Author: Sharad Bhalerao

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने शाळा व्यवस्थापन समिती आणि लोकवर्गणीतून सर्व विद्यार्थिनींना शालेय पोषण आहारासाठी थाळीचे नुकतेच वाटप करण्यात आले. शिक्षक सेनेचे चाळीसगाव तालुकाध्यक्ष मनोज पाटील यांनी सर्व विद्यार्थिनींना चमचा भेट दिला. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गायकवाड होते. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते थाळीचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थिनींना शालेय पोषण आहारासाठी एक सारखी थाळी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रभाकर चौधरी, दीपक पवार, शुभांगी बनकर, दीपाली शिंदे, रेखा चुगंडे, प्रमिला पवार, शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष मनोज पाटील, मुख्याध्यापक विजयसिंग राजपूत,…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर इस्त्रोने सूर्यांकडे झेपावणाऱ्या आदित्य एल-१ चे यशस्वी प्रेक्षपण केले. संपूर्ण देशासाठी हे अभिमानास्पद आहे. याबद्दल येथील व्ही. एच. पटेल प्राथ. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इस्त्रोच्या टीमचे पोस्टकार्ड पाठवून अभिनंदन केले. मंगळवारी अशी पत्रे बंगळरु येथे पाठविण्यात आली आहेत. मोबाईलमुळे विद्यार्थ्यांच्या लेखनाचा सराव कमी होत आहे. चांगले हस्ताक्षर हा व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. लेखन सरावासोबतच सामान्यज्ञान, देशाभिमान बालवयातच वाढीस लागावा, यासाठी वर्गशिक्षक जिजाबराव वाघ यांनी पत्रलेखनाचा विद्यार्थ्यांना सराव दिला. २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन स्वतःच्या हाताने ‘चंद्र आणि सूर्यपूत्रांनो आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे…’ अशा शब्दात इस्त्रो टीमचे अभिनंदन केले. पत्रे लिहून त्यांना रंगसंगतीसह सुबक सजविले. यावेळी…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी गेल्या २ वर्षांपासून रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी यांच्यासह ८ रिक्त पदांच्या बाबतीत माजी सरपंच जिभाऊ आधार पाटील, विद्यमान सरपंच प्रमोद वसंतराव चव्हाण यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते अनिल नाना पाटील, रावण पांडुरंग वाघ यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत पाटील यांना निवेदन दिले होते. त्यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेत रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात २ डॉक्टरांची नेमणूक केली आहे. यामुळे आता रुग्णालयात रुग्ण तपासणीसह इतर सर्वच कामे सुरळीत होण्यास मदत होणार आहे. याबद्दल रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी दोघेही महिला डॉ.भगिनींचे स्वागत केले. तसेच समस्त रांजणगावकरांच्यावतीने तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी वर्गाचे आभार व्यक्त…

Read More

साईमत, वाकोद, ता. जामनेर : वार्ताहर मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे प्रतिनिधी उपोषण करत होते. याठिकाणी शुक्रवारी,१ सप्टेंबर रोजी सायंकाळी पोलिसांनी लाठीमार करत हवेत गोळीबार केला. या घटनेचा वाकोद येथील सकल मराठा समाजाच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. मराठा समाजाचे शांततापूर्ण सुरू असलेले उपोषण पोलिसांनी अमानुष पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी वाकोदमधील सकल मराठा समाजाच्यावतीने गावातून निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी ‌‘छत्रपती शिवाजी महाराज की जय‌’, ‌‘एक मराठा लाख मराठा‌’, ‌‘या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय‌’, मराठ्यांना आरक्षण मिळालेच…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी हिवताप योजनेतील कर्मचाऱ्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हजारोंच्या संख्येने हिवताप कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर मंगळवारी, ५ सप्टेंबर २०२३ पासून न्याय मिळेपर्यंत लाक्षणिक साखळी उपोषण करून आपला रोष व्यक्त करणार आहेत. यासाठी राज्यातील हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांनी हजारोंच्या संख्येने आंदोलनात सामिल होवून अन्यायाविरूद्ध एकजुटीची लढाई देण्याची ताकद दाखवावी, असे संघर्ष समितीने आवाहन केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील योजनेमध्ये गट-क चे अवैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य कर्मचारी व गट-ड चे क्षेत्र कर्मचारी या संवर्गाचे जवळपास अशोक संकपाळ १२ हजार कर्मचारी आहेत. १९५२ पासूनच योजनेचे अस्तित्व स्वतंत्र आहे. उक्त संवर्गाचे (सांगली) सेवाप्रवेश…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव तालुका तेली समाजाच्यावतीने समाज भूषण माजी नगराध्यक्ष कै.अण्णासाहेब मधुकर उखा चौधरी यांना नुकतेच ‘मरणोत्तर समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा पुरस्कार नुकताच कॅनडा जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक विजेते, ट्रिपल महाराष्ट्र केसरी तथा अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे (डीवायएसपी) पै.विजय नथ्थू चौधरी यांच्या हस्ते कै. अण्णासाहेब मधुकर चौधरी यांचे लहान बंधु बापू शेठ आणि बाळासाहेब उखा चौधरी यांनी स्वीकारला. याप्रसंगी चाळीसगाव तालुका व चाळीसगाव शहर तेली समाज संघटना अध्यक्ष, सचिव, सर्व पदाधिकारी तसेच तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते.

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी जागा भाडेतत्त्वावर सुरू करण्यासाठी तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी तथा पाचोरा तालुका आरोग्य अधिकारी यांनी ५० हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी धुळे लाच लुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. पाचोरा तालुका आरोग्य अधिकारी तथा तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.देवराम किसन लांडे (वय ५३) असे लाचखोर आरोग्य अधिकाऱ्याचे नाव आहे. सविस्तर असे की, तक्रारदार हे चाळीसगाव शहरातील रहिवासी आहे. त्यांचे घर व जागा भाडेतत्त्वावर आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी देण्यासाठी जळगाव येथील जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाला अर्ज केला होता. त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून…

Read More

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर पाचोरा येथील लीलावती हॉस्पिटल आणि प्रसूतीगृहाचे संचालक डॉ. वैभव सूर्यवंशी हे उत्कृष्ट आरोग्यसेवा, समाजसेवा करीत असल्याने त्यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने पाचोरा येथे राज्याचे मदत तथा पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, विश्वासराव आरोटे, आ. किशोर पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. डॉ.वैभव सूर्यवंशी हे रात्री-अपरात्री रुग्णसेवेसाठी धावून जातात. वेळेवर रुग्णाला रक्तपुरवठा लागत असल्यास स्वतः आपले रक्त देऊन त्याठिकाणी रुग्णाला वाचविण्याचे कार्य करीत असतात. आपत्कालीन परिस्थितीत हजारो रुग्णांचे प्राण त्यांनी वाचविले आहे. त्याचबरोबर समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, म्हणून सामाजिक…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील अहिर सुवर्णकार महिला मंडळ आणि महाराष्ट्र सुवर्णकार सेना यांच्यावतीने म्हाडा कॉलनीजवळील अयोध्यानगरातील मातोश्री इन ॲड बँक्वेट हॉल याठिकाणी रविवारी लघु रुद्राभिषेक सोहळा महामंडलेश्वर संत ब्रजभूषण (बापू) (श्रीधाम) यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला. सोहळ्यात ५१ यजमानांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ.राजूमामा भोळे, नगरसेविका तथा अहिर सुवर्णकार महिला मंडळ अध्यक्षा रंजना वानखेडे, प्रभाग समिती सदस्य तथा महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हाध्यक्ष संजय विसपुते, उपाध्यक्ष विजय वानखेडे, सचिव संजय पगार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या प्रयत्नाला यश मिळून लघु रुद्राभिषेक सोहळा प्रसन्न वातावरणात पार पडला. सोनार समाज बांधवांच्या समृध्दी आणि आनंदासाठी अत्यल्प दरात सोहळ्याचे आयोजन केले…

Read More

साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर खर्डी येथील शारदा माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडांगणावर तालुकास्तरीय शासकीय खो-खो क्रीडा स्पर्धा नुकत्याच उत्साहात घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन अध्यक्ष एम.के.पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष ॲड. व्ही.बी.पाटील, मुख्याध्यापक बी.डी.पाटील, सी.एन.पाटील, एन.डी.घुगे, डी. आर. शिसोदिया, एल.डी. पाटील, एम.पी. सुरवाडे, चोपडा तालुका क्रीडा समन्वयक आर.पी. आल्हाट, तालुका क्रीडा अध्यक्ष अशोक साळुंके, चोतामा संचालक गुणवंत वाघ, शा.शि.सदस्य ललित सोनवणे, क्रीडा शिक्षक वासुदेव महाजन, अरुण पाटील, सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक देविलाल बाविस्कर, चोपडा तालुक्यातील सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेत १४ वर्ष, १७ वर्ष, १९ वर्ष आतील मुला-मुलींचे ४० संघ सहभागी झाले…

Read More