Author: Sharad Bhalerao

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से हायस्कूल, पाचोरा विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी दोन्ही महान विभूतींच्या प्रतिमेस विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पी.एम. वाघ , उपमुख्याध्यापक एन.आर. पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक आर.एल.पाटील, तांत्रिक विभाग प्रमुख एस.एन. पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी, आर.बी.बोरसे, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. जयंती दिनाचे औचित्य साधून शालेय परिसर स्वच्छ केला. तसेच तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तसेच बी.एस. पाटील, आर. बी .तडवी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी,…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी बाळद बु. येथील रहिवासी सुरेंद्र विनायक सोमवंशी यांनी १७ वर्षे अखंड देशसेवा करून भारतीय सैन्य दलातून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्याबद्दल उबाठा शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांचा गौरव केला. यावेळी अरुण सोमवंशी, प्रकाश मोरे यांच्यासह समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. तसेच भडगावला शेख रऊफ दगडू मणियार हे इंडियन आर्मीमधून १७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. याप्रसंगी गणेश परदेशी, योजना पाटील, माधव पाटील, जे.के.पाटील आदी उपस्थित होते. त्यानंतर पाचोरा येथे सेवापूर्ती समारंभात अनिल शालिक पाटील यांनी २२ वर्षे इंडियन आर्मीत आपला कार्यकाळ पूर्ण करुन सेवानिवृत्त झाले. याबद्दल वैशाली सूर्यवंशी यांनीही त्यांचा गौरव…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेच्या पूजनासह माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शासनाच्या आदेशानुसार महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली. अध्यक्षस्थानी लोकमान्य विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक मनोहर महाजन होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका मनिषा खांजोडकर होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षक मधुकर सोनार, सायली देशपांडे, भूषण महाले, आशा सोनवणे, रेखा कांबळे, मृदुला झारे, संदिप महाजन, संदीप मुंदाणकर, हरीश भामरे, वरिष्ठ लिपीक नचिकेत महाले, लॅब ॲटेडंट प्रसाद जोशी, शिपाई प्रवीण गांगुर्डे, अनिता बिऱ्हाडे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील लायन्स क्लब अमळनेर व मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे राजेश पन्नालाल जैन यांच्या सहकार्याने नुकतेच अन्नदान करण्यात आले. अन्नदानाचा सुमारे नऊशे भाविकांनी मंगळग्रह मंदिर येथे लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन डिगंबर महाले, एम.जे.एफ विनोद अग्रवाल होते. यावेळी राजेश जैन यांचे लायन्स क्लबचे अध्यक्ष दिलीप गांधी यांच्यासह सर्व सभासदांनी आभार मानले. कार्यक्रमात क्लबचे सचिव दिनेश मणियार, डॉ.रवींद्र जैन, प्रदीप जैन, उदय शाह, विनोद अग्रवाल, जितेंद्र जैन, अजय हिंदुजा, जितेंद्र पारख, अनिल रायसोनी, प्रशांत सिंघवी, हरिकृष्ण सोनी, राजू नांढा उपस्थित होते.

Read More

साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव उर्वरित जिल्हास्तरीय जिल्हा असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय खो-खो १४ व १७ वर्षाआतील मुले व मुलींच्या खो-खो स्पर्धा येथील छत्रपती क्रीडा संकुलात नुकत्याच उत्साहात पार पडल्या. याप्रसंगी १४ व १७ वर्षाआतील मुलांच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात धानोरा येथील झि.तो. महाजन माध्यमिक विद्यालय आणि नामदेवराव भावसिंग पाटील ज्युनिअर कॉलेजच्या संघाने समाज विकास विद्यालय, शिंदाड दोन्ही संघाचा एक डाव २ गुणांनी पराभव करत विभागीय स्तरावर मजल मारली आहे. हे दोन्ही संघ विभाग स्तरावरील खांडबारा येथे होणाऱ्या सामन्यांसाठी पात्र ठरले आहेत. यावेळी राज्य क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात,…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ‘अनमोल नानकर फाऊंडेशन’ आणि ‘युवा मित्र मंडळ’ यांच्यावतीने दहिवदला सलग सहाव्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी परिसर स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. शिबिरात ४० युनिट रक्त संकलित करण्यात आले. शिबिरात रोहित वाघ, दीपक वाघ, सचिन वाघ, कुलदीप वाघ, वीरेश बागुल, निखिल निकम, सुनील महाजन, गोविंदा निकम, भूषण वाघ, सागर सोनवणे, नीलेश वाघ, लतीफ पिंजारी, दीपक ठाकरे, जितेंद्र वाघ, तुषार पवार, भूषण पाटील, गणेश देवरे, प्रसाद भोसले, ज्ञानेश्वर वाघ,…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहर महिला काँग्रेस, तेजस्विनी फाउंडेशन आणि आ.प्रणिती शिंदे विचार मंच, चाळीसगावतर्फे स्वच्छतेचा संदेश देत महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती शांतीनगरातील श्री संत नामदेव नगर, पवारवाडीत चाळीसगाव शहर महिला काँग्रेस कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी चाळीसगाव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अर्चना पोळ, गायत्री देवरे, मोनिका परदेशी यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी अर्चना पोळ यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि ‘जय जवान जय किसान’चा नारा देणारे देशाचे माजी पंतप्रधान तथा गृहमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. श्री संत नामदेव नगर, शांतीनगर, पवारवाडी, चाळीसगाव परिसरात सर्व महिलांनी स्वच्छतेचा…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी दि चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी. पी. आर्ट्‌स, एस. एम. ए. सायन्स अँड के.के. सी. कॉमर्स कॉलेज, चाळीसगावचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्याकडून उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्रदान केल्याबद्दल चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत तुकाराम कोळी यांच्या सुचनेनुसार सर्व ८ हजार ५०० सभासदांच्यावतीने चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आर.सी. पाटील यांच्या हस्ते जाहीर सत्कार करून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सर्व संचालक, पदाधिकारी आणि संस्थेचे सदस्य उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर यांनी सत्कार स्वीकारताना संस्थेच्या सर्व सभासदांचा ऋणी असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ आणि ऑल इंडिया फिल्म प्रोड्युसर टेक्निशियन अँन्ड आर्टिस्ट युनियनतर्फे विविध क्षेत्रात अष्टपैलु कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्यात चाळीसगाव तालुक्यातील तळेगावचे अनिल पगारे यांचा समावेश आहे. सामाजिक कार्याची व समाजाप्रती असलेल्या निस्वार्थ भावनेचा कर्तृत्वाचा सन्मान म्हणून त्यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. हा पुरस्कार ना.रामदास आठवले, शेखर मुंदडा (अध्यक्ष, गोसेवा आयोग महाराष्ट्र), अविनाश महातेकर (माजी राज्यमंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग), सिनेकलावंत आणि मान्यवरांच्या हस्ते येत्या शनिवारी, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईतील कस्तुरबा महिला मंडळाच्या हॉल माटुंगा येथे दिला जाणार आहे. अनिल पगारे हे…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या शिफारशीने तसेच ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव तालुका संजय गांधी निराधार समिती नुकतीच जाहीर केली आहे. समितीच्या अध्यक्षपदी हिरापूरचे भाजपाचे कार्यकर्ते भैय्यासाहेब आनंदराव पाटील यांची नियुक्ती केली आहे. इतर सदस्यपदी विविध समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. विधवा, दिव्यांग, अनाथ व वृद्ध गोरगरीबांसाठी महत्त्वाची असणाऱ्या शासनाच्या समितीवर गेल्या वर्षभरापासून अशासकीय पदे रिक्त होती. आ.मंगेश चव्हाण यांच्या सुचनेने पदावर १० अशासकीय सदस्यांची नियुक्ती केल्याने पुन्हा एकदा निराधारांच्या मानधन प्रकरणांना गती मिळणार आहे. समितीवर नियुक्त झालेल्या सर्व सदस्यांचे आ.मंगेश चव्हाण यांनी कौतुक केले आहे. चाळीसगाव तालुका संजय गांधी…

Read More