Author: Sharad Bhalerao

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव हे महत्वाचे आणि मोठे पेठेचे ऐतिहासिक शहर आहे. येथे आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी, यासाठी उपजिल्हा रूग्णालयाच्या मंजुरीसाठी राज्याचे मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाळधी येथील दौऱ्यात त्यांनी धरणगाव येथे उपजिल्हा रूग्णालयाची लवकरच निर्मिती करण्यात येणार असल्याचे घोषितही केले होते. रुग्णांच्या हितासाठी उपजिल्हा रूग्णालयाला विशेष बाब म्हणून मंजुरी मिळाल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे आभार मानले आहे. उपजिल्हा रूग्णालयासाठी बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या लगतच्या परिसरातील जागेची निवड केली आहे. त्यामुळे येथे आता सर्व सुविधायुक्त उपजिल्हा रूग्णालय बांधकाम केले जाणार आहे.…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी ध्वनी प्रदुषणासंबंधीचा कायदा हा जुना आहे. आजपर्यंत या कायद्यान्वये शहरातील मशिदीवरील ध्वनीवर्धकांमुळे (भोंग्यामुळे) होणारे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कुठलीही कारवाई केलेली नाही. निवेदनात सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखलाही दिला आहे. तसेच शहरातील सर्व मशिदीवरील ध्वनीवर्धकामुळे होणारे ध्वनी प्रदूषण तातडीने थांबवून ते ध्वनीवर्धक काढावेत आणि अशा पध्दतीने गुन्हे करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशा आशयाचे निवेदन शहरातील हिंदुत्ववादी पक्ष, संघटना, गणेश मंडळातर्फे तहसीलदार भाऊसाहेब थोरात, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांनी स्वीकारले. निवेदन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्थानिक कार्यालयालाही दिले आहे. शहरातील विविध भागातील सर्वच मशिदीवरील ध्वनीवर्धकाद्वारे (भोंग्याद्वारे) होणाऱ्या ध्वनी प्रदुषणामुळे सर्वसामान्यांना अतिशय त्रास होतो. अनेक…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील सामनेर येथील ५० वर्षीय शेतकरी शेतातून घरी येत असतांना त्यांना विषारी सर्पाने दंश केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, त्यांच्या अकस्मात निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. सविस्तर असे की, पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील शेतकरी संजय लक्ष्मण साळुंखे (वय ५०) हे ३ ऑक्टोबर रोजी सकाळी शेतात पिक पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान ९ वाजेच्या सुमारास संजय साळुंखे हे घरी येत असताना त्यांना रस्त्यात एका विषारी जातीच्या सर्पाने दंश केला. घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच संजय साळुंखे यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात…

Read More

साईमत, फैजपूर, ता. यावल : प्रतिनिधी येथील मधुकरराव चौधरी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या सामूहिक कॉपी कांडामध्ये पकडल्या गेलेल्या २६ विद्यार्थ्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बुधवारी, ४ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष हजर राहून खुलासा सादर करण्यासाठी ‘कारणे दाखवा नोटीसा’ देण्यात आल्या आहेत. फैजपूर येथील तापी परिसर विद्यामंडळ संचलित मधुकरराव चौधरी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात २८ ऑगस्ट रोजी एफ. वाय. बी.फॉर्म तसेच एफ. वाय. एम.फॉर्म या वर्गाच्या प्रथम सेमिस्टर परीक्षेत विदयापीठाने नेमलेल्या भरारी पथकाने प्रथम वर्ष बी.फार्मचे २२ विद्यार्थी तर प्रथम वर्ष एम.फॉर्मचे ४ विद्यार्थी कॉपी करताना रंगेहात पकडले होते. या घटनेने शिक्षण क्षेत्रात सर्वत्र खळबळ उडाली होती. सर्व विद्यार्थ्यांचे पेपर…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी शहरातील प्रकाश नगरातील सप्तश्रृंगी दुर्गोत्सव मित्र मंडळाची नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीत मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात मंडळाच्या अध्यक्षपदी अविनाश मराठे, उपाध्यक्षपदी प्रशांत चौधरी तर सचिवपदी जगदीश सोनार यांची एकमताने निवड करण्यात आली. बैठकीत नवरात्रीनिमित्त राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयी चर्चा करण्यात आली. सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घ्यावेत, असे ठरविण्यात आले. उर्वरित कार्यकारिणीत सहसचिव मनोज महाजन, खजिनदार दीपक फिरके, सल्लागार ॲड.विनोद धनगर, सह सल्लागार म्हणून सुदाम पाटील, कार्याध्यक्षपदी कृणाल भंगाळे (भैय्या), मंडळाच्या समितीपदी मनीष पाटील तसेच सदस्यांमध्ये ॲड. महेंद्र पाटील, सचिन भंगाळे, ॲड. आशितोष चंदेले, दीपक चौधरी, सागर महाजन, निलेश माळी, सुदाम…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ च्या ४८ जागा निवडून आणण्याचे व्हिजन भाजपने ठरविले आहे. राज्यातील कोणतीही लोकसभेची जागा सहजासहजी जाऊ द्यायची नाही. त्यासाठी महाराष्ट्रातील राज्य सरकारमधील विद्यमान मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाणार असल्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून जामनेर विधानसभेवर सतत ६ वर्ष निवडून आलेले आणि सध्याच्या राज्य सरकारमध्ये ‘पावर फूल’ असलेले ग्रामीण रोजगार मंत्री ना. गिरीष महाजन यांना रावेर लोकसभा निवडणूक लढवावी लागणार असल्याची खात्रीलायक माहिती भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमधून मिळाली आहे. याविषयी जामनेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात ‘राजकीय खलबते’ शिजू लागली आहेत. रावेर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) च्यावतीने माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रत्येक वार्डतील गटारी घाणीने तुडुंब भरल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. नारायणवाडी परिसरातील रेल्वेलाईन जवळील भागातील नगरपरिषद शौचालयापासून निघालेली गटार तर कधीही व्यवस्थितरित्या सफाई होत नसल्याची स्थिती आहे. त्याच भागात राहणारा यश विवेक काळे याचा सोमवारी, २ ऑक्टोबर रोजी आकस्मित (डेंग्यूनेच) मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच नागरिकांच्या आरोग्याच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. त्यामुळे नगरपालिकेने उपाय योजना करण्याची मागणी उबाठा शिवसेनेतर्फे मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पूर्वी डासांचा प्रतिबंध व्हावा म्हणून नगरपरिषदेकडून नियमितपणे फवारणी वगैरे सारखे उपाय करण्यात येत होते. मात्र, सध्या अश्ाा उपाय…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी धुळे येथील अजय भवनात नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम, नवी दिल्ली यांच्यातर्फे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात विजयनाना पाटील आर्मी स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे इंग्रजी विषयाचे शिक्षक अनिल नथू पाटील यांना राज्यस्तरीय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना हा पुरस्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गणपती निवासन (निवृत्त कर्नल, भारतीय सेना), भाऊसाहेब शिवाजी अकलाडे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.धुळे) गोरख देवरे (राष्ट्रीय अध्यक्ष -नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा फोरम) प्रफुल्ल पाटील (उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, नैसर्गिक मानवाधिकार परिषद फोरम) यांच्या हस्ते देण्यात आला. याबद्दल त्यांच्यावर संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय दळणवळण मंत्री विजय नवल पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील,…

Read More

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर जीपीएस मित्र परिवारातर्फे नवरात्री उत्सवानिमित्त भव्य दांडिया गरबा रासचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्त जीपीएस परिवारातर्फे भव्य मोफत दांडिया प्रशिक्षण शिबिर बुधवारी, ४ ऑक्टोबरपासून आयोजित केले आहे. दांडिया प्रशिक्षक म्हणून निखिल जोशी असणार आहे. दांडिया गरबा प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेणाऱ्या इच्छुकांनी आपली नावे जीपीएस शाळा, श्रीराम नगर पाळधी बु., जय अंबे डेअरी, मेन पाळधी खु. यांच्याकडे नोदविण्याचे आवाहन केले आहे. दांडिया गरबा प्रशिक्षण शिबिर जीपीएस शाळेचे पटांगण, श्रीराम नगर पाळधी बु. याठिकाणी बुधवारी, ४ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ७७६७९४९०९० या क्रमांकावर संपर्क…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यू. कॉलेज येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व ‘जय जवान जय किसान’ अशी घोषणा देणारे लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.एम.कोळी होते. प्रमुख वक्ते म्हणून शरद पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून बी.डी.पाटील होते. सुरुवातीला दोन्हीही महान विभूतींच्या प्रतिमांचे पूजन करून मान्यवरांनी माल्यार्पण केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन्ही विभूतींवर मनोगत व्यक्त केले. स्वातंत्र्य लढ्यातील अशा महान व्यक्तींची नावे आपणास माहिती असतात. परंतु त्यांची जीवनशैली आणि त्यांची विचारसरणी जाणून घेणे गरजेचे असते, असे शरद पाटील यांनी सांगितले. लालबहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा…

Read More