साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीची सोमवारी शासकीय सुट्टी होती तरी चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा लिलावाचे कामकाज सुरूच होते. चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलावाचे कामकाज हे सुरळीतपणे सुरू आहे. शासनाने कांदा शेतीमालावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारल्यामुळे इतर बाजार समितीत कांदा लिलावाचे कामकाज बंद होते. परंतु चाळीसगाव बाजार समितीत कांदा लिलावाचे कामकाज शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून कामकाज सुरूच ठेवल्याची माहिती बाजार समितीचे सभापती कपिल पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांच्याआग्रहाखातर आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन व्यापाऱ्यांचे सहकार्य घेऊन बाजार समितीने कांदा लिलावाचे कामकाज सुरु ठेवलेले होते. चाळीसगाव बाजार…
Author: Sharad Bhalerao
साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर येथील गोंडगाव रस्त्यावरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण व स्टेशन भागातील रहिवासी राजश्री नितीन देशमुख यांच्या घरावर सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकत सोन्या-चांदीसह रोकड मिळुन अंदाजे दहा लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लांबविला आहे. चव्हाण व देशमुख कुटूंबास दरोडेखोरांनी मारहाण करत चार ते पाच जणांना जखमी करत दहशत निर्माण केली. दीड वर्षाच्या बालकाच्या गळ्यास तलवार लावत चव्हाण यांच्याकडील ऐवज लांबविला. सात ते आठ दरोडेखोरांनी दहशत माजविल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस दाखल झाले होते. ‘शाम’ नामक श्वान पथकही दाखल झाले होते. सविस्तर असे की, कजगाव येथील स्टेशन भागातील रहिवासी राजश्री नितीन देशमुख यांच्या घराच्या दरवाजाचा…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय (ओबीसी) पिछडावर्ग, छत्रपती क्रांती सेना, मौर्य क्रांती संघ, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, लहुजी क्रांती मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी वारकरी संघ यांच्यासह अन्य संघटनेच्यावतीने महाराष्ट्र बंद अंतर्गत धरणगावला सोमवारी, २ ऑक्टोबर रोजी शहर बंदसह रास्ता रोको केला. आंदोलनाचे नेतृत्व बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक राजेंद्र माळी तसेच भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील यांनी केले. तत्पूर्वी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला भारत मुक्ती मोर्चाचे प्रदेश महासचिव मोहन शिंदे, शिवसेना (उबाठा) सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अरविंद देवरे, राष्ट्रीय आदिवासी परिषदेचे ताराचंद भिल, शहरप्रमुख भागवत चौधरी, गोपाल पाटील, सिताराम मराठे,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील देवळी येथील नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी आश्रमशाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती सोमवारी, २ ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सतिष पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे तुषार खैरनार यांनी दीपप्रज्ज्वलन करून प्रतिमा पूजन केले. शाळेतील शिक्षक प्रशांत पाटील तसेच विद्यार्थी अनिल वसावे, बादल बारेला यांनी महापुरुषांचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमास मुख्याध्यापक, अधीक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन पाटील तर आभार संदीप सोनवणे यांनी मानले.
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रभर सुरू असलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ अभियानांतर्गत पाचोरा तालुक्यातील भोजे आणि पिंपळगाव हरेश्वर येथे विठ्ठल धुमाळ पाटील, जळगावचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने, रावेरचे जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, युवासेनेचे जिल्हा उपप्रमुख संदीप जैन, युवा सेनेचे तालुकाप्रमुख शशिकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या कार्यक्रमात मोदी सरकारच्या खोट्या आश्वासनांचा पर्दाफाश करण्यात आला. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी जी आश्वासने नवनिर्माण भारताचे स्वप्न उभे केले होते.…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पळासखेडे मिराचे येथील नि.पं. पाटील विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक राजेंद्र पितांबर पाटील यांना नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरमतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. विद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रम, कोरोना काळात केलेली शैक्षणिक सेवा व विविध उपक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अशा कार्याची दखल घेऊन त्यांना धुळे येथे हा पुरस्कार देण्यात आला. नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरख देवरे, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल गणपती श्रीनिवासन, आ.कुणाल पाटील, शिवाजी अकलाडे, प्रमोद पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक अशोक पाटील, भास्कर पाटील होते. उपशिक्षक राजेंद्र पाटील यांना…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता.अलिबाग, जि. रायगड तसेच महाराष्ट्र शासन व भारत सरकारतर्फे आयोजित “स्वच्छता हीच सेवा” महास्वच्छता अभियान मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते श्रीफळ फोडून राबविण्यात आले. अभियानामुळे संपूर्ण शहर चकाचक करण्यात आले. अभियानात न.पा.चे उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, नगरसेवक डॉ. प्रशांत भोंडे, आतिष झाल्टे, बाबुराव हिवराळे, सुहास पाटील, बाजार समितीचे सभापती राजमल भागवत, प्रशासक तथा मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, उपमुख्याधिकारी डांगे तसेच सर्व नगरसेवक यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी, नागरिक, ‘श्री’ सदस्य सहभागी झाले होते. अभियानासाठी १४ ट्रॅक्टर, ८ रिक्षा तसेच नगरपालिकामार्फत १६ वाहनांचे सहकार्य मिळाले. त्याचप्रमाणे जामनेर परिसरातील १६ ‘श्री’ बैठकीमार्फत ५४३ ‘श्री’ सदस्य…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील नवोदित साहित्यिक कवी, कवयित्रींसाठी मंडळातर्फे डिसेंबर २०२३ च्या शेवटच्या रविवारी अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रविवारी होऊ घातलेल्या खान्देशस्तरीय संमेलनात सहभागी होण्यासाठी दोन कविता फोटोसह बायोडाटा मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डी.डी.पाटील यांच्या पत्त्यावर पाठवाव्यात. कविता पाठविण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबरपर्यंत आहे. कविता आणि आपले प्रकाशित पुस्तके, कथा, कविता, कादंबरीची एक प्रत बाय पोस्ट डी.डी.पाटील, संस्थापक-अध्यक्ष जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळ, जामनेर, ५५/१ शारदा सदन, लक्ष्मी कॉलनी, वाकी रोड, जामनेर, ता.जामनेर, जि.जळगाव, पिन कोड नंबर-४२४२०६ या पत्त्यावर पाठवाव्यात. यासाठी संबधितांनी ८७८८२६०५६० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी निखील राजपूत याच्या खुनानंतर काही दिवसांचा अवधी उलटत नाही तोच भुसावळात पुन्हा खून झाल्याने परिसर हादरला आहे. रविवारी सकाळी खडका रोड परिसरातील मणियार हॉलजवळ जिम ट्रेनर नाजीर शेख नशीर (वय ३१) या तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात हा तरुण मृत झाला. भरदिवसा झालेल्या घटनेने शहरातील कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भुसावळ शहरात काही दिवसांपूर्वीच कुख्यात गुन्हेगार निखील राजपूत याची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यानंतर काही दिवस उलटत नाही तोच रविवारी सकाळी पुन्हा एकदा शहरात खून झाल्याने खुनाची…
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक जीवनातील तीन महत्त्वाचे घटक आहेत. ग्रामीण आणि शहरी पातळीवर स्वच्छता ही महत्त्वाची आहे. लोकसहभागाचा तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सदृढ निरोगी राहण्यासाठी तसेच सदृढ भारतासाठी “स्वच्छता ही सेवा” अभियान वरदान ठरणार आहे. त्यासाठी सांघिक प्रयत्न गरजेचे आहे. स्वच्छता हीच ईश्वरीय सेवा मानून स्वच्छ गाव, सुंदर शहर ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांनी समाजाप्रती आपले निरंतर कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. राज्यातील स्वच्छतेच्या महाश्रमदानाच्या कार्यक्रमाची सुरुवात पालकमंत्र्यांनी स्वतःच्या पाळधी गावातून केली. १५ सप्टेंबर ते २…