Author: Sharad Bhalerao

साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर आकुलखेडा येथील पंडित जवाहरलाल नेहरु माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडांगणावर तालुकास्तरीय शासकीय खो-खो क्रीडा स्पर्धा नुकत्याच उत्साहात घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन शालेय समितीच्या सदस्या मनिषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चोपडा तालुका क्रीडा समन्वयक आर.पी.अल्हाट, तालुका क्रीडा अध्यक्ष अशोक साळुंके, चोतामा संचालक गुणवंत वाघ, शा.शि.सदस्य ललित सोनवणे, क्रीडा शिक्षक वासुदेव महाजन, अरुण पाटील, सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक देविलाल बाविस्कर, चोपडा तालुक्यातील सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेत १४ वर्ष, १७ वर्ष, १९ वर्ष आतील मुला-मुलींचे ४० संघ सहभागी झाले होते. त्यात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात १४ वर्षे…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी प्रताप महाविद्यालयात शनिवारी सकाळी रंगलेल्या पावसाळी व्हॉलीबॉल सामन्यात मुलींचा १७ वर्षे वयोगट स्पर्धेत व्हॉलीबॉल खेळात साने गुरूजी हायस्कूल, अमळनेर विरूद्ध शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे यांच्यात चुरस झाली. मुलींची अंतिम स्पर्धा रोमहर्षक ठरली. त्यात कळमसरे हायस्कूलच्या मुलींनी मोठ्या फरकाने बाजी मारली. जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे. स्पर्धेच्या विजयासाठी व्हॉलीबॉल खेळाचे मार्गदर्शक राजेश राठोड, मुनाफ तडवी या शिक्षकांनी शाळेच्या तासिकेमध्ये एकही खेळाचा तास नसतांना शाळा सुटल्यावर, शनिवारी, रविवारी सुट्टीच्या कालावधीत मुलींच्या सोबत स्वतः खेळून कसून सराव केला. त्याचे फलित म्हणून विजय प्राप्त करता आला. ग्रामीण भागात खेळाच्या सुविधा नसतांना मुलींनी शिक्षकांच्या घेतलेल्या मेहनतीला दाद दिली.…

Read More

साईमत, शेंदुर्णी, ता.जामनेर : वार्ताहर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शेंदुर्णी मराठा कुणबी पाटील समाजसेवा मंडळाच्यावतीने रविवारी, ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मूक मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाचे नेतृत्व समाजाचे ज्येष्ठ नेते दगडू पाटील, संजय गरूड, उत्तम थोरात, डॉ.सागर गरूड, प्रफुल्ल पाटील, सीताराम पाटील, भागवत पाटील, सुनील गरूड यांनी केले. मोर्चात जैन समाजाच्यावतीने सागरमल जैन, बारी समाजाच्यावतीने सुधाकर बारी, गुजर समाजाच्यावतीने शांताराम गुजर तर तेली समाजाच्यावतीने राजेंद्र पवार यांनी उपस्थित राहून मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला. मोर्चाला पहुर दर्जापासून सुरुवात होऊन युनियन बँक, दत्त मंदिर चौक, गांधी चौक, महावीर मार्ग, बस स्थानक मार्गे…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सुरटी गावात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू असतांना पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला करून उपोषणकर्त्यांना जखमी केले. या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाच्यावतीने तोंडापूर शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आला. दोषींवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सुराटी गावातील घटनेच्या निषेधार्थ जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे मराठा समाजाच्या सर्व संघटनाच्यावतीने टायर जाळून निषेध करण्यात आला. त्याचबरोबर दोषीवर कायदेशीर कारवाई तात्काळ करावी, अन्यथा मराठा समाज तीव्र आंदोलन छेडणार, असा इशारा दिला आहे. या मागणीसाठी तोंडापूर गाव हे शंभर टक्के बंद करून सरकारचा निषेध केला आहे.

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी शहरातील रस्त्यांसह विकास कामांसाठी मंत्री अनिल पाटील यांनी नुकताच १० कोटी निधी मंजूर केला असताना आता ग्रामीण भागालाही त्यांनी न्याय देत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून ५ कोटीच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. आता या माध्यमातून ३८ गावांमध्ये आवश्यक ती विकासकामे होणार आहेत. मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मंत्री अनिल पाटील राज्याची जवाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळत असताना आपल्या मतदारसंघास आमदार म्हणून न्याय देण्यासाठी विकासकामांचा सपाटा सुरू केला आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडे विकास कामाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर नामदार पाटील यांनी यशस्वी प्रयत्न केल्याने सुमारे ५ कोटींच्या कामांना या विभागाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयात पेपर देण्यासाठी आलेल्या तीन विद्यार्थ्यांचे मोबाईल लांबविल्याचा प्रकार शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जळगाव तालुक्यातील सावखेडा येथील प्रज्वल चंपालाल पाटील (वय १९) हा तरूण शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयात परीक्षा असल्याने मित्रांसह ते पेपर देण्यासाठी गेले होते. सकाळी १० वाजता पेपर असल्याने परीक्षेच्या आधी प्रज्वल पाटील यांनी त्यांच्या बॅगमध्ये त्याचे व मित्रांचे ३ मोबाईल बँगेत ठेवून परीक्षा हॉलमध्ये गेले. दरम्यान दुपारी १२ वाजता पेपर सुटल्यानंतर बॅग…

Read More

साईमत, कासोदा, ता.एरंडोल : वार्ताहर येथील आर.टी.काबरेमध्ये सुरू असलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत फायनलमध्ये सेंट मेरी शाळेचा पराभव करून भारती विद्या मंदिर शाळेची जिल्हास्तरीय निवड झाली आहे. तालुकास्तरीय स्पर्धेत शाळेने कबड्डी, कुस्ती, क्रिकेट अशा क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला होता. कुस्ती व कबड्डीतही शाळेने यश संपादन केले आहे. शाळेच्या क्रिकेट टीमची जिल्हास्तरीय निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष शरद शिंदे, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकांनी टीमचे कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांच्या यशासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक डी.ए. पाटील, प्रवीण मराठे यांनी परिश्रम घेतले.

Read More

साईमत, भडगाव : प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय तथा भडगाव तालुका क्रीडा समितीच्या संयुक्त विद्यमाने आदर्श कन्या विद्यालय, भडगाव येथील क्रीडांगणावर भडगाव तालुकास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धा खेळाडूंच्या मोठ्या उत्साहात घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ, भडगावचे सचिव दीपक महाजन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी आदर्श कन्या विद्यालयाचे प्राचार्य सुरेश रोकडे, पर्यवेक्षक शामकांत बोरसे तसेच तालुक्यातील विविध शाळेतून आलेले क्रीडा शिक्षक, व्यवस्थापक, प्रशिक्षक उपस्थित होते. स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलींच्या गटात ब.ज.हिरण, कजगावच्या संघाने प्रताप विद्यालय, वडगाव विरुध्द विजय मिळविला. वडगाव संघ उपविजयी ठरला तर तिसऱ्यास्थानी जवाहर हायस्कूल, गिरडच्या संघाने यश…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील नागद रस्त्यावरील अँग्लो उर्दू हायस्कूलजवळील नगरपालिका अंतर्गत बनविण्यात आलेल्या भुयारी गटार बनविल्यापासून त्यात मोटार सायकल स्वार तर कधी चार चाकी वाहने फसतांना दिसत आहे. या गटारीमुळे येथून रहदारी करणाऱ्या वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. या समस्यांबद्दल नगरपालिकामध्ये तक्रारीही या भागातील नागरिकांनी केल्या आहेत. मात्र, याकडे नगरपालिका लक्ष देत नाही, असे सामाजिक कार्येकर्ते आदिल चाऊस यांनी सांगितले. नगरपालिका कोणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगावला मोठा शैक्षणिक वारसा आहे. थोर गणितीतज्ज्ञ भास्कराचार्यांच्या भूमीत याचा पाया सहकार व शिक्षण महर्षी कै. रामराव जिभाऊ पाटील यांनी घातला. पुढे हा वारसा काही शिक्षणप्रेमींनी आवर्जून जपला. त्यात चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायण अग्रवाल हे अग्रभागी राहिले आहे. गेल्या ६० वर्षापासून एखाद्या व्रतस्थाप्रमाणे ते वयाच्या ८६ व्या वर्षीही कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था स्मार्ट व ग्लोबल शिक्षणातही एक पाऊल पुढे आहे. त्यांचे योगदान चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणादायी ठरले आहे, असे गौरवोद्गार व्यक्त करुन संस्थेसाठी सर्वतोपरी मदतही करु, असे आश्वासन जळगाव लोकसभेचे खा. उन्मेष पाटील, आ. मंगेश चव्हाण यांनी दिले. शनिवारी आ.बं.…

Read More