Author: Sharad Bhalerao

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर जळगाव जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. सुलोचना वाघ यांनी जळगाव जिल्हा महिला काँग्रेसच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी बिलखेडा येथील प्रमिला चंपालाल भदाणे यांची निवड केली आहे. अशा आशयाचे नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच देण्यात आले. धरणगाव तालुक्यात काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी तालुक्यातील महिलांचे संघटन करण्याचा मनोदय प्रमिला भदाणे यांनी निवडीनंतर व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पवार, जळगाव जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा.सुलोचना वाघ, धरणगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.व्ही.डी.पाटील, सुरेश भागवत, सी.के.पाटील, सम्राट परिहार, अरुणा कंखरे, वैजयंता भागवत, लता पाटील,…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी प्रभावी संभाषण कौशल्य असणे अत्यंत गरजेचे आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये क्षमताधिष्ठीत, स्किल बेस्ड अभ्यासक्रमात संभाषण कौशल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्कृष्ट संभाषण कौशल्याच्या सहाय्याने जीवनात प्रचंड यशस्वी होता येते, हे स्पष्ट करत इंग्रजीतून बोलण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या मनात असणारी भीती किती निरर्थक आहे हे सांगून प्रा.डॉ.अनिल क्षीरसागर यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच संभाषण करीत असताना शब्दसंग्रह अत्यंत उपयुक्त आहे. त्यांनी BBC Learning English.com Oxford learnerdictionaries.com ह्या दोन संकेतस्थळांचा सखोल अभ्यास करावा, असे सुचविले. आपल्या व्याख्यानात त्यांनी जीवनात संभाषणाचे महत्त्व विषद करून संभाषणाचे विविध प्रकार कोणते असतात हे स्पष्ट करताना संभाषणाशिवाय आयुष्य किती अर्थहीन…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी चालू खरीप हंगामात घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड निर्धारित वेळेत केल्यास तीन लाखापर्यंत केंद्र शासन ३ टक्के तर डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत ३ टक्के व्याज परतावा मिळणार आहे. केंद्राचा परतावा हा थेट थेतकऱ्यांच्या बचत खात्यात (डीटीबी) जमा होणार आहे. त्यामुळे बँकेला नाईलाजास्तव शून्य टक्के व्याजदराची सवलत बंद करावी लागल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी सोमवारी, २५ सप्टेंबर रोजी रिंग रोडलगतच्या बँकेच्या मुख्य शाखेच्या आवारात आयोजित सर्वसाधारण सभेत सांगितले. यावेळी अजेंड्यावरील दहा विषय अवघ्या ३० मिनिटात मंजूर करण्यात आले. यावर्षी बँक प्रथम व्याजासहित कर्ज वसूल करेल. नंतर शेतकऱ्यांना शासनाकडून व्याज परत मिळणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी केंद्र सरकार पुरस्कृत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच स्वतंत्रता सेनानींच्या सन्मानासाठी ‘मेरी मिट्टी मेरा देश’ कार्यक्रम राबविला जात आहे. के.सी. ई. च्या मुळजी जेठा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शाखेच्यावतीने ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानास सुरुवात झाली. सर्व एनएसएसच्या कॅडेट्‌‍सनी आपापल्या गावातून आणलेली माती अमृत कलशामध्ये टाकली. कार्यक्रमाची सुरुवात करताना महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो.स. ना. भारंबे यांनी सर्वात अगोदर अमृतकलशामध्ये माती टाकून स्वातंत्र्यवीरांना नमन केले. यावेळेस त्यांनी या अभियानाची आवश्यकता आणि महत्व काय आहे? यावरही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला भाषा प्रशालेचे संचालक प्रो. भूपेंद्र केसुर, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विशाल देशमुख, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी ‘गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…’ अशा जयघोषात असंख्य विद्यार्थी भक्तांच्या उपस्थितीत रंगीबेरंगी फुलांनी, विद्युत रोषणाईने सजलेल्या रथातून जी. एच. रायसोनी इन्स्टीिट्युट ऑफ अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील गणरायाला सातव्या दिवशी भावपूर्ण निरोप देण्यात आला. अभियांत्रिकी इमारतीच्या परिसरात सात दिवसापूर्वी गणरायाची भक्तिभावात प्रतिष्ठापना केली होती. गणेशोत्सवानिमित्त रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जी. एच. रायसोनी इन्स्टीिट्युटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, ॲकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, जी. एच. रायसोनी कनिष्ठ महविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आरती झाल्यानंतर बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. सजविलेल्या रथात विराजमान…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयासह रुग्णालयात १७ ते २३ सप्टेंबर दरम्यान नॅशनल फार्मेकोव्हिजिलन्स सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सप्ताहातून औषधींच्या प्रतिकूल परिणामांबाबात समाजात जनजागृती करण्यात आली. सोमवारी, १८ सप्टेंबर रोजी नॅशनल फार्मेकोव्हिजिलन्स सप्ताहाच्या उद्घाटनाप्रसंगी महाविद्यालयातील प्रा.डॉ.देवेंद्र चौधरी यांनी फार्मेकोव्हिजिलन्सबाबत संवाद साधला. तसेच २१ रोजी डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरेपी कॉलेज व गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे आणि २२ सप्टेंबर रोजी डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथी कॉलेज येथेही फार्मेकोव्हिजिलन्सबाबत प्रा.डॉ.बापुराव बिटे यांनी सेमिनार दिला. यानंतर २३ सप्टेंबर रोजी ई-पोस्टर स्पर्धा घेण्यात येऊन बक्षीस वितरण करण्यात आले. त्यात द्वितीय वर्ष एमबीबीएसच्या गीतांजली कवाळे आणि सानिया शेख विजेत्या ठरल्या. समाजात औषधाचे उचारात्मक गुणधर्म…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी स्वच्छता पंधरवडा अंतर्गत मनपा आणि व.वा.म्युन्सिपल मार्केट(गोलाणी मार्केट) येथे प्रशासक तथा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या अधिपत्याखाली १८ अधिकारी वर्गाच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाकडील मुख्य स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक युनिट प्रमुख व मुकादम यांच्याकडून समन्वय करून ३०५ कामगारांकडून नुकतीच विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गोलाणी मार्केटची स्वच्छता मोहीम ही विंग क्रमांक १ ते ४ वर आणि आजूबाजूचा मार्केटचा परिसर रस्ते साफसफाई मोहिमेत करण्यात आली. यावेळी प्रशासक तथा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी स्वतः हजर राहून मोहीम राबविली. यावेळी सह. आयुक्त गणेश चाटे, सहआयुक्त (आरोग्य) उदय पाटील, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांच्यासह सर्व मुख्य स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकातर्फे गणेशोत्सवानिमित्त DAY-NULM अंतर्गत गरीब महिलांच्या बचत गटांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने प्रशासक तथा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या संकल्पनेतून खाद्यपदार्थ तयार करण्यात येणाऱ्या बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यावेळी खाद्यपदार्थ तयार करण्यात येणाऱ्या बचत गटांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने महानगरपालिकेत पाच दिवसांकरीता १० स्टॉलच्या गरीब महिलांचे बचत गटास मनपा प्रशासनाकडून प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात जागा करून दिली आहे. जळगाव शहरातील नागरिकांना खान्देशी खाद्यपदार्थाचा आनंद व स्वाद एकाच ठिकाणी उपलब्ध होईल, या उद्देशाने बचतगटास या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून स्टॉलकरीता सहकार्य शहर अभियान व्यवस्थापक गायत्री पाटील यांच्याकडून…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी शहरातील मंगलम्‌‍‍ हॉल येथे जळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा नुकताच उत्साहात झाला. त्यात खुबचंद सागरमल विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रवीण वसंतराव पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिवसेना प्रमुख निलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एस.तायडे, क्रीडा शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, जिल्हा परिषद सदस्य गोपाळ चौधरी, उपजिल्हाप्रमुख स्वप्निल परदेशी, प्रतीक भोळे, जळगाव तालुका प्रमुख शिवराज पाटील, तालुका समन्वयक जितेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दीपप्रज्ज्वलन जिल्हा शिवसेना प्रमुख निलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्याचा राग येऊन महिला डॉक्टराला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बुधवारी, २० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास काँग्रेस भवनासमोर घडला. याप्रकरणी रविवारी, २४ सप्टेंबर रेाजी दुपारी तीन जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, महिला डॉक्टरची आंजोली नारखेडे ही मैत्रीण आहे. तसेच आंजोली नारखेडे यांनी महिला डॉक्टरची बदनामी केली म्हणून अब्रुनुकसानीचा दावा जळगाव न्यायालयात दाखल केला आहे. त्याचा राग आल्याने आंजोली नारखेडे हिने हेमंत जाधव आणि एक अनोळखी या दोघांच्या मदतीने चिथावणी दिली. त्या दोघांनी बुधवारी, २० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास काँग्रेस भवनाजवळ महिला डॉक्टरला…

Read More