साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील भारत विकास परिषदेच्या जळगाव शाखेतर्फे नवजीवन मंगल कार्यालयात ‘चेतना के स्वर’ राष्ट्रीय समूहगान स्पर्धा व ‘भारत को जानो’ प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते. उद्घाटन सोहळ्यास जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा तर पारितोषिक वितरण प्रसंगी कर्नल अभिजीत महाजन, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, आकाश भंगाळे या मान्यवरांसह क्षेत्रीय संपर्क सचिव तुषार तोतला, संस्कार विभागाच्या प्रांत उपाध्यक्ष राधिका नारखेडे, जळगाव शाखेचे अध्यक्ष महेश जडिये, सचिव उमेश पाटील उपस्थित होते. प्रश्नमंजुषा स्पर्धेत लहान गटात १६ शाळा तर मोठ्या गटात २२ शाळांनी सहभाग घेतला. समूहगान स्पर्धेत १३ शाळा सहभागी झाल्या होत्या. परीक्षक म्हणून प्रांजली रस्से, प्राजक्ता केदार, दुष्यंत जोशी, पवन…
Author: Sharad Bhalerao
साईमत, जळगाव : प्रतिनिधी लहान मुले हे देशाचे भविष्य आहे. मुलांनी जिज्ञासा पूर्वक प्रश्न विचारून सुसंवाद घडवावा, त्यातूनच समाज घडेल, असे प्रतिपादन मध्यप्रदेशच्या पोलीस महासंचालक (DGP) श्रीमती अनुराधा शंकर यांनी केले. त्या गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित अहिंसा सद्भावना शांती यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. महात्मा गांधींच्या १५५ व्या व लाल बहादूर शास्त्रीजींच्या १२० वी जयंती निमित्त लालबहादूर शास्त्रीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अहिंसा सद्भावना शांती यात्रेची सुरवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मध्यप्रदेशच्या पोलीस महासंचालक (DGP) श्रीमती अनुराधा शंकर यांच्याहस्ते अहिंसा सद्भावना यात्रेला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यात्रेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगाव मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड,…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात २० रक्तदात्यांनी सहभाग घेऊन स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. गेल्या दोन वर्षांपासून रोटरी वेस्टतर्फे दर तीन महिन्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. गतवर्षी ३० दिवसात ६० शिबिरांद्वारे १२०० पेक्षा अधिक रक्त पिशव्यांचे रोटरी वेस्टने महारक्तदान अभियानात संकलन केले होते. शिबिराचा शुभारंभ डॉ.राजेश पाटील, विनोद बियाणी, अरुण नंदर्षी, ॲड.सुरज जहांगीर, संगीता पाटील, चंद्रकांत सतरा, सुनील सुखवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. रोटरी वेस्टचे अध्यक्ष सरीता खाचणे, मानद सचिव मुनिरा तरवारी, ब्लड डोनेशन कमिटी व…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी मैत्रेय कंपनीची मालमत्ता विकून गुंतवणुकदारांना पैसे परत मिळावेत आणि फरार आलेल्या मुख्य आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी मैत्रेय कंपनीतील मैत्रेय उपभोक्ता व अभिकर्ता असोसिएशनच्यावतीने महात्मा गांधी उद्यानासामोर सोमवारी, २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. महाराष्ट्रासह देशातील २ कोटी १६ लाख ग्राहकांचे मैत्रीय सर्व्हिसेस प्रा.लि., मैत्रेय प्लॉटर्स ॲण्ड स्ट्रक्चरर्स, मैत्री रियल्टर ॲण्ड कन्स्ट्रक्शन, मैत्री सुवर्णसंधी या चार कंपन्यांमध्ये तब्बल २ हजार ६०० कोटी रुपये अडकून आहेत. फेब्रुवारी २०१६ पासून कंपनीवर गुन्हे दाखल होऊन कंपनी बंद झालेली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणाचे कामकाज…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी शहरातील लालबहादूर शास्त्री टॉवर येथे सोमवारी, २ ऑक्टोबर रोजी लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच महात्मा गांधी उद्यानात महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम महात्मा गांधी पुतळ्याजवळ आयोजित केला होता. दोन्ही कार्यक्रमाचे आयोजन शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील १८ जानेवारी २०२३ चे परिपत्रकाच्या अनुषंगाने जळगाव मनपा प्रशासनाकडून आयोजित केले होते. शास्त्री टॉवर चौकातील लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यास आणि महात्मा गांधी उद्यानातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास मनपाचे प्रशासक तथा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी शहर अभियंता चंद्रकांत…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शतकोत्तर शैक्षणिक वारसा असणाऱ्या चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या विविध विभागात झालेल्या व होत असलेल्या अद्ययावत सुविधा व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर सभासदांनी कौतुकाचा वर्षाव करत अभिनंदनाचा ठरावही केला. सोमवारी, २ ऑक्टोबर रोजी संस्थेच्या प्रांगणात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभा विविध मुद्द्यावर चर्चा होऊन खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष रामकृष्ण पाटील होते. व्यासपीठावर चेअरमन नारायण अग्रवाल, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचिव डॉ. विनोद कोतकर, आ. बं. मुलांच्या विद्यालयाचे चेअरमन योगेश अग्रवाल, वरिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन सुरेश स्वार, आ. बं. मुलींच्या विद्यालयाचे चेअरमन ॲड. प्रदीप अहिरराव, श्यामलाल कुमावत, भोजराज पुंन्शी, अशोक बागड, जितेंद्र वाणी, नीलेश छोरिया, सर्व संचालक, विश्वस्त उपस्थित होते. सभेचे…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी. पी. आर्टस्, एस. एम. ए. सायन्स अँड के. के. सी. कॉमर्स आणि के. आर. कोतकर ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अजय काटे, प्रा. डी. एल. वसईकर, उपप्राचार्य डॉ. के.एस.खापर्डे, उपप्राचार्य ए. आर. मगर, उत्सव समिती प्रमुख प्रा. अंकुश जाधव, प्रा. एस. डी. भामरे, प्रा. किशोर पाटील, श्री हेमंत गायकवाड, श्री. संजय जाधव आदी उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे यांनी मनोगतात महात्मा गांधी यांच्या विचारांवर प्रकाश टाकला.…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे खु., पिंपळे बु. आणि आटाळे गावातील शाळकरी मुले ही दररोज शाळेत ये-जा करत असतात. अशावेळी अमळनेर आगारातील बसेस पिंपळे येथील विद्यार्थ्यांना घेऊन जात नसल्याचा गंभीर आरोप करत सोमवारी, २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.५० वाजेच्या सुमारास तिन्ही गावातील शाळकरी मुला-मुलींनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जवखेडा ते अमळनेर रस्त्यावर दोघी बाजूला मोठ्या प्रमाणावर बसेस व इतर वाहनांच्या मोठी गर्दी झाली होती. आंदोलनात त्यांचे पालकही धावून आले होते. अमळनेर शहरात शाळेत जाण्यासाठी बसेसमधून जातात. कारण मुलींना बसेसमधून मोफत प्रवास आहे. शाळकरी मुलांनी रास्ता रोको भर रस्त्यावर एक ते दीड तास केला. आंदोलनात मुलांनी अमळनेरकडे जाणाऱ्या…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी महाराष्ट्राला दिशा देणारे मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल, असा विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बोधचिन्हाच्या अनावरणप्रसंगी व्यक्त केला. अमळनेर येथील प्रताप मिल कंपाउंडमधील बन्सीलाल पॅलेसमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी, माजी आमदार स्मिता वाघ, डॉ. बी. एस. पाटील, शिरीष चौधरी, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, बोधचिन्ह निर्माते प्राचार्य मिलन भामरे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. बोधचिन्हाची निर्मिती येथील भूमीपुत्राने केली त्याचा माझ्यासारख्या भूमीपुत्राला अभिमान आहे. अतिशय…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी “पत्रकारांना चहा पाणी पाजा, ढाब्यावर न्या” अशा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर अमळनेरात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. त्यामुळे अमळनेर शहरात तिरंगा चौक ते तहसील कार्यालयापर्यंत बावनकुळे यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांना निवेदन देण्यात आले. चंद्रशेखर बावनकुळे यांचे हे वक्तव्य पत्रकारांवरील शाब्दिक हल्ला असल्याने पत्रकारांवरील हल्ले या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी, त्यामुळे असे वक्तव्य करण्याचे धाडस कोणीही करणार नाही, असेही निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष जयंतलाल वानखेडे, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष अजय भामरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय सरचिटणीस रवींद्र…