साईमत, जळगाव : प्रतिनिधी जिल्हा असोसिएशनतर्फे आयोजित विभागीय नाशिक विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत जळगावच्या स्वरदा साने हिने चार गटात विजेतेपद मिळविले तर दक्ष जाधव व भूमिज सावदेकर यांनी दुहेरी मुकुट पटकाविला. ह्या स्पर्धा जळगावातील जिल्हा क्रीडा संघात नुकत्याच पार पडल्या. स्पर्धेत १३० खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेनंतर लगेचच बक्षीस वितरण पार पडले. विविध गटातील विजयी-उपविजयी खेळाडू असे-११ वर्षं वयोगटात विजयी खूश बगडीया, उपविजयी श्लोक वारके, १३ वर्षं वयोगटात विजयी भूमिज सावदेकर, उपविजयी आरुष जाधव, १५ वर्ष वयोगटात मुली – विजयी स्वरदा साने, उपविजयी स्वाधा भालेकर, नाशिक, मुलांमध्ये विजयी भूमिज सवदेकर, उपविजयी जिनय पिपरिया, १७ वर्षं वयोगटात विजयी स्वरदा साने, उपविजयी स्वाधा…
Author: Sharad Bhalerao
साईमत, जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि जैन स्पोर्टस् ॲकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील महिला क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर नुकत्याच घेण्यात आल्या. वरिष्ठ गटाच्या स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या बलाढ्य पश्चिम बंगाल संघाला नमवत ‘महाराष्ट्र’ संघाने दिमाखात विजय मिळविला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपूर्वी जळगावात प्रथमच होणाऱ्या स्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पूर्व तयारी स्पर्धा म्हणून बघितले गेले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतराज्य वरिष्ठ टी-२० क्रिकेट स्पर्धा-२०२३ स्पर्धेत शेवटच्या दिवशी गुणतालिकेत अव्वल व दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ‘महाराष्ट्र’ संघात सामना रंगला. महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या आंतरशालेय १७ वर्षातील फुटबॉल स्पर्धेत मुलांच्या अटातटीच्या स्पर्धेत ‘पोद्दार’ इंटरनॅशनल स्कूलने सेंट लॉरेन्सचा १-० ने पराभव केला तर मुलींच्या स्पर्धेत ‘ओरियन स्टेट’च्या मुलींनी ‘पोद्दार’ इंटरनॅशनलचा पेनल्टीमध्ये २-१ ने पराभव करीत अंतिम विजेतेपद पटकाविले. विजेते व उपविजेते संघांना जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन व स्पोर्ट्स हाऊस, जळगावतर्फे चषक प्रदान करण्यात आले. याप्रसंगी पारितोषिक वितरण जळगाव नगरीचे माजी नगरसेवक प्रशांत नाईक, आम आदमी पार्टीच्या जिल्हाध्यक्ष अमृता नेटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव फारूक शेख, कार्याध्यक्ष डॉ.प्रा.अनिता कोल्हे, सहसचिव अब्दुल मोहसीन, क्रीडा शिक्षिका छाया बोरसे आदी उपस्थित होते. स्पर्धेचा अंतिम निकाल…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी जिल्हा दूध संघाच्या प्लॅन्टची क्षमता आता ५ लाख लीटर्स प्रती दिन झालेली आहे. त्यामुळे संघाच्या दूध संकलनात जास्तीत जास्त वाढ कशी होईल, यासाठी सर्वांनी सामूहिकरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहेे. संघ लवकरच स्वतःचे ‘विकास ॲप’ तयार करीत आहे. त्या ॲपद्वारे संस्थांच्या तक्रारी, अडचणी असल्यास त्या त्वरित आणि वेळेवर सोडविण्यासाठी मदत होईल. यापुढे दूध संघाचे कामकाज लोकाभिमुख पध्दतीने चालणार असल्याचे आश्वासन दूध संघाचे चेअरमन आ. मंगेश चव्हाण यांनी दिले. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची २०२२-२३ या वर्षाची ५२ वी वार्षिक सर्व साधारणसभा रविवारी, २४ सप्टेंबर रोजी संघाचे चेअरमन आ.मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला ना. गिरीश महाजन,…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी पर्युषण पर्व सणाच्या पूर्णत्वाच्यानिमित्त दरवर्षाच्या परंपरेनुसार जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघातर्फे जलकलशासह वरघोडा मिरवणुकीचे रविवारी, २४ सप्टेंबर रोजी आयोजन केले होते. त्यात धर्मप्रेमी, लहान मोठ्या सर्व स्तरातील समाजबांधवांनी सहभाग घेतला होता. शहरातील विविध जैन मंदिरात तसेच गृह जैन मंदिरात अष्टप्रकारी पूजेची थाळी अर्पण करून चैत्यवंदन करण्यात आले. शेवटी कोठारी मंगल कार्यालयात स्वामीवात्सल अर्थात जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्याचा समाजबांधवांनी लाभ घेतला.
साईमत, जळगाव : प्रतिनिधी शहरात शनिवारी, २३ सप्टेंबर रोजी रात्री अचानक झालेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याने मेहरुणमधील रामेश्वर कॉलनी येथे अंबरधऱ्याचे पाटचारीमधून पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते पाणी बांधावरून नागरिकांच्या घरात शिरल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे प्रशासक तथा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी रविवारी त्याठिकाणी तातडीने भेट देऊन २ जेसीबी, १ पोकलँड मशीन लावून पाण्याच्या वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बाबींचा निचरा करून पाणी वाहून जाण्यासाठीची व्यवस्था तातडीने प्रशासनामार्फत करण्यात आली. तसेच काव्यरत्नावली चौक, हॉटेल रॉयल पॅलेस समोरील चोकप, स्मित कॉलेज मार्ग याठिकाणी अडलेल्या पाण्याची वाहून जाण्याची वाट ‘व्हॅक्यूम एम्पिटर’द्वारे मोकळी करून देण्यात आली. तसेच द्वारका नगर येथील रहिवासी नागरिकांनी प्रशासक तथा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीत समावेश व्हावा म्हणून चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर चाळीसगाव सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने चवथ्या दिवशीच्या साखळी उपोषणात शिरसगाव येथील महिलांसह मराठा समाज बांधवांनी सहभाग घेतला. उपोषणात गणेश पवार, प्रमोद पाटील, खुशाल पाटील, विजय (पप्पू) पाटील, दिलीप पाटील, संजय पाटील, नाना शिंदे, विलास गवळी, सुनील चव्हाण, अभिमान पाटील, तमाल देशमुख, विकास पवार, किशोर पाटील, मनोज भोसले, राजेंद्र पाटील, योगेश देशमुख, आर.बी.जगताप, विलास भोसले, सुनील देशमुख, ईश्वर पवार, छोटु अहिरे, पी.एन.पाटील, सचिन गायकवाड, सचिन पवार, मनोज देशमुख, रविबाबा पाटील, शेखर देशमुख, मनोज भोसले, किशोर पाटील, विलास मराठे, भरत नवले, दिनेश…
साईमत, भडगाव : प्रतिनिधी गिरड रस्त्यावरून छोटा हत्ती वाहनातून निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी नेत असतांना गावातील ग्रामस्थांच्या मदतीने वाहन पकडण्यात आले. या कारवाईत पाच गुरांची सुटका केली आहे. वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, भडगाव तालुक्यातील गिरड गावातील सरकारी दवाखान्याजवळ छोटा हत्ती वाहन (क्र.एमएच ४८ टी ७४०४) यात पाच गुरांना निर्दयतने कोंबून त्यांची कत्तलीसाठी घेवून जात असतांना काही ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी वाहन थांबवून भडगाव पोलीसांना कळविले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून वाहन ताब्यात घेत पाच गुरांची सुटका केली. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी समीर खान फिरोज खान,…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर जळगाव जिल्ह्यातील कोळी समाजाच्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेल्या कोळी समाजाच्या काही नागरिकांना जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेवर देत नसल्याने जिल्ह्याभरातील काही लोकांना अपात्र ठरविण्यात आले होते. परंतु ही अडचण लक्षात घेऊन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून शासनाद्वारे या लोकांना एक वर्षाची मुदत वाढवून दिल्याने मंत्री गिरीश महाजन यांचे कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष हरलाल कोळी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्ठमंडळाने आभार मानले आहे. तसेच यावेळी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडीअडचणी व समस्या त्वरित सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, असे साकडे घालण्यात आले. राज्याच्या विविध जिल्ह्यात अर्ज केल्यावर प्रमाणपत्र दिले जाते. त्याच पद्धतीने जळगाव…
साईमत, भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पिचर्डे गावात एका झोपडीत बांधलेल्या ११ बकऱ्यांचा हिंस्त्र प्राण्यांकडून फडशा पाडला आहे. त्यामुळे महिलेचे आर्थिक नुकसान झाले आहे. पंचनामा करून शासनाकडून तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील नर्मदाबाई सहादु भील यांच्या घरासमोरील झोपडीत रात्री बांधलेल्या ११ बकऱ्यांना हिंस्रप्राणीने फडशा पाडला. अतिशय गरीब परिस्थितीतून नर्मदाबाई भील यांनी एवढ्या ११ बकऱ्या एक एक रुपया जमवून घेतल्या होत्या. सकाळी वनविभागचे वनरक्षक दुर्गादास वानखेडे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी पिचर्डेचे पोलीस पाटील चेतना पाटील, उपसरपंच दीपक महाजन, ग्रामपंचायतीचे सदस्य विजय महाजन, जगदीश पाटील, माजी उपसरपंच विनोद बोरसे, माजी पोलीस पाटील हेमराज महाजन,…