साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील कांग नदीच्या पात्रात आपल्या दोन मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या शहरातील मुजावर मोहल्ला भागातील १९ वर्षीय अविवाहित तरुणाचा बूडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी, २५ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सविस्तर असे की, शेख आदिल शेख जमील मुजावर, ताहीर शेख आसिफ आणि अफ्फान शेख हाफिज असे तिघे जण रविवारी, २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कांग नदीच्या पात्रातील शेवडीजवळ पोहण्यासाठी गेले होते. परंतू नदीला पूर आल्यामुळे पाण्यातील प्रवाहाच्या वेगाचा अंदाज न आल्याने शेख आदिल शेख जमील मुजावर (वय १९, रा.मुजावर मोहल्ला)…
Author: Sharad Bhalerao
साईमत, मुंबई : प्रतिनिधी ‘मुंडे साहेब की जय…’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय…’ अशा घोषणा देत एका तरुणाने मंगळवारी, २६ सप्टेंबर रोजी चक्क मंत्रालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंत्रालयाच्या आवारातील असलेल्या दोरीच्या जाळीमुळे त्याचा जीव वाचला. त्याला मंत्रालयातील पोलिसांनी तात्काळ बाजूला घेऊन त्याची विचारपूस केली. मात्र, त्या तरुणाचे नाव समजू शकले नाही. ‘शिक्षक भरती लवकर करा’ अशा मागणीची घोषणा तो करीत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मंगळवारी दिवसभर त्या तरुणाविषयी चर्चा सुरु होती. त्याने आत्महत्येचा का प्रयत्न केला, याबाबतही कुजबुज सुरु होती. त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.
साईमत, जळगाव : प्रतिनिधी भाजपाचे खा.रमेश बिघुडी यांनी अल्पसंख्यांक समाजाबद्दल अत्यंत खालच्या पातळीचे वक्तव्य केले आहे. त्याच्या निषेधार्थ आणि भाजप खासदारचे लोकसभा सदस्य रद्द करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागातर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना तक्रार अर्ज पाठविला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, अल्पसंख्यांकचे जिल्हाध्यक्ष मझहर पठाण, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, युवक सरचिटणीस रमेश पाटील, अल्पसंख्यांकचे प्रदेश सरचिटणीस सलीमभाई इनामदार, आदिवासी जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी, अल्पसंख्यांकचे जिल्हा कार्याध्यक्ष बरकत अली, माजी नगरसेवक सुनील माळी, अल्पसंख्यांकचे महानगराध्यक्ष रिजवान खाटीक, जिल्हा सरचिटणीस राजा मिर्झा, नइमभाई खाटीक, अब्बास खाटीक, संजय चव्हाण, दानिश खान,…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी शासन परिपत्रानुसार सोमवारी, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मनपा प्रशिक्षण इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पंडित दिनदयाल उपाध्याय यांची जयंतीनिमित्त (अंत्योदय दिवस) त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले. त्यानुसार प्रशासक तथा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी उपायुक्त अविनाश गांगोडे, उपायुक्त निर्मला गायकवाड, सह आयुक्त अभिजीत बाविस्कर, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, कार्यालय अधीक्षक दीपक फुलमोगरे यांनी प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहिली.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीत समावेश व्हावा म्हणून चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर सोमवारी, २५ सप्टेंबर रोजी चाळीसगाव सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सहाव्या दिवशी घंटानाद केला. साखळी उपोषणाला नगरसेवक भगवान राजपूत, रामचंद्र जाधव, रोशन जाधव यांनी पाठिंबा दर्शविला. चाळीसगाव तालुक्यातील मराठा समाज बांधव, महिला भगिनी, विद्यार्थ्यांनी २६ ते २७ सप्टेंबरपर्यंत साखळी उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर २५ सप्टेंबर रोजी सहाव्या दिवशी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद करण्यात आला. उपोषणात गणेश पवार, प्रमोद पाटील, खुशाल पाटील, कुणाल पाटील,…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी शहरातील भावसार समाज पंच भवनात अखिल महाराष्ट्र भावसार समाजाच्यावतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्हासह रोख पारितोषिक देऊन सन्मान केला. अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष सुभाष भावसार होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल महाराष्ट्र भावसार समाजाचे अध्यक्ष अरुण भावसार, सचिव चंद्रशेखर भावसार, मनोहर भावसार उपस्थित होते. सत्कारमूर्ती कु.कोमल लक्ष्मीकांत भावसार, भाग्यश्री दीपक भावसार, वैष्णवी निलेश भावसार, श्रीकांत संजय भावसार, प्रथमेश राजेंद्र भावसार आदी गुणवंतांना अरुण भावसार, चंद्रशेखर भावसार, मनोहर भावसार आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, करंडक व रोख बक्षीस भेट देऊन सन्मान केला. तसेच समाजाच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी सत्कारमूर्ती कोमल भावसार, भाग्यश्री भावसार, वैष्णवी…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेला २२ सप्टेंबरपासून सुरुवात करण्यात आली. स्पर्धेला मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, उज्ज्वला बेंडाळे आदींनी भेट दिली. अंतिम सामन्यात महात्मा गांधी विद्यालय उपविजेते तर राष्ट्रीय विद्यालय, चाळीसगाव यांनी एकतर्फी विजय मिळविला. उपस्थित मान्यवरांनी विजयी संघाचे आणि बास्केटबॉल प्रशिक्षक योगेश पांडे यांचे कौतुक केले. यावेळी जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे प्र. सचिव जितेंद्र शिंदे यांनी मंत्री महाजन यांचे स्वागत केले. यशस्वीतेसाठी राज्य पंच वसीम शेख, दिनेश पाटील, सचिन पाटील, विनय काळे, आशिष पाटील, निखिल झोपे, धनराज चव्हाण, भूषण चौधरी,जावेद शेख आदींचे सहकार्य लाभत…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग, जि.अलिबागद्वारे सोमवारी, २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, आतिष झाल्टे यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत निर्माल्य संकलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बैठकीचे ‘श्री’ सदस्य उपस्थित होते. तसेच स्नेहदीप गरूड, माजी मुख्याध्यापक डी.डी.पाटील यांनीही भेट देऊन कार्याचे कौतुक केले. जामनेर शहरात निर्माल्य संकलनासाठी दोन गटात विभागणी केली आहे. ती अशी सकाळी १० ते ५, सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत असे ७ ठिकाणी स्टॉल लावून प्रत्येक ठिकाणी साधारण ३० ‘श्री’ सदस्य उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक ठिकाणी स्टॉल लावून गणपती विसर्जनासाठी…
साईमत, भडगाव : प्रतिनिधी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था, भडगाव संचलित साधनाताई प्रतापराव पाटील प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आमडदे शाळेत संस्थेचे संस्थापक कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या २२ व्या पुण्यस्मरण सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रतापराव हरी पाटील होते. यावेळी शारदा माता, कर्मवीर तात्या बाबा, कै. ताई आजी स्व. साधनाताई पाटील, कै.युवराज दादा पाटील, कै. अशोक अण्णा पाटील आदींच्या प्रतिमेच्या पूजनासह माल्यार्पण तसेच श्रीफळ वाहून कार्यक्रमाचे नानासाहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयाच्यावतीने मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची १०५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील माळी समाजाच्या मंगल कार्यालयात नुकतीच घेण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सुनील क्षीरसागर होते. यावेळी ज्या-ज्या मान्यवरांनी विविध क्षेत्रात कार्य करीत असताना गावाचे नाव मोठे केले. तसेच वेगवेगळे पुरस्कार प्राप्त केले. अनेक विद्यार्थ्यांनी चांगले यश प्राप्त केले. अशा मान्यवरांचा स्मृतीचिन्हासह शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. त्यात लोहारा येथील कृषीभूषण विश्वासराव शेळके, अर्जुन भोई, शैलेश पालीवाल, अमोल सोनवणे, मुरलीधर जाधव, प्रा.डॉ गुणवंतराव शेळके, ओमकार शिंदे, कैलास सरोदे अशा मान्यवरांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविकात संस्थेचे माजी चेअरमन तथा भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरद सोनार यांनी…