साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, धुमाळ क्लासेसच्यावतीने तसेच कुळवाडीभूषण समाज विकास संस्थेच्या सहाय्याने वीर भगतसिंह यांच्या जयंतीदिनी पुस्तक वाटपाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. विद्यार्थ्यांना भगतसिंह यांच्या जीवनावरील पुस्तकांचे वाटप करून अनोख्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वीर भगतसिंह यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी जयश्री रणदिवे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भगतसिंगांच्या कार्याची माहिती करून दिली. याप्रसंगी पंकज रणदिवे, आकाश धुमाळ, जयश्री रणदिवे, पंकज पाटील, भूषण सूर्यवंशी, राम दराखा, मनोज पाटील, शुभम पवार, विनोद शिंपी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
Author: Sharad Bhalerao
साईमत, चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील गुळ मध्यम प्रकल्पातून आ.लता सोनवणे यांच्या हस्ते आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुळ नदी परिसरातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पुनर्भरणासाठी फायदा व्हावा म्हणून डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी उजव्या कालव्याची तात्काळ दुरुस्ती करुन त्यातही लवकरात लवकर पाणी सोडण्याबाबत संबंधितांना सूचना केली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, मंगला पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी. पी. सोनवणे, मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील, उपअभियंता सुनील अमृतकर, बांधकाम विभागाचे विरेंद्र राजपूत, शाखा अभियंता राहुल भालकर, बाजार समितीचे संचालक…
साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव उर्वरित जिल्हास्तरीय जिल्हा असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय आटापाट्या १४, १७, १९ वर्षाआतील मुलींच्या आट्यापाट्या स्पर्धा येथील छत्रपती क्रीडा संकुलात नुकत्याच उत्साहात पार पडल्या. याप्रसंगी १७ वर्षे आतील मुलींच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात कुरवेल हायस्कूलच्या मुलीच्या संघाने बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली संघाचा ५ गुणांनी पराभव करत विभागीय स्तरावर मजल मारली आहे. तसेच १७ वर्षाआतील मुलांच्या संघाने दुसरा क्रमांक पटकाविला. सामन्यांचे उद्घाटन खानापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक हेमंत धांडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवा सेवा संचालनयाचे क्रीडा समन्वयक अनिल माकडे, कुरवेल…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील महाविद्यालयातील वरिष्ठ आणि कनिष्ठ विद्यार्थ्यांसाठी शनिवारी, ३० सप्टेंबर रोजी ‘स्पेल्ल्याथोन’ स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात इंग्रजी व्याकरण, इंग्रजी व्होक्याबुलरी आदी मुद्द्यावर आधारित १०० गुणांचे बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले होते. त्यात ३०५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यशस्वीतेसाठी इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.आर.आर.बोरसे त्यांचे सहकारी प्रा. डॉ.प्रशांत पाटील, प्रा.प्रतीक अग्रवाल, प्रा.अंकुश जाधव तसेच सेवक रघुनाथ खलाल यांनी परिश्रम घेतले.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील बी. पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स अँड के. के. सी. कॉमर्स महाविद्यालयातील भूगोल विभाग व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, ३० सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्त “भूगोल विषयात असणाऱ्या पर्यटन क्षेत्रातील रोजगाराच्या संधी” विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर होते. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ.के.एस.खापर्डे, उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे, आमंत्रित प्राचार्य प्रा. सुधाकर वाघ, प्रा.ऐश्वर्या कदम, प्रा. एस. एस. गायकवाड, धनसिंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. रोजगाराच्या संधी शोधत असताना विद्यार्थ्यांनी सातत्य व विविध कौशल्य अंगी असणे गरजेचे असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर यांनी व्यक्त केले.…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, देवळी येथे नुकत्याच घेण्यात आल्या. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदित्य सूर्यवंशी यांनी केले. यावेळी चाळीसगाव तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, एरंडोल तालुका क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण, तालुका क्रीडा समन्वयक अजय देशमुख, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सतीश पाटील, तुषार खैरनार आदी उपस्थित होते. चाळीसगाव तालुक्यातील अनेक शाळेतील १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या संघांनी क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये प्रथम क्रमांक आश्रमशाळा, देवळी, द्वितीय क्रमांक माध्यमिक विद्यालय, खेडगाव, तृतीय क्रमांक जयहिंद विद्यालय,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र ॲम्युचेअर नेटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने नेटबॉल खेलकुद युवा असोसिएशन, नंदुरबारच्यावतीने ६ ते ८ ऑक्टोबर २०२३ रोजी होणाऱ्या १६ व्या राज्यस्तरीय सबज्युनिअर नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनचे मुला-मुलींचे दोन्ही संघ सहभागी होणार आहे. यासाठी जळगाव जिल्हा निवड चाचणी चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील यशवंत पब्लिक स्कूलच्या नेटबॉल मैदानावर रविवारी, १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता निवड चाचणीचे आयोजन केले आहे. ८ ऑक्टोबर २००७ नंतर जन्मलेले खेळाडू चाचणीत सहभागी होवू शकतील. सहभागासाठी आधार कार्ड झेरॉक्स, ३ पासपोर्ट फोटो, बोनाफाईड, जन्माचा दाखला आदी कागदपत्रांसह जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन जळगाव जिल्हा नेटबॉल असोसिएशनचेे सचिव प्रमोद पाटील…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त धुळे येथे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा पवार यांना जगन्नाथ ताकते यांच्या हस्ते ‘मराठा गुणगौरव पुरस्कार’ देऊन नुकतेच गौरविण्यात आले. त्या समाजात मोठ्याप्रमाणे काम करतात. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात आले. त्या सर्व महिलांच्या अडीअडचणींना दाद देऊन महिलांचे प्रश्न सोडवित असतात. म्हणून त्यांना ‘मराठा गुणगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील तुकाराम आनंदा माळी पतसंस्थेच्या सर्व सभासदांना भेटवस्तू म्हणून आकर्षक चादर व लाभांशचे वाटप नुकतेच करण्यात आले. यावेळी भाजपचे लोहारा-कुऱ्हाड जिल्हा परिषद गटाचे गटनेते संजय पाटील यांच्या हस्ते संस्थेच्या सर्व सभासदांना भेटवस्तू म्हणून आकर्षक चादरचे वाटप करण्यात आले. यावेळी तुकाराम माळी पतसंस्थेचे चेअरमन डॉ.सुभाष घोंगडे यांनी संजय पाटील यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम गायकवाड यांचा मुरलीधर गिते यांनी सत्कार केला. संस्था स्थापनेपासून सभासदांना दरवर्षी लाभांश देत आहे. मागीलवर्षी लाभांशसोबत चांदीचे नाणे व यंदा लाभांश व आकर्षक चादर प्रत्येक सभासदांना मिळणार आहे. तसेच सभासदांना लाभांश व भेटवस्तू देणारी लोहारा पंचक्रोशीतील एकमेव पतसंस्था…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यांच्यातर्फे बी.यु.एन.रायसोनी विद्यालय, जळगाव येथे डॉजबॉल स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. त्यात १७ वर्ष आतील मुले, मुली, तथा १९ वर्ष आतील मुले या तीनही गटात शालेय जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत इंदिराबाई ललवाणी माध्य.व उच्च माध्य.विद्यालयाचा संघ प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. विभागीयस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे सचिव किशोर महाजन यांच्या हस्ते सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक एस.आर.चव्हाण, उपमुख्याध्यापक एस.एन.चवरे, उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे, क्रीडा विभाग प्रमुख जी.सी.पाटील, बी.पी.बेनाडे, गजानन कचरे, प्रा.समीर…