Author: Sharad Bhalerao

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर येथील स. न. झंवर विद्यालयात ओव्हरसीज हेल्थ केअरतर्फे किशोरवयीन मुलींसाठी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.हिना चौधरी यांनी आरोग्याविषयी मार्गदर्शन करुन धडे दिले. कार्यक्रमात मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी मुलींमध्ये होणारे हार्मोनलबदल वेदना मुक्ती वैयक्तिक स्वच्छता गैरसमज आणि वास्तव याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका शोभा तोतला, कल्पना झवर आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी वैद्यकीय प्रतिनिधी आनंद नन्नवरे, मनोज जैन यांनी परिश्रम घेतले.

Read More

साईमत, कासोदा, ता. एरंडोल : वार्ताहर येथील धनराज खंडेराव पाटील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत विविध खेळात सुयश मिळविले आहे. स्पर्धेत १४ वर्षाआतील १०० मीटर धावणेत गोपाल भाऊसाहेब महाजन प्रथम, १७ वर्षाआतील १०० मीटर धावणेत सुनील अनिल पाटील प्रथम, २०० मीटर धावणेत चेतन शांताराम महाजन प्रथम, गोळाफेकमध्ये प्रशांत शिवाजी महाजन प्रथम, थाळीफेकमध्ये चेतन शांताराम महाजन प्रथम, लांब उडीत सनी सोमनाथ पाटील प्रथम अशा विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सुयश मिळवून त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. त्यांना क्रीडा विभाग प्रमुख एस.टी.पाटील, पी.जी.कोळी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या निवडीबदल शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केला. सर्वच प्रकारात विद्यार्थ्यांनी प्रथम…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधत व्याख्यानासह चर्चासत्राचे आयोजन करून “माहिती अधिकार कायदा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य एम.ए.मराठे होते. कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून माहिती अधिकार कायदा महासंघाचे विभागीय जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ यांच्यासह आरटीआय धरणगावचे तालुकाध्यक्ष प्रा.सतिष शिंदे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे भरत शिंपी होते. माहिती अधिकार कायदा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचावा, त्याच हेतूने शहर व परिसरातील आरटीआयचे पदाधिकारी जितेंद्र महाजन, प्रा.दीपक पाटील, अवधेश बाचपाई, मेजर ज्ञानेश्वर मराठे, भरत शिंपी, प्रभाकर ठाकूर, पी.डी.पाटील, विकास पाटील, निलेश पवार, लूनेश्वर भालेराव हे माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी निरंतर प्रयत्नरत असतात. यावेळी पत्रकार…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी हिंदू -मुस्लीम, सिख्ख, ईसाई असा कोणताही भेद न करता मानवता हा एकच धर्म असल्याची शिकवण आपल्यात रुजली पाहिजे. मोठ्यांचा आदर, एकमेकांविषयी जिव्हाळा, बालकांवरील प्रेम हे दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. हे थांबवून जातीपातीच्या खोल खड्ड्यात न पडता बंधू भाव जोपासावा, असे प्रतिपादन सूरमाज फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी उस्मान शेख यांनी केले. चोपडा येथील कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सुरमाज फाउंडेशनच्यावतीने ईद-ए-मिलादनिमित्त ५० आदिवासी विद्यार्थिनींना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी अबुल्लैस शेख, मुराद भाई, झियाउद्दीन काझी साहब, डॉ.एमडी रागीब, शोएब शेख, जुबेर बेग, शुभम भाई, इम्रानभाई पलंबर, अब्दुल…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी महिलांना अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या विरोधात शुक्रवारी, २९ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर निळे निशाण सामाजिक संघटनेच्यावतीने निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर नायब तहसीलदार देवेंद्र नेतकर यांना निवेदन देण्यात आले. गेल्या ४ सप्टेंबर २०२३ रोजी निळे निशाण संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी अपमानास्पद वागणूक दिली. संघटनेच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करून पोलीस स्टेशनमधून हाकलून लावले. त्या प्रकरणाच्या निषेधार्थ निळे निशाण संघटनेने पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलन करून व त्या आशयाचे लेखी निवेदन देवून केली. तसेच…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची भेट घेऊन त्यांना नगरपरिषद हे अनेक वर्षापासून नागरिकांकडून लोकवर्गणीच्या नावाखाली कर आकारत आहे. हा कर बेकायदेशीर असून तो रद्द करावा, पाणीपट्टी आणि घरपट्टीवर करावरही १ ऑक्टोबरपासून दोन टक्के व्याजदर लावण्यात येणार असल्याचे समजते. ते रद्द करावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केली आहे. नगर परिषदेला करांवर व्याज किंवा दंड लावण्याच्या अधिकार आहे. परंतु याबाबतीत ग्राहक पंचायतीने मागणी केल्यावर त्यांच्याकडे कोणतेही प्रकारचे शासनाचे परिपत्रक किंवा सर्क्युलर आले नसल्याचे समजते. व्याजदर सुरू केल्यास सर्वसामान्य जनतेला व आर्थिक दुर्बल घटकांना मोठ्या प्रमाणावर त्याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार असल्याचे…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी गणरायानंतर आता खान्देशात भुुलाबाईच्या उत्सवाला उधाण आले आहे. त्यात महिलावर्ग रंगून जातात. गणपती विसर्जनानंतर पाचोरा परिसरात ग्रामदैवत भुलाबाईची ठिकठिकाणी स्थापना करण्यात येत होती. आता पुन्हा महिलांनी भुलाबाई मंडळाची निर्मिती करून चौकाचौकात भुलाबाईच्या मूर्तीची विधिवत स्थापना केली पाहिजे. पाचोरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भुलाबाईची मूर्ती १०० रुपयात विक्रीसाठी आली आहे. शहरात प्रत्येक भागात महिलांनी एकत्र येऊन यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला पाहिजे. रोज सकाळी भुलाबाईची आरती, विविध मनोरंजक खेळ, गाणी, प्रसाद वाटप यात रंगून जाऊन त्यात रात्री उशिरापर्यंत महिला व मुलींचा लक्षणीय सहभाग घेत या खेळातून सांघिक वृत्ती वाढत आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना चांगला…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर साहब यांची जयंती ईदमिलादुनब्बी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी हुडको परिसर, मदिना मशीद, जामा मशीद, अक्सा मशीद, गौसिया मशिद, फातेमा मशीद, कादरी नगर, अक्सा नगर, बाराभाई मोहल्ला, नागद रोड, जहागिरदार नगर, कुरेशी मोहल्ला, इस्लामपूरा, हजरत अली चौक, न.पा.मंगल कार्यालय आदी भागातून मुस्लिम बांधवांनी वाजत-गाजत मिरवणूक काढून शरबत व मिठाई वितरित केली. यावेळी मुस्लिम समाजातील आबालवृद्ध बहुसंख्येने उपस्थित होते. चाळीसगाव शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक तुषार देवरे, सहायक निरीक्षक विशाल टकले, सागर ढिकले, दीपक बिरारी, उपनिरीक्षक योगेश माळी, पंढरीनाथ पवार, भटू पाटील यांनी सहकाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवला…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी गणेश विसर्जनाचे औचित्य साधून चाळीसगाव महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी निर्माल्य संकलनद्वारे पर्यावरण संवर्धनसाठी जनजागृती केली. स्वयंसेवकांनी चाळीसगावात जागोजागी विविध गणेश मंडळांना भेटी देऊन निर्माल्य संकलन केले. त्यांनी निर्माल्य, प्लास्टिक बॅग्स इकडे तिकडे फेकून पर्यावरणाला हानी पोहचवू नका, असे आवाहन केले. त्यात रा.से.यो.चे स्वयंसेवक किरण निकम, हरीश बच्छाव, चेतन रावते, नितीन शेवाळे, योगेश महाले, वासुदेव सोनवणे, अनिकेत राजपूत, रोहित देवरे, यशवंत मोरे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. उपक्रमासाठी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.आर.बोरसे, सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा. डी.बी.पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी शहरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका शांततेत निघून गुलालाची उधळण करत गणेशाला उत्साहात निरोप देण्यात आला. ‌‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या…‌’ च्या गजरात पाचोरा येथील मिरवणूक काढून सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन उत्साह शांततेत पार पडले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील जामनेर रोड मस्जिद जवळ, हुरसेंनी चौक, आठवडे बाजार यासह शहरातील मुख्य मार्गांवरून सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल, ताशे, बँडसह विविध वाद्यांचा मिरवणुकीमध्ये समावेश होता. विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, सहाय्यक…

Read More