साईमत, चोपडा : प्रतिनिधी यावल वनविभाग आणि चोपडा सबडिव्हीजन अंतर्गत वनपरिक्षेत्र चोपडा, वैजापूर, अडावद व देवझिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सातपुड्यातील वने, वन्यजीव संरक्षण व देखभाल करणाऱ्या क्षेत्रीय वनाधिकारी, कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी यांची वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर चोपडा वनपरिक्षेत्र कार्यालय येथे नुकतेच पार पडले. हे शिबीर वनसंरक्षक ऋषीकेश रंजन, उपवनसंरक्षक ए. आर. प्रवीणमार, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनाखाली व यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नाने घेण्यात आले. याप्रसंगी घाटकोपर, मुंबई येथील स्पार्कस लाईफ केअर संस्थेतर्फे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक, लेखापाल, लिपीक व वनमजूर आदी अधिकारी व कर्मचारी यांचे शुगर, बीपी, रक्त तपासणी, हृदयरोग, किडनी, वात,…
Author: Sharad Bhalerao
साईमत, कासोदा, ता.एरंडोल : वार्ताहर जालन्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ पूर्ण राज्यभरात मराठा समाजाच्यावतीने ठिकठिकाणी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आली. त्याच्याच निषेधार्थ रविवारी, ३ सप्टेंबर रोजी कासोद्यातही सकाळी नऊ वाजता श्रीराम मंदिराजवळ रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनावेळी एरंडोल – भडगाव रोड अर्धा तास अडविण्यात आला. त्यात मराठा समाजाच्या बांधवांनी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देत ‘आरक्षण आमच्या हक्काचे आहे आणि ते आम्हाला मिळालेच पाहिजे’ असे मत त्याठिकाणी मांडले. लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ कासोदा पोलीस स्टेशनच्या स.पो.नी. योगिता नारखेडे यांना निवेदन देण्यात आले. घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही न झाल्यास अजून मोठ्या संख्येने संपूर्ण…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने यंदाची नाशिक विभागीय टेबल टेनिस स्पर्धा जळगावात होणार आहे. जळगाव टेबल टेनिस असोसिएशनतर्फे २३ व २४ सप्टेंबर रोजी स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या हॉलमध्ये पार पडणार आहे. उत्तर महाराष्ट्र विभागीय स्पर्धेत यजमान जळगावसह नाशिक, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार ह्या पाच जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होतील. स्पर्धा आयोजनासंदर्भात रविवारी बैठक घेण्यात आली. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर त्रिपाठी, कार्याध्यक्ष प्रकाश चौबे, अरविंद देशपांडे, सहसचिव सुनील महाजन, कोषाध्यक्ष संजय शहा, राजु खेडकर, ॲड. विक्रम केसकर, शैलेश जाधव, स्वानंद साने, अमित चौधरी, विजय विसपुते आदी उपस्थित होते. विजयी खेळाडूंना रोख…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील अण्णासाहेब देशमुख फाऊंडेशन व डॉ.शरद देशमुख यांचे मेडिलिव्ह मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल(द्वारका, नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने कुऱ्हाड खुर्द येथे आदर्श माध्यमिक विद्यालय येथे रविवारी, ३ सप्टेंबरला महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याची माहिती पोट व यकृत विकार तज्ज्ञ डॉ.शरद देशमुख आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुचिता देशमुख यांनी दिली. शिबिरात अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांची विनामूल्य विविध तपासणी करणार आहेत. गरजू रुग्णांनी नाव नोंदणीसाठी ८०८०८८३०७४ /९८८१४१४१३९ किंवा ०२५३-२५०६५९९ या नंबर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. शिबिराला कुऱ्हाड ग्रामपंचायत, विकास सोसायटी व आदर्श हायस्कूल, स्थानिक डॉक्टर्स, कृष्णा लॅब तसेच कुऱ्हाड ग्रामस्थांचे सहकार्य लाभणार आहे. महागड्या…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी.पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स ॲड के.के.सी. कॉमर्स कॉलेज आणि के.आर. कोतकर कनिष्ठ महाविद्यालय, चाळीसगाव येथे संस्थेच्या मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायणभाऊ अग्रवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विभागाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्रीफळ फोडून, कुदळ मारून नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. संस्थेच्या सर्व सन्माननीय संचालक मंडळाच्या सदस्यांनी श्रीफळ फोडून कुदळ मारून भूमिपूजन केले. त्यानंतर भूमिपूजन कोनशिलेचे अनावरण सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आर.सी. पाटील, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सीनियर कॉलेज कमिटीचे चेअरमन सुरेश स्वार, ज्युनियर कॉलेज कमिटीचे चेअरमन नाना कुमावत,…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तापी नदीकाठी पुरातन व जागृत श्री नाटेश्वर महादेवाचे मंदिर पाडळसरे येथे होणाऱ्या धरणामुळे पाण्यात बुडवून जाणार असल्याने पुनर्वसित गावात प्रति नाटेश्वर शिवलिंग स्थापना करण्याची संकल्पना महिलांनी मांडली आणि युवा वर्गाने श्रावणमासानिमित्त प्रति नाटेश्वर महादेवाचे मंदिरात शिवलिंग प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन केले होते. ओंकारेश्वर येथून शिवलिंग, पितळी त्रिशूल, नंदी मूर्ती, कासव, नागदेवता आणून श्रीक्षेत्र पाडळसरे गावी सजविलेल्या ट्रॅक्टवर पारंपरिक वाद्य, डीजेच्या मदतीने सवाद्य मिरवणूक तापीनदीच्या काठावरील पुरातन मंदिरापासून मूर्त्यांना तापीस्नान घालून कुमारिका बालिकांच्या पारंपरिक पोशाखात कलश डोक्यावर घेऊन मूर्त्यांची शोभायात्रा काढण्यात आली. श्रावण सोमवारी सुरू झालेला प्राणप्रतिष्ठा सोहळा, पौर्णिमेला महाप्रसाद वाटून सांगता करण्यात आली. त्यात शोभायात्रा,…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे १५ ते २० सप्टेंबर दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, निवडणुकीत समर्पित आयोगाच्या अहवालानुसार ओबीसीच्या जागा घटणार आहेत. जामनेर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पहुरपेठ, शहापूर, सवतखेडा, कापूसवाडी, खडकी, सामरोद यांच्यासह १७ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. सात ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी तयारी पूर्ण झालेली आहे. गेल्या काही महिन्यापासून मुदत संपल्याने ग्रामपंचायतीवर प्रशासकीय नियुक्ती केली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार वार्ड रचना पूर्ण करण्यात आल्या आहेत. २५ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केल्याआहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. १५…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील पोदार जीनियस इंटरनॅशनल स्कूल येथे महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जामनेर नगरपंचायत समिती व जीनियस स्कूल यांच्या संयुक्त विद्यमान ३१ ऑगस्ट रोजी मुले व १ सप्टेंबरला मुली अश्या २ दिवस होणाऱ्या स्पर्धेत वयोगट १४, १७ व १९ तालुकास्तरीय शालेय शासकीय कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती अवार्डी तथा क्रीडा अधिकारी किशोर पाटील यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद प्रतिमेचे पूजन करून तथा कबड्डी स्पर्धेची सुरुवात नाणेफेक करून करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून पोदार जीनियस इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक डॉ.नंदलाल पाटील, संचालक नितीन…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील अंतरवाली गावात आमरण उपोषण दरम्यान सकल मराठा समाजावर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा निषेध म्हणून सोमवारी, ४ ऑगस्ट रोजी शहरातील राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन शनिवारी, २ सप्टेंबर रोजी जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यावतीने उपस्थित पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना देण्यात आले. मराठा समाजाच्या प्रतिनिधींवर शासनाने बळाचा वापर करून पोलिसांकडून लाठीचार्ज केल्याने सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहे. त्याचा निषेध म्हणून सोमवारी, ४ रोजी शहारातील राजमाता जिजाऊ चौकात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन अहिंसेच्या व शांततेच्या मार्गाने होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच जामनेर तालुक्यातील…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाज बांधव व महिला भगिनी शांततेच्या मार्गाने उपोषणास बसले होते. आंदोलनकर्ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केल्याच्या निषधार्थ चाळीसगाव सकल मराठा समाजाच्यावतीने शनिवारी, २ सप्टेंबर २०२३ रोजी तहसील कार्यालयासमोर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. सरकारच्या विरोधात दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आंदोलनात गणेश पवार, अरुण पाटील, खुशाल बिडे, सुमित कापसे, कुणाल पाटील, भैय्यासाहेब पाटील, विवेक रणदिवे, दिनेश पाटील, प्रमोद पांडुरंग पाटील, शशिकांत साळुंखे, अनिल निकम, किशोर देशमुख, नंदकिशोर पाटील, किशोर पाटील, भरत नवले, सुधीर पाटील,…