साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील यांनी सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर प्राचार्य डॉ.पी.पी.चौधरी यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी श्रीमती प्रा. यु .बी.पाटील, प्रा. के. वाय. देवरे, निवृत्त शिक्षक डी.एस.पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
Author: Sharad Bhalerao
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील अँग्लो उर्दु हायस्कुलमध्ये ईद-ए-मिलादनिमित्त ‘मुस्लिम रक्तवीर योद्धा ग्रुप’ आणि सुरभी ब्लड बँकेच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते बिलाल खान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रक्तदान शिबिराला फिरोज आयाज जागीरदार, सरफराज रफिक मण्यार, गुफरान नसीर मन्यार (बबलू भाई), सलीम खान शकूर खान, रमजान भिकन शहा, अजिज सायबू पिंजारी, अब्दुल वाहेद अब्दुल गफ्फार शेख, इमरान भाई आदी ‘मुस्लिम रक्तवीर योद्धा ग्रुप’च्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम सहकार्य केले. चाळीसगाव येथील ‘मुस्लिम रक्तवीर योद्धा ग्रुप’च्यावतीने सलग तिसऱ्यावर्षी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिर घेण्यात आले शिबिरात ५५ जणांनी रक्तदान केले. त्यात सलमान भाई एम. आय. एम., छोटू शेठ बेपारी, सरफराज मण्यार, रमीज…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील नगरदेवळा येथील लक्ष्मीबाई पवार वाचनालयाचे ग्रंथपाल संजय जसनसिंग परदेशी यांचे अकस्मात निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियाना आर्थिक मदत मिळावी, त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील ग्रंथालयांना मदतीचा हात द्यावा, असे आव्हान केले होते. ग्रंथालय संघाने ११ हजाराचा मदतनिधी संकलित करुन नगरदेवळा येथे कै. संजय परदेशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन नुकताच देण्यात आला. यावेळी जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष रवींद्र पाटील, कार्यवाह संजय पाटील, व्यवस्थापक सागर बघुरे, संचालक गणेश देशमुख, पाचोरा तालुकाध्यक्ष यशवंत पाटील, भैय्या पाटील, महेंद्र राजपूत तसेच लक्ष्मीबाई पवार वाचनालयाचे संचालक शिवनारायण जाधव,…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवड्याचे यशस्वी आयोजन केले होते. स्वच्छता पंधरवड्याच्या अनुषंगाने शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात १ ली, २ रीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होतेे. याप्रसंगी स्वच्छतेचा संदेश देणारे विविध आकर्षक चित्रे विद्यार्थ्यांनी रेखाटली. त्यासाठी त्यांना शाळेतील कलाशिक्षक देवेंद्र बारी व सोनाली देवरे यांचे मार्गदर्शन लाभले. ३ री व ४ थीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली होती. शाळेतील शिक्षिका सुचिता पाटील व किर्ती चौधरी यांनी ‘स्वच्छता अभियान’ विषयावर निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी रिपाई आठवले गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये पाचोरा तालुकाध्यक्ष विनोद अहिरे यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा तालुक्याची बैठक हुतात्मा स्मारक याठिकाणी घेण्यात आली. बैठकीत गाव तेथे शाखा आणि म.फुले, राजर्षी शाहू, डॉ.आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुषांचे विचार गावोगावी पोहोचविण्याचे काम सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते. पदाधिकारी यांनी करावे, अशी संकल्पना करण्यात आली. तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांचे स्वागत करण्यात आले. बैठकीत नूतन पदाधिकारी म्हणून कार्याध्यक्ष गुरुदास भालेराव, तालुका सचिव रमेश सुरवाडे, पिंपळगाव गटाचे विभागीय अध्यक्ष संदीप चव्हाण, तालुका उपाध्यक्ष रामदास गायकवाड, शहर उपाध्यक्ष प्रकाश भीवसने, महिला आघाडी पाचोरा प्रियंका सोनवणे, खडकदेवळा संतोष…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर महामार्गावरील गलंगी (ता.चोपडा) ते वढोदे (ता. यावल) दरम्यानच्या रस्त्यावरील नदीनाल्यांवर बांधलेल्या पूलांच्या दोन्ही बाजुस खुपच मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. पर्यायाने दिवसागणिक लहानमोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. संबंधित विभागाने हे खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत. अन्यथा लवकरच रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी पत्रकान्वये दिला आहे.
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान’ मोहिमेंतर्गत पाळधीतील गुलाबराव पाटील वरिष्ठ महाविद्यालयातील एन.एस.एस.च्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी एकदिवसीय शिबिराचे आयोजन करून ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत महाविद्यालयाचा परिसर त्याचबरोबर गावातील बाजारपेठ, मुख्य रस्ता, पोलीस स्टेशन चौक परिसर स्वच्छ करून नागरिकांना स्वच्छतेचे महत्व समजून सांगितले. त्याचबरोबर नागरिकांना मोहिमेत सहभागी होण्यास प्रेरित केले. त्यात एन. एस. एस.च्या सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी कौतुक केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील, प्रतापराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजून सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य यु.के फासे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम स्वच्छता कार्यक्रम पार पडला. महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा एन.एस.एस.चे कार्यक्रम अधिकारी संजय…
साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर राज्य महामार्गावरील भडगाव तालुक्यातील पासर्डी येथील ज्येष्ठ रहिवाश्यावर मोटारसायकलवरील तीन युवकांपैकी एकाने हातावर चाकुने वार केले. युवकांनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, ज्येष्ठ नागरिकाने आरडाओरड केल्याने तिघा युवकांनी भडगावच्या दिशेने पळ काढला. त्यामुळे तिघा युवकांचा ज्येष्ठ नागरिकाला लुटण्याचा प्रयत्न फसला आहे. याघटनेमुळे पुन्हा परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सविस्तर असे की, राज्य महामार्गावरील भडगाव तालुक्यातील पासर्डी येथील रहिवासी दिलीप अर्जुन जगताप (वय ६०) हे रात्रीच्या जेवणानंतर हॉटेलच्या शंभर मीटर अंतरावर शतपावली करत होते. तेव्हा कजगावच्या दिशेने तीन युवक मोटरसायकलने आले. दिलीप जगताप यांच्याजवळ मोटरसायकल थांबवत ‘मोबाइल दे… पैसे दे…’ करत त्यांना धमकाऊ लागले. येथे…
साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर येथे दोन ठिकाणी सशस्त्र दरोडा टाकून सात ते आठ दरोडेखोरांनी पाच ते सात लाखांचा ऐवज लुटून नेत ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती निर्माण केली आहे. अशातच पोलीस तपास सुरू असतांनाच पुन्हा दुसऱ्या दिवशी याच दरोडेखोरांनी चव्हाण कुटूंबास जिवे ठार मारण्याची धमकी देत पोलिसांनाच आव्हान दिले आहे सविस्तर असे की, सोमवारी, २ च्या रात्री स्टेशन भागातील रहिवासी राजश्री नितीन देशमुख आणि कजगाव-गोंडगाव मार्गावरील ओंकार रामदास चव्हाण यांच्या घरावर सात ते आठ दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत पाच ते सात लाखांचा ऐवज लांबविला होता. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराहट पसरली होती. तसेच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले होते. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांसह…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे सोमवारी, २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी उद्यान येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष विजय अभंगे, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, सचिव राहुल नेतलेकर, खजिनदार योगेश बागडे, मोहन गारुंगे, संदीप गारुंगे, संदीप बागडे, गोपाल बाटुंगे, वीर दहियेकर, पंकज गागडे, जितू नेतलेकर, पिंटू नेतलेकर, राहुल दहियेकर, कृष्णा बाटुंगे आदी समाजबांधव उपस्थित होते.