Author: Sharad Bhalerao

गोमातेचे पूजन करुन समाजबांधवांनी खाऊ घातली ‘लापसी’ साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहरातील नेरी नाक्यालगतच्या पांझरापोळ गोशाळेत संत नरहरी सोनार बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने निरंतर पितृपक्षाचे औचित्य साधून मोक्ष प्राप्ती धर्म जागृती, संरक्षण गो संरक्षणनिमित्त रविवारी, १४ सप्टेंबर रोजी सामूहिक गोसेवेचा कार्यक्रम पार पडला. गेल्या १० वर्षांपासून संस्थेतर्फे हा उपक्रम राबविला जात आहे. सुरुवातीला सामूहिक हनुमान चालिसाचे पठण करुन गोमातेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित समाजबांधवांनी त्यांच्या हस्ते गोशाळेतील गाईंना ‘लापसी’ खावू घातली. त्यानंतर समाजातील इतर संस्था, मंडळे प्रतिनिधी यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात भाजपा महानगरच्या कोषाध्यक्षपदी विजय वानखेडे, अखिल भारतीय सुवर्णकार हितकारणी सभेच्या उपाध्यक्षपदी संजय विसपुते यांच्या निवडीबद्दल…

Read More

मान्यवरांच्या हस्ते ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ अन् ‘ग्लोबल महातेज’चे प्रकाशन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  पत्रकार हा समाजाचा कणा आहे. मात्र, आज मीडिया क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. डिजिटल, सोशल मीडिया, आंतरराष्ट्रीय पत्रकारिता अशा सगळ्या क्षेत्रात नवे ट्रेंड्स, नवी आव्हाने निर्माण होत आहेत. अशा काळात संघटनाशिवाय पत्रकारांचे प्रश्न सोडविणे अशक्य आहे. आमची लढाई पत्रकारांच्या हक्कासाठी आहे, असे संस्थेचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी ठामपणे सांगितले. व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम संस्थांनी एकत्र येऊन पत्रकारांना जगभर जोडण्याचा आणि त्यांचे हक्क सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी नमूद केले. व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरमचा दोन दिवसीय राज्यस्तरीय केडर कॅम्प अमळनेरच्या…

Read More

संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांसह जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  नव्या शासन निर्णयानुसार ग्रामरोजगार सहाय्यकांना तात्काळ दरमहा मानधन द्यावे तसेच ११ महिन्यांचे थकित मानधन मिळावे, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहाय्यक संघटना जळगाव जिल्ह्याच्यावतीने देण्यात आला आहे. अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांना नुकतेच देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, शासनाने १ ऑक्टोबर २०२४ पासून ग्रामरोजगार सहाय्यकांना दरमहा ८ हजार रुपये निश्चित मानधन तसेच इंटरनेट, प्रवास खर्च आणि अल्पोपहार भत्ता म्हणून २ हजार रुपये अशा १० हजार रुपयांच्या मानधनाचा निर्णय घेतलेला आहे. परंतु अशा निर्णयाला आता ११ महिने…

Read More

धरती आबा अभियानाअंतर्गत ‘आदि कर्मयोगी’ कार्यशाळेला प्रतिसाद साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  जिल्ह्यातील आदिवासी विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत ‘आदि कर्मयोगी प्रतिसादात्मक शासन कार्यक्रम’ कार्यशाळेचे आयोजन केले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या हस्ते मंगळवारी, ९ सप्टेंबर २०२५ रोजी कार्यशाळेचे उद्घाटन झाले. ही कार्यशाळा ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान नियोजन समितीच्या सभागृहात पार पडली. कार्यशाळेचा उद्देश ‘समर्पण, सेवा आणि संकल्प’ अशा त्रिसूत्रीवर आधारित परिवर्तनशील नेतृत्व घडवणे असणार आहे. देशभरात २० लाख परिवर्तनशील नेते घडविण्याचे मोठे उद्दिष्ट अभियानामार्फत समोर ठेवण्यात आले आहे. “आपला गाव समृद्धीचे स्वप्न” संकल्पनेवर आधारित उपक्रमातून गावपातळीवर नवदृष्टीची पेरणी करून सर्वांगीण…

Read More

मंगळवारी भव्य कार्यक्रम, एम.जे.ला पत्रकार परिषदेत माहिती साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  उत्तर महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या खान्देश कॉलेज एज्युकेशन (केसीई) सोसायटीच्या ८१ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करण्यासाठी मंगळवारी, १६ सप्टेंबर रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संस्थेच्या संपूर्ण परिसरात सकाळी ९.४५ वाजता सुरू होणाऱ्या विशेष कार्यक्रमात सोसायटीच्या विविध शैक्षणिक संस्थांनी एकत्र येत एकाचवेळी त्यांच्या प्रगतीची आणि कार्याची झलक सादर करण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. कार्यक्रमात १७ कार्यक्रमांचा समावेश असणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील यांनी एम.जे.कॉलेजमध्ये शनिवारी, १३ सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला संस्थेचे शैक्षणिक संचालक डॉ. मृणालिनी फडणवीस, सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, प्राचार्य अशोक राणे,…

Read More

देव्हारीतील कार्यक्रमात डॉ. नितीन विसपुते यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   संवाद नसल्यामुळे मनातल्या भावना दाबल्या जातात, गैरसमज वाढतात, ताणतणाव निर्माण होतो आणि मग माणूस हळूहळू व्यसनाधीनतेकडे किंवा आत्महत्येसारख्या टोकाच्या मार्गाकडे वळतो. पण जर योग्यवेळी, मनापासून आणि खुलेपणाने संवाद झाला तर जीवनातले अनेक प्रश्न सुटू शकतात, असे प्रतिपादन चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.नितीन विसपुते यांनी केले. एम. जे. कॉलेजच्या जीवशास्त्र विभागामार्फत ह्युमन हेल्थ अँड हायजिन कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम अंतर्गत जळगाव तालुक्यातील देव्हारी येथे समाजाभिमुख कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमात व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. मनोजकुमार चोपडा, प्रा. मधुकर…

Read More

जी.एम.फाउंडेशनमधील बैठकीत आ.सुरेश भोळे यांची माहिती साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  भाजपाच्या नूतन कार्यालयात अर्थात जीएम फाउंडेशन येथे शुक्रवारी, १२ सप्टेंबर रोजी दुपारी जळगाव जिल्हा महानगराची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीत १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवाडा कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले आहे. सेवा पंधरवड्यात घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या समिती याठिकाणी जाहीर करण्यात आली. बैठकीला आ. सुरेश भोळे (राजूमामा), महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सेवा पंधरवडा संयोजक विजय वानखेडे, उदय भालेराव यांनी मार्गदर्शन केले. सेवा पंधरवड्यात आरोग्य, स्वच्छता, वृक्षारोपण, रक्तदान, प्रतिभावानांचा सन्मान, ‘वोकल फॉर लोकल’ चा प्रचार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनकार्यावर आधारित फिल्म आणि पुस्तक…

Read More

सामूहिक गोसेवा, पूजन, गोग्रास, सवामणी लापसी दानाचा कार्यक्रम साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  गेल्या १० वर्षांपासून निरंतर पितृपक्षाचे औचित्य साधून पितरांना मोक्षप्राप्ती, धर्मजागृती, विश्वकल्याण, गोसरंक्षण हेतू संत नरहरी सोनार बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित सामूहिक गोसेवा, पूजन, गोग्रास, सवामणी लापसी दान कार्यक्रम सालाबादप्रमाणे यंदाही नेरीनाका लगतच्या पांझरा पोळ गोशाळेत रविवारी, १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता आयोजित केला आहे. कार्यक्रमास सोनार समाज वंशावळकार ललित महाराज अहिरराव उपस्थित राहणार आहेत. तसेच समाजातील इतर संस्था, मंडळे प्रतिनिधी यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्याच्या गौरव प्रित्यर्थ त्यांचा सन्मान व सत्कार होईल. श्राद्धपक्ष असल्याने कार्यक्रमाला सर्व धर्मप्रेमी, गोसेवक, समाजबांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

Read More

कासोदा पोलिसात गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  जिल्ह्यातील कासोदा पोलिसांनी एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जुगारींना अटक केली आहे. कारवाईत पोलिसांनी १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई कासोदा गावाजवळच्या बांभोरी शिवारात गुरूवारी, ११ सप्टेंबर रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास करण्यात आली. कारवाईमुळे परिसरातील अवैध धंद्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, जुगाऱ्यांकडून ३ हजार ३८० रुपये रोख, २२ हजार रुपयांचे मोबाईल फोन आणि १ लाख ४० हजार रूपयांच्या तीन मोटरसायकली असा १ लाख ६६ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल समाधान तोंडे यांच्या तक्रारीवरून कासोदा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.…

Read More

अपघातप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनीच्या परिसरात सिमेंटने भरलेला ट्रॅक्टर चढावावर जात असताना चालकाचा ताबा सुटून उलटल्याने ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरखाली दबून जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी, १२ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. अपघातातील मयत ट्रॅक्टर चालकाचे गणेश मोरसिंग चव्हाण (वय ४७, रा. भैरव नगर, पिंप्राळा हुडको, जळगाव) असे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सविस्तर असे की, ट्रॅक्टर चालवून गणेश चव्हाण परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. १२ सप्टेंबर रोजी सकाळी त्यांनी रेल्वे मालधक्क्यावरून ट्रॅक्टर (क्र. एमपी-६८ ए-०६४६) सिमेंटच्या गोण्या भरल्या होत्या. सकाळी ११ वाजेच्या सुमारास…

Read More