साईमत, अमळनेर : प्रतिनिधी शहरात गुरुवारी, २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीनिमित्त शांततेत मिरवणूक काढणाऱ्या आदर्श मंडळांचा ‘श्री’ सन्मान करण्यात येणार आहे. यानिमित्त अमळनेरची मंडळाचे स्वागत करण्याची खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरू होणार आहे. सर्व गणेश मंडळांनी आदर्श मिरवणूक काढून सन्मानाचे मानकरी व्हावे, असे आवाहन केले आहे. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना, मुंदडा फाउंडेशन, पोलीस स्टेशन आणि नगरपरिषद अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान करण्यात येणार आहे. खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे. यासाठी मंडळ आदर्श असावे, आदर्श म्हणजे विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात मात्र कोणताही वादविवाद किंवा गोंधळ न घालता, शिस्तबद्ध, पर्यावरण आणि वेळेच्या आत काढून…
Author: Sharad Bhalerao
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील आर्मी स्कूल ज्युनियर कॉलेजमधील बारावीचा विद्यार्थी तुषार विजय राठोड याने १९ वर्षे आतील गटात जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड केली आहे. याबद्दल क्रीडा शिक्षक विजय बोरसे आणि विजेता खेळाडू तुषार राठोड या दोघांचे संस्थेचे अध्यक्ष विजय नवल पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, संस्थेचे मानस सचिव सुनील गरुड, प्रशासकीय अधिकारी डी.बी.पाटील, श्याम पवार, प्राचार्य पी.एम. कोळी, सुभेदार मेजर नागराज पाटील, बटू पाटील, श्रीराम पाटील तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी शासनाच्या ‘स्वच्छता एक सेवा, एक भारत श्रेष्ठ भारत, स्वच्छ आणि सुंदर भारत’ उपक्रमाचा एक भाग म्हणून १८ महाराष्ट्र बटालियन जळगाव यांच्या आदेशान्वे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि पी.आर.हायस्कूलमधील एनसीसी कॅडेटस् यांनी संयुक्तपणे नुकतेच स्वच्छता अभियान राबविले. अभियानाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.अरुण वळवी यांनी केले. अभियानाअंतर्गत येथील रेल्वे स्थानक परिसर, प्लॅटफॉर्मवर साफसफाई करण्यात आली. स्वच्छता एक सेवा आहे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विद्यार्थी दशेत प्रत्येकाला स्वच्छतेची जाणीव झाली तर भविष्यात स्वच्छतेची समस्या उद्भवणार नाही. अशा उपक्रमात सहभागी होऊन शासनाची मोहीम यशस्वी करण्यासाठी आणि आपले आरोग्य सदृढ करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन डॉ.ए.डी.वळवी…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील सुमंगल महिला मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त आयोजित मोदक स्पर्धा तसेच भारतीय सण उत्सवावर आधारित रांगोळी स्पर्धा नुकत्याच उत्साहात घेण्यात आल्या. मोदक स्पर्धेत प्रथम प्रिया वाणी, द्वितीय रुपाली शिरोडे, तृतीय पुष्पा येवले तर उत्तेजनार्थ संगीता कोठावदे, माधुरी कोठावदे, रत्नप्रभा अमृतकर यांनी बक्षीस पटकावले. तसेच रांगोळी स्पर्धेत प्रथम प्रीती कोतकर, द्वितीय रत्नप्रभा येवले, तृतीय नीलिमा शिरोडे, फुलांची रांगोळी सुजाता कोतकर तसेच उपस्थित सर्व सखींसाठी ‘होम मिनिस्टर’ खेळ घेण्यात आला. त्यात प्रथम क्रमांक पैठणीचा मान शुभांगी येवले, द्वितीय दीपाली येवले, तृतीय सुजाता पाखले यांनी पटकाविला. मोदक स्पर्धेसाठी ज्योती पटेल आणि रांगोळी स्पर्धेसाठी कुमुदिनी नारखेडे यांनी परीक्षण केले. बक्षीस वितरण मंडळाच्या…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी रूढी परंपरांना व अनिष्ट प्रथांना बाजू देत धरणगाव येथील नवेगाव गणेश मित्र मंडळाने परिसरात येणाऱ्या तृतीयपंथीयांच्या हस्ते गणेशाची आरती करून एक अनोखा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे. याप्रसंगी गोपी गुरु, कविता गुरु यांच्या इतर सहकाऱ्यांसमवेत महाआरतीचा मान देत मंडळाने एक अनोखा उपक्रम राबविला. याप्रसंगी नवेगाव गणेश मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, परिसरातील सर्व भाविक भक्त, सर्व समाज बांधव, सामाजिक व राजकीय पदाधिकारी आदी उपस्थित होते.
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समस्त पत्रकार बांधवांबद्दल केलेले विधान पत्रकारांच्या जिव्हारी लागले आहे. त्यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे बुधवारी, २७ सप्टेंबर रोजी पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच प्रांताधिकारी भूषण अहिरे आणि पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना निषेधार्थ निवेदन देण्यात आले. निवेदन पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, राहुल मोरे यांनी स्विकारले. प्रतिकात्मक अंत्ययात्रा व निवेदन देतेप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, पाचोरा तालुकाध्यक्ष नंदकुमार शेलकर, शहराध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे, पत्रकार विनायक दिवटे, संदीप केदार,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तळोंदे प्र.दे. येथे सालदार म्हणून काम करणाऱ्या पतीने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिचा खून करुन तिला ‘यमसदनी’ धाडले आहे. मंगळवारी, २६ सप्टेंबर रोजी रात्री पत्नीचा गोठ्यातच खून करून रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह घरातच पहाटे सकाळपर्यंत पडून होता. सकाळी शेतमालक शेतात दूध काढण्यासाठी शेतात गेल्यावर सालदार हा गोठ्याला कडी लावून बाहेर बसलेला होता. शेतमालकाने विचारणा केल्यानंतर त्याने पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. शेतमालकाने मेहुणबारे पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी सालदाराला ताब्यात घेतले आहे. त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली आहे. याप्रकरणी मेहूणबारे पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, रामेश्वर रूपचंद…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सतत ८ दिवसांपासून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी साखळी उपोषण करण्यात आले. चाळीसगावचे तहसिलदारद्वारा सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून साखळी उपोषणाची टाळ, मृदुंगाच्या गजरात सांगता करण्यात आली. चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर संविधानिक पध्दतीने सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने २० ते २७ सप्टेंबर २०२३ पर्यंत सतत ८ दिवस साखळी उपोषण करण्यात आले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद, डफ बजाओ, टाळ मुदुंग वाजवून आंदोलन करण्यात आले. अद्यापही शासनाने मराठा आरक्षणा संदर्भात कुठलीही भूमिका स्पष्ट केली…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील तहसिलदारांना आपल्या शासकीय कार्यालयात व आपल्या अधिनिस्त सर्वच कार्यालयात गुरुवारी, २८ सप्टेंबर रोजी हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा, अशा आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडीमार्फत देण्यात आले. निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सागर निकम, मनोज(बाळाभाई) देशमुख, गौतम निकम, रवी गायकवाड, संदीप पगारे, किरण पगारे, सोनू डोखले आदी उपस्थित होते.
साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील ज्ञानगंगा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ व जामनेर उपजिल्हा रुग्णालय अंतर्गत शालेय ५ वी ते १२ वीच्या उपस्थित विद्यार्थ्यांची नुकतीच आरोग्य तपासणी केली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी सर्व डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यात डॉ.पंकज पाटील, डॉ. जितेंद्र वानखेडे, डॉ.स्वाती विसपुते, डॉ.अनिता राठोड, डॉ. विजया पाटील, डॉ.धनंजय पाटील या सर्व टीमने ८४८ विद्यार्थ्यांची तपासणी करून १२० विद्यार्थ्यांना औषधीचे वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्य तपासणी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.