साईमत, नवापूर: प्रतिनिधी दलितांवरील अत्याचाराबाबत नवापूर येथील दलित समाज बांधवांनी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन निवेदन दिले. हरेगाव ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर येथील कबुतर व बकरी चोरीच्या संशयावरुन ४ दलित युवक कुणाल मगरे, ओम गायकवाड, प्रणय खंडागळे व शुभम माघाडे यांना अर्धनग्न करुन झाडाला उलटे बांधले. त्यांना अमानुषपणे मारहाण करुन अत्याचार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच अंगावर लघवी करुन, बुटावरील थुंकी चाटायला लावणारे गावगुंड युवराज गलांडे, मनोज बोखडे, पप्पु पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजु बोरसे आणि त्यांचे साथीदार यांना अंडर ट्रायल ठेवून केस जलद गतीने चालवून फाशीची शिक्षा द्यावी. रामनगर मंगठा रोड, जालना येथील गायरान जमीनीवर…
Author: Sharad Bhalerao
साईमत, नवापूर : प्रतिनिधी आदिवासी जनसमुहाचे जीवनमान उंचावणे हे आदिवासी विकास विभागाचे ध्येय आहे. आदिवासी समुदायाच्या विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. तसेच आदिवासी वनपट्टेधारक शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा पुरवुन शाश्वत शेती विकासासाठी प्रोत्साहित करून त्यांच्या जीवनात कायापालट महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागामार्फत घडविला जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. ते नवापूर येथे आदिवासी बांधवांसाठी आयोजित वनपट्टे वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ९६ गावातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना वनपट्टे उतारे २९५, पोटखराब उतारे ४०२, संजय गांधी निराधार योजना १०२, रेशनकार्ड ५८ लाभ असे वितरण करण्यात आले. याप्रसंगी डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना…
साईमत, तळोदा : प्रतिनिधी तालुक्यातील रांझणी गावापासून अवघ्या एक किलोमीटरवरील श्रीकृष्ण गोशाळेसमोर बिबट्याने दर्शन दिले. १५ ते २० मिनिटे बिबट्या गोशाळेसमोर ठाण मांडून होता. त्यामुळे गोशाळेच्या मालकासह रखवालदार जीव मुठीत धरून बसले होते. भेदरलेल्या अवस्थेत त्यांनी मोबाईलवरून गावातील तरुणांना संपर्क करत बिबट्याच्या तावडीतून गायीची व आपली सुटका केली. मात्र, या घटनेमुळे रांझणीसह परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाने याबाबत ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. तळोदा तालुक्यातील रांझणी-नवागाव रस्त्याला श्रीकृष्ण गोशाळा आहे. सायंकाळी सात-साडेसातला एक गाय गोशाळेतून सुटून बाहेर पडली होती. गायीचा शोध घेण्यासाठी गोशाळेचे मालक आनंद मराठे, सहकारी विजय ठाकरे, चालक अजय पाडवी, सचिन…
साईमत, तळोदा : प्रतिनिधी दलेलपूर शिवारातील हलालपूर रस्त्यावरील राजाराम रामराजे यांच्या शेतात दलेलपूर येथील किशोर धानका व जानेश धानका आपल्या शेळ्या नेहमीप्रमाणे चारण्यासाठी गेले होते. दलेलपूर शिवारात बिबट्याची दहशत कायम असल्याने दोन शेळ्यांचा फडशा बिबट्याने पाडला आहे. किशोर धानका व जानेश धानका यांच्या दोन शेळ्या बिबट्याने हल्ला करून ठार केल्या. पंधरा दिवसात हल्ल्याची तिसरी घटना घडली आहे. वनविभाग नावापुरतेच उरले असल्याची ग्रामस्थांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. वनविभाग मृत्यूतांडव घडवून आणत आहे. अशावेळी सर्व स्तरातून बिबटे जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे. वनविभाग कधी जागा होईल आणि आमचे जीव, जनावरांचे प्राण कधी सुरक्षित होतील, असा प्रश्न पंचक्रोशितील शेतकरी बांधव, शेतमजुर, पशुपालकांनी…
साईमत, तळोदा : प्रतिनिधी तळोदा तालुका मुलींच्या शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत विद्यागौरव सेकंडरी इंग्लिश मेडीयम आणि गौरव कनिष्ठ महाविद्यालय, आमलाडच्या विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळविला असून त्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड झाली आहे. १४ वर्ष वयोगटातील स्वाती कालुसिंग वसावे ही २०० मीटर धावणे प्रथम, मिनाक्षी सुनील मोरे ही १०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम तसेच १७ वर्ष वयोगटात २०० मीटर धावणे स्पर्धेत नंदिनी राजू ठाकरे प्रथम, सुस्मिता सुनील तडवी ही ४०० मीटर धावणे प्रथम व तेजस्विनी दीपक वळवी ही द्वितीय, लांबउडी स्पर्धेत नंदिनी राजू ठाकरे प्रथम तर तेजस्विनी दीपक वळवी द्वितीय, गोळाफेक स्पर्धेत रोहिणी कैलास वसावे…
साईमत, नवापूर : प्रतिनिधी शहरात श्रावण सोमवारी कावडयात्रा समितीतर्फे कावडयात्रा सालाबादाप्रमाणे काढण्यात आली. शहरातील सरदार चौक भागातील नागेश्वर महादेव मंदिरात विधीवत पूजन डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित, जि.प महिला बालकल्याण समिती सभापती संगिता गावित यांनी केले. यानंतर महादेवाच्या पालखीचे पूजन आणि कावडयात्रेचे पूजन करुन यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजपचे सरचिटणीस राजेंद्र गावित, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, अजय पाटील, आयोजक दर्शन दीपक पाटील, किरण टिभे, नागेश्वर महादेव मंदिराचे ट्रस्टी हरीष पाटील, हेमंत जाधव, जितेंद्र अहिरे, विक्की चौधरी, राहुल दुसाणे, मेहुल भोई, रजु अग्रवाल, अजय अग्रवाल, सागर टिभे, राहुल मराठे, भागवत चौधरी, नितु शर्मा, शमा कुलकर्णी, जया परदेशी…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाटणाच्या जंगलात चंदनाच्या झाडाची तस्करी करणाऱ्या टोळीतील एका संशयित आरोपीला वन्यजीव विभागाने ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले होते. तेव्हा त्याला ४ दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. सविस्तर असे की, चाळीसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव- प्रभारी) डी. के. जाधव हे आपल्या वन कर्मचाऱ्यांसह २ सप्टेंबर रोजी सायंकाळी नियतक्षेत्र पाटणा यामधील राखीव वनकक्ष क्रमांक ३०५ मध्ये जंगल भागात गस्त घालत होते. अशातच त्यांना डोंगरी नदीवरील भागात अज्ञात असल्याचा भास झाला. मग त्यादिशेने पाठलाग केला. चंदन तस्करी करणाऱ्या तिघांपैकी एक जण मिळून आला. त्याचे नाव विचारल्यावर सखाराम श्रावण गावंडे (रा. अंबाना ठाकूरवाडी, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) असल्याचे त्याने…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील एका भागात राहणाऱ्या नऊ वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. सविस्तर असे की, पाचोरा शहरातील एका भागात ९ वर्षीय अल्पवयीन चिमुकली आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मे २०२३ पासून ते आतापर्यंत परिसरात राहणारा संशयित आरोपी सतीश शेजवळ याने पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान, हा प्रकार पीडित मुलीने घरच्यांना सांगितला. त्यानुसार पीडित मुलीसह घरच्यांनी तातडीने पाचोरा पोलीस ठाण्यात घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी सतीश शेजवळ याच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षण मागणीच्या उपोषण करणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष हल्ला केल्याच्या निषेधार्थ सोमवारी, ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शहरातील राजमाता जिजाऊ चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाच्यावतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनावेळी भाषण आणि घोषणांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ चौक दणाणला होता. या घटनेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी गृहमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, मराठा समाजातील आंदोलकांवर दाखल गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागावी, अशा मागण्यांसाठी जामनेर तालुका मराठा समाजाच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील रेल्वे स्टेशन जवळील सिंधी कॉलनीतील घरातून अज्ञात चोरट्याने विव्हो वाय १५ कंपनीचा २० हजार किमतीचा मोबाईल ३ रोजी रात्री ११ ते ११-३० वाजेच्या दरम्यान लांबविला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी साउंड सिस्टीम व्यावसायिक रिंकेश हरिराम पवानी (वय ३५) हे ३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पत्नी सोबत नातेवाईकांकडे गेले होते. त्यावेळी घरी मुलगा व मुलगी असताना ११ ते ११-३० वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने घराचा दरवाजा खोलून मोबाईल लांबविला. यावेळी मुलांनी मज्जाव केला तरीही तो व्यक्ती मोबाईल घेवून गेला. रिंकेश पवानी हे ११-३०…