साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील कुर्ऱ्हे खु.येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, लालबावटा शेतमजूर युनियन यांच्याकडून शहीद भगतसिंह यांना माल्यार्पण करुन जयंती साजरी करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच कॉ. निलाबाई अभिमन भील होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी माल्यार्पण करुन भगतसिंह यांना अभिवादन करुन घोषणा देण्यात आल्या. त्यांच्या कार्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी जिल्हा सचिव ज्ञानेश्वर पाटील यांनी शहीद भगतसिंह यांच्या स्वातंत्र्याबद्दल विचार मांडले. तसेच शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव गोरख वानखेडे यांनीही मनोगत व्यक्त केले. भारतीय कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन शाखा कुर्ऱ्हे खु. यांच्याकडून सरपंच निलाबाई भील यांना भगतसिंह यांचा फोटो ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यासाठी भेट देण्यात आला. कार्यक्रमाला भाकपाचे…
Author: Sharad Bhalerao
साईमत, भडगाव : प्रतिनिधी कर्मवीर तात्यासाहेब आणि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित साधनाताई प्रतापराव पाटील प्राथमिक माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, आमडदे शाळेत संस्थेचे संस्थापक कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या २२ व्या पुण्यस्मरण सप्ताहाचा सांगता समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व भडगाव तालुका शेतकरी संघाचे प्रेसिडेंट प्रतापराव पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव तथा मुंबई येथील मंत्रालयातील उपसचिव प्रशांतराव पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा तथा जळगाव जिल्हा दूध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पूनम पाटील, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे सचिव तथा कै. दिनानाथ दूध उत्पादक सोसायटीचे चेअरमन जगदीश पाटील…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील कोळंबा ग्रुप ग्रा.पं.अंतर्गत वडगावसीम येथील श्री हनुमान मंदिरात वर्षानुवर्षांपासून स्थापित श्री महादेवाची पिंड जीर्ण झाल्याने तेथे श्री ओंकारेश्वर जवळील बकावा (म.प्र.) येथून नवीन मूर्ती आणून श्री निळकंठेश्वर महादेवाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यासाठी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक, नातेवाईक, मित्रमंडळींनी सढळ हस्ते देणगी देऊन मंदिर निर्माण कार्यास हातभार लावलेला आहे. पहिल्या दिवशी ग्रामसफाई करण्यात येऊन गावभर सडासमार्जन, रांगोळ्या, पताका, केळीचे खांब, ध्वज, तोरण लावून गावात सजावट करण्यात आली होती. श्रीरेणुका देवीच्या मंदिरापासून सुशोभित वाहनावर महादेवाच्या मुर्त्या ठेवून गावभर भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात आली. सवाद्य मिरवणुकीत शेकडो कलशधारी मुली, महिला, आबालवृद्ध व तरुणांनी सहभाग घेतला. दुसऱ्या…
साईमत, कासोदा, ता.एरंडोल : वार्ताहर येथील मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरी केली. मिरवणुकीला दुपारी बिजली शाह बाबा दर्गापासून सुरुवात झाली. मिरवणुकीत नाते शरीफचे पठण करत मिरवणूक हजरत सादिक शाह सरकार, बिर्ला चौक मार्गे निघून ईदगाह मैदानात मिरवणुकीची सांगता करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी तेथे नमाज अदा केली. विश्वशांती हिंदू-मुस्लिम एकता गरीब दुर्बल घटक व आरोग्यांसाठी प्रार्थना करण्यात आली. मिरवणुकीत पांढरे शुभ्र वस्त्र पठाणी ड्रेस व फेटा आकर्षित ठरले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ए.पी.आय. योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.
साईमत, जळगाव : प्रतिनिधी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरचे परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आज्ञा आणि आशीर्वादाने तसेच प.पू.दादासाहेब चंद्रकांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जयंतीनिमित्त रविवारी, १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ‘श्रमदानातून स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. दिंडोरी प्रणित मार्गाच्या ‘श्रमदानातून स्वच्छता अभियान’ मोहिमेच्या माध्यमातून रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राद्वारे मेहरूण तलाव परिसरातील गणेश घाटातील जवळपास ५० सेवेकऱ्यांच्या सहकार्याने तलाव किनाऱ्यावरील जलपर्णी आणि काठावरील निर्माल्याचे संकलन करण्यात आले. त्यातून सुमारे २ ट्रॅक्टर इतका जलपर्णी आणि कचरा संकलन करण्यात आला.
साईमत, चोपडा : प्रतिनिधी मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजुर युनियनच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे रविवारी, १ ऑक्टोबर रोजी चोपडा येथे सकाळी ११ वाजता त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशनाचे आयोजन केले आहे. अधिवेशनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉम्रेड शिवकुमार गणवीर (राज्य सचिव, लाल बावटा शेतमजूर युनियन) तर अध्यक्षस्थानी भारतीय शेत मजदुर युनियनचे राष्ट्रीय कमिटी मेंबर अमृत महाजन असतील. अधिवेशनात जळगाव अंनिसचे कार्याध्यक्ष जे. डी. ठाकरे, का. प्रा. प्रकाश चौधरी, भाकपचे जिल्हा सचिव ज्ञानेश्वर पाटील, देविदास बोंदारडे, राजेंद्र झा आदी मान्यवर मार्गदर्शन करतील. जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने चोपडा आणि अमळनेर तालुक्यात शेतमजुर युनियनचे काम सतत चालते. त्यादृष्टीने संघटन मजबूत व्हावे, म्हणून आयोजित केलेल्या अधिवेशनात गायरान जंगल…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी एका महिला रुग्णावर चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने तिला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे याप्रकरणी डॉ. अनिल शिंदे यांच्यावर भा.दं.वि. कलम ३०४-अ आणि ३२८ प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत येथील न्यायदंडाधिकारी वर्ग -१ यांनी प्रोसेस इश्यू केली आहे. सविस्तर असे की, पारोळा तालुक्यातील चिखलोड येथील ज्ञानेश्वर राघो पाटील यांनी तक्रार केली आहे की, त्यांची पत्नी अनिता पाटील यांना ९ सप्टेंबर २०२१ रोजी डॉ. अनिल शिंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. डॉ. अनिल शिंदे यांनी अनिता पाटील यांच्याकडे दुर्लक्ष केले. कामात निष्काळजीपणा केला. तसेच रुग्णास पुढील उपचारासाठी मुंबई येथे घेऊन जाण्यास सांगितले. त्यादरम्यान रुग्णाची परिस्थिती अत्यंत…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी मिरवणूक काढून ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी केली. यासाठी भडांगपुरा भागात सर्व मुस्लिम बांधव दुपारी जमा झाले होते. त्यानंतर भडांगपुरा भागातून मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक धरणी चौक, जैन गल्ली, पिल्लू मशीन भागातून परिहार चौक, बेलदार गल्ली, किरण मंदिर, तेली तलावमार्गे पतनगरी भागात मिरवणूक समाप्त झाली. मिरवणूक पिल्लू मशीनजवळ आल्यानंतर धरणगाव बेघर संघर्ष समितीचे प्रमुख ॲड.व्ही.एस.भोलाणे यांनी मिरवणुकीचे प्रमुख सय्यद साहब यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांचा रथ मिरवणुकीत सर्वात पुढे होता. यावेळी धरणगाव मुस्लिम समाजाचे अध्यक्ष इरफान भाई उपस्थित होते. परिहार चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे मिरवणुकीतील लोकांसाठी पाण्याची व्यवस्था केली…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी विवरे ते भालगाव हा १० कोटींच्या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात करणार आहे. सभामंडप बांधकामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव तालुक्यातील विवरे, बोरगाव खु. येथे हरीनाम कीर्तन सप्ताहाच्या कार्यक्रमा प्रसंगी तसेच विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. दिवसभरात कासोदा, विवरे, बोरगाव येथे पालकमंत्र्यांनी दिवसभरात तीन ठिकाणी किर्तन श्रवण केले. धरणगाव तालुक्यातील विवरे येथे गावांतर्गत २५ लक्ष निधीतून पेव्हिंग ब्लॉक मंजूर आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तसेच भवरखेडा व बोरगाव खु. येथे ११८ वर्ष्याची परंपरा असलेल्या हरीनाम कीर्तन सप्ताह…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील विजयनाना पाटील ज्युनिअर कॉलेज येथे अहिराणी कवी, लोकगीतकार बापूराव सोनवणे यांनी आपल्या अहिराणी कविता व गीतांच्या माध्यमातून विविध विषयावर जनजागृती केली. यावेळी प्राचार्य पी.एम.कोळी यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले. बापूराव यांनी ‘हागणदारी मुक्त गाव पाहिजे’, ‘शिकाना कटाया करू नका’, ‘पाणी आडवा..पाणी जिरवा’, ‘झाडे लावा..झाडे जगवा’, ‘रोगराई थांबवा’ आदी विषयावर विद्यार्थ्यांचे मनोरंजन करत सामाजिक प्रबोधन केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन शालेय सांस्कृतिक प्रमुख शरद पाटील तर व्ही. डी.पाटील यांनी आभार मानले.