्री कुलकर्णी, शक्ति महाजन, नितीन विसपुते, भूषण लाडवंजारी, शिरीष तायडे, डॉ.विलास नारखेडे, प्रा.मंगला मोरे आदी उपस्थित होते. आसामला राष्ट्रीय स्पर्धेसाठी स्पर्धक प्रतिनिधीत्व करणार राज्यस्तरीय स्पर्धेतील विजयी संघात पुणे जिल्हा…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव, एकलव्य क्रीडा संकुल, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय मनपा स्तरीय स्क्वॉश स्पर्धा नुकत्याच उत्साहात घेण्यात आल्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मु.जे.महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर, मनपाचे क्रीडा अधिकारी दिनानाथ भामरे, पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे, चेअरमन प्रा.शिल्पा सरोदे, प्रा.स्वाती बराटे, प्रा.डॉ.निलेश जोशी आदी उपस्थित होते. उद्घाटन प्रत्यक्ष खेळून प्रा.डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर यांनी केले. स्पर्धेत आठ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेसाठी ५३ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. पंच स्पर्धा प्रमुख म्हणून प्रा.प्रवीण कोल्हे, शुभम शिसोदे, अनिरुद्ध जाधव,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी काही समाजकंटकांनी लोकांची दिशाभूल करून लोकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन प्रांताधिकारी आणि नगरपालिका यांना अर्ज दिला आहे. सर्वे.नं. ४२५ ‘क’ मध्ये मशिद व मदरसाचे अनधिकृत बांधकाम सुरु आहे, अशी दिशाभूल करून दोन समाजात तेढ निर्माण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. असे काही घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासन, प्रशासन व समाज कंटकांची राहील. त्यामुळे संपूर्ण अर्जाची चौकशी करून यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशीही मागणी मुस्लिम पंच कमेटी स्टेशन मशिद कब्रस्तान आणि पीर दर्गा ट्रस्टने केली आहे. निवेदनाच्या प्रती जळगाव जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, चाळीसगाव तहसीलदार, न.पा. मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक यांना रवाना केल्या आहेत. निवेदनावर मुस्लिम पंच…